Shilpa Desai

Others

4.3  

Shilpa Desai

Others

आयुष्याच्या या वळणावर

आयुष्याच्या या वळणावर

15 mins
384


राधिका गळ्यात चंद्रहार घालत असतानाच समीर मागून कधी आला ते तिला कळल नाही. पाठीमागून त्यांने केलेल्या स्पर्शाने तिचे अंग शहारले. समीरच्या हातावर आपले डोके तिने टेकवले. मग राधिकाच्या केसावरून अलगत हात फिरवत समीर म्हणाला ,"आज आमच्या राणी सरकारांच्या गालावर लाली फुलली आहे. किती सुंदर दिसतेस तु. वाव! ट्रॅडिशनल लूक! उम्म....म.....म्मा.....!"    "गप्प बस आता. तु आलास की मला काही सुचत नाही. इथे...मला माझी नथ कुठे ठेवली ते सापडत नाही आणि तु मध्येच आलास गोंधळ घालायला."

"ओ...हो, म्हणजे सगळा दोष माझा आहे का?

"तसं नाही रे, थोड्यावेळापूर्वी इथेच तर ठेवली होती पण आता आठवत नाही. तु मध्येच आलास, अन् कधी कुठे ठेवली ते विसरून गेले."

"ठेवली असशील ग इथेच कुठेतरी; शोध सापडेल." असं बोलून समीर निघून गेला.

"अरे सापडेल काय, जरा शोधण्यासाठी मदत केली असती तर काय बिघडलं असतं का." राधिका वैतागून बोलत होती.

"राधिका,आवर लवकर खाली सगळे वाट पाहत आहेत तुझी.... आज-कालच्या मुलीं....ना तयार व्हायला तासनतास काढतात" सासुबाई हॉल मधून तिला आवाज देत होत्या. राधिका मात्र काहीच उत्तर देत नाही असे पाहून सासूबाई तिच्या रूम मध्ये आल्या. "काय ग, किती वेळ हाक देते तुला. तोंड धरलं की काय? मला अगोदरच गुडघ्याचा त्रास होतो आणि जिना चढून तुझ्यापर्यंत यावे लागले. लोकं खोळंबली आहेत. आणि तु नट्टापट्टा करत बसलीस."

"अहो आई, माझी नथ सापडत नाही आहे आत्ताच तर इथे ठेवलेली. कुठे गेली कोण जाणे." राधिका सांगत होती मात्र सासू बाईचा पारा चढला, त्यामुळे त्या वैतागून बोलल्या, "तुझी नथ ईथे ठेवली तर काय आभाळाने खाल्ली, काय या रुमने गिळली. काय नखरे चालले तुझे. या वयात इतकं विसरतेस मग पुढे कसं होणार." असं रागात बोलत त्या निघून गेल्या. आता राधिकाला स्वतःचा राग यायला लागला. सासुचा गळा आवळावा असा विचार मनात डोकावू लागला. मग शेवटचा प्रयत्न म्हणून बेडवर असलेल्या सगळ्या वस्तू तिने फेकून द्यायला सुरु केली. टॉवेल उचलला तशी नथ खाली पडली. तिला खूप बरं वाटलं. अरे आपणच तर टॉवेलला नथ लवकर सापडावी म्हणून बांधून ठेवली होती आणि अगदी विसरून गेले. ती आपल्या विसराळूपणाचा विचार करत असतानाच सासूबाई नी पुन्हा हाक दिली,"राधिके......... आता तुझ्यासाठी आरती घेऊन येऊ का ग ."

"अहो आई, आलेच......" या म्हातारीचा काहीतरी बंदोबस्त करायला हवा. असं तिच्या मनात आलं. दुसर्‍याच क्षणी ती पळत पळत हॉलमध्ये आली. खाली सर्व मंडळी तिची वाट पाहत होती. सगळीकडे फुलांची आरास होती. पाळणा ही सुरेख सजवला होता. जणु 'कृष्णाचाझुला' कारणही तसेच होते तिच्या गोंडस लेकाचा आज बारसा होता..ना. घरातील सर्व कुटुंब खूष होते.

"राधे, आज लयभारी वाटतेस, अग. तुझ्या नाकात नथ असती तर... क्या बात..! बाळाच्या जन्मानंतर तुझ्या चेहऱ्यावर खुपच ग्लो आला बघ राधिका." शमिका राधिकाच्या कानात कुजबुजली.

