Mahesh V Brahmankar

Others

4.3  

Mahesh V Brahmankar

Others

समाजसुधारक

समाजसुधारक

1 min
176


समाज सुधारक हा सत्य शोधक असतो. तो समाज सुधारण्यासाठी, त्यागाची भूमिका ठेवतो, व सहनशिलता ठेवतो. बऱ्याच समाज सुधारकांनी, स्वातंत्र्यासाठी लढा दिला. आता 21 व्या शतकात आपल्याला समाज सुधारण्यासाठी प्रत्येकाने पाऊल उचलण्याची गरज आहे. आज तर संस्कृती लयास चालली आहे. यासाठी आपण काय करू शकतो, तर यात शासन पण काही चुका करते. पण समाज व संस्कृती घडवण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला पाऊल उचलणे गरजेचे आहे. 

    आजच्या समस्या भ्रष्टाचार, विभक्त कुटुंब पद्धती,मोठ्यांचा अनादर ,गुन्हेगारी, बलात्कार , वृद्धाश्रम व पाळणाघरांचा वापर, ताण तणाव,फास्ट फूड व व्यायाम न केल्यामुळे होणारे आजार, असल्या समस्यांना आपण तोंड देत आहोत. जुने ते सोने ही म्हण खरीच. जुन्या काळी ह्या समस्या नव्हत्या. मग या समस्या सोडवण्यासाठी आपण प्रत्येकाने पाऊल उचलुन, आपण समाज घडवूया.

   थोडक्यात एकत्र कुटुंब पद्धतीने पाळणाघर, वृद्धाश्रम आपोआप बंद होतील, व एकत्र राहिले की मन निरोगी राहते ,म्हणजे आजार कमी होतील. भ्रष्टाचार थांबवण्यासाठी आपण प्रत्येकाला व्यवहाराचा जाब विचारला तर तो कमी होईल, नेते पण योग्य निवडण्याची आपली जबाबदारी. प्रत्येकाने प्रत्येकाचा विचार केला, तर गुन्हेगारी कमी होईल. अश्लिल चित्रपट, गीत,मालिकांना शासनाने परवानगी देऊ नये. स्त्रीने स्त्रीची मर्यादा सोडु नये, कपडे पूर्ण परिधान करावे, मग पुरुष पण आपोआप मर्यादा पुरुषोत्तम होईल. पाषात्य संस्कृती संपउया व जुन्या भारतीय संस्कृतीचा आदर करूया. प्रत्येक जण समाजसुधारक बनवूया ,धन्यवाद.


Rate this content
Log in