Ashwini Kulkarni

Others

3.0  

Ashwini Kulkarni

Others

विवाहबाह्य संबंध

विवाहबाह्य संबंध

5 mins
1.1K


    आज अचानक ज्या विषयाची छेड काढली, तो विषय नक्कीच चर्चेचा नाही... पण प्रत्येक तिसऱ्या घरातील समस्या नक्कीच आहे. विवाहबाह्य संबंध खरंतर विषय खूप नाजूकच आहे. पण डोळ्यासमोर दिसणारी काही उदाहरणे  बघता बोलण्याचा एक छोटासा प्रयत्न करावा. कदाचित हे सगळं प्रवाहाविरुद्ध जाण्यासारख असावं... पण हरकत नाही नीडरपणे स्वतःचं मत मांडण्यात कुणाची भीती काय बाळगावी, खरंतर आपण अशा समाजात राहतो तिथे अर्धा स्त्री वर्ग, आणि अर्धा पुरुष वर्ग खोट्या प्रतिष्ठेला बळी जाऊन मानसिक घुटमळीचा सामना करून जगत असतो. सतत कुणीतरी असावं समजून घेणारं... समजून सांगणार... असं त्याला वाटत असतं. 

     

आणि लग्नानंतर तर ही परिस्थिती अगदीच होते आणि मग तिथूनच सुरुवात होते पर स्त्री आणि पर पुरुष... मग आपण आपल्याचविषयी आपल्याच नात्यांच्या भावना विसरून जातो. दोघांमध्ये तिसर आलं कि हें होतंच सगळ्याच नात्याची सुरुवात छानच असते. लग्नानंतरही काही वर्षं खूप छान असतात.  मग मात्र एकमेकांना स्पेस हवी असते. हिच्यामुळे माझं अस्तित्वच राहिलं नाही आणि याच्यामुळे माझं अस्तित्वच नाही... अशा भावना दोघांच्याही मनात घर करतात. वाजतगाजत लग्न लावून आणलेल्या मुली आणि चारचौघात मिरवून आणलेला नवरा मुलगा आता चार भिंतीतही एकमेकांना नकोशी झालेली असतात. 

   

जगातलं सगळ्यात सुंदर आणि पवित्र नातं म्हणजे नवरा आणि बायको. जगात मानाचे स्थान मिळवायचं असेल तर तो नवरा कसाही असो बायको कशीही असो स्वतः खुश असो किंवा नसो, दुरून डोंगर साजरे होत आहे ना बस मग... अर्ध आयुष्य तर समाज काय म्हणेल यातच घालवतो आपण. फक्त त्यांच्या एकमेकांसोबत राहण्याचं एकमेव कारण म्हणजे त्यांची मुलं. मुलं ही नात्याची बहारदार उदाहरण असली तरीही नातं नेहमी चांगले राहिलंच असे

नाही. सगळ्यांना सगळं असून सगळं पटत नसतं. प्रत्येक वेळी चुक ही पुरुषाचीच असते असे नाही पण ती स्त्रीची ही नसते. कुठल्याही नात्याचा पाया प्रेम, आदर, विश्वास, काळजी आणि सगळ्यात महत्वाचं एकमेकांना देणारा वेळ... यावर अवलंबून असतो. पुरुषाच्या विवाहबाह्य संबंधाची कारणे भरपूर असतात. एकतर बायको सुंदर नसते, नाहीतर ती स्वभावाने चांगली नसते, किंवा घरातल्यांशी चांगली वागत नसते, किंवा मग हवं तेव्हा हवं ते सुख द्यायला ती असमर्थ ठरते. त्यामुळे तो तिच्यापासून दूर राहतो आणि एखादी स्त्री कुठल्याही पुरुषाशी मैत्री करते त्याचे एकमेव कारण तिला न मिळालेली त्याची साथ, न दिलेला आदर, न दिलेला वेळ आणि न दिलेले प्रेम, तिचा विचार एवढं करून मला अशी वागणूक मग मी अशीच का नको वागू... एक गोष्ट आयुष्यात समजली एखाद्या व्यक्तीला एखाद्या चुकीची शिक्षा मिळते जी त्याने केलेलीच नसते कधी...

 

     अशावेळी त्याने काय करावे ती चुक करावी की मग मुकाट्याने शिक्षा भोगावी... सगळं ठीक असतं नात्यामध्ये गरज असते ती काही स्वीकारण्याची आणि काही नाकारण्याची... मनातली व्यक्ती डोक्यात जाऊ नये एवढी काळजी मात्र घ्यावी नाहीतर त्या नात्याला काही अर्थ उरत नाही आणि मग अशावेळी त्याही गोष्टी दिसतात ज्या कधी केलेल्याच नसतात. पुरुषाला दोन प्रेमाचे शब्द पुरेसे आहेत. तुम्ही किती करता सगळ्यांसाठी तुमची कदरच नाही कुणाला... हायहाय... दुखत्या नसवरच बोट ठेवलं की पोरीने... मग काय हिच्याशिवाय मला कुणी नाही समजून घेणारं... पण अशा नात्यात का पडावं जे समाजाच्या दृष्टीने चुकीचं आहे ज्याला आपण स्वीकारू शकत नाही जे समाजात आलं की उध्वस्त व्हावं लागेल. 


