स्मरणांची संचितं
स्मरणांची संचितं
निसर्गाने मानवाला जन्मासह अनेक गोष्टी बहाल केल्या जसे की मन व भावना त्या सांर्याच केंद्र असलेला मेंदु नैसर्गिक महासंगणक जो आयुष्यातल्या सार्याच गोष्टीच जगण्याच्या वाटेवर आलेल्या अमाप अशा अनुभवांच माणसांच संचित जपुन ठेवतो.काही गोष्टी वाईट असतात काही चांगल्या असतात अशाच भल्या बुरया आठवणीचा ठेवा मनुष्य कधी कधी निवांत क्षणी ऊघडून मागे वळून पहाताना कधी हसत असतो कधी हळवा होत असतो जन्म घेता क्षणी या जगाशी आपला ज्ॠणानुबंध जुळतो.पुढे हळु हळु मोठे होताना आपलया पालकांच्या छतरछायेत लहानपणाचे सारे लाड आपण पुरवुन घेत असतो सध्याच्या काळात तर आठवणी जपुण ठेवण्यासाठी इलेक्ट्रीक माध्यम मोलाची भुमिका बजावत आहेत अगदी जन्माला आल्यापासून पहीला घास घेईपर्यंत नि पहील पाऊल टाकल्यापासून पुढे शिक्षण वा नोकरी निमित्त बाहेर दूरदेशी जातानाच्या प्रत्येक क्षण आपण मोबाइल मधये टिपत रहातो.एकुनच काय आठवणी काळाच्या ओघात विरून न जाता आपल्या हृदयाच्या मेंदूच्या कुपीत बंदिस्त असतातच त्यासह मानवाने निर्माण केलेल्या तंत्रज्ञान त्या जपुन ठेवायला मोलाचे सहकार्य करते...........हो असतात आठवणी कडु नि गोड कधी हसवणारया तर कधी नकळत डोळ्याच्या कडा ओलावणारयाआपल्या लहानपणी आई आपल्याला तिच्या लहानपणाच्या गमती जमती ऐंकवते तेव्हा आपल्या मनात आलेल्या भावना विचार आपण जेव्हा पुढे आपल्या मुलाबाळांना कींवा इतर लहान मुलांना ऐकवतो तेव्हा पुन्हा नव्याने तो काळ जगायला लावतात आपल्या बालपणात घेऊन जातात.पूढे शाळेच्या आठवणी तर जन्मभर सोबत रहातात तो एक वेगळाच कप्पा असतो अगदी गणवेशापासुन शाळेत भेटलेल्या नव्या कोऱ्या बालभारती चा सुवास आजही जसाच्या तसा मनात दरवळत असतो अगदी कालपरवाच तर होतो ना आपण शाळेत असे भास निर्माण करतो शाळेचे मैदान वर्ग बाक शिक्षक मित्र मैत्रीणी सहली स्नेह संमेलनातील गमती शिक्षकांना ठेवलेली नावे एकत्र येणे जाणे वाटून खाल्लेला डबा परीक्षेत चोरून जीवलग मैत्रीणीला दाखवलेल्या ऊत्तर पत्रिका कीती आठवावे नि किती सांगावे पूढे माध्यमिक शाळेतले शेवटचे वर्ष दहावीचे स्नेह भोजन मग रडणे कधीही न विसरणे एकाच काॅलेजमधये जाण्याचे बेत सारच हृदयात भरून पुढच्या मार्गाला लागतो आपण मात्र आठवणी सोबत येतात पुढे महाविद्यालयिन जीवनात तर वेगळीच मजा असते जी कायम आठवणीनं रहाते जणू हा आयुष्याचा सुवर्ण काळ असतो ना कोणती फिकीर ना पर्वा तारुण्य मनसोक्त बहरत असत मित्र मैत्रीणीच्या सहवासात तर फुलुन येत आपल्याच मस्तीत जगतं रहात.