रीताच असणं!
रीताच असणं!


माझ्या सारख्या शाळकरी मुलांचे भावविश्व तरी काय असावे ?
शाळा ...घर आणि चित्रपट ! हो चित्रपटाने माझे भावविश्व समृद्ध केले होत. अस म्हटल तर काही वावग ठरणार नाही. पौगाडावस्थेत वाचलेल्या राजकन्याच्या कथा मला जगण्याची प्रेरणा देत होत्या आणि शाळेत बंदीस्त असलेले माझे व्यक्तीमत्व सांयकाळी कथा कादंबरी-या वाचताना मोकळे व्होयाचे. तिथे कथाचा नायक मीच असायचो.
अभ्यासात तसा जेमतेमच होतो मी. खेळातही पुढे नव्हतो. बोलायला चालायला बेताचाच. कळत नव्हते एव्हढी नकारात्मक कोठुन आली होती माझ्यात. सोबतीला असलेल संवेदनाशील मन तेच मला खुलवायच अन फुलवायचं
वस्तीतील रीता सर्वाच्याच जिव्हाळ्याचा विषय होता तसाच माझाही होता. लोकांच्या नजरेत ती चालु होती. वस्तीची नजरच तशी होती. मात्र माझ्या नजरेत ती तशी नव्हती. का नव्हती याचे स्पष्टीकरण माझ्याकडे नव्हते. तीच्या चांगलेपणावर माझा प्रचंड विश्वास होता. एव्हढा की माझ्याच मित्राने तिच्या हस्तक्षरातील दुस-याला पाठवलेली काही पत्र दाखवली तेव्हा मला पत्र खोटी वाटली आणि ती खरी ! माझ्या मनात आले एखाद्याची बदनामी तरी कीती करावी.?
माझा लाजरा बुजरेपणा ही माझी समस्या होती. संवेदनाशीलते सोबत मिळालेला तो एक शाप असतो. सगळ काही सहज होत नसतं त्यासाठी धडाडी हवी असते. तीच माझ्यात वजा होती. आपल्याला हवे ते प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात हे सत्य स्विकारायची माझी तय्यारी नसायची.
रीता मादक होती याची जाणीव मला आता होतेय तेव्हा फक्त एवढंच कळायच तीचे डोळे खुप गहीरे आणि गुढ आहेत. तिच्या शारीरिक हालचाली खुप मोहक आसयच्या.तिला मिठीत ओढण्याची मला नेहमीच घाई असायची पण तीने पुढाकार घ्यावा अशी मनातुन खुप ईच्छा आसायची.
माझ्या कुटुंबाचे माझ्याप्रति असलेला निष्काळजी दृष्टिकोन हा मला माझ्या मनात भरलेला नकारात्मकतेचा परीणाम वाटतो. वडीलांचा शीघ्रकोपीपणा त्यात भर टाकतो. भीती आणि अनिश्चितता यातुनच वाढीस लागते. यामुळे माझे व्यक्तीमत्वात बुजरेपणा आला तो पुढे घालवण्यास मला हात्तीचे बळ आणावे लागले.
पुन्हा रीता कडे वळतो. रीता मला खुप कमी वेळा बोलायची. पण रीताचे बोलणे माझ्या मनातील रीतेपणाला भरती आणायचे. ते माझ्या भावविश्वात आंनदाचे वादळ आणायचे.
जर ती माझ्या मिठीत आली तर जर तीच्याशी प्रणयक्रीडा खेळता आली तर..या दोन्ही जर तरच्या प्रश्नानी माझे भावविश्व सुंगधीत केले होते. पण मला माहीत होते हे कधी होणार नाही. पण वास्तवात होणार नसेल म्हणुन काय झाले शेवटी सत्यात व स्वप्नात जाणवणारी संवेदना जवळजवळ सारखाच आंनद देवुन जाते. स्वप्न हे मानवी मनाचे संतुलन ठेवणारी महत्त्वाची प्रक्रिया आहे. ती एक मानवाला लाभलेली देणगी आहे.
त्या वयात रीता आणि स्वप्न ही समानआर्थी जुळलेली बाब होती. स्वप्नाचा काही दोष नव्हता. असलाच तर वयाचा दोष असेल, मात्र त्याला स्वप्नदोष का म्हणतात हे मला अजुनही कळले नाही. भावनेचा बांध अनावर झाला की फुटणाराच हे सगळ्या सहज क्रिया आहेत त्यामुळे आक्रदंणार माझ मन शांत व्हायचे. स्वप्नात रीता माझ्या इच्छेनुसार वागायची.
रीताचे डोळ्यातील गहीरेपण विसरण खरंच कठीण आहे. तिच्या पेक्षा तीचे डोळेच जास्त बोलायचे, एकदा ती घरात एकटी आसताना तिने इशा-याने मला बोलविले होते.माझ्यावर भुल टाकावी अन मनाला संमोहित अवस्था प्राप्त व्हावी असे काहीसे झाले होते. त्या अवस्थेत मी तीच्या घरात शिरलो.
ये ..बस!.चहा घेशिल ? अस काहीस ती बोलत गेली आणि नाही म
्हणावे असे माझ्याकडे काही उरलेच नव्हते.