"अरे देवा! आपण ज्या नथीसाठी इतका वेळ दवडला तीच गोष्ट नेमकी राहिली. ओह.... नो....!असंच होतं नेहमी नेहमी. या नथीसाठी सासुबाईचे बोलणं ऐकून घ्यावं लागलं आणि ती जेव्हा सापडली तर नाकात घालायची राहिली." आता मात्र राधिकाला चुटचुट लागून राहिली. मनातल्यामनात ती स्वतःवर चिडचिड करू लागली.

बारशाचा कार्यक्रम नीट पार पडला. सगळं आवरे पर्यंत रात्रीचे अकरा वाजून गेले. बाळ मात्र शांत झोपी गेले. खुशी म्हणजेच मोठी लेक. तिची काही झोपण्याची लक्षणे दिसत नव्हती. राधिकाचा मोबाईल घेऊन काहीतरी गेम आणि कार्टून पाहत होती. राधिकाला मात्र झोप येत होती. सकाळपासून पाहुण्यांची रेलचेल असल्यामुळे राधिकावर कामाचा ताण पडला होता. त्यात पुन्हा . 'नथपुराण' . या सगळ्यामुळे ती खूप दमली होती. कधी एकदाची पाठ टेकते असे तिला झाले होते. "खुशी, राजा बाळ झोपलं ना... मोबाईलच्या आवाजाने तो जागा होईल. चल, तु पण झोप." राधिकाने खुशीच्या केसांना कुरवाळत सांगितलं आणि हळूच गालाचा गोड पापा घेतला. खुशी पण मम्माकडे पाहून गोड हसली व पुन्हा मोबाईलवर कार्टून पाहू लागली. त्यामुळे राधिकाला खुशीचा इतका राग आला की, राधिकाने ताडकन जाऊन तिच्याकडचा मोबाईल खेचून घेतला. "कार्टे, तुला मघापासून सांगते, ठेवून दे तो फोन आणि झोप जाऊन तर हसून दाखवतेस मला. मी काय वेडी आहे. चल अगोदर नाही तर तुझा आता जीव घेईन." असं म्हणत साधिकेने खुशीच्या बखोटीला जोरात पकडलं आणि तिला जागच्या जागी उभ केल. वर असा काही जोराचा धपाटा दिला की बिचारी घाबरलेली पोरं अंगाचं मुटकुळं करून बेडवर तशीच झोपली. काही वेळाने तिने खुशीकडे पाहिलं तिला तसं झोपलेल्या पाहून राधिकेला ढसाढसा रडू आलं. तिने दरवाजा बंद केला आणि आपण भरपूर रडली. नंतर खुशीपाशी आली झोपलेल्या पोरीच डोकं आपल्या मांडीवर ठेवले. मग खूप वेळ तशीच बसून राहिली तोपर्यंत पारस जागा झाला त्याच्या रडण्याने ती भानावर आली. त्याला छातीशी धरलं पट्ट्याने व्यवस्थित दुध पिलं आणि क्षणात गाढ झोपी गेला. आता राधिकालाही झोप येऊ लागली.

"अगं बाई सुर्य डोक्यावर आला तरी झोपून आहेस तु. रात्री लवकर झोपलीस. अजून का उठत नाहीस. समीरला ऑफिसला जायला वेळ होतो निदान पोळीभाजी तरी देशील की नाही? की आज पण हॉटेलवारी. तुझ्या लग्नाअगोदर मी त्याला कधीच ते हॉटेलचं तेलकट, मसालेदार खायला भाग पाडलं नाही. कायम घरचा डबा असायचा. आता कसाबसा आठवड्यातून दोन वेळा डबा नेतो तो. ते हॉटेलच खाऊन बिचाऱ्या माझ्या पोराचं पोट बिघडलंय. तो तरी काय करणार दुपार होईस्तोवर झोपल्यावर डबा काय ऑटोमॅटिक तयार होणार का? आणि म्हणते कामापुढे वेळ मिळत नाही. मी पण तीन पोरांना जन्म दिला सासू-सासरे, नवरा सगळ्यांचं सगळ उरकायचं. आणि आता यांना कामवाल्या बाया लावून दोन माणसांचे जमत नाही." सासूची सकाळीच कटकट चालू झाली. त्यांचा एकएक शब्द राधिकेच्या डोक्यात जात होता. आता तिला स्वस्त बसून राहावेना. तडक ऊठून आली इन्स्टंट कांदापोहे तिने झटपट बनवले आणि लगेच समीरला हाक दिली, "समीर, पोहे तयार आहेत खाऊन घे" समीर ऑफिसला जाण्यासाठी तयार झाला होता तो फार घाईत होता असं त्याच्या हालचालीवरून दिसत होते.

