Raj Mohite

Drama Tragedy

4.0  

Raj Mohite

Drama Tragedy

साहेब म्हणू की पप्पा?

साहेब म्हणू की पप्पा?

4 mins
322


तुझं नाव काय आहे ????

लीना ....

आणि तुझ्या वडिलांचे ????

तिने काहीच उत्तर दिले नाही. कदाचित तिला माहित नसावे कदाचित तिचे कुटुंब ह्या जगात हयात नसावे.पण कुणी तरी असेल ना?? तिचा चिमुकलीचा सांभाळ करणारे...????

माझ्या नेहमीच्या कामात येता जाता त्या सिग्नल वर तिची भेट होत असे. तिचं नाव लीना सुंदर आणि गोंडस हसू तिच्या चेहऱ्यावर असायचं. काही लहान चेहरे म्हणजे साक्षात त्या भगवंताचे रुप अर्थात सर्व मुळे भगवंताचे रूपच पण काही होत त्या परी मधे जे मला खूप आकर्षक करायचे.

माझी बाईक सिग्नल वर थांबली की ती न सांगता मला कोणतेही एक फुल द्यायची. मी बरेच वेळा तिच्या घरच्यान बद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला पण इतकेच माहिती झाले एक म्हातारी तिचा सांभाळ करीत होती. म्हातारी स्वतः भिक मागायची आणि लीना फुले विकायची. त्या म्हातारीने कधीच लीना ला भीक मागायला लावलं नाही.

लीना ५-७ वर्षांची चिमुकली मुलगी दरदिवशी सिग्नल वर विविध प्रकारची रंगी बेरंगी फुळे घेवून उभी असायची. तिच्या कडून मी नेहमी एक फुल विकत घेत असे. कधी ऑफीस साठी तर कधी घरा साठी.

एक दिवस मी पुन्हा त्या सिग्नल वर थांबलो. लीना माझ्या जवळ आली मला एक सुंदर असे फुल दिले मी तिला त्या मोबदल्यात नेहमी प्रमाणे १० रुपये आणि एक सुंदर चॉकलट्स दिले. इतक्यात तिला एका माणसाने कार मधून आवाज दिला. ती धावत त्या माणसा कडे जात होती.एक भरधाव जीप ने लीना ला जोराची टक्कर दिली.त्या जीप मागे पोलिसांची गाडी देखील होती ती जीप एक कुख्यात अंडरवर्ल्ड गुंड चालवत होता.

लीना रक्ताच्या थारोळ्यात पडली. मी क्षणाचा ही विलंब न करता तिला डॉक्टर कडे घेवून गेलो. तिची अवस्था फार बिकट होती. तिच्या पायांवर शस्त्रक्रिया करण्याची वेळ आली आणि त्या साठी रक्ताची गरज होती. योगा योग माझा रक्त गट आणि तिचा रक्त गट एकच होता.

ती वाचली पण तिचा उजवा पाय डॉक्टर वाचवू शकले नाही. मी नियमित तिच्या साठी हॉस्पिटल मधे ये जा करत असे. तिला फळे घेवून मी तिची तिच्या तब्बेतीची विचारपूस करत असे. मलाच ठावूक नव्हते का मला इतका तिचा लळा लागला होता.

ज्या वेळी तिला डिस्चार्ज मिळाला मी त्या लेकराला माझ्या घरी घेवून जाण्याचे तिच्या आजीला सांगितले. तिची म्हातारी आजी तसे ही आता तिचा सांभाळ करू शकत नव्हती.

मला तसे ही लग्न होवून ३-४ वर्ष मूल नव्हते. माझी बायको आधी तयार नव्हती पण ज्या वेळी हॉस्पिटल मध्ये तिने लीना ला पाहिले ती तयार झाली.खरेच तिच्यात काही तरी वैशिष्ट होते तिचा चेहरा तिचे हसू मला नेहमी एक वेगळा आनंद देत होते.

माझ्या घरी आल्यावर माझ्या बायकोने तिच्या वर खूप जीव लावला. जरी एक पायाने अपंग असली तरी ती बुद्धीने चतुर होती. माझ्या बायकोने तिचे घरीच सर्व शिक्षण घेतले.

खूप हुशार झाली. मला बस एकच खंत होती. किती तरी वेळा तिला मी सांगितले मला पप्पा म्हण बाबा म्हण पण ती मला साहेब म्हणायची. तिच्या नजरेत मी तिच्या वर केलेले एक उपकार आणि त्या साठी मला ती फक्त साहेब म्हणायची.एक समाधान म्हणजे माझी बायको तिला मुलगी समजायची आणि ती माझ्या बायकोला तिची आई.

