Raju Rote

Others

3  

Raju Rote

Others

मोहाचा क्षण-राजू रोटे

मोहाचा क्षण-राजू रोटे

8 mins
1.1K


मि.दिनेश.. जेव्हा मी तुमच्याशी बोलून वळते तेव्हा तुम्ही माझ्या पाठमो-या भागाकडे पहाता..बरोबर ना! 

इतके बिनधास्त पणे दिनेशला विचारणा-या मिस लीलीने त्याला घाबरवून सोडले होते. त्याला क्षणभर काय बोलाव सुचेना..त्यांची स्थिती पाहुन ती खळखळुन हसली अन म्हणाली "अहो, कीती घाबरता! 

तो घाबरतच म्हणाला " मिस लीली ..अस एवढं बेधडक मला कुणीही विचारल नव्हतं !"आणि मिस लीली... तुम्ही पाठमो-या वळल्यानंतर तुम्हाला मी पाहतो हे कसे कळते..? मी तुमच्याकडे तशा नजरेन कधी पहात नाही."

त्यावर ती पुन्हा हसली अन म्हणाली ..तुम्ही माझ्याकडे पहाता हे माझ निरीक्षण आहे...आणि तसाही बायकांना सिक्स सेन्स असतो.पण डोंन्ट वरी मला तुमचा स्वभाव आवडतो.

तो हसला पण आवाज काही बाहेर आला नाही.

लांबलचक पसरलेल्या ट्रक टर्मिनलवर दिनेश समाजसेवकाच काम करायचा. ट्रक ड्रायव्हर आणि क्लिनरना एडस या आजारा बाबत जागृत करताना त्याच्या लैंगिक समस्यावरही समुपदेशन करणे हा त्याच्या कामाचा भाग असे. त्यांचा पाच जनांचा स्टाफ होता.त्यांची कामे ठरलेले होते. फील्डमधे जावून माहीती देणे.आलेले अनूभव आपल्या टीममधे शेअर करणे आणि नवीन स्टँटेजी बनविणे अशी प्रक्रिया सतत चाललेली असायची.त्यात अचानक एक नवीन व्यक्ती नव्याने जाँईन झाली होती.

तिच नाव मिस लिली, वय वर्ष ४२, उंच आकर्षक बांध्याची अशी लिली प्रामुख्याने सफाईदार इंग्रजीत बोलायची.

बोलण्या वागण्यात तिच्यात ब-यापैकी मोकळेपणा होता.

सुरवातीला काही दिवस लिली ही खुप गंभीर स्वभावाची स्री आहे असा दिनेशचा उगाच समज झाला होता.त्यामुळे तिच्याशी बोलतांना तो शब्द मोजून मापुन बोलायचा. पण त्याचा हा समज काही जास्त काळ टीकला नाही.

दुपारची वेळ होती. दुपारचे जेवन नुकतेच झाले होते. परीणामी शरीर पेंगायला लागले होते. दुपारच्या वेळी सहसा कोणी समुपदेशनासाठी केंद्रावर येत नसत हा नेहमीचा अनुभव होता. ते तिघेजन होते. दिनेश कदम आणि मिस लीली!त्यांना आलेली मरगळ झटकावी म्हणून मग दिनेशने आपल्याला येत असणा-या अनुभवाचे शेअरींग करायला सुरवात केली.

बोलता बोलता विषय लैगिकते वर आला.ते सारेजन या संदर्भात लोक जागृतीचे कार्यच करीत होते परीणामी या विषयावर बोलणे त्यांच्यासाठी काही विशेष नव्हते.

मिस लीली त्यांच्या मनातील शंका व्यक्त करीत होत्या.आणि त्यावर ते सारे चर्चा करुन त्याचे शंका समाधान करायचे. हस्तमैथून करणे चांगले की वाईट याबद्दल ट्रक ड्रायव्हर नेहमी प्रश्न विचारायचे. याला कारण समाजात मुख्यते आढळणारे दोन दृष्टिकोन होते.आयुर्वेदीक कींवा जडीबुटीच्या शास्त्रानुसार हे शरीराला घातक आहे याने कमजोरी येवून तुमची मर्दानगीवर परीणाम होतो. तर अँलोपँथी नुसार हस्तमैथून ही सहज प्रक्रिया असून त्यामुळे तुमचे मानसिक शाररीक आरोग्य चांगल राहण्यास मदतच होते.