"मला उशीर होतो. आता मला काही नको" समीर उपरोधाने म्हणाला.

"ठीक आहे." असं म्हणून राधिका ही आपल्या कामाला लागली. तिला आता सासू आणि नवऱ्याचाही खूप राग आला होता पण काही न बोलता ती शांतपणे कणिक भिजवत राहिली. इकडे समीर मात्र सोप्यावर बसून चहाची वाट पाहत राहिला.

"ये बाई, आता ते पोहे की काय ते देते ना? काय अजून लेट करणार आहेस." असे सासूने म्हणताच राधिकाचा इतका वेळ दाबून ठेवलेला राग मुसंडी मारून बाहेर आला. किचनमधून तिने गरम चहाचा कप सोप्याच्या दिशेने फेकला. हॉलमध्ये, भिंतीवर, दरवाज्यावर चहाचे डाग पडले. कप फुटून चहा ठिबकसिंचन झाला. सोफा, टेबल, भिंत, दरवाजा इथून ठिबकु लागला. समीरने एक त्रासिक नजर राधिका वर टाकली. सासुबाई मवाळ झाल्या. "अगं चहा का फेकते? काय झालं तुझं? त्याला उशीर झाला असं सांगतो तो, तूच लेट करतेस त्याला. चहा तयार केलास तर देना त्याला." तिच्या या बोलण्यावर राधिकाचा संताप अनावर झाला. "हे बघा आई, आमच्या दोघांच्या बोलण्यात तुम्ही मध्ये पडू नका. तुम्ही तुमचे लेक्चर पहिली बंद करा. आणि तुम्हाला ऐकू येतं ना ७ मिनिटापूर्वी चहा-पोहे प्लेटमध्ये वाढून समीरला नाश्ता आणू का, असं विचारलं होतं तर तो नको बोलला. उशीर झाला म्हणाला. मग मी काय करणार? काय करायला हवे होते? चहापोहे घेऊन समीरला भरवायला हवे होते का? मी माझ्या पुढच्या कामाला लागले. कारण दुपारी तुमचा स्वयंपाक वेळेवर होणे अपेक्षित असतो नाहीतर तुमची ॲसिडिटी वाढते. असं तुम्ही सांगत असता. तुमचं जे आत्ता सारखं उलट-सुलट बोलणं, ते नेहमीच मी ऐकत आले. इतकाच जर मुुलाचा पुुुळका आला होता तर तुम्ही पोहे बनवले असते तर बिघडले असते. लहान बाळाचं बघायचं, मुलाचं मीच करायला हवं. रात्रीची जागरणं देखील मीच करायची, तुमच्या सगळ्यांचा स्वयंपाक, घर आवरणं, प्रत्येकाची आवड-निवड, सगळं सगळं मीच करायचं. आणि एखादा दिवस थोडासा उशीर झाला तर ठेवणीतलं बोलणं ऐकायचं. कंटाळा आला मला या सगळ्याचा. .                    

 त्यानंतर राधिकाची बराच वेळ अशी चिडचिड चालू होती. या सगळ्या धावपळीत पारस जागा झाला व मोठ्याने रडू लागला त्याच्या रडण्याने तिला आता वैताग आणला. त्याला पाळण्यातून काढून जोरात जमिनीवर आपटावा. इतका तिला त्याचा राग आला. रागातच ती त्याच्याजवळ आली. तिला पाहून तोही रडायचा थांबला. त्याची ती गोड छबी पाहून राधिकाचा राग कुठच्या कुठे पळाला होता. "अरे ..आता आपण काय वाईट विचार केला.. छे...पारसला जमिनीवर आपटाव.... असा विचार मनात येतोच कसा.....मी आई आहे त्याची..... माझ्या मुलाचा मी असा विचार करू शकते? इम्पॉसिबल! काय होते मला. मी अशी कशी अविचारी.....या सगळ्या जाणिवेने ती खूप घाबरली. तिचे अंग थरथर कापू लागले. डोळे पाण्याने भरले. विचाराने तिचे डोके भणभणू लागले. राधिका पारस जवळ गेली. त्याला पाळण्यातून उचलला त्याला भूक लागली होती. त्याची तिला पूर्ण जाणीव झाली होती. तिने लगेच त्याला छातीजवळ धरला. थोड्याच वेळात पारसच पोट भरताक्षणी तो हसू लागला. आता मात्र ती थोडी सुखावली.

