Ashwini Kulkarni

Others

3  

Ashwini Kulkarni

Others

तडजोड

तडजोड

2 mins
193


कधीकधी मन खरच खूप अस्वस्थ असत,,, का कदाचित याच उत्तर शोधूनही सापडत नसत !!!

 आज अचानकच खुप रडावसं वाटलं, का तेही माहिती नाही, खूप सुखही नव्हत, पण रडावे इतक दुःखही नव्हतं,, पण काहीतरी हवं होतं,, आणि काहीतरी नको होत,, पण ते शब्दात व्यक्त करणं जमत नव्हतं,, काही गोष्टी आयुष्यात खूप जखमा देतात, गोष्टी म्हणण्यापेक्षा अर्थातच काही नाती,... काही लोक आयुष्यात नकोशी असतात, तरीदेखील डोक्यावरती नात्याचे ओझे घेऊन चालण्याची सवय असते,, काही नात्याकडून असह्य होणाऱ्या जखमा मिळतात ते सोडून देण्यात सुख असत यांची जाणीव असून देखील माणूस त्या जखमांचा सुखद अनुभव घेत असतो. 

      पोळलेल्या जीवाला ही जखम सुखद फुंकर घालते आणि मग पडलेल्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी माणसाचे आयुष्य जिलेबी सारखं गोल गोल वेटुळ्यात अडकत जाते ,, 

आज सकाळ पासूनच विचाराने पारं डोक्याची वाट लावली, प्रश्न तर पडलाय  पण उत्तर मात्र सापडेना कदाचित प्रश्न चुकीचा पडला असावा,, 

सगळंच तर छान आहे मस्त दिलखुलास हवं असलेलं मग ही अस्वस्थता का? 

कदाचित काही गोष्टी मिळवण्यासाठी खूप काहीतरी गमवायची वेळ येते,, 

ध्येय गाठण्यासाठी चालत असताना वळणावरती बरच काही हरवाव लागतं, कदाचित याचंच नाव आयुष्य असत जे कधी आपलं नसतं तेच गमवायच्या भीतीत माणूस व्यस्त असतो...

 आणि ध्येय मिळाल्यावर मात्र काय गमावल हे ध्येयाच्या जाणिवेत पण नसतं... असो 

सतत का...याने येऊन नकारार्थी प्रश्न विचारावा, आणि त्याच्या उत्तराच्या शोधात मात्र आयुष्याने पुंन्हा शून्यातून जावं.

 सगळंच का सोपं नाही प्रत्येक वेळी हव्या असलेल्या गोष्टी मिळवण्यासाठी काहीतरी गमावणे आहेच!!!

 निसर्गाचाच नियमच आहे, !!! कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है!!! इथे तर सगळंच गमावून शून्य व्हावं लागत,, 

    समोर उभा असलेला अपेक्षांचा डोंगर दिसायला खूप लहान आणि सुंदर दिसतो, पण जेव्हा पार करण्याची वेळ येते तेव्हा समजतं आहे त्यातच समाधानी असणे .... यातच खरे समाधान आहे,, गुलमोहराचे झाड समोरून खूप सुंदर दिसते त्याच्या सावलीत आयुष्य घालवावे असे वाटते, पण जवळ गेल्यावर समजते ते खूप ठिसूळ असते कधी अर्ध्यावर साथ सोडेल माहिती नसते, 

 बऱ्याचदा आपण म्हणतो की स्वतःशी बोलल्यावर सगळे प्रश्न सुटतात, पण या प्रश्नांच्या गर्दीत स्वतःचा शोध तरी कसा लावावा,!!!म्हणूनच आज वाटलं विनाकारण खूप रडावं खूप रडावं!!!! हव असलेल मिळवण्यासाठी आहे ते गमवावं की समाधान मानून पुढे चालावं.. 

  पण जन्माला आलय तर काहीतरी मिळूनच मरावं का उगी रडावं का उगी रडावं !!!!


Rate this content
Log in