सोबत
सोबत
तू मला काहीच कस सांगितले नाहीस अरु ?
नात तूटले तरी मुलीचा बाप म्हणुन कायम राहणार आहे मी. परवा आई भेटल्या अचानक म्हणुन तुझ्या बद्दल समजले तरी.
सुशील आता जे झाल ते झाल त्यात बदल नाही ना होणार.
आपण चांगल्या डॉक्टर कड़े जावू तू नक़्क़ी बरी होशील.
नको सुशील आता काही होणार नाही.
अरु आयुष्यात कधी कधी चमत्कार ही होतात ग. मी कधी काळी प्रेम केले तुझ्यावर ,मला काळजी वाटणे साहजिकच आहे.
सुशील माझ्या साठी काही करणार असशील तर एक कर.
काय सांग मी सगळ करायला तयार आहे.
दोन महीने माझ्या सोबत माझ्या घरी राहशील.
म्हणजे मित्र मैत्रीणि सारखे राहु ना की नवरा बायको म्हणुन. ...हो सांगतो मी तुला लवकर.
माहित आहे मला सुशील तुला घरी बायको ची परवानगी घ्यावी लागेल.
बघ जमले तर माझी काही जबरदस्ती नाही.
पुन्हा एकदा तुझ्या सोबत चे क्षण जगायचे होते जाता जाता.
अरु प्लीज अस निर्वाणीच काही बोलू नकोस,तुला काही ही होणार नाही.
ऑलरेडी कैंसर झाला आहे सुशी.
हम्म्म्म मी सांगतो तुला आणि नेहा ला कन्विंस करतो.
अरुणा आणि सुशील चा प्रेम विवाह झाला होता. सुरवातीला सगळ छान चालल होत पन जस जसे स्वभावातले दोष कळू लागले तसे खटके उडु लागले एक मूलगी झाली तरी ही यांचे नाते घट्ट होण्या ऐवजी तूटत गेले. अरु मूली सोबत वेगळी राहु लागली आणि सुशील ने त्यांचा डिवोर्स झाल्या नन्तर वर्ष भरात नेहा शी लग्न ही केले. सुशील घरी आला. त्याने नेहा ला अरुणा बद्दल सांगितले तशी ती भड़कली सुशील तुला समजते का? काय बोलतोस तू दोन महीने तुम्ही एकत्र राहणार. आणि समजा अरुणा या कैंसर मधून बरी झाली आणि तुमचं एकमेकांवर पुन्हा प्रेम बसल तर?
नेहा अस काही ही होणार नाही. अरुणा संमजस आहे ग ती आपल्या मध्ये कधीच येणार नाही. तीची कंडीशन बघ जरा मानुसकीच्या नात्याने विचार कर..... सुशील ने ख़ुप नेहा ला समजावले तेव्हा कुठे नेहा तयार झाली.
सुशील ने रोज एकदा तरी तिला भेटायला यायचे या अटीवर नेहा तयार झाली.
सुशील ने अरुणा ला सांगितले आणि तो अरुणा कड़े राहायला आला. पूर्वा त्यांची मूलगी ख़ुप खुश झाली की बाबा आपल्या सोबत राहणार म्हणुन. दहा वर्षाची होती ती. अरुणा ची औषधे ,केमोथेरेपी सगळ चालू होत. सुशील तीची सर्वतोपरी काळजी घेत होता. काही तरी चमत्कार व्हावा आणि अरु यातून बरी व्हावी असच त्याला वाटत होते. पूर्वा सोबत ते दोघे बाहेर फिरायला जायचे. सुशील घरी वेगवेगळे पदार्थ बनवून त्या दोघीना खावु घालायचा. जमेल तितके तो अरु ला खुश ठेवत होता. सुशील ला एका नामांकित कैंसर तज्ञा बद्दल समजले तसा तो अरुणा ला त्या डॉक्टर कड़े घेवून गेला. सुशील चे प्रेम,काळजी बघुन अरु पुन्हा एकदा त्याच्यात गुंतत चालली होती. आणि सुशील ही नव्याने अरु च्या प्रेमात पडला होता कीती ही झाले तरी दोघांचे ते पहिले प्रेम होते एकमेकांचे! पण आता या गुंतन्याला काही ही अर्थ नाही हे दोघे ही जाणून होते.
नवीन डॉक्टर आणि वेगळी ट्रीटमेंट याने अरुणा च्या तब्येतीत थोड़ा फरक दिसू लागला होता असा पण तिचा कैंसर दुसऱ्या स्टेज ला होता.
सुशी माझ्या नन्तर पूर्वा ची काळजी घेशील ना रे कारण ती माझ्या नन्तर एकटी पड़ेल. आई ही आता थकली आहे.
अरु तुला काही ही होणार नाही तू स्व: ता कड़े बघितलेस का कीती बदल होत आहे. डॉक्टर ही म्हणाले मला,काही काळजी नका करू सकारात्मक विचार ठेवा कदाचित अरुणा यातुन बऱ्या सुद्धा होतील मग आपण का निगेटिव्ह विचार करायचा. सुशील म्हणाला.
