STORYMIRROR

Shilpa Desai

Fantasy Others

4  

Shilpa Desai

Fantasy Others

रंग माझा वेगळा

रंग माझा वेगळा

1 min
451

बहिणीच्या लग्नात आवडत्या हिरव्या रंगाची पैठणी नेसून करवली म्हणून मिरवत होती. साडी फारच छान आहे तृप्ती तुझी असे एक दोघांनी म्हटले त्यामुळे ती खुश होती. फोटो काढण्याच्या कार्यक्रमात अचानक ताईच्या सासूबाई साडीला हात लावत म्हणाल्या 'पैठणी खूपच छान आहे ग तुझी, पण त्यामुळे तुझा रंग चांगलाच गडद काळा दिसतो बघ' आता मात्र ती कावरीबावरी झाली. त्यानंतर त्या कलरचे कपडे तिने वापरले नाही.


आज चार वर्षांनंतर आपल्या लग्नात हिरवा शालू नेसून ती खुश आणि सुंदरही दिसत होती. दुसऱ्यांच्या खोचक बोलण्यामुळे आपल्या एखाद्या आवडत्या गोष्टीला नाकारणे म्हणजे स्वतःवर अन्याय करणे हे सुशांतने पटवून देऊन तिला हिरवा शालू दिला होता. तृप्तीने आज मनातली सगळी जळमटं बाजूला करून तो शालू नेसला होता.


Rate this content
Log in

Similar marathi story from Fantasy