दिनेशने या विषयाचा चांगलाच आभ्यास केला होता.हस्तमैथून हे सुरक्षित आहे हे त्याला प्रशिक्षणाच्या माध्यमातून कळले होते हे सार तो चर्चेच्या माध्यमातून मिस लीली यांना समजावून सांगत होता.त्यांना फिल्डमधे जाण्यापुर्वी परीपुर्ण ज्ञान असावे असा टीमचा आग्रह होता.हळुहळु या विषयावर बोलत होऊन मिस लीली चांगल्याच खुलत चालल्या होत्या.ट्रक ड्रायव्हरने त्यांना विचारलेल्या शंकाचे शास्त्रीय भाषेत त्या कसे समाधान करतील याचा एक लहानसा रोल प्ले च दिनेशने घेतला. यात कदमने ड्रायव्हरची भुमिका केली तर मिस लीली या शोशल वर्कर झाल्या होत्या. कदम मुद्दामहून अडचणीत आणणारे प्रश्न त्यांना विचारीत होते.आणि मिस लीली त्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करीत होत्या.ब-याच ठीकाणी त्या गडबडत कींवा अनइझी फील करीत होत्या. 

दिनेशने सांगितले. लीली मँडम हे तर काहीच नाही याही पेक्षा भयंकर अशा प्रश्नाना तुम्हाला फील्डमधे तोंड द्यावे लागेल.मनाची तयारी करण्यासाठी हा रोल प्ले तुम्हाला फायदेशीर ठरेल.

दिनेश मधेच थांबवून त्यांना मार्गदर्शन करीत असे. दिनेश आनुभावी असल्यामुळे त्याचे बोलणे प्रभावी होते.एक एक लैगिक आजारा संबधीचे मुद्दे मांडून त्याबद्दल गटात मनमोकळी चर्चा होत राहीली परीणामी आलेला आळस दुर पळाला होता, मोकळेपणाने केलेल्या या चर्चेमुळे गट म्हणून ते तिघे जवळ आले होते. त्यात मिस लीली दिनेश कडे आकर्षित झाल्याचे कदमलाही जाणवले होते. वेळ मिळेल तेव्हा दिनेश सोबत मिस लीली एकांतात व्यक्तीगत बाबीवरही बोलायला लागल्या होत्या.

एक दिवस असेच तिघेजन नेमकेच लंच करुन गप्पा मारीत बसले होते,गप्पाच्या ओघात त्यांनी सांगितले.."मी इथे येण्यापुर्वी लेडीज बार मधे काही दिवस काम केलय."

हे दिनेश व कदमना आश्चर्यचकित करणारे होते.चांगली सफाईदार इंग्रजी बोलणा-या मिस लीली या पेक्षाने शिक्षिका आहेत हा आतापर्यत त्यांचा समज होता.आणि अचानक त्या बार बाला होत्या हे कळल्यावर दिनेश तर उडालाच. त्याचे आश्चर्य तो लपवू शकला नव्हता.

त्याने विचारल "नेमके काय करायचा तुम्ही बार मधे?"

मी गाणे म्हणायचे!

हे ऐकतात कदम मधला मिस्कील पुरुष जागी झाला. मँडम आम्हाला खर नाही वाटत.?

त्यावर लीली खळखळुन हसुन म्हणाल्या "ऐका, मी एक गाणे म्हणून दाखवते. दिनेशची नजर दरवाजाकडे वळली.कदम उठला व त्याने दरवाजा धकलला.

लिलीनी गळा खाकरला आणि सरळ त्या दिनेशच्या डोळ्यात खोलवर पाहुन गाण गुणगुणायला लागल्या "आइये हुजुर तुमको सितारो मे ले चलु" या गाण्यातील आर्जवे इशारे त्या डोळ्यांनी करायला लागल्या तस्स दिनेशला वेगळल फील वाटायला लागल. तो गाण थांबवून म्हणालो "वा... छान गाता तुम्ही.तुमच्यात हे एक वेगळे टँलेन्ट आहे.बर झाल हे मला आज कळाले,

मिस लिली सुखावल्या. आता त्याच धाडस वाढल होतं.त्या आता काही गोष्टी बिनधास्तपणे बोलायला लागल्या होत्या.

