#संसारातील तिची घुसमट
#संसारातील तिची घुसमट
संसार हा एक जीवनातील असा गाडा आहे, कि यात दोन्ही चाक भक्कम आणि समजूतदार पाहिजेत. यात एक चाक जरी डगमगले तरी आयुष्य अपूर्ण असते.नवराबायको हे एकमेकांचे साथी एकमेकांना सुखदुःखात साथ देणारे भक्कम चाक असतात. संसार म्हणजे एकमेकांच्या प्रेमाने, विश्वासाने पुढे चालेले चाक . एकमेकांचा आदर ही ठेवला पाहिजे.नवऱ्याने कधीही बायकोला पुरुषी अहंकार नाही दाखवला पाहिजे ! कधीही बायकोशी टोचून, मोठयाने बोलने तसेच हीन तेचि वागणूक दिल्याने बायको आतून खूप खचून जाते, पण तिला जर आदर, प्रेमाची वागणूक तर ती तेव्हडीच नवऱ्यावर आणि त्यांच्या कुटुंबावर प्रेम करते,आणि आपुलकीने सगळ्यांना आपले करून टाकते.
अशीच कहाणी घेऊन आले आहे, नीता आणि अजय ची !
अजय हा उंच, दिसायला गोरा, खूप देखणा . तो खूप मोठा बिसिनेसमॅन होता . तशीच नीता ही देखणी गोरीपाण पण ती घर सांभाळत होती. तीने तिचे शिक्षण इंजिनीरिंग मध्ये डिग्री पूर्ण केलेली होती, पण तीला सासरी अजिबात मोकळीक आणि स्वतंत्र कोणत्याही गोष्टीत नव्हते . नवरा आणि त्याच्या घरच्यांची बाहेर पडण्यासाठी परवानगी नसल्याने तीला स्वतःचे स्वातंत्र्य हिरावून घेतल्याचे सारखे जाणवत , कोणतीही गोष्ट करताना तिला नवऱ्याची कुटुंबाची परवानगी घ्यावी लागत. त्यामुळे ती आतून खूप नाराज होती . तिला ही वाटत आपण बाहेर पडून चार पैसे कमवावेत. तसें ती नवऱ्याशी खूप वेळा बोलली ही, पण नवऱ्याचं एकच उद्देश तो म्हणजे!" तिने चूल आणि मुल सांभाळावे, आणि' तुला काही कमी आहे का? दोन वेळच जेवण मिळतंय ना !!असे त्याचे आणि घरच्यांचे ही हेच म्हणणे होतें. यामुळे तिला लग्न केलेला खूप पच्छाताप झाला होता , पण तिचा काहीसा नाइलाज झालेला....!
घरात बसून तिला खुप बोर झालेले, त्यात सासूची सारखी चिडचिड, नाकडोळे मोडने,कामावरून सारखे काही ना काही बोलणे. तसेच नवरा ही सारखा घरातल्या कोणत्याही कामावरून किरकिर करत राहत. कधीही तिच्याशी चार शब्द प्रेमाने बोलत नव्हता . तसा तो कामामुळे घरातही खूप कमी असायचा . त्यामुळे तिला वाटत कि, आपण बाहेर पडलो कि आपल्याला जग कळेल, तसेच चार पैसे कमावले तर आपल्याला ही घरात किंमत मिळेल !'
"जी अजून पर्यंत कधीही मिळाली नाही" आपण ही एक स्वावलंबी आयुष्य जगू ! काही महिन्यातच तिला दिवस गेले , मग बाळामुळे तिला घरीच थांबावे लागले.तिला बाळाचे करता करता कधी वेळ जातो हे ही कळत नव्हते.
आज तिचे बाळ चार वर्षाचे झालेले होते . दिवस कसे पटकन गेले तिच्याही लक्षात ही येत नाही. तिच्या बाळाचा वाढदिवसानिमित्ताने सगळ्या पाहुण्यांना आमंत्रण दिलेले होते. नीता ने सर्व तयारी स्वतःच्या हाताने केलेली होती .रुचकर जेवणाचा बेत ही तिने केलेला होता. नीता सर्व तयारी करून झाल्यावर स्वतःताचे आवरायला घेते. खूप दिवसातून तिने तिच्या आवडीची रेड कलर ची साडी आणि केस मोकळे सोडून एक सुंदर क्लिप लावलेला होता.
ती आज खूपच सुंदर दिसत असते, लगेच तिची सासू तिला निळ्या कलर ची साडी नेसायला लावते. "का तर त्यांना आवडते म्हणून "! तिचा चेहरा लगेच पडतो. नवरा तिथं असूनही काही बोलत नाही त्यामुळे तिला खूपच वाईट वाटते. तीचा वाढदिवसाच्या पार्टीत पूर्ण मूड गेलेला असतो, पण तरीही खोट हसू आणून ती पार्टीत मिरवते.
