Mahesh V Brahmankar

Romance Fantasy Inspirational

3  

Mahesh V Brahmankar

Romance Fantasy Inspirational

श्याम

श्याम

8 mins
182


श्याम एक हुशार, हजरजबाबी, व ध्येयवादी तरुण. आई वडिलांची परिस्थिती अतिशय गरिबीची व व्यवसाय शेतीचा. श्यामचे दोन अतिशय जिवलग मित्र वैभव आणि शिरीष. श्याम ह्याचे अभियांत्रिकी विद्यालयात अंतिम वर्षी शिक्षण घेताना. कॉलेजचा सगळ्यात हुशार विद्यार्थी पण तेवढाच आलरोउंडर. खेळ, अभ्यास, तसेच कॉलेज च्या सर्व सांस्कृतिक कार्यक्रमात पुढे, मुली तर सर्व त्याच्यावर फिदा. त्याला आवड संशोधनात.नजर त्याची नेहमी वेगळ्या दृष्टीने पहायची, प्रश्न नेहमी मनाला विचारायचा, असे का? एकदा त्याने विचार केला की आपण असे काही संशोधन करू की त्याने सामान्य जनतेला व शेतकरी वर्गाला काही तरी चांगला फायदा होईल असे काही तरी करु. माधुरी नावाची मुलगी त्याच्या प्रेमात पडली. आकाश आणि मुकुंद एकदम टपोरी. तिघेही रूम पार्टनर. मुलींचा नाद तिघांना, अगदी टर उडवण्यापासून तर प्रपोझ करण्यापर्यंत तिघेही अव्वल.


माधुरी ही कॉलेजची सुंदर मुलगी जी श्यामला मनापासून आवडायची, आणि श्वेता व अर्पिता तिच्या खास मैत्रिणी.कॉलेजची कॅन्टीन म्हणजे श्यामचा कट्टा. सकाळी उठले की सर्वजण पक्क्याच्या कॅन्टीनवर,वैभ्याला सिगारेट ची सवय तर पचक्या शिर्याला चुना लाऊन तंबाखूची सवय. सकाळी कांदेपोहे , भजी काय की मिसळपाव काय तिघे अगदी धमाल करत.अभ्यासाच्या बाबतीत तर श्याम खूप हुशार, एका रात्रीत अभ्यास करून पेपर मध्ये नेहमी टॉपर, कॉलेज मध्ये नेहमी lecture ला नेहमी हजर राहुन lecturer च्या कुठल्याही प्रश्नांचे उत्तर श्यामचे तयार असायचे. उलट श्यामने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर प्राध्यापकाकडे कधीच नसायचं, कारण साहेबांचे लॉजिक खुप जबरदस्त. कॉलेजच्या विज्ञान प्रदर्शनात तर श्यामने अतिशय सुंदर प्रोजेक्ट केला. त्याने तर विना इंधनाचे सौर उर्जेवर चालणारे वाहन तयार केले, ज्याला चार चाके व 1 क्विंटल सामान लोड होईल अश्या पद्धतिचे ते वाहन. मग ते शेतकरी असो की शहरातील फेरीवाले असो ते आपला माल त्यात वाहून ते आपला उदरनिर्वाह करतील अशी ती गाडी श्यामने बनवली. या गाडीचे वैशिष्ट्य म्हणजे ती तासी 40किमी ने पळू शकते म्हणजे शेतकरी त्याचा घरापासून शेतापर्यंत तर थेट शहराच्या मार्केट पर्यन्त तो शेतीमाल वाहू शकतो, तर दुसरीकडे गरीब हातफेरीवाला कुठेही त्याचे दुकान तो त्या वाहनात लावू शकतो ,म्हणजे एकीकडे इंधनाची बचत तर दुसरीकडे फेरीवाले याना दुकानाचे भाडे द्यायची गरज नाही तर शेतकऱ्यांना थोड्या गोष्टींसाठी भाडे द्यायची गरज नाही. हा प्रोजेक्ट प्राचार्य व बाहेरील पर्यवेक्षक याना खूप आवडला. व त्याला त्याचे प्रथम पारितोषिक पण देण्यात आले.