त्या दिवशी लोकांशी चर्चा करायला दिनेश सोबत लीली फील्डमधे आल्या होत्या.आठदहा जनांचा घोळका एका कोप-यात पत्ते खेळत बसला होता.त्यांच्याकडे लक्ष जाताच त्यांनी आपला खेळ थांबवला.

दिनेशने आमली ओळख करुन दिली.बोलता बोलता त्यांना लैंगिक आजारापासून दुर राहण्यासाठी काय करायला हवे, यावर त्याने नकळतपणे चर्चा घडवून आणली.चर्चेत ते मोकळेपणे बोलत होतो.मिस लिलीही पुढे होऊन त्यांच्याशी संवाद साधीत होत्या.समोर उभी असलेली स्री आणि तिचे लैगिक विषयावर बोलण हे ड्रायव्हरांचा रस वाढविण्यास पुरेस होतं. ते नको ते प्रश्न खोलवर विचारुन चर्चा लांबवण्याचा प्रयत्न करीत होते.हे दिनेशच्या लक्षांत येतात तो पुढे झाला व त्यांच्या प्रश्नाची उत्तरे देत गेला. हळुहळु त्याचे प्रश्न कमी होत गेले.

मिस लीलीचा आत्मविश्वास मात्र कमालीचा वाढला होता. त्या आता क्लिनिकमधे येणा-या ट्रक ड्रायव्हर सोबत मोकळेपणाने चर्चा करीत होती.

पण हळुहळु त्यांचा दिनेश बद्दलचा दृष्टिकोन बदलत चालला होता.मिस लिलीनां आपल्याशी बोलायला आवडतय हे दिनेशच्या आगोदरच लक्षांत आले होते.आपल्यावर भुरळ घालण्याचा तिचा प्रयत्न आहे हे लक्षांत येताच तो सांभाळून तिच्याशी बोलत होता.

त्या दिवशी दुपारच्या वेळी क्लिनिक मधे कोणीच नव्हतं.बहुतेक शनिवार होता,या दिवशी क्लिनिक तस शांतच असते.कदम काही कारणास्तव लवकर घरी गेला होता.तिथे आता दोघेच होते.लिलीला हा एकांत हवा होता.ब-याच दिवसापासुन मनातले तिला दिनेशला सांगायचे होते.

दिनेश शांतपणे नोंदवहीत अहवाल लिहीत होतो.मिस लीलीने नेहमी प्रमाणे गाणे गुणगुणायला सुरवात केली.त्या गुणगुणतच त्याच्या समोर येवून बसल्या.

दिनेशने काम थांबवले व त्याच्या डोळ्यात पाहून विचारले "बोला, काय म्हणता?

काही नाही..आपल सहज..खर पाहील तर आज मन लागत नाही.

दिनेशने त्याच्या डोळ्यात पाहील.त्याच्या डोळ्यात पाणी तरंगल्याचा भास दिनेशला झाला.

तो म्हणाला "मन लागत नसेल तर कशात तरी गुंतवा."

हो.. तेच तर करतेय!

"म्हणजे नेमक काय करता?"

म्हणजे गाणे गुणगुणतेय.. कधी कधी वाचन करतेय. पण काहीच फायदा झाला नाही..तुमच्याकडे थोडा वेळ असेल तर मला तुमच्याशी बोलायचय.

त्याने डायरी बंद केली.आणि त्यांच्या डोळ्यात पाहील "बोला!

मिस लीली थांबल्या ..व म्हणाल्या " I have need a counselling "

हं..बोला, काय म्हणता! तो शांतपणे ऐकायला लागला.

लीली बोलायला लागल्या ..अलिकडे मला नीट झोप येत नाही

अनेक विचार मनात येतात.

काय विचार येतात.?

त्या थांबल्या ..कस सांगाव कळत नाही..!

बोला, मनमोकळेपणे बोला!