तिच्या येण्याने माझ्या घरात एक आनंद आला होता एक नवीन चैतन्य बहरले होते घरात. भले ती मला बाबा पप्पा म्हणत नव्हती. पण मला एक प्रश्न पडायचा" कोण असेल तिचे वडील ???? आणि कधी ते आले तर???? माझी बायको ही कधी कधी ही खंत मला सांगायची. तिचे मातृत्व कधी कमी झाले नाही.

माझी बायको एक संगीत विशारद होती. तिचे एक स्वप्न होते एक प्रख्यात शास्त्रीय गायक होण्याचं पण तिला ते होता आले नाही. ज्या वेळी तिने पाहिले लीना मधील संगीतातील गुणधर्म. तिने तिला शास्त्रीय संगीत शिकविण्यास सुरुवात केली. लीना दिवस भर संगीताचा रियाज करू लागली. ३-४ वर्षा नंतर ती एक सुंदर गोड गळ्याची गायक झाली. तिचा आवाज घर परिसर सर्व मंत्र मुग्ध व्हायचे.

एक सिंगर हंट प्रोग्राम मधे लीना ने भाग घ्यावा तिचे नाव मोठे करावे. त्या साठी बायकोने तिचे नाव त्या शो मध्ये रजिस्टर केले. मला ते जरी मान्य नव्हते तरी ते मान्य करावे लागले. कारण त्यात लीना चे भवितव्य होते.

लीना ऑडिशन राऊंड ते फायनल राऊंड सहज जिंकली. सर्व महाराष्ट्रात तिची ख्याती झाली लोक ओळखू लागली तिला तिच्या नावाने. नवीन शो नवीन अॅडच्या ऑफर तिला येत होत्या.

प्रसिद्धी आणि पैसा जितके चांगले तितके वाईटच एक दिवशी तिची आज्जी एक कुटुंबा सहित माझ्या घरी आली.ते कुटुंब म्हणजे लीना चे आई वडील.

माझ्या बायकोचे सरळ म्हणणे होते काही पुरावा असल्याशिवाय बायको मानायला तयार नव्हती. आजीबाई खरी बोलते कशावरून ?वाद अखेर पोलिसानं पर्यंत गेला. पोलिस नंतर कोर्ट कचेरी.

मी बायकोला किती समजावले लीना आपली मुलगी नाही आहे. ती जी काही शिक्षा होईल ती स्वीकारायला तयार होती पण चुकीच्या हातात लीनाला द्यायला तयार नव्हती. मी ही तिच्या मताशी सहमत झालो.

मी खोटे की तिची आजी खोटी ह्या साठी कोर्टाने एक पर्याय दिला. तो म्हणजे डी एन ए.

माझे माझ्या बायकोचे खोटे सरळ बाहेर येणार इतके नक्की.

खरेच ते कुटुंब लीनाचे आहे??? हे जाणून घेण्यासाठी मी आणि माझी बायको त्या डी एन ए. चाचणीला तयार झालो.

सर्व चाचण्या झाल्या. कोर्टाचा निर्णय येण्या आधी मी माझे डोळे बंद केले. आणि कोर्टाने निर्णय दिला.

माझा डी एन ए. लीनाच्या डी एन ए. जवळ मॅच झाला.कसलाच विचार न करता माझी बायको लीना जवळ धावून गेली. तिने लीना ला घट्ट मिठी मारली. दोघी आश्रुत भिजल्या. डोळे माझेही पाणावलेले होते.

आणि तिचे ही जी कोर्टात हजर होती ह्या निकला साठी नेहा पवार.माझे आणि तिचे लग्ना आधी अफेयर होते. त्या वेळी आम्ही कचऱ्यात टाकलेले भ्रूण म्हणजे लीना.नेहा लीना ला उराशी पण धरू शकत नव्हती. काही न बोलता माझ्या कडे पाहत अश्रू पुसत ती गेली.

लीना माझ्या जवळ येवून मला पप्पा म्हणाली डोळे बंद करून ते आठवले ज्या वेळी तिला कचऱ्यात फेकले होते. ती रडत होती. मी रस्ता चालत निघालो मला काहीच ऐकू येत नव्हते.

आज जे मी ऐकले "पप्पा " मला ते ऐकायचे नव्हते. मला तू साहेबच म्हण.


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama