Shilpa Desai

Others

2  

Shilpa Desai

Others

मौल्यवान पाण्याची गोष्ट

मौल्यवान पाण्याची गोष्ट

1 min
170


पाणी फाऊंडेशनमध्ये जलमित्र म्हणून सहभागी होण्याची संधी शहरातील शितलला मिळाली. ठरलेल्या दिवशी दुष्काळग्रस्त गावात सगळे गेले. ओसाड जमीन,सुकलेलीझाडे, वणवण करून तहानेने व्याकूळ झालेली मुकी जनावरे हे विदारक दृष्य. पाण्याची मुबलकता असणाऱ्या ठिकाणी राहणारी ती. हातपाय धुण्यासाठी बादलीभरपाणी वापरायची. स्वतःची स्कूटर धुतानासुद्धा बदाबदा पाणी ओतायची. श्रमदानासाठी दुपारच्या सत्रात जाण्याअगोदर गावातील एका घरी शीतलने भेट दिली. त्या घरातील एक बाई व दोन मुली भरउन्हात अनेक किलोमीटर पायपीट करून पाण्याची पातळी कमी असलेल्या विहिरीवरून पाणी आणत होत्या.तीन हंडे पाणी दिवसभरासाठी वापरायचे. पाण्याअभावी गावातील लोकांचे हाल पाहून शितल दुःखी झाली. पाण्याचा प्रत्येक थेंब मौल्यवान आहे त्याचे नियोजन करून वापरल्यास पाणी नसलेल्या भागाचा प्रश्न सुटू शकतो.हे तिने जाणले.


Rate this content
Log in