Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

kishor zote

Inspirational


4.1  

kishor zote

Inspirational


शेतकरी जगला तर ; देश टिकेल

शेतकरी जगला तर ; देश टिकेल

4 mins 11.1K 4 mins 11.1K

         उच्चतम शेती

         कनिष्ठ व्यापार

          निच नोकरी

    असे समाजकारण मानले जात होते, मात्र आज हा क्रम पुर्णपणे बदलला गेला आहे. भटकणारा समाज याला स्थैर्य प्राप्त झाले तेच मुळी शेतीच्या कामा मुळे.

       माहिला वर्गाने गरोदर काळात भटकंती नको व आयुष्याला एक स्थैर्थ लाभावे त्या मुळे अनुभव व विचार या जोरावर शेतीला सुरवात केली. माणसाची कायम एका ठिकाणी राहण्याची सुरुवात देखील झाली. त्यानंतर प्रगती व्हायला लागली.

      शेती म्हणजे काय तर अन्न, तंतू प्राणी तसेच वनस्पती यांचे व्यवस्थापित उत्पादन होय.जे आदी काळा पासून सुरू आहे.

     आपल्या महाराष्ट्राचा विचार केला तर कुणबी म्हणजे शेती करणारा वर्ग किंवा जात असा अर्थ होतो. छत्रपति शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी भोसले यांचा देखील ब्रिटीशांच्या कागदोपत्री कुणबी असाच उल्लेख केला गेला होता. ते वेरूळ गावचे पाटील होते आणि पाटील हा शेतकरीच असतो.

       कुणबी हा शब्द कुळ व बीज या दोन शब्दापासून बनलेला आहे. कुळ म्हणजे वंश आणि बीज म्हणजे बी. महाराष्ट्रातील साम्राज्य विस्ताराबरोबर देशात कुणबी पसरले, नंतर त्यांना मराठी भाषा बोलणारे किंवा महाराष्ट्र राज्यातील राहणारे म्हणून मराठा हे बिरूद लागले. कुणबी व मराठा हे वेगळे नाहीतच. देशभरात व्यवसाय मात्र शेतीच.

       शेतीकडे कालांतराने दुर्लक्ष होत गेले. हालाखीचे दिवस इंग्रज राजवटीत आले, त्याला सर्वप्रथम वाचा फोडली ती म.फुले यांनी 1883 मधे शेतकऱ्यांचा आसूड यातून. शेतकरी अडवणूक, शेतीमाल भाव न मिळणे, कर्ज काढुण केलेले लग्न कार्य , सावकारी पाश त्यातून नैराश्य आदि बाबींवर त्यांनी प्रकाश टाकला आहे. *पाणी आडवा पाणी जीरवा* ही संकल्पना त्यांचीच आहे. अतिशय पोट तिडकीने त्यांनी शेतकरी वर्गाच्या समस्या मांडल्या.

     तेंव्हा पासून त्या समस्या आजही वाढत आहे. ती समस्या पुढे 1928 पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चळवळीत बदलवली. खरं तर तेच खरे शेतकऱ्यांचे कैवारी होत. कोकणातील खोत पध्दती विरुद्ध आंदोलन सुरू केले. 17 सप्टेंबर 1937 खोत पद्धत नष्ट करण्यासाठी कायद्याचे विधेयक मुंबई विधिमंडळात मांडले. 10 जानेवारी 1938 ला 25 हजार शेतकऱ्यांचा विराट मोर्चा त्यांनी विधिमंडळावर नेला होता.

     भारतासारख्या कृषीप्रधान देशात पाणी आणि वीज यांचे समानरीत्या पुरवठा झाला तर भारत एक समृध्द देश होण्यास वेळ लागणार नाही. असे त्यांचे परखड मत होते. नदया जोड प्रकल्प ही त्यांचीच योजना होती. सावकार व खोतांना ते आयत्या बिळावरचे नागोबा म्हणत. त्यांनी महत्वाची संकल्पना मांडली ती म्हणजे शेतीचे राष्ट्रीय करण करणे होय. म्हणजेच समुदायीक शेती प्रकार.

