STORYMIRROR

Pradnya Tambe-Borhade

Fantasy Inspirational Children

3  

Pradnya Tambe-Borhade

Fantasy Inspirational Children

रम्य ते बालपण

रम्य ते बालपण

3 mins
181

बालपणीचा काळात पुन्हा एकदा जाता आलं तर किती गंमत येईल ना. स्वप्नात का होईना पण पुन्हा एकदा लहान होवून त्या आठवणीत एकदा जायचं आहे. आई-बाबांनी झोपताना सांगितलेल्या गोष्टी, गायलेली अंगाई पुन्हा ऐकायची आहे. मित्र-मैत्रिणींसोबत मनसोक्त खेळायचे आहे. त्यावेळी कुठ माहित असत आपल्याला की मोठ झाल्यावर एकमेकांना पाहू पण शकणार नाही ते. कोण कुठल्या ठिकाणी कामा निमित्त शहर सोडून जातं, तर कोणी लग्न करुन सासरी जाते. त्यावेळी हे समजले असले तर भांडण कधी केलीच नसती. हो ना....??? 


         आईचा खाल्लेला मार, ओरडा परत एकदा अनुभवायचा आहे. खाऊ पाहिजे म्हणून बाबां जवळ केलेला हट्ट. आज सगळी याची कमतरता जाणवते. शाळेत अभ्यास वेळेवर न केल्याने वर्गा बाहेर उभ राहण्याची झालेली शिक्षा. न आवडणारी भाजी मैत्रीणीला देवून तीच्या डब्यातली भाजी ताव मारत खावून घरी गेल्यावर आईला आश्चर्याचा धक्का बसायचा तो काही निराळाच.


      परिक्षा जवळ आली म्हणून आई अभ्यासाला पहाटे उठवायची. पहाटे केलेला अभ्यास चांगला लक्षात राहतो. अस बोलून रुम बाहेर जाताच. गाढ झोप लागून झोपा काढत. रूम उघडल्याचा आवाज येताच पुस्तक डोळ्यासमोर धरून नंतर मोठमोठ्याने वाचण्याची ती त-हा. एक - एक क्षण नजरे समोरुन जात आहे.


    ओळखीच्या काकांच्या लग्नात आपल्याच नातेवाईकाच लग्न आहे समजून फोटोवर फोटो काढत बसले होते. फोटोग्राफर ला नंतर समजले मी तर पाहुणी आहे. तेव्हा त्याचा चेहरा बघण्यासारखा झालेला. कारण त्यात कलवरी म्हणून माझेच फोटो जास्त होते.


      लहानपणी किल्ले बघायला जाण्याची भारी हौस. म्हणत प्रत्येक मैत्रिणीच्या टेरेसलाच केल होत एक किल्ला. सर्वांनी खावू सोबत घेवून खरच किल्ला चढलो अस दाखवत असायचो. खूप दमलो आता जेवायला पाहिजे म्हणत बरोबर आणलेला थोडा खावू खायचो. एक किल्ला झाला, जसे की शिवनेरी पाहून झाला आता दुस-या मैत्रिणीच्या टेरेसला प्रतापगड म्हणायचो. अशी खेळण्याची मज्जाच न्यारी.


        खेळ खेळताना सारख राज्य माझ्यावरच का म्हणत देवाला दोष देत खेळाचा मात्र पुरेपुर आनंद घेतला जायचा. कोणी चिडी खेळत असेल तर त्याला चिडवून खेळाबाहेर काढायचो.


      बाहुलीचा वाढदिवस तर..... स्वत:चा जसा साजरा करतात अगदी सेम टू सेम तसाच साजरा केलेला. त्यावेळी केक कुठे होते ओ..... मग काय आईला शिरा बनवायला सांगून कोणी शि-याचा केक आणला तर कोणी सजावट केली. सगळ्यांनी छान कपडे घालून वाढदिवस साजरा केला.


       लहानपणी सिग्नल लागला की वाटायच आता गाड्यांची रेस आहे वाटते. लाल रंग दिसला की थांबायचं. आणि हिरवा रंग लागला की कोण पहिल जातय म्हणून सगळ्या गाड्या भुरकन..... पळत सुटायच्या. याच कोड मोठ झाल्यावर उलगडले.


        आईची आणलेली नविन साडीची घडी पहिल्यांदा मोडून आरश्यासमोर नटावं वाटायचं. काय तो ड्रेस नको वाटयचे. आणि आता मात्र साडी घालायच्या वेळी ड्रेस मध्येच छान वाटत. कधीतरी स्वयंपाकघरात आवडीचा पदार्थ सुट्टीच्या दिवशी बनवला जायचा. पण आता मात्र रोजच जेवण बनवताना कंटाळा येतो आहे.


       सुट्टी लागली की भावंडे एकत्र जमायचो. रोज संध्याकाळी बाबांना नविन ठिकाणी घेवून जाण्याचा आग्रह असायचा. कधी बागेत, तर कधी नारळ पाणी प्यायला घेवून जा असा हट्ट असायचा. चित्रपट पाहायला न्या. 


     सणासुदीला आई च्या हातचे चविष्ट पदार्थ चाखायला मिळायचे. आजी - आजोबांकडून, आई- बाबांकडून कपडे, मिठाई, भेटवस्तू मिळायच्या. दादाकडून कॅडबरी सेलिब्रेशन मिळणार हे ठरलेलं असायचं.


     आई- बाबांच्या मारापासून आजोबांनी वाचवून गुपचूप कोपरीच्या खिशातून रंगिबिरंगी चाॅकलेट देताना आठवत आहे. खजिनाच असायचा नुसता. कधी कधी तर जादू आहे सांगत टोपी मधून देखील चाॅकलेट निघत असायची. 


        त्यावेळी कुठ माहित होत आहे हा क्षण भरभरुन जगावा म्हणून. पण त्यावेळी असणाऱ्या भावना आज आठवल्या तर स्वत:चच कधीकधी हसायला येत. उगाच कारण नसताना चिडत किंवा रागवत असायचो याची जाणिव आज होत आहे. आईने हि भाजी आवडत नाही म्हणताच जेवत्या ताटावरुन उठून नविन भाजी बनवताना पाहिले होते. आज हीच वेळ जेव्हा येते तेव्हा तीन कस केल असेल हा प्रश्न सहज मनात येतो. 


     लहानपणी दिलेला त्रास, चिडचिड आठवल ना किती वेडे होतो आपण हसू की रडू अशी अवस्था होते. पण हे बालपण पुन्हा जगावस वाटते. खरचं होईल का असं. जाता येईल का मला पुन्हा त्या रम्य अश्या बालपणात...


Rate this content
Log in

Similar marathi story from Fantasy