तसच एक प्रकारच आकर्षण ही आसत कोणीतरी खास असत ज्याच्या सोबत आयुष्य घालवण्याच्या आणाभाका घेतल्या जातात पंरतु मार्ग वेगळे होतात त्या आठवणी अनमोल असतात कोणावर तरी केलेल्या अपार प्रेमाच्या दिलेल्या वाचनाच्या तुटलेल्या नात्याच्या विखुरलेल्या मनाच्या जे असत पहिल प्रेम त्यात गोडवा असतो तितक्याच कडवट होतात जेव्हा कोणितरी फितुर होऊन आपल्याला उध्वस्त करूण जातं सोडून जातं पंरतु आपण कधीच माफ करून टाकलेल असत कारण काहीक्षणाच का होइना हळव्या प्रेमाचा निखळ स्वंच्छद जगण त्या मुळे आपल्या वाट्याला आलेले असते पुढे कीतीही भारी जोडीदार भेटला तरिही पहील्या प्रेमाच्या आठवणी मनुष्य कधीही विसरू शकत नाही असे बरेच लोक म्हणतात.बापलेकीच्या बहीण भावाच्या नात्याचे बंध प्रेमळ अतुट लेक सासरी गेल्यावर तिची ऊनिव भासल्यानं कितीही कठोर वाटणारा व कधीही डोळयात अश्रू न आलेलया पित्याचे डोळे लेकीच्या आठवणीने पानावतात तसेच बहीण भावाचे नाते कीती छोटया छोट्या गोष्टींसाठी अगदी आईची लाडकं कोण जास्त आहे इथपासून टिव्ही च्या रीमोटसाठी सुद्धा भांडलेली भावंड दुर गेलयावर आठवणीने कासावीस होतात सोबत घालवलेले क्षण आठवून कधी हसतात तर कधी रडतात.........................नात्यांच्या पलीकडे ही काही लोक आपल्याला कधीतरी कुठलयातरी अशा वळणावर भेटतात ज्यावेळेस आपल्याला खरी मदतीची गरज असते आपण असंख्य संकटाचा सामना करीत असतो कूठलीच दिशा न सापडल्याने आपल्या जीवनाची दशा होऊन जाते अशा वेळेस जर कोणि मानवतेच्या नात्यातून आपल्या साठी ऊभे राहीले तर त्या माणसाला आपण कधी विसरू शकु काय?जशी वाइट वेळ आठवणीत रहाते तसेच त्याकाळात धीर दिलेली व्यक्ती ही कायम आपल्या स्मरणात रहातात आपण त्या व्यक्तिचे उतराई कोणत्या प्रकारे होऊ शकु असे विचार सतत मनात येतात कारण मनुष्य एकवेळ सुखाच्या काळात सोबत राहीलेली माणसं विसरेल पंरतु कठीण काळात पाठबळ दिलेल्या व्यक्तीसाठी मनात शेवटपर्यंत एक आदराचा ठेवा जपत राहील..........................अशा या आठवणी पंरतु काही अशा असतात ज्या कायम स्वरूपी आठवणच बनून रहातात.आपल्या अत्यंत जवळच्या माणसाला अचानक गमाविल्यानंतर तो कायमचा आयुष्यातुन वजा झाल्यानंतर फकत त्याच्या आठवणींचा आक्रोश करत आपण जगतो ना ती एक भयानक अनुभूती जी कधीही कोणाच्याही वाटयाला येऊ नये आपल माणुस आपल्याला सोडून हे जग सोडून कायमचा निघुन जातो मागे ठेवतो फक्त आठवणींची शिदोरी त्याच्या सोबत घालविलेले दिवस महीने वर्षानुवर्ष आपण आठवत रहातो कधी हसतो कधी रडतो का दूर जातात अशी माणसं जाताना आपले सौख्य हास्य आनंद सारच घेऊन जातात नि मागे खुप सारे प्रश्न ठेऊन जातात जे कायम निरुत्तरीत असतात.अशा आठवणी शेवट पर्यंत आपल्या सोबत असतात.