      

परिस्थिती नसतांनाही श्याम ने ध्यास सोडला नाही शिक्षणाचा, त्याची कॉलेज ची फी पण त्याचे मित्र व प्राध्यापक भरत कारण श्याम हा विद्यापिठात पण तिघेही वर्षी सर्वप्रथम आला होता, म्हणूनच पाध्यापकाना थोड्याफार श्यामच्या खोड्या दुर्लक्ष कराव्या लागायच्या. नन्तर मग कॉलेजचं वार्षिक स्नेहसंमेलन आलें आणी श्यामला स्नेहसंमेलनासाठी सांस्कृतिक सचिव म्हणून बिनविरोध निवडण्यात आले. श्याम हा सूत्रसंचालन पण छान करायचा तसेच तो चांगला डान्सर पण होता व एक चांगला अभिनेता. श्याम ने स्नेह संमेलनात एक नाटक बसवले व माधुरीला त्याने अभिनेत्री म्हणून निवडलं कारण त्याला ती खूप आवडायची व श्याम त्या नाटकातला अभिनेता. असे करत करत स्नेहसमेलनाच्या चार दिवसांत मधुरीपन श्यामच्या प्रेमात पडली , तिला पण तो आवडायचा पण तीने ते कधी समजू नाही दिल . स्नेहसमेलनातही श्यामच्या नाटकाला प्रथम पारितोषिक मिळाले व त्याने पूर्ण चार दिवसाचे नियोजन अतिशय सुंदर केले त्याच्यात वैभव आणि शिरीष ने त्याला साथ देऊन मोलाची कामगिरी बजावली.


       आता माधुरी व श्याम कार्यक्रमानंतर भेटायला लागलें कॉलेज संपलेकी ते दररोज भेटत असत आणि अशातच श्यामने तिला आलेल्या व्हॅलेन्टाईन डे ला प्रोपोझ केले. पण माधुरी ही श्रीमंत घराण्यातील मोठ्या उद्योजकाची मुलगी. तिने तर प्रोपोझल स्वीकारले व दोघेही पुढे एकमेकांशी लग्न करण्यास तयार झाले. अभियांत्रिकी च्या अंतिम सत्राच्या परीक्षा संपल्या. व पुन्हा श्याम कॉलेज व विद्यापीठात सर्व प्रथम आला. दस्केबर्डीगावी त्याचे जँगी स्वागत झाले. त्याला त्याच्या आईवडिलांविषयी त्याला खूप अभिमान होता कारण श्यामच्या आईने त्याच्या शिक्षनासाठी सर्व दागिने व वडिलांनी पूर्ण जमिन गहाण ठेवली होती. एकीकडे गाव आनंदाने नाचत होते तर श्याम व त्याचे आई बाबा ढसाढसा रडत होते, त्यांना ते कळत नव्हते की ते आनंदाश्रू आहेत की त्यांनी केलेल्या कष्टाची विरह अश्रु आहेत. श्यामने मात्र ठरवले की मी माझ्या आईवडिलांना काही कमी पडू देणार नाही व अडचणी च्या वेळेला कामात येणाऱ्या गावाचा विकास मी करीन असा त्याने निर्धार केला. 


       पुढे माधुरी व शाम यांनी एम.टेक. करायचे ठरवले व पूर्वपरीक्षेत पुन्हा श्याम महाराष्ट्रात सर्वप्रथम आला आणि पुढच्या शिक्षणाचा खर्च महाराष्ट्र शासनाने उचलला व बघता बघता श्यामचे एम. टेक. पूर्ण झाले व पुढे त्याने दिल्लीला जाऊन भारत सरकारच्या शिष्यवृत्ती ने त्याने पीएच.डी. पण पूर्ण केले व ते डॉक्टरेट श्याम झाले. डॉक्टरेट बनता बनता श्यामने सुंदर असे वेगवेगळे प्रोजेक्ट केले व त्याला शासनाकडून गौरविण्यात आले.


       आता श्यामला भाभा संशोधन केंद्रात चांगली नोकरी मिळते व तो आणि त्याचा परिवार अगदी आनंदी होतात. आता श्याम माधुरी ला लग्नासाठी मागणी घालण्यासाठी माधुरीच्या घरी जातो. तिथे मात्र काही तरी उलटेच होतें. माधुरी चे बाबा श्री पतंगराव म्हणतात की श्याम मी माझ्या मुलीला खूप लाडाने वाढवले आहे मी तुझे चातुर्य बघून माझी मुलगी तुला द्यायला तयार आहे पण एका अटीवर...

      माधुरी व श्याम दोघे थक्क झाले व दोघे एक मेकांकडे बघून एकाच आवाजात म्हणाले कुठली बाबा?

      पतंगराव म्हटले मी तुला एक 1500 sqft चा उत्तुंग फ्लॅट व एक BMW देतो.. 

     दोघेही एका आवाजात काय...... किती मज्जा - श्याम माधुरी

     पण....