संध्याकाळी समीर घरी आला तेव्हा तो काहीसा घुस्स्यातच होता . सकाळच्या प्रकरणाचा किडा बहुतेक डोक्यात होता. राधिकाने गरमागरम फेसाळणारी कॉफी समिरसाठी बनवली. त्याच्यापुढे कॉफीचा मग नेत ती समीरला म्हणाली, "सॉरी मी असं वागायला नको होतं, तरी पण काय करू, अलीकडे माझी खूप चिडचिड होते. प्लीज ही कॉफी घे." समीरने काही न बोलता तिच्या हातातला भरलेला मग घेतला व शांतपणे कॉफी पिऊ लागला. कॉफी पिऊन झाल्यावर कप तिथेच सोडला व मोबाईलवर गेम खेळत बसला. राधिकाला वाटले समीर आपली विचारपूस करेल. अलीकडे जास्त चिडचिड का करतेस? तुला कामाचा थकवा येतो का? वगैरे प्रश्न विचारले पण कुठं काय. यातलं काहीच नाही उलट त्याच्या त्या बेफिकीर मोबाईल गेम खेेेळण्याने तिच्या शांततेचे परिवर्तन रागात होऊ लागलं. स्वतःच्या रागावर आवर घालून राधिकाने आपल्याला रात्रीच्या स्वयंपाकाच्या कामात गुंतवून घेतलं. सहज राधिकेने देवघरात डोकावून पाहिलं. तिन्हीसांज  होऊन गेली तरी देवाजवळ दिवा लावला नव्हता. सासूबाई आरामात फोनवर बोलत बसल्या होत्या. कधी राधिकाला थोडा जरी उशीर झाला तरी त्या सुनवतात 'तिन्हीसांजेला' दिवा लावायलाच हवा. आपण मात्र आज तासन-तास लेकीबरोबर फोनवर गप्पा मारत बसल्यात. उद्या लेक माहेरपणाला येणारच मग एवढं काय बोलत बसायचं. दिवा लावला असता तर काय हात मोडले असते. पुन्हा राधिकाची चिडचिड चालू झाली.

मुलांना उन्हाळी सुट्टी लागल्याने आज नंदाताई म्हणजेच नणंद आपल्या दोन मुलांना घेऊन दोन महिन्यासाठी माहेरी एन्जॉय करण्यासाठी येणार होती . इथे काही काम न करता बसून खायला मिळतं मग काय झाल हातपाय पसरायला. राधिका आहेच की त्यांची सेवा करायला. असे एक ना अनेक विचार आज सकाळपासून राधिकेच्या मनावर आरूढ झाले होते. साफसफाई, नाश्ता, मग पोरांच्या आंघोळया, त्यांचं खाणं पिणं, स्वयंपाक करा, नणंदेच्या सरबराईत स्वतःला गुंतून घेणं, तिची तिखट दोन पोरं, ती दोन दोन मिनिटांनी खाण्याच्या ऑर्डर करणार ते नेऊन अथवा बनवून देणे, त्यांनी टीव्ही पहाण्याच्या बहाण्याने केलेला पसारा काढणं. आता या भल्यामोठ्या लिस्टने डोकं दुखू लागलं. राधिकाने किचनच्या ओट्यावर जोरात स्वतःचाच हात मारला. हाताला चांगल्या झिणझिण्या आल्या. काय करणार हे सगळं तर करावंच लागणार होतं.

दुपारी बारा वाजता नणंदबाईंचे खट्याळ पोरांना घेऊन आगमन झालं. आल्याबरोबर ऑर्डर सोडली राधिका कैरी असेल तर थंडगार पन्ह बनव. पण राधिकाने अगोदरच पन्ह बनवून ठेवल असल्यामुळे तिने ते फ्रिज मधून काढून घेतलं. नंदाताई हात पाय धुवून घेते तोपर्यंत ग्लास मधून भरून तिच्यासमोर पेश केलं तशी नंदाताई खूष झाली. पन्ना पीत असताना ती पारसच्या खोलीत गेली. पारसने शी केली होती. ते तिने पाहिले. आणि राधिकाला बोलावले."राधिका बाळाकडे तू वेळेत लक्ष देत नाही का ग?बाळाची शी सू, त्याचे औषध, खाना पिना याकडे वेळीच लक्ष द्यावे. काय करत असते कोण जाणे. आम्हालासुद्धा दोन मुलं झाली मी त्यांच लक्षपूर्वक करायचे. दिवसभर कामात व्यस्त असल्यासारखे भासवतेस.

असा कोणता डोंगर परतून घालतेस ग. नुसता स्वयंपाक तर करतेस.""अहो ताई, मी आता त्याला पाहायला जाणारच होते पण तुम्हाला पन्ह करायला गेले. लगेच तुमच्या आर्या, निशांतने नूडल्स बनवायला सांगितले." राधा जमेल तितक्या शांतपणे बोलत होती.

"अग्गबाई......! म्हणजे माझ्या पोरांनसाठी नुडल्स करायचा तुला त्रास वाटतो तर ; बाई .....बाई तरी मी आईला सांगत होते. येत नाही म्हणून. चार दिवस माहेरी सुखात राहीन, हे माझ्या नशिबातच नाही बहुतेक. सासरी दहा दहा माणसांचा स्वयंपाक केला मी, पण कधी या कानाच त्या कानाला समजलं नाही. इथे साध्या नूडल्स कराव्या लागतात म्हणून केवढा त्रागा. असे असेल तर उद्याच निघते मी घरी जायला. नंदाताई राईचा पर्वत करून सांगत होत्या. "अगं नंदे कुठे जायचं नाहीये तू. हे घर तुझं पण आहे म्हटलं. तुला वाटेल तेव्हा तू माहेरी येऊ - जाऊ शकतेस. कोणी अडवू शकत नाही. आणि तू काम-बिम करायची गरज नाही. सासरी काम करतेस ना मग इथे दोन घास खा सुखाने. माझ्या दोन नणंदा, सुट्ट्या लागल्या की एप्रिलमध्ये यायच्या त्या सरळ जूनला जायच्या. त्या, त्यांचे नवरे ,मुलं हा गोतावळा .मी पहाटे उठून सगळ्यांच्या आवडीचे पदार्थ बनवायची आणि आता ....ही काय? वाकड तोंड करून असते. कधी काय सांगितलं तर, बाळाचे हे करायचं आहे अन् ते करायचं हेच उत्तर असतं. बरं, इतकं करून त्या पोरांचं पण नीट बघत नाही. आज काय डोकं दुखत, तर कधी पोट दुखत, कधी ताप येतोय आणि काय न काय. तरुण वयात कसली दुखनी आली हिला कोण जाणे." सासूची बडबड चालू झाली.

इतका वेळ शांत असलेल्या राधाच्या रागाचा आता जणू काय झाला."हे बघा आई, मुलांच चांगलं संगोपन व्हावे , त्यांच्याकडे बघता यावं म्हणून नोकरी सोडली. तर तुम्ही मला घरच्या कामाला जुंपले. लोकांच्या सूना बघा त्यांच्या छोट्या मुलांना सासू कडे ठेवून नोकऱ्या करतात. आणि त्या आजी आपल्या नातवंडांना न कंटाळता छान सांभाळतात. कितीतरी सासवा सुनांना डबे बनवून देतात. आणि तुम्ही नुसत्या बसून असतात तुमचे कसे रोज पाय दुखतात. निमित्त करून कामाची कशी टाळाटाळ करायची हे तुम्हाला चांगले माहीत आहे. पारसच्यया जन्मानंतर मला खूप थकवा येतो. तरीसुद्धा घरातील सगळी काम एकटीच करत असते. तरी तुम्हाला केलेपण नाही."  राधिका रागाने बोलता बोलता रडू लागली. मोबाईलची रिंग वाजली आणि ती थोडी शांत झाली. काव्यावहिनीचा फोन होता. नात्याने वहिनी लागत असली तरी खरी जिवाभावाची मैत्रीण होती. दोघीही सारख्याच वयाच्या त्यामुळे ननंद भावजय नाहीच मुळी. हो मैत्रिणी. याच सगळं श्रेय काव्याला जात कारण काव्या मुळी होतीच तशी लाघवी स्वभावाची.