तिची बालपणीची बेस्ट फ्रेंड स्नेहा ही आलेली असते. स्नेहाला मात्र जाणवते कि नीता अजिबात खुश नाही. ती तिच्याशी बोलते, तेव्हा नीता सर्व खरं सांगायला सुरुवात करते. तिला या संसारात फक्त घुसमट होते. तीला तिच्या मनासारखे ही वागता येत नाही, आणि नवराही कसलाच सपोर्ट करत नाही. मला या घरात फक्त मोलकरीनीचा दर्जा आहे . असे ही ती स्नेहा ला बोलते. तिला आता कळत कि नीता का खुश नाही. पण ती आईबाबान साठी सहन करत असते. त्यांना आपण माहेरी गेलो "तर उगाच टेन्शन कशाला !" तसेच शेजारी चे लोक काय बोलतील? यामुळे ती आपल्या लहान मुलाकडे बघून सगळं सहन करत असते.! असेच दिवस जात असतात. इकडं अजयचा व्यवसाय खूप वाढलेलला होता . त्याचे घराकडे अजिबात लक्ष नसत. नीता मात्र आपली जवाबदारी चोख पणे पार पाडत असते.
आज तिचे मन मारून केलेल्या संसाराला 20 वर्ष पूर्ण होतात. आज तिच्या लग्नाचा वाढदिवस असतो. आज तरी नवऱ्याने दोन शब्द प्रेमाने बोलावे. आज आपल्याला वेळ द्यावा असे तिला वाटत होतं,पण आज ही त्याला घरी येईला 11 वाजतात.
तिला तो एनिवर्सरी विश ही करत नाही, आणि त्याच्या लक्षात ही नसतो लग्नाचा वाढदिवस ! तो नेहमी प्रमाणे जेवतो आणि झोपी जातो. इकडे ती मात्र आतून पूर्ण तुटलेली असते. रडून तिचे डोळे सुजलेले असतात. ती मुलाकडे बघते आणि तिला तिच्या आयुष्यात आपण सगळ्या इच्छा, स्वप्ने यातील आपण काहीच पूर्ण करू शकलो नाही !" याचा पच्छाताप होतं असतो. वीस वर्ष झाले तरी लग्नाला तरी नवऱ्याच्या स्वभावात काही बदल झालेला नसतो.
आपण फक्त आयुष्यात आपल मन मारत जगत आलोय" याचे ही तिला खूप दुःख होते.
दुसऱ्या दिवशी सकाळी तिला उशिरा म्हणजे 8 वाजता जाग येते. तीच डोकं ही खूप जड झालेले असते. छातीत ही तिच्या कळ मारत असते. तसें ती चहा पिताना नवऱ्याला सांगते ही, पण नवरा ऍसिडिटीमुळे झाले असेल असे बोलतो, आणि निघून जातो.
ती च्या अंगात कसलच बळ राहिलेलं नसतं , तरीही ति सर्व रोजची कामे करत असते.घरात कोणीही नसतं. सासू सासरे लग्नाला आणि मुलगा शाळेत गेलेले असतो. दुपारचे 1वाजलेले असतात, तिला आता मात्र पित्ताची गोळी खाऊन ही बर वाटत नसत, ताप पण खूप आलेला असतो. छातीत खूप जोरात दुखत असते. तिला काय करावे काही कळत नाही शेवटी ती नवऱ्याला कॉल करते, पण तो मीटिंग मध्ये असल्याने कॉल उचलत नाही, नंतर पाणी पिण्यासाटी जाते तशी जोरात चक्कर येऊन खाली कोसळते. 3च्या सुमारास सासू सासरे लग्नावरून येतात.
दरवाजा उघडाच असतो. सासू दरवाजातूनच बोलते, साधं हिला दरवाजापण लावायचा जमला नाही. "नीता, अग नीता, कोठे आहेस तु? पाणी आण जरा, तिचा मात्र काहीच आवाज येत नाही. मग सगळीकडे पाहण्यासाठी ते दोघे जातात. नीता अजून तशीच फरशीवर पडलेली असते. तिला बेशुद्ध अवस्थतेत बघून दोघे ही घाबरतात. मुलाला कॉल करतात.
त्याचाही कॉल लागत नाही. नंतर ऍम्ब्युलन्स ला कॉल करतात. तिला पटकन हॉस्पिटल मध्ये घेऊन जातात. डॉक्टर चेक करतात, तिचा हार्टअटक ने मृत्यू झालेला असतो.
डॉक्टर येतात आणि तिच्या सासू सासर्यांना सांगतात "she's no more "असं सांगून निघून जातात. ते दोघे ही खूप रडतात पण रडून आता काहीही उपयोग नसतो. ते ही बातमी तिच्या नवऱ्याला सांगतात. तिच्या नवऱ्याला जेव्हा ही गोष्ट कळते, तेव्हा त्याला खूप मोठा धक्काच बसतो, तो खूप रडतो. त्याला एक तिने लिहून ठेवलेली डायरी सापडते, त्यात तिने स्वतःचे लग्नाआधी आणि लग्नानंतर चे आयुष्य ! स्वतःची स्वप्न, त्यात कोणतीही पूर्ण झालेली नसतात. ती डायरी बघून अजून तो खूप रडतो, "आज तो तिच्यासाठी रडत असतो ! ती मात्र त्याला बघायला राहीलेली नसते. हे जग सोडून निघून गेलेली असते, ती कधीच जगाला निरोप देऊन अनंतात विलीन झालेली असते, आणि
त्याला आज तिची किंमत कळत असते !!
संसार करताना नवरा बायकोने एकमेकांनची काळजी तसेच किंमत ही केली पाहिजे. एकमेकांना कमी न समजता, एकमेकांनचे कौतुक करून एकमेकांनचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सपोर्ट केला पाहिजे...
तेव्हा तो संसार आणखीन च सुंदर होतो..... !!!