     मात्र खेदाची बाब म्हणजे आमचे लोकप्रतिनिधी हे ग्रामिण भागातील असूनही शेतीकडे लक्ष देत नाहीत. जय किसान ही फक्त घोषणा राहीली आहे. शेतीला अशा स्थरावर नेले आहे की  शेतकरी म्हणवून घ्यायला आजच्या पिढीला कमी पणा वाटतो. शेतीला आधी शेतकरी खरेदी करू शकत होता आता त्यात बदल केल्याने काळा पैसा यात आला आणि शेती हा आलटी पलटी चा व्यवसाय झाला. आता अलिकडे NA ची अट काढून काळी मातीची शेतजमीन प्लॉट विक्रीची होत आहे.

      सेझ  (स्पेशल इकॉनॉमिक झोन) या मुळे कारखानदार याच्या घशात शेतजमीनी जात आहेत. हातात पैसा येत आहे मात्र त्यामुळे व्यसनाधीनता व घरगुती कलह वाढले आहेत. भौतिक सुविधाकडे कल वाढत आहेत. तसेच पैसा उधळपट्टी होवून आजचा शेतकरी उदयाचा भीकारी होत आहे.

        शेती विषय व नवनविन तंत्रज्ञान शेती व नव्या शेतकरी पिढी पर्यंत न गेल्याने परंपरागत पिके घेतली जात आहेत. त्यात सरकार हमी भाव न दिल्याने शेतकरी हवालदिल होत आहे व आत्महत्या प्रकार वाढत आहेत. 70-75% शेतीवर आज ही परिस्थीती आली आहे. जो आपला पोशिंदा त्याकडेच लक्ष दयायला कोणी तयार नाही.

     शेती विषय प्राथमिक स्तरापासून सुरू करुन शेतीला पुन्हा उच्च दर्जा आणून द्दयावा लागेल. शेतीला प्रतिष्ठा आणावी लागेल. त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती हवी. हमी भावा बरोबर, प्रत्येकाला शेती वितरीत व्हावी तसेच कष्टणाऱ्या शेतकऱ्याला पेंशन लागू व्हावी.

      शेतकरी जगाला तर देश टिकेल त्यासाठी फक्त म.फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शेती व शेतकरी विषयक विचार अवलंब करणे राजकण्यांंना आवश्यक आहे व आपणास विविध माध्यमातून जागृती करुन राजकरणी मंडळीवर दबाव टाकणे.

         मागे एक VDO क्लिप व्हायरल झाली होती, कामासाठी एक तरुण फोन करतो, पालिकडील व्यक्ती त्याला 2 लाख पर्यंत गुंतवणुक, सुट्टी नाही, मुलाबाळा सोबत काम करावे लागेल, ओवर टाईम ही करावा लागेल, या अटी घालतो व पगार काहीच नाही असे कळते. तेंव्हा फोन करणारी व्यक्ती त्याला म्हणते मी पागल आहे का अशी कोणती व्यक्ती आहे का जी हया अटी मान्य करेल.

       तेंव्हा पालिकडची व्यक्ती म्हणते होय एक व्यक्ती आहे, माझा शेतकरी तेंव्हा फोन करणारी व्यक्ती निरुत्तर होते व शेतकऱ्याचे आभार मानते.

     अशी प्रतिष्ठा शेतकऱ्यांना पुन्हा मिळवी त्यासाठी 1940 मधे महात्मा फुले यांच्या विचाराने साने गुरुजी यांनी शेतकऱ्यास हाक दिली, त्यांना बोलावले.

रात्र दिवस तुम्ही   करीत असा काम

जीवनात तुमच्या   उरला नाही राम

घाम गळे तुमचा     हरामाला दाम

येवो आता तुम्हास   थोडा तरी त्वेष

येथून तेथून सारा     पेटू दे देश

       या ओळींची ही आठवण होते.

 

 


Rate this content
Log in

More marathi story from kishor zote

Similar marathi story from Inspirational