दोन वर्षापुर्वी धाकट्या भावाशी लग्न करून काव्या घरात आली आणि घरातली जणू मुलगीच बनली. पेशाने डॉक्टर असली तरी कुठे शिक्षणाची घमेंडी नाही. त्यामुळे राधिकालही ती खूप आवडायची. दर चार-पाच दिवसात तीचा आवर्जून चौकशीसाठीचा फोन असतोच. आताही तसाच फोन आलेला. राधिकाने काव्याचा फोन उचलला खरा पण तिला रडू आवरेना. हॅलो म्हणताच ती रडू लागली. काव्या तिला काय झालं म्हणून विचारतात राधिकाला जास्तच रडायला आल. प्रकरण खुप गंभीर आहे हे समजायला काव्याला वेळ लागला नाही. राधिका सांगू लागली, "काव्या अलीकडे माझी खूप चिडचिड होते ग. मग कोणाचा राग कोणावर तरी निघतो. बऱ्याचदा एखादी वस्तू कुठे ठेवली तेच मुळी विसरुन जाते. मग ते शोधता-शोधता खूप थकवा येतो. घरातल्या कामाचा पसारा बघून जीव रडकुंडीला येतो. त्यात समीर कधीच मला मदत करणार नाही. बाळाकडे कधीच बघणार नाही. त्त्यात सासू, नणंद दोघी कशा आहेत तुला माहितीच आहे. त्यांचात जीव घ्यावा असा राग येतो. आई म्हणून मुलांसाठी मी कुठेतरी कमी पडते असं सारखं वाटत राहते. कधी कधी मग खूप रडायला येतं. पोरांसाठी नोकरी सोडली पण त्याचा काहीच उपयोग होत नाही असे वाटून राहते. राधिकाचे बोलणे काव्या शांतपणे ऐकत होती. शेवटी काव्याने राधिकाला सांगितले,"हे बघ राधिका सध्या खुशिला पण उन्हाळ्याची सुट्टी लागली आहे. तेव्हा फॉर अ चेंज म्हणून काही दिवस माहेरी राहायला ये. घराचा, सासूचा किंवा नवऱ्याचा कसलाच विचार करत बसायचं नाही. फक्त स्वतःसाठी थोडा बदल करायचा. हे बघ सगळ्या गोष्टी होऊन जातील ओके.... तेव्हा काळजी करू नकोस. सगळं व्यवस्थित होईल. स्वताची काळजी घे. असं म्हणून तिने फोन ठेवला.

संध्याकाळी काव्या स्वतः कार घेऊन राधिकाच्या घरी पोहोचली. राधिकाला काही दिवस माहेरी घेऊन जात आहे ह्यासाठी तिने राधिकाच्या सासूला शांतपणे समजावत परवानगी घेतली. प्रथम सासूने आपली मुलगी आजच घरी आली आहे अन् हिला लगेच माहेरी कसं जाता येणार. माझ्या मुलीला काय वाटेल.की ती आली म्हणून हिला आवडत नाही. अशी कारण देत नकारच दिला. पण काव्याने नंतर असं काही सांगितला की सासूला राधिकाला घेऊन जायची परवानगी द्यावी लागली.

राधिकाने सामानाची आवराआवर करून ब्यागा भरल्या. तोपर्यंत काव्याने फोन कॉल करून समीरला रधिकाविषयी सर्व सांगितलं," राधाला लवकरात लवकर समोपचाराची गरज आहे. ती एका भयानक आजाराला तोंड देते. त्यासाठी राधिकाला मी घेऊन जाते. कारण डॉक्टर म्हणून माझ्या मैत्रिणीला मला यातून बरं करायचं आहे." समीर जेव्हा ऑफिसमधून घरी आला तेव्हा त्याचा निरोप घेऊन राधिका कव्याबरोबर माहेरी निघाली.

