Jyoti gosavi

Horror Thriller

3  

Jyoti gosavi

Horror Thriller

रंजामुंजा भाग १

रंजामुंजा भाग १

6 mins
173


एका सत्यघटनेवर आधारित स्वतः अनुभवलेली कथा आहे स्वतःच्या घरातील कथा आहे.) 

भाग पहिला


करकरीत तिन्हीसांजेची वेळ त्यातून थंडीचे दिवस, त्यामुळे अंधार लवकर पडायचा शिवारातली गुरेढोरे केव्हा घराच्या रस्त्याला लागलेली .आणि अशा करकरीत तिन्ही सांजेच्या वेळी, रात्र आणि तिन्हीसांजेच्या उंबरठ्यावरती एक सोळा सतरा वर्षाची मुलगी जिवाच्या आकांताने घराकडे धावत होती .

तिला अंधार पडायच्या आत आपल्या घरात पोहोचायचे होते.दोन गावाच्या सीमेवर ते स्मशान होते आणि ते ओलांडून सर्वांनाच जावे लागत असे.गावाच्या सीमेवरून ओढा वाहत होता, तो त्या रस्त्याला समांतर वाहत होता.त्याच्या अलीकडच्या काठावरती सरकारने स्मशानात साठी चौथरा बांधून दिला होता.पूर्वी गावकरी पाण्यातून पलीकडे जाऊन तिथल्या तीरावर अंत्य संस्कार करीत असत परंतु बऱ्याच वेळा पावसाळ्यामध्ये त्यांचे हाल होत होते .कधीकधी पुराच्या पाण्यातून प्रेताला देखील पलीकडे नेताना बराच त्रास होत असे.  त्यामुळे गेल्या दोन-चार वर्षांत सरकारने स्मशानासाठी चौथरा बांधून दिला होता .काही लोकांचा त्याला देखील विरोध होता. कारण स्मशानाला लागूनच रस्ता होता. वर्षानुवर्षे लोकांच्या मनावर भुताखेतांच्या गोष्टी चा पगडा होता. त्यामुळे लोक घाबरत असत आणि अंधार पडायच्या आतच गाव जवळ करीत असत. 

******* ****** *****

 तीन मुलींचा पाठीवर मुलगा पाहिजे म्हणून आई-वडिलांनी एक एका देवस्की करणाऱ्या माणसाकडे खेटे मारण्यास सुरुवात केली. हे ठिकाण स्मशान पासून जवळ होते . कोणत्यातरी देवीचे देऊळ बांधून तेथेच तो रहात होता. एक बंगाली बाबा कडून थोडीफार सिद्धी प्राप्त करुन घेतली होती तंत्रविद्या अवगत करून घेतले होती. रात्री-अपरात्री त्याचा वावर स्मशानामध्ये दिसतो. वाढवलेल्या दाढी-मिशा, तांबारलेले डोळे, प्रसाद म्हणून गांजाचा वापर, अंगाला येणारा भपकारा त्यामुळे लोक त्याला साधारणपणे घाबरूनच असत. देव देवस्की करणारे देवताळे साधारण अशा रूपात दिसतात. 

त्याने एका हडळीला आणि एका खविसाला आपल्या ताब्यात ठेवले असून त्यांना वश केले आहे, आणि ते लोक बिनबोभाट त्याची कामे करतात अशी गावांमध्ये एक वदंता होती. पण कधी कोणाला गुण येत होता. कधी कोणाचा ताप जात होताकोणाला मूलबाळ झाले होते. कोणाची रिणामधून मुक्तता झाली होती. असे बोलणारी माणसे पण होती. त्यामुळे त्याच्या बाजूने बोलणारी माणसे पण होती, त्याच्या विरुद्ध बोलणारे पण होते. 

काही नाही! सगळ्या अंधश्रद्धा आहेत. काही खरे नाही. अशी माणसे दोन्ही बाजूने बोलत होती. 

आई बाप अजून आले नाही म्हणून रंजन तिन्हीसांजेला त्यांना बघण्यासाठी घराच्या बाहेर पडली . आईबापांची चुकामुक झाली, आणि करकरीत तिन्हीसांजेला ती पुन्हा धावत घराकडे निघाली. पाळीच्या चौथ्या दिवसाची न्हालेली पोर स्मशानाच्या रस्ता पायदळी तुडवत होती. तिथे असणाऱ्या भूताखेंताच्या गोष्टी ती ऐकून होती. त्यामुळे तिच्या भीतीमध्ये अजूनच भर पडली होती. की तिच्या अंगावर काटा आला आणि पिंपळाच्या झाडाखाली कशात तरी अडकून धपकन पडली. 