अरुणा चा वाढदिवस जवळ आला होता आणि सुशील अरु सोबत राहुन दोन महीने होत आले होते. या दिवसात ख़ुप वेळा अरु च्या मनात आल की एकदा फ़क्त एकदा सुशी ला घट्ट मीठी मरावी आणि सांगावे त्याला की माझ प्रेम अजुन ही तुझ्यावरच आहे. पण तिचा सुशी आता नेहाचा नवरा होता ही गोष्ट ती विसरली नव्हती.
सुशील ने घर ख़ुप मस्त सजवले होते. आई ला घरी बोलवले होते.-केक कापुन ते सगळे जेवायला बाहेर गेले. घरी आले अरु थोड़ बोलायचे होते तुझ्याशी सुशील म्हणाला. पूर्वा ला झोपु दे मग मी येते तू गैलरीत बस तो पर्यंत. अरुणा थोड्या वेळाने सुशील कड़े आली. अरु उद्या डॉक्टरांनी बोलवले आहे तुझे रिपोर्ट्स येणार आहेत. जे आपण मुंबई ला पाठवले होते. हो बघू जे असेल ते असेल माझी सगळ्याला तयारी आहे सुशी फ़क्त पूर्वा ची काळजी वाटते. अरु काही नाही होणार सगळे रिपोर्ट्स चांगलेच असतील अस माझ मन सांगते मला. सुशी शेवटचे एक मागु. बोल काय हवे त्याने विचारले. मला तुला मीठी मारायची आहे रे. ये म्हणत सुशील ने आपले हात पुढे केले. अरुणा त्याच्या मिठित आली त्याने तिला घट्ट कवटाळले. अरु आय लव यू म्हणत त्याने तिच्या कपाळावर किस केले. सुशी आय लव यू टू म्हणत अरु रडू लागली. अरु नको रडू आपण नवरा बायको नसलो तरी मित्र म्हणुन कायम सोबत राहु. मी जीवंत राहिले तर ना सुशी ? अस नको बोलू अरु प्लीज त्याने तिच्या गालावर चे अश्रु पुसले त्याला राहवले नाही त्याने पटकन तिच्या ओठांवर आपले ओठ ठेवले तिला काही समजायच्या आत त्याने किस केले. ती ही त्याला मग प्रतिसाद देवू लागली. अरु तू हवी आहेस मला.. तिच्या नजरेत बघत तो म्हणाला. तिच्या चेहऱ्यावर ,मानेवर बेभान होऊन किस करत राहिला. दोघाना आता स्व: ता वर कंट्रोल ठेवने अशक्य झाले . त्याने तिला उचलून बेडवर आणले. एकमेकांच्या ओढ़ीने ते जवळ येत गेले आणि कपडयांचा अडसर दूर होत गेला. ख़ुप शान्त आणि समाधानाने अरुणा झोपी गेली. सकाळी ती उठली तर सुशील तिच्या बाजूला झोपला होता तिने हळूवार त्याच्या केसातुन हात फिरवला. तसा तो जागा झाला.
अरु आय एम सॉरी रात्री जे घडले ते घडायला नको होते. सुशी त्यात चूक माझी पण आहे तू सॉरी नको बोलूस. पण मी ख़ुप आनंदी आहे. सो अस काही बोलू नको आता आणि पुन्हा ही चूक होणार नाही कारण आज पासून तू तुझ्या घरी परत जाणार आहेस. अरु तुला आणि पूर्वा ला सोडून जावेसे वाटत नाही. सुशी हे एक स्वप्न होते अस समज वास्तव ख़ुप वेगळे आहे आणि आपल्या वाटा ही वेगळ्या आहेत. चल आवरून घेवू हॉस्पिटल ला जायचे आहे. दोघे हॉस्पिटल ला आले. डॉक्टरांनी अरुणा चे रिपोर्टस बघितले . अभिनंदन मिस अरुणा तुम्हाला ही औषधे चांगली सूट झाली आहेत ,तुम्ही लवकरच पूर्णपणे बऱ्या व्हाल. हे ऐकुन अरुणा चे डोळे भरून आले. सुशील ही आनंदी झाला. ख़ुशीत दोघे घरी आले. अरु मला ख़ुप आनंद झाला आहे. तू आता व्यवस्थित उपचार सुरु ठेव आणि काही मदत लागली तर मी आहेच. हो सुशी अरु जड़ अंत :करणाने म्हणाली कारण आता सुशील त्याच्या घरी जाणार होता. अरु म्हणत सुशील ने तिला आपल्या मिठित घेतले. स्व:ताची आणि पूर्वा ची काळजी घे म्हणाला. आणि माघारी न बघता पुढे निघुन गेला. सुशी तुझी ही औट घटके ची सोबत ही मला जगायला पुरेशी आहे रे अरु डोळ्यातले पाणी पूसत म्हणाली.