राधिका अशी तडकाफडकी माहेरी आली हे तिच्या आईला आवडलं नाही कारण तिच्या दृष्टीने संसार टिकवणं महत्त्वाचं. त्यात थोडं बाईने कुठच्याही गोष्टीत नमत घेतलं तरी चालतं. असं आईला वाटायचं. काव्याने जेव्हा राधिकाच्या होणाऱ्या त्रासाबद्दल सांगितलं त्यावेळी आईला थोडी भीतीच वाटली. तिचं म्हणणं हे होतं की मला पण दोन मुलं झाली पण राधिका सारखा बाळंतपणानंतर असा त्रास झाला नाही. आमच्या काळात असं नव्हतं. तुम्हा आताच्या जनरेशन मध्ये नवीन नवीन काय तरी होत असत. आणि तुम्ही काही सहन करण्याच्या मनस्थितीत नसतात.

आईचे बोललेले हे शब्द मात्र राधिकाच्या मनाला लागले. आपल्या प्रकृतीत काहीतरी बदल झाले हे खरे आणि त्याचा त्रास आपल्याला खूप होतो. ह्या सगळ्या गोष्टीचा कुणालाच काही फरक पडत नाही. ही सर्वं मीच कशी चुकीची हे सांगतात.पण काय चुकते ? का चुकते ? हे मात्र कोणी सांगत नाही. निदान आईने तरी असे बोलू नये . या गोष्टीचं वाईट वाटल्यामुळे राधाच्या डोळ्यातून पाणी आलं. पण काव्याने तिला समजावलं. दुसऱ्या दिवशी काव्या राधिकाला घेऊन मानोसपोचार तज्ञांकडे गेली तिथे गेल्यावर ब्लड टेस्ट झाली. दुसऱ्या दिवशी पुन्हा डॉक्टर कडे जावे लागले. डॉक्टरांनी जे राधिकाला सांगितले त्यावरून राधिकाला समजलं की हा पोस्टपार्टम डिप्रेशनचा प्रकार आहे. डॉक्टरनी मग राधिकाला याविषयी समजावून सांगितले. 20 टक्के महिलांमध्ये हा त्रास जाणवतो. बाळंतपणानंतर जसे बाईच्या शरीरात बदल होतात तसे मनातही बदल होत असतात. फक्त त्याची तीव्रता कमी जास्त असते प्रत्येक स्त्रीला वाटते की आपण बाळाचे सगळ काही नीट करू की नाही ही काळजी सतत वाटत राहते मुल झाल्यानंतर स्त्रीची जबाबदारी वाढते. घरच्या कामांसोबतच तिला आपल्या बाळाचा सांभाळ देखील करावा लागतो. पण प्रसूती नंतर ती शारीरिकरित्या कमकुवत असते, त्यामुळे देखील तिच्या व्यवहारात बदल घडून येऊ शकतो. ही काळजी हे पोस्टमार्टम ब्लुजच लक्षण असत.पण या गोष्टीचा रूटीन कामावर परिणाम झाला व त्याचा कालावधी जास्त दिवस असला तर त्याचं रूपांतर पोस्टपार्टम डिप्रेशनमध्ये होतं. नवीन बाळ घरात आल्याने सगळ्यांना आनंद होतो. पण बाळाची आई कधीकधी खूप निराश असते तिचा आत्मविश्वास हरवू लागतो. काही काम करू नये असे वाटते, काही खावेसे वाटत नाही कधीकधी आत्महत्येचा विचार येतो. काही वेळा बाळाचा जीव घ्यावा असेही वाटते. मात्र थोड्या वेळाने आपला हा विचार चुकीचा आहे हे आपणाला समजते व त्याचा त्रास होतो. आपणच आपला तिरस्कार करतो. नेमकं काय होतं हे आपल्याला समजत नाही आणि दुसरी व्यक्ती समजून घेत नाही. त्यापेक्षा आपण असं म्हणू आपल्याला त्या व्यक्तीला समजावून सांगता येत नाही. तुमच्या बाबतीत नेमके हेच होतंय. हे बघा, राधिका तुम्हाला तुमच्या बाळाची सतत काळजी वाटते. पण त्याच जेव्हा करावं लागत तेव्हा राग येतो. तुमची मुलगी पाच वर्षाची आहे. अर्थात ती पण लहान असल्याने तिला ही आई हवी असते मग ती तुमच्याजवळ मस्ती, हट्ट करणार. तुम्हाला त्याची दगदग वाटते. घरातील कामे, दोन मुलं सांभाळणे फार कठीण आहे असे वाटते. त्यात तुमची आई, तसेच सासुबाई यांचं म्हणणं असं की, 'आम्ही ह्या सगळ्या गोष्टी केल्या; तर तुला का जमत नाही.' त्यामुळे आणखीन डिप्रेशन येते. तसेच तुमच्या या सगळ्या सिस्टीम मध्ये नवऱ्याचा सहभाग कुठेच नाही. तुमच्या पतीचीही मुलांबाबत मदत असती तर खूप गोष्टी आटोक्यात आल्या असत्या. कमी झोप, बाळाची काळजी, इतरांच्या संकल्पनेतून तयार झालेली आईची प्रतिमा आणि त्या साच्यातील आई बनवण्याचं ओझ याचा परिणाम तुमच्या नैराशेत आहे.