--- --- ----- ------- --


एकाएकी तिच्या अंगावरती काटा शिरशिरला, आणि मानेवर काहीतरी जड जड पडल्यासारखे वाटले. पिंपळाच्या झाडा वरती बसलेला मुंजा आणि हडळ एकमेकांमध्ये किचकिचत करत होते. हीच त्यांची भाषा होती. इतक्यात हडळीची नजर जीवाच्या आकांताने धावणाऱ्या त्या कोवळ्या नुकत्याच तारुण्यात प्रवेश करू पाहणाऱ्या मुली वरती गेली. ती हर्षा अतिरेकाने ओरडली मुंजा बघ! बघ!  तुझं सावज आलं.

आता बघ मी कशी गंमतच करतेय. हडळ खिदळली. दोघेही येणाऱ्या सावजा कडे लक्ष देऊन पाहू लागले . ती बरोबर दृष्टीच्या टप्प्यात आली तशी, हडळीने झाडावरून हात लांब करुन तिच्या पायात अडकवला, आणि तिला धपकन खाली पाडले. रंजू स्वतःला सावरेपर्यंत मुंजा तिच्या मानेवरती बसला. ते दोघे पण नेहमी तिथून घाबरत घाबरत जाणाऱ्या लोकांची अशीच मजा घेत असत. ते त्यांना खाली पडत असतील,  घाबरवत असतीलही, परंतु झाडाला धरण्यासाठी मात्र परवानगी नसते .रंजू ची गोष्ट वेगळी होती . तिच्या मानेवर बसल्याबरोबर, तिच्या शरीरातील अशुद्ध पणा त्याला जाणवला, आणि तो खुशीने तिच्या अंगभर पसरला आणि नाचायला लागला. रंजू च्या शरीराला झटके बसत होते. गेले खूप वर्ष तो अशा संधीची वाट पाहत होता. जेणेकरुन त्यांना आज योग्य झाड मिळाले. रंजू पटकन उठली, एकतर भीतीने तिचा उर धपापत होता. डोळ्यात पाणी आले. त्यातच परकरा मध्ये अडकून पडल्याने ती तोंडावरच मातीत पडली. सगळ्या अंगाला माती लागली, ओठ फुटला व ओठातुन रक्ताचे दोन-चार मातीमध्ये मिसळले .

हाताची ढोपरे फुटली. तरीपण ती कशाची देखील पर्वा न करता घराच्या दिशेने धावत सुटली. सारे अंग ठणकत होतं. डोके तिला जड वाटत होतं. हडळ सावकाश खाली उतरली रक्ताच्या ताज्या ताज्या थेंबांचा तिने मन भरून वास घेतला. खूप दिवसांनी तिला असं ताज रक्त वाट्याला आलं होतं. नेहमीप्रमाणे जरा वेळ आलेल्या सावजा ची मजा घेऊन त्याला घाबरवून मुंजा पुन्हा आपल्या जागी परत येत असे. पण यावेळी तर तो झाडाबरोबर पुढे चालला होता..अरे चाललास कोठे? हडळीने विचारले? आपली सीमारेषा एवढीच आहे. यापुढे गेले तर आपल्याला त्रास होईल. त्याबरोबर  मुंजाने सांगितले मी आता परत येणार नाही, मला हवे ते झाड गवसले आहे. हाडळी ला मनामध्ये फार विषाद वाटला. आता आपल्याला एकटे त्या झाडावर ती राहावे लागणार. आपला सोबती चालला .ती पुन्हा त्यांच्या मागे धावत गेली. 

अरे! मी पण येऊ? तुझ्या बरोबर मला पण घेऊन चल, त्याने सांगितलं नाही! मुळीच नाही, खूप वर्षाने मला असं झाड मिळालेल आहे .अरे पण आपण दोघे झाडावर बरोबर राहतोच ना? मग तिकडे पण मला येऊ दे ना !

नाही -नाही ते जमणार नाही. हे झाड माझ आहे. 

मी तुला देणार नाही असा योग यायला कित्येक वर्ष जावी लागतात. असं झाड मिळायला खूप वर्षे वाट पाहावी लागते..

तू आता तुझं झाड पकडायच्या मागे लाग नाहीच मिळालं तर कधी तरी मी तुला बोलावून घेईन रंजू चा असा अवतार बघून आई घाबरली .काय झालं म्हणून तिला जवळ घेतलं. त्याबरोबर रंजना रडू लागली. 

अगं कार्टे! कुठे गेली होतीस? तिन्हीसांजेची धडपडायला .आणि कोठून पडून आलीस? एक तर तुला चौथा दिवस आहे..आणि अशा न्हात्याधुत्या मुलीने तिन्हीसांजेच्या वेळी घर सोडून बाहेर कशाला पडावं? 

तुम्हालाच बघायला गेले होते. येताना पिंपळाखाली परकरात अडकून पडले. असे म्हटल्यावर त्या माऊलीच्या काळजामध्ये धस्स झाले. 