श्याम तू तुझ्या म्हातारड्या अडाणी आईवडिलांना तिथे कधीच आणणार नाहीस , तू त्यांना विसरायचं! श्याम चक्कर येऊन खाली पडला. माधुरी चिडून तिच्या बाबांना म्हटली की बाबा ही कसली भाषा ,जर तुम्ही त्यांच्या आईबाबांना सोडायला लावता तर मी पण तुम्हाला सोडले पाहीजे का?? 

मग माधुरी श्यामला कवेत घेऊन तोंडावर पाणी मारत त्याला शुध्दीवर आणले, मग श्याम उठत म्हटला, बाबा मी तुमचा मी खुप आदर करतो पण असे म्हणून तुमची प्रतिमा माझ्या मनात मलीन झाली, अरे तुम्ही तुमच्या मुलीचा संसार बसवायला निघाले आणि तुम्ही माझ्या आईवडिलांना तोडायला निघाले. माधुरी म्हणाली मी बाबा श्याम शिवाय दुसऱ्या कुणाशीही लग्न करणार नाही. पतंगरावानी तिच्या कानफटात लावली आणि म्हटले जा तू घरात येथून पुढे तू त्याच तोंड नाही पहायच. माधुरी रडत म्हणाली मी जीव देईन पण दुसऱ्या मुलाशी लग्न करणार नाही!


मग श्याम म्हटला डोळे पुसत, बाबा मी तुमच्या मुलीशी जीवापाड प्रेम केलंय. पण आई वडिलांशी पण तेवढंच , कारण मी आज जे काही आहे त्यांचा मुळे... मला माधुरी हवी आहे, हम हमारी दुलणीया जरुर लेके जायेंगे , तेहि थाटामाटात चोरून लपुन नाही!

बाबा (पतंगराव) तुम्हाला पैशाचा अभिमान आहे आज माझ्याकडे तो नाही म्हणून तुम्ही मला बंगला गाडी दयायला निघालेत. मला काही नको मला फक्त माधुरी हवी, मला एक वर्षांची मुदत द्या , तुम्ही मला माधुरी मला तुमच्या हाताने द्याल. मी तुम्हाला पैसाच नाही पण माझं नाव देशाविषात गाजवून दाखवतो आणी मला आत्मविश्वास आहे की तुम्ही माझी पाट थापाल असा जावई जाऊन मिळाला नसता.

ठीक आहे श्याम तुला एक वर्षांची मुदत देतो पण तु तो पर्यंत माधुरीला भेटणार नाही याचं वचन दे .

श्याम माधुरी हुंदके देऊन रडायला लागले, पण श्याम हृदयावर दगड ठेवत म्हणाला, माधुरी प्रिये रडु नको मला एक वर्ष वेळ दिलाय मला बाबांनी ,, माझ्या प्रेमाखातर त्यानीं मला एवढा वेळ दिल्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे.

एक साल बाद हम हमारी दुलनिया जरूर लेके जायेंगे, तेथून पतंगराव तिला तेथून तिला ओढत नेतात , दोघेही खूप रडतात , अंगावर शहारे येतील असा तो क्षण....


संध्याकाळी श्याम वैभ्या व शिर्या ला कॉलेजच्या कॅन्टीनला बोलावतो, व दोघे जिवलग मित्र त्याचे सांत्वन करतात, वैभ्या म्हणतो अरे आपण माधुरीला पळवुन आणू आणि त्या टकल्या पतंग्याला धडा शिकवू ... शिर्या म्हणतो त्या टाळ्याला उचलून आणू आणि त्याच्या समोर तुमच्या दोघांचं लग्न लावून देतो.

श्याम म्हटला चूप बसा तो माझा होणारा सासरा आहे त्याला माझ्या आई वडिलांच्या पायांशी लोटांगण घालायला लावेल व त्याच्या हाताने तो माझ्या माधुरीचा हात माझ्या हातात देईल हेच त्याचे प्रायश्चित, तोवर जर त्याने माझ्या माधुरीच त्याने काही केले तर त्याची खैर नाही.

 घरी गेल्यावर आई वडीलाना भेटतो व ढसा ढसा रडतो, आई बाळ तू आज नाराज दिसतोय, काही झाले का रे..

नाही आई

बाबा म्हणतात मला माझ्या श्यामचे हात पिवळे करायचे आहेत..

नाही बाबा एका वर्षात तुमची सुनबाई घरात येईल ,डोळे पुसत व गालातल्या गालात हसत.

मला फक्त तुमचां आशीर्वाद द्या मला एक वर्ष खूप मेहनत घ्यायची आहे .

दोघे म्हटले आम्ही सदैव तुझ्या पाठी आहोत. असे म्हणत तो आईबाबांना घेऊन मुंबईला आपल्या फ्लॅटवर निघाला.