चहा झाल्यावर ती म्हणाली तु माझ्याकडे का पाहतोस
मी दचकून नाही म्हणालो
त्यावर ती हसली .. तिच हसणंही वेड लावाव असच!
माझ्या नकळत मी तिच्याकडे सरकलो तिच्या खांद्यावर हात ठेवताच ती काहीसी माझ्याकडे कलल्याच मला जाणवलं. मी तिला जवळ घेतली तशी स्पर्शाची भाषा जास्त बोलकी होऊ लागली अन मैफील रंगात येवु लागली. जसजसा मैफीलीस सुर लागत गेला तस तसे स्वर्गिय संगीत निर्माण होत गेले. देहभान विसरणे म्हणजे काय असते हे मला तेव्हा कळले. ऐन रंगात खेळ आला असताना अचानक ती म्हणाली ,.थांब खिडकीत कोणतरी आहे. हे ऐकुन माझे पेटलेले शरीर विझुन गेले.
मी उठलो खिडकित पाहील. तिथे कोणीच नव्हते. तिच्या कडे पाहील तर ती मला वेडावुन म्हणाली ..कसं फसवलं..आणि खळखळुन हसली. तेच ते तीचे हसणे होते.
मला तिचा राग आला नाही .वाटले ते प्रेमच!
त्यानंतर ती नेहमी भेटायची. भेटली की आमच बोलण कमी आसायच. देहबोलीच जास्त क्रियाशील झालेली. तीच्या रसाळ ओठांना माझे ओठ भिडायचे. तिला राग यायचा..लटकेच रागाने म्हणायची एवढ्याच साठी मला बोलवतोस का ?
मी काहीच बोलु शकत नव्हतो. कदाचित उत्तर तिला आवडले नसते.
पुढे कामात गुंतल्यामुळे मला वेळ मिळेना. रिता माझा निषेध वेळ मिळेल तेव्हा नोंदवायची. ती माझ्याशी बोलत नव्हती. तिची तळमळ मला जाणवायची पण माझाही नाइलाज होता. पण हे मी तिला सांगु शकत नव्हतो.
पुढे उच्च शिक्षणासाठी मला गाव सोडाव लागल. जाताना ती गर्द रानातल्या वडाच्या झाडाखाली भेटली.खुप रडली. मलाही भरुन आल होत. काय बोलुन तिच सांत्वन कराव कळत नव्हतं. शेवटी माझं लक्ष तिच्या रसाळलेल्या ओठावर गेले. ती आज खुपच सुंदर वाटली. माझ्या नकळत तीचे दीर्घ चुंबन घेत राहीलो. तिचा आजचा प्रतिसाद वेगळाचा होता. हे कधी संपुच नाही असे दोघांनाही वाटत होते. पण वास्तव नाकारु शकत नसतो कुणीच!
मी मागे न पाहता निघुन गेलो, ती मात्र तशीच बराचवेळ थांबली त्या वळणावर!
वर्षभरात माझ घरी येण झाल नाही. जेव्हा घरी आलो तेव्हा तीच्या घराच्या दरवाजावर लटकलेल्या टाळ्यावर माझी नजर खिळली. माझी अस्थिरता बहुदा सदाशिवच्या लक्षांत आली असावी. तो माझा शालेय जीवनातला जवळचा मित्र आसल्यामुळे माझ्या ब-याच गोष्टी त्याला माहीत होत्या.
त्याने सांगायला सुरवात केली, रीताच दोन महीण्यापुर्वीच लग्न झालं. मुलगा चागंला सरकारी नोकरीत आहे.पण तिला पसंत नव्हता तिच्या आई वडीलानी खुप त्रास दिला तिला आणि जबरदस्तीने लग्न लावुन दिले,
गेली ती... पण सारखी हरवल्या सारखी वागत होती. लोक म्हणतात तीला बाहेरच काही लागल असावं!
कशी जगत असेल देव जाणे!
तिच्या आईवडीलानी हे घर सोडलं आणि ते मोठ्या शहरात गेले. कुठे जाणार हे कुणालाच सांगितले नाही. त्याचे लोंकाबरोबर म्हणावे तेवढे चांगले संबंध नव्हते परिणामी ते कुठे जाणार हे त्यांनी कोणालाच सांगितले नाही.
माझे भरलेले डोळे लपवणे मला अवघड झाले तसे मी उठुन बाहेर पडलो आणि जिथे आम्ही शेवटचं भेटलो त्या वडाच्या झाडाजवळ आलो. सुर्य मावळतीकडे झुकला होता. वडाच झाड उदास वाटायला लागलं. संध्याकाळची उदासिनता झाडाबरोबर माझ्या मनात शिरत गेली. दुरवर गाणा-या फकीराची विराणीचे स्वर माझ्या काळजाला भिडत गेले
रीताच अस्तित्व माझ्या सभोवताली आसल्याच मला जाणवल.ती अजुनही त्याच वळणावर थांबली जिथे तिला मी सोडल अस मला प्रकर्षाने जाणवले..आता कुठे असेल ती?