जा! जा! पहिले हात-पाय धुऊन घे कपडे बदल आईने तिला फर्मावलं. ती हात पाय धुऊन आल्यानंतर ,कपडे बदलल्यानंतर, तिच्या ओठाला आणि ढोपरांना  हळद लावली. तिला गरमागरम चहा प्यायला दिला आणि घरात गाणगापूर "भस्म" होतं ते लावलं आणि वडिलांनी गुरुदेव रक्षण करा! अशी जोरदार आवाज करून प्रार्थना केली व जेवून खाऊन निश्चिंततिने ते कुटुंब झोपी गेलं. मात्र तिच्या पायातून घरात शिरलेला मुंजा मात्र नवीन घर मिळाल्यामुळे खूष होता.

**********************************

तिसऱ्या दिवशी सकाळी रंजू रोजच्यापेक्षा उशीराच उठली,

आजही तिचे डोके दुखत होते व सर्व अंग जड जड वाटत होते. रोजचे व्यवहार तर चालू होते पण ती कुठे तरी हरवल्यासारखी वाटत होती. कोणत्याच गोष्टींमध्ये तिचे लक्ष लागत नव्हते. मुलीची ही अवस्था आईने बरोबर हेरली होती. आई तिला सारखे खोदून खोदून प्रश्न विचारत होती. आणि ती मात्र उगाच काहीतरी असंबद्ध उत्तरे देत होती. कधी -कधी एकाच जागी नजर लावून अर्धा-अर्धा त्याच त्याच अवस्थेमध्ये बसत होती. शेवटी तरुण वय आहे कुठेतरी मन भरकटले असेल, असा निष्कर्ष काढून आईने तिचा नाद सोडून दिला. 

रंजू चे वडील पुजारी होते त्यांना आधुनिक काळातील संत म्हणा ना! तसेच त्यांचा अध्यात्मिक व्यासंग चांगला होता. अध्यात्माची बैठक चांगली होती. दररोज सकाळी पहाटे तीन वाजता उठून ,त्यांची दिनचर्या सुरू व्हायची .साधनेत कोणाचा अडथळा नको म्हणून,ते भल्या पहाटे उठून गावातील सार्वजनिक विहिरी वरचे पाणी आणून एवढ्या पहाटे शंकराचे आणि विठ्ठलाचे पूजन करायचे. त्यानंतर गुरुचरित्र, शिवकवच, देवी कवच, दुर्गा कवच, राम, दत्त, देवी या सर्वांच्या जपाच्या माळा ही सगळी तीन तासाची एका जागी बैठक घालून साधना होत होती. अख्या गावाचं घड्याळ त्यांच्यावरती चालायचं. बामन उठला म्हणजे तीन वाजले,  विहिरीचा रहाट वाजला म्हणजे साडेतीन वाजले, देवळात स्तोत्रम म्हणण्याचा आवाज घुमला की समजायचं चार वाजले.


एकदा तर त्यांना महादेवाने दर्शन देखील दिले होते. कारण अख्ख्या गावांमध्ये एवढ्या पहाटे उठून त्यांच्या शिवाय कोणी देवळात पाऊल देखील टाकत नसे. मात्र एकदा असे घडले लागोपाठ तीन दिवस" त्यांचा पाय शंकराच्या गाभार्‍यात, आणि आतला माणूस त्यांना ओलांडून बाहेर" ते छोटेसे खेडेगाव असल्यामुळे तेथे प्रत्येक व्यक्ती एकमेकाला ओळखत असे. परंतु हा चेहरा काही त्यांच्या ओळखीचा वाटत नव्हता. किंवा थोडासा धुरकट अस्पष्ट धूसर असा दिसत होता. त्यांनी मनात विचार केला असा कोण शिवभक्त आहे? बाबा जो माझ्याआधी शंकराच्या डोक्यावर पाणी घालतोय त्याच्या दर्शनाला येतोय. कोणी एखादा पाहुणा वगैरे आला असावा असा त्यांनी विचार केला आणि शेवटी तिसऱ्या दिवशी मनाचा हिय्या करून कुठल्या गावचा पावणे? असं त्यांना विचारलं त्याबरोबर त्या माणसाने एकदा मागे वळून पाहिलं आणि तिथेच तो अदृश्य झाला. 

कशाला देखील न घाबरणारे काका( रंजू यांना काका म्हणत असे आणि सगळे गाव देखील त्यांना काका म्हणून ओळखत होते) त्यादिवशी मात्र घाबरले त्यांनी पटकन महादेवाच्या डोक्यावर पाणी ओतले. आणि झटकन काढता पाय घेतला. घरी घेऊन कोणत्याही साधनेला न बसता चक्क पांघरूण घेऊन झोपी गेले. तसा काही त्यांना त्रास झाला नाही, पण अदृश्य झालेली व्यक्ती साक्षात शंकर होती? एखादे भूत प्रेत होते? हे मात्र समजले नाही. नंतर त्यांच्या मनाने असा निष्कर्ष काढला की तो शंकर महादेवच होता, आणि माझी परीक्षा पाहण्यासाठी तो आला होता, इतके पक्के घेतले. त्यांची पाठीमागील आध्यात्मिक साधना जाणून घेण्यासारखे आहे हे आपण जाणून घेऊ. 


Rate this content
Log in

Similar marathi story from Horror