श्यामने पुढे आपल्या भाभा रिसर्च सेंटरला जॉब करता करता आपले संशोधन चालू ठेवले. श्यामने चक्क दिवस रात्र मेहनत घेऊन बायोगॅस चा वापर करून विमान चालू शकते असे संशोधन केले, याने शेतकऱ्यांना बायोगॅस निर्मिती साठी वेगवेगळे प्रकल्प उभारून रोजगार मिळाला व नैसर्गिक इंधनाची बचत झाली. त्याला या संशोधनाने देशविदेशात ख्याती मिळाली. त्याच्या अगोदर श्यामने कॉलेजमध्ये असताना सौरउर्जेवर चालणाऱ्या वाहनाचा शोध लागला होता. ह्या संशोधनाच्या अनुषंगाने श्यामचे सर्वत्र कौतुक होते व त्याला भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्काराने राष्ट्पतींच्या हस्ते गौरविण्यात येते.व तो भारतरत्न मिळवणारा सगळ्यात कमी वयाचा व्यक्ती ठरतो. असे करत करत श्यामचे वार्षिक उत्पन्न हे वर्षाला 12 कोटी रुपये होते कारण त्याला देशा विदेशातील प्रोजेक्टच्या ऑफर्स यायच्या. त्याने या सगळ्या गोष्टींचा फायदा आपल्या दस्केबर्डी गावाला ही केला, पाणी वीज रस्ते व सर्व शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकासपण केला. 


      भारतरत्नाची बातमी जेव्हा पतंगराव टिव्ही वर बघतात तेव्हा ते थक्क होतात, श्यामचे देशविदेशातील नावं बघून त्यांच्या तोंडाचे पाणी पळाले. आणि माधुरी ला बोलवतात व म्हणतात माझ्या जावयाला फोन लाव मला त्यांना आताच्या आता भेटायचे आहे, रामू ड्रायव्हर गाडी काढा. माधुरी खूष व आनंदाने तिने बाबांना मिठी मारली.


     पतंगराव थेट मरीन ड्राइव्ह च्या श्यामच्या बंगल्यावर, बंगला बघून पतंगराव थक्क सेक्युरिटी वाले त्यांना अडवतात, व म्हणतात साहेबाना आता भेटता येणार नाही, मग माधुरी म्हणते त्यांना माधुरी आली आहे असे सांगा. मग हे सर्व श्यामला कळल्यावर श्याम अतिशय खुश होतो व म्हणतो त्याना ताबडतोब पाठवा आत. पतंगराव आत आले व श्यामच्या आईवडिलांची माफी मागतात दादा ताई मला माफ करा जावई बापु मला माफ करा. तुम्ही मी सांगितल्या प्रमाणे एका वरश्याच्या आत एवढी प्रगती करून दाखवली, व मी एका चांगल्या माणसाची पारख करू नाही शकलो. माधुरी व श्याम दोघे एकमेकांना बघत त्यांचे डोळे पाणावले व चक्क दोघांनी एकमेकांची गळाभेट घेतली. मग श्यामचे बाबा म्हणतात अहो पतंगराव मला श्यामने सर्व हकीकत सांगितली तुम्हाला तुमच्या चुकीचे जाणिव झाली हेच तुमच्या चुकीचे प्रायश्चित. माझी सुनबाई आम्हाला एका वर्षनन्तर पहायला मिळाली, माझ्या श्यामला ती मनापासून आवडते म्हणून आता लवकर महूर्त शोधून धुमधडाक्यात लग्न लावून टाकू. हे सर्व बघून पतंगराव ढसाढसा रडायला लागतात, व म्हणतात अश्या मोठ्या मनाची लोक खूप कमी असतात मी पैशानच्या गुर्मीत तुम्हाला तुमच्या मुलापासून दूर करायला गेलो. मला माफ करा वासुदेवराव (श्यामचे वडील). हसतहसत म्हणाले जा माधुरी जा तुझ्या श्यामकडे, ले जा तेरी दुनिया को श्याम! माधुरी व श्याम आनंदाने गळाभेट घेतात व दिलवाले दुलनिया मधल्या क्षणाची आठवण आली.


    अशाप्रकारे वासुदेवराव म्हणतात पुत्र व्हावा ऐसा त्याचा त्रिलोकी झेंडा, असे म्हणत माधुरी व श्याम आईवडिलांचे दर्शन घेऊन लग्नाच्या तयारीला लागतात व लग्न थाटामाटात पार पडते. श्यामचा आदर्श सगळ्यांनी घ्यावा असा तो श्याम...


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance