सखी तु जेंव्हा ...
सखी तु जेंव्हा ...
सखी, तू जेंव्हा हासत आलीस माझ्या घरी
प्रीतपुष्प उमलले माझ्या स्वप्नवेलीवरी ...
असशिल जरी तू मज जवळ नी खूप दूरवरी
असतेस परंतु रात्रंदिनी माझ्या नेत्रपटलावरी
शोधू तरी तुला कोठे अनं कुठवरी?
भेटशील का मला तू कोठे? केंव्हा तरी
येतेस स्वप्नात माझ्या बनुनी लाल परी
कधी होशिल तू माझी हीच काळजी अंतरी
असशिल जिथे कुठे तू जगाच्या पाठीवरी
वाट पाहतो मी सखी तुझी चातकापरी.
भासतेस मला त
ु हरणासम म्रॄगजळापरी
कधी वाटते विसरूनी तुला जावे गोड स्वप्नापरी
कधी वाटते प्रेमलता बनुनि फुलावे तुझ्याच दारी
मुक्तपक्षी बनुनि तुज भेटावे नदीच्या पैलतीरी
होतीस सखी तू जीव की प्राण; का गेलीस ?
सखी, येवूनी जीवनी माझ्या वाद्ळापरी
ऐक सखये, प्राणज्योत माझी मालवली जरी
दिसेल तुजला त्यात तुझीच आकॄती बावरी
मागेन देवाला हेच मागणे जोडूनी दोन्ही करी
भेटेन सखये तुजला अखंड जन्मजन्मांतरी.