आणि स्त्रीच त्याउलट काय यार तू कशा मुलाशी लग्न केलं त्याला तुझी कदर नाही तुला याच्यापेक्षा चांगला मिळाला असता. बस झाला मग विषय तिथून नव्या नात्याला पाझर फुटतो. एखाद्या परपुरुषाला किंवा परस्त्रीला सर्वस्व मानून माणूस स्वतः सर्वस्व उध्वस्त करत असतो. पण यात चुक कोणाची असते. समाजाच्या दृष्टीने लग्नरुपी सागरात राहून स्वतःचं मन मारून ऍडजेस्ट करून राहायचं. सध्या लग्न हा कौटुंबिक विषय नसून सामाजिक विषय झालाय... ती राहात नाही म्हणूनच ती चांगलीच नसेल. स्वतःच्या पद्धतीने नाण्याची एक बाजू पाहून लोक कॅरेक्टरचे सर्टिफिकेट देत असतात... वा रे समाज, पुरुषांच्या तुलनेत 70 टक्के बायका घुटमळत आयुष्य जगत असतात. स्वतःच्या इच्छा, अपेक्षा, स्वप्न सगळं मातीमोल करूनही स्वतःच्या संसाराची फुलं उमलवंत असतात.


एखाद्या पुरुषाचे विवाहबाह्य संबंध समाजात आले तर अरे तो तर पुरुष आहे ठीक आहे.. पण तीच जर नुसती मैत्री जरी स्त्रीने कुणाशी केली तर समाजाच्या दृष्टीने मोठा गुन्हा होऊन बसतो. मान्य आहे स्त्री नाजूक विषय आहे तिचं कॅरेक्टर म्हणजे काचेचं भांडे आहे, पण तिच्या मानसिक घुटमळीचं काय. चार पैसे कमावणारा निर्व्यसनी बायका-पोरांवर प्रेम करणारा मोठ्यांना आदर देणारा असा नवरा कुणाला नको असतो. मग अशा स्त्रीला बाहेर डोकवायची गरज नाही. पण नवऱ्याने मित्र, प्रियकर, सोडून फक्त नवरेगिरीच केली तर कसे चालणार... परस्त्रीशी तुम्ही मैत्री केलेली चालणार पण तीच मैत्री तुमच्या घरातील स्त्रीने कुणाशी केली तर घराण्यावर काळ कोसळतो का... तुमची इभ्रत ती इभ्रत, दुसऱ्याची काय भाजीपाला आहे, मार्केटमध्ये नवीन बातमी म्हणून बाहेर काढायला... अशा परिस्थितीत नवऱ्याने बायकोची आणि बायकोने नवऱ्याची साथ सोडली तर तो विषय कौटुंबिक न राहता सामाजिक होतो आणि समाज काय मग त्याच्या त्याच्या परीने अंदाज लावतो.


विषयामागचं सत्य माहिती नसतं नाण्याच्या दुसऱ्या बाजूचे माहिती नसतं पण अंदाज लावण्यात शास्त्रज्ञालासुद्धा मागे टाकतो. कोणीच साधुसंत नाही इथे नुसता माणुसकीपणाचा आव आणूच नाही. माणूस आहे चुकणारच तुम्ही काय त्याच्या जगण्याचा अधिकारच हिसकावून घ्याल का. लगेच याचे त्याचे मालक होऊ पाहताय... नात्यात अधिकार गाजवण्याआधी कर्तव्य पार पाडा, जगायला सोपं होईल नातं... माणसाची एक चूक आणि एक चुकीचा निर्णय तो स्वतः घेतो एकट्यासाठी पण त्याची किंमत प्रत्येक नातं मोजत असतं... खासकरून मुलं. कारण आई-वडिलांच्या भांडणात त्या कोवळ्या मनावर खूप परिणाम होत असतात... 


अशावेळी एकमेकांना समजून घेण्यात नि समजावून सांगण्यात खरी कसरत असते. पण त्यानंतर आयुष्य खूप सुंदर असते. आई-वडील, भावंडं मित्र-मैत्रिणी किंवा मुलं हे आयुष्यभर नसतात. आयुष्यभर साथ देणारी बायको असते आणि नवरा असतो... तिने थोडं समजून घ्यावं, त्याचे आई-वडील, भावंडं यांना सांभाळून घेतलं की बस तो जीव ओवाळून टाकील आणि त्याचप्रमाणे तिच्याही घरच्यांना आपलंसं केलं तर तीही सगळे आनंदाने करील... शेवटी नातं दोघांचं आहे. 


एकमेकांनी नात्यात स्पेस घ्या पण अंतरे कमी करण्यासाठी... ती वाढवण्यासाठी नाही. प्रत्येक नातं इतकं पारदर्शी असावं की एकमेकांची ओढ डोळ्यात दिसावी. तिथे गैरसमजाला किंवा तिसऱ्या व्यक्तीच्या येऊन सांगण्याला अर्थच उरत नाही. कारण नंतर पस्तावण्याशिवाय हाती काहीच लागत नाही. ज्यावेळी एकटा बघून समाज थट्टा करतो त्यावेळी आपण सगळ्यात किमती व्यक्ती हरवून बसलो याची जाणीव होते पण तेव्हा मात्र वेळ निघून गेलेली असते. त्यामुळे ती वेळ जाण्याआधी नात्यांना वेळ द्या... 


Rate this content
Log in