राधिकाला आता आपल्या आजाराच मूळ सापडलं होतं. तिने काव्याचे आभार मानले. त्यानंतर पुढचे दोन महिने तिची ट्रीटमेंट चालू झाली. औषध, व्यायाम, समुपदेशक, मेडिकेशन हे सगळं ती वेळेत करायची. काव्या तिच्याकडे जातीने लक्ष द्यायची.

साधारण तीन महिन्यात ती बरी झाली. या मधल्या काळात सर्व गोष्टी राधिका च्या सासूबाईंना सांगितल्या होत्या त्यामुळे त्या अनेक वेळा राधिकाला पाहायला यायच्या. समीर तर आठवड्यातून दोनदा तरी रधिकासाठी यायचा.रविवार असला की संपूर्ण दिवस रधिकासोबत घालवायचा. बाळाला सांभाळायचा. आजही रविवार असल्याने समीर सकाळीच आला. राधिका समीरबरोबर तिच्या घरी जायला निघाली. अगदी रिफ्रेश होऊन.

पारस झोपी गेला होता त्याला त्रास व्हायला नको म्हणून समिरही अगदी स्लो ड्राईव्ह करत होता. घरी पोहचताच सासु बाई आणि नंदाताई  ताट घेऊन दारात उभ्या होत्या. कार मधून राधिका, समीर पारस आणि खुशी उतरले. एक परिपूर्ण कुटुंब आनंदाने आपल्या घरकुलाच्या दिशेने चालू लागले. सासूबाईंनी भाकर तुकडा चौघांच्या वरून ओवाळून टाकला. आणि नंदाताई ने राधिकाचे औक्षण केले.

"राधिका, आम्हाला माफ कर. मुळात हे असं काही असतं हेच मला माहित नव्हतं. माझी मोठी बहीण त्याकाळात म्हणजे साधारण ४५ वर्षापुर्वी. पाच बाळंतपण झाली तिची. वर्ष - दीडवर्षाच्या अंतराने प्रत्येक दुसऱ्या मुलांचा जन्म झाला. खूप अशक्त झाली होती. सारखी झोपून राहायची. जेवायला गेली की भूक नाही म्हणायची. मुलाला दुध पाजायची नाही. दुध का दिलं नाही? विचारलं तर तो पीत नाही हेच उत्तर ठरलेलं असायचं. बाळंतपणानंतर अशक्तपणा येतो एखाद्याला असं समजून आम्ही सगळ्यांनी दुर्लक्ष केलं तिच्याकडे. त्यानंतर काही दिवसातच तापाच निमित्त होऊन गेली बिचारी कायमची सगळ्यांना सोडून. पण तिच्या वेदना आज मला समजल्या." सासुबाई व्याकुळतेने बोलत होत्या. मुली तुझ्या बाबत मी तेच केलं तुझी बदललेली मानसिकता, तुझ्यात अचानक आलेलं चिडकेपणा याकडे कानाडोळा करून तुला दोष देत बसले. चुकलच माझ.

"आई, तुमच काहीच चुकलं नाही. हा आजार गरीब -श्रीमंत,सुशिक्षित -अशिक्षित असा भेदभाव न करता कोणालाही होऊ शकतो. फक्त त्याची तीव्रता कौटुंबीक वातावरणावर अवलंबून असते. मी सुद्धा वेळीच तुम्हा सगळ्यांना मला होणारा त्रास सांगितला असत तर. पण आयुष्याच्या या वळणावर हे असं काही असतं हे मलाही माहित नव्हतं. या सगळ्यात काव्या माझ्यासाठी देवदूत ठरली. "



Rate this content
Log in