Ashwini Kulkarni

Others

3.8  

Ashwini Kulkarni

Others

वस्तुस्थिती

वस्तुस्थिती

3 mins
143


 काही दिवसांपूर्वी अचानक मुलीची तब्येत बिघडली होती. 

 मी तिला दवाखान्यात घेऊन गेले, तिथे दवाखान्यात काम करीत असलेल्या मावशी वर अचानक पणे नजर गेली. 

 तब्बल अर्धा तास एकटक मावशीकडे बघत बसले, पेशंटला आत सोडणे, 

 ओ मावशी आम्हाला सोडाना आम्ही केव्हाच आलोय असं म्हणत पेशन्ट ची कट कट त्यात नवीन आलेल्या पेशन्ट चे नाव टिपणे, आणि त्यातच अचानक एका व्यक्तीने आवाज दिला, ओ मावशी तो बाथरूम मधला नळ बंद करा टपटप आवाज येतोय केव्हाचा, 

   न राहून सहज विचारले मी मावशींना मावशी तुम्ही किती वाजता येतात हो ड्युटीवर त्या म्हणाल्या सकाळी नऊ वाजता आणि घरी जाण्याचा टाईम काही नक्की नसतं ग पेशंट असल्यावर, नाहीतर साधारण नऊ वाजता त्यादिवशी तर मला साडे नऊ वाजून गेलेले,  मावशी मग स्वयंपाक? .. "इथून गेल्यावर करेल की" सहज म्हणाल्या, "काही नाही ग त्यात एवढे सवय आहे मला"

 अर्धा तास मला त्या ठिकाणी बसणे अशक्य झाले होते. 

  सतत पेशंटच्या वापरात आलेल्या त्या वॉशरूमचा घाणेरडा वास, अस्वच्छ असलेला आजूबाजूचा परिसर असह्य होत होते मला,

  या कशा रोज राहत असतील बुवा इथे कुणास ठाऊक, 

   परिस्थिती माणसाला खूप काही शिकवते मावशीकडे बघितल्यावर लक्षात आले पोटासाठीच ना हे सर्व, आनंदाने तर कुणी करत नसावं..... 

    मला तसं का? माझेच असे का? अशी म्हणणारी मी त्यादिवशी अचानक पणे खूप वेळ शांत झाली. 

  या जगात कुणी सुखी नाही. 

 कधी कधी वाटतं माझ्याकडे आहे ते कुणाकडेच नाही जगात सर्वात सुखी मी आहे असे म्हणून चालावे. 

 माझ्याकडे असलेला अर्धा पाण्याने भरलेला पेला पण मी मात्र तरी रडते कि पेला अर्धाच भरलाय, किमान तो अर्धा तरी आहे... काहींकडे तर तेही नाही.

 त्यादिवशी वाटले एवढा कामाचा लोड, आजूबाजूचा अस्वच्छ परिसर, लोकांची बडबड कटकट, एवढं सगळं सहन करूनही मावशींच्या कपाळावर हलकीशी आठी सुद्धा नाही. 

  आणि त्यात पेशंटला दिलासा देणारे त्यांचे वाक्य अहो मागच्या आठवड्यात एक पेशंट असा येऊन गेला त्याला पण असा त्रास होत होता, पण आमच्या डॉक्टरांनी चार दिवसात बरे केले त्याला त्यांच्या अशा बोलण्याने पेशंट अर्धा तिथेच बरा होईल. 

   कसे असते ना आपण आयुष्यात ज्या गोष्टीला सर्वात जास्त घाबरत असतो, तीच गोष्ट आपल्या सोबत होते, आपल्याला जे कधी हरवायचं नसतं तेच आपल्याकडून हिरावल जातं. 

   आधी वाटायचं आपल्या जीवनाचे शिल्पकार आपणच आहोत, माझ्या आयुष्याचा निर्णय मीच घेते, मी जसे विचार करतो तसेच होईल, मी ठरवेल तेच होईल, या सगळ्या म्हणायच्या गोष्टी झाल्या, वास्तव्य काही वेगळेच असते म्हणून म्हणतात ना, राजाचा रंक, आणि रंकाचा राव कधी होईल सांगता येत नाही. 

   विधात्याने रचलेल्या ऊन सावलीच्या खेळांमध्ये माणसाचे स्वप्न मात्र माती मोल होतात. आणि आयुष्याची वाट लागते, पण मग अशा परिस्थितीत काय करावे जगणे तर आहेच, आपल्यासाठी नाही पण त्यांच्यासाठी ज्यांच्या जगण्याच कारण आपण आहोत, 

आयुष्याच्या कंट्रोल नक्कीच आपल्या हातात नसतो. 

  जे तो ठरवणार आहे तेच होणार, आपण फक्त तयारीत असावं वाईटातला वाईट विचार करून यापेक्षा अजून काय वाईट होईल हे म्हणून स्वतःला समजावाव. 

  देव बाप्पा भक्तांची अशी परीक्षा घेतो उंचावरून खाली ढकलून देतो आधी पण मात्र अर्ध्यावर झेलतो. 

मनावर शरीरावर एक खर्चट सुद्धा येऊ देत नाही.

 पण आयुष्य मात्र बदलून टाकतो या अपघातामुळे, संकटातही टाकतो पार जीव कोलमडून जातो, पण पुन्हा तारतो.

 प्रवाहात हात सोडतो पण बुडण्याआधी पुन्हा सावरतो, या अनुभवातून माणूस खूप काही शिकतो, आपलं कोण परके कोण ज्याची ओळख मात्र करून देतो, पण या सगळ्यात किंमत मात्र खूप मोठी मोजावी लागते, जाणीव असते, माहिती पण असतं कोण कसं पण मन वस्तुस्थिती स्वीकारायला तयार नसतं जीवन हे असच असतं कुठेतरी धरसोड करावीच लागते 

  पण मग अशा परिस्थितीत शांत, संयमी अस असाव लागत. 

  अशांत रागीट व्यक्ती वाईट नसते....

 त्याच्या असाहाय्यतेच्या भावनेने दुसऱयाला मात्र असहाय्य करून टाकतो 

   त्यादिवशी मुलगी आजारी पडली याचं खूप वाईट वाटत होत, पण तिच्या निमित्ताने नव्याने काही गोष्टी अनुभवल्या, आणि पुन्हा एकदा आयुष्याकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन बदलला, 

 आहे ते तसे स्वीकारणे ही आयुष्याची वस्तुस्थिती आहे...

 हे मात्र समजले आता मला म्हणून अनुभवाला गुरु का म्हंटले ओळखायला आले आता . ..



Rate this content
Log in