Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Alka Jatkar

Fantasy


3  

Alka Jatkar

Fantasy


रविवारची मस्त सकाळ

रविवारची मस्त सकाळ

2 mins 1.8K 2 mins 1.8K

चहा घेताना वाटलं... छानशी गोष्ट लिहावी आज. बसले पेन आणि कागद घेऊन. राजकन्येची गोष्ट सुचू लागली...

ढगांमागून सूर्य अलगद वर येत होता. दूर कुठून तरी बासरीचे मंद सूर ऐकू येत होते. राजकन्या 'मानसी' ला हलकेच उठवत दासी म्हणाली "दूध आणू का तुमच्यासाठी केशर घालून ?"

पुढे लिहिणार एवढ्यात मागून नवरोजींचा आवाज आला "चहा मिळणार आहे का आम्हाला ? " उठून सगळ्यांनाच चहा देऊन परत बसले लिहायला.

राजकन्या उठून खिडकीशी येऊन उभी राहिली. समोरच्या सुंदरश्या बागेत प्राजक्ताचा सडा पडला होता. मोगरा, जाईजुईचा सुवासही मन प्रफुल्लित करत होता.

इतक्यात दाराची बेल वाजली "कचरा", वॉचमनची आरोळी आली. 'अरेच्या, विसरलेच की लिहिण्याच्या नादात' असं म्हणत उठून कचऱ्याचा डबा दिला. हातासरशी झाडूपोछाही करून घेतला.

राजकन्या दूध घेऊन जलविहाराची तयारी करू लागली. तिच्या सख्याही जमू लागल्या.

"आई, माझे मित्र आलेत. खायला कर ना छानस काहीतरी". लेकाची प्रेमळ मागणी. ती कशी मोडणार. मग उठलेच. सर्वांसाठी नाश्ता आणि जेवणही तयार करून टाकले.

राजकन्या जलविहार करून परतली. तोवर मुदपाक खान्यात पंचपक्वान्नाचे भोजन तयार झाले होते. राजकन्या पाटावर येऊन बसली. सगळ्या पक्वानाचा आस्वाद घेत सावकाश जेवली आणि वामकुक्षी साठी आपल्या महालात परतली.

'ताई' कामवाल्या बाईच्या मुलीच्या हाकेने तंद्री भंगली. "ताई, आज आय येनार नाय. तिचं अंग तापलया" निमूट उठले. सगळ्यांची जेवण उरकून धुणं भांडी करून टाकली.

राजकन्या वामकुक्षी करून उठली. इतक्यात राजेसाहेबांचा सांगावा आलाच "चला, जरा उद्यानात जाऊन येऊ. तेव्हडाच तुम्हाला विरंगुळा."

"दुपारचा चहा करून उद्याची भाजीबीजी घेऊन ये गो. सकाळी धांदल नकोय". सासूबाईंची सूचना आली. शेवटी सगळे लिखाण उचलून ठेवले. चहा केला. भाजी आणली. रात्रीचा स्वयंपाक करून सर्वांची जेवण उरकली.

राजकन्या उद्यानात विहार करून आली. चालून थोडीशी दमलीच ती. म्हणून लवकरच भोजन करून ती विश्रांती साठी आपल्या महालात परतली.

स्वप्नातले जगणे कागदावर उतरवले आणि मीही मागचे सारे आवरून बिछान्यावर अंग टाकले.


Rate this content
Log in

More marathi story from Alka Jatkar

Similar marathi story from Fantasy