त्या थांबल्या ...दिर्घ पाँज देवून त्या बोलायला लागल्या..माझ्या स्वप्नात एक पुरुष येतो..तो माझ्याकडे पाहतो.. हसतो..त्याचा चेहरा ओळखीचा नाही..तो तिथपर्यतच थांबत नाही माझ्या शरीरावर त्याचे हात फीरतात .त्याचा स्पर्श माझ्या अंगभर पसरतो..तो मला कवेत घेतो...हळुहळु तो मला मिठीत दाबून टाकतो आणि मग हळुहळु तो माझ्या शरीरावरील सर्व कपडे दुर करतो..त्याच्याशी प्रणय रंगात येतो आणि तितक्यात मला जाग येते आणि मग मला रात्रभर झोपचा येत नाही.खुप डीस्टर्ब होते मी!

तो थांबला आणि त्याने दिर्घ पाँज घेवून विचारले "तुम्हाला त्या पुरुषासोबत प्रणय करतांना अपराधी पणाच वाटत का?"

लीली काही वेळ थांबल्या आणि त्यांच्या चेह-यावर मंद स्मित आले...नाही ! खर सांगायच तर मला तस काही guilt feeling येत नाही.

मग अस काय कारण असेल ज्यामुळे या स्वप्नांमुळे तुम्ही विचलित होता.?

त्या थांबून बोलायला लागल्या "अगदी प्रामाणिकपणे सांगायचे तर स्वप्नात घडणारे सारे मला आवडते...पण माझा शरीराला हवा हवा वाटणारा तो स्पर्श आचानक जाग आल्यामुळे नाहीसा होतो ..तेच मला त्रासदायक वाटतय!त्या खाली पहायला लागल्या.

दिर्घ विराम घेवून दिनेश बोलायला लागला.

तुमच लैंगिक जिवन कस आहे..I mean समाधानी कींवा असमाधानी!

त्याने मिस लिलीनां सरळच विचारल होतं.तस विचारन गरजेचही होतं.

मला लैगिक जिवनच नाहीय!

म्हणजे? साँरी ..कळल नाही..त्याने प्रश्नार्थक मुद्रेने पाहीले.

माझे मिस्टर आता नाहीत...तिच्या डोळ्यात वेदना दाटली.

I m sorry..मला माहीत नव्हत..

यावर आपल कधी बोलणही झाल नव्हतं.

तो थांबला..आणि पुन्हा बोलायला लागला.

मिस लिली माणसाच्या अन्न वस्र निवारा या जशा गरजा आहेत तशीच लैंगिक गरजही असते.यावर आपण मोकळेपणे कधी बोलत नाही.कारण सेक्स म्हणजे काहीतरी घाणेरडे असाच लोंकामधे गैरसमज असतो.आणि जेव्हा आपण लैंगिक विषया बद्दल लोकांमधे जागृती निर्माण करतो.प्रथमता ती आपल्या मनातही असायला हवी.. म्हणुन मी तुम्हाला मोकळेपणानं सांगू काही गोष्टी सांगू इच्छीतो.

बोला!

हे पहा...आपल्या प्रत्येकाच्या काही शाररीक व मानसिक गरजा असतात ..त्या पुर्ण नाही झाल्या की त्या स्वप्नाच्या माध्यमातून आपण पुर्ण करण्याचा प्रयत्न करतो.त्यातमूळे आपल मानसिक आरोग्य चांगल राहतं.

पण अशा स्थितीत मी काय करावे? त्या हलक्या आवाजात बोलल्या .

....तुम्हाला एखादा जोडीदार शोधावा लागेल.

हं...बरोबर आहे तुमच!...पण आता चांगला पुरुष कुठे शोधायचा?

दिनेशने मंद स्मित करुन म्हणाला..अहो कुठे काय !इच्छा असल्यास कुठेही मिळेल..त्यात काय विशेष!

मिस लिली मिस्कील चेह-याने म्हणाल्या"तसा एक पाहण्यात आहे माझ्या!

अरे वा..मग काय सुटलाच तुमचा प्रश्न! कोण आहे तो!

ती थांबली आणि मिश्कील हसत म्हणाली ..दुसर कोण?तुम्हीच आहात!

त्यावर दिनेश मोकळेपणे हसला..वातावरण रिलँक्स झाले ..अहो, काय मस्करी करता माझी!

मस्करी नाही ..I m serious बघा विचार करा...ती खरच गंभीर होऊन बोलायला लागली होती.

तो मात्र काहीसा चपापला..अस बेधडक पहील्यांदा कोणीतरी त्याला विचारीत होतं.पण तो स्वतावर शक्य तेवढ नियंत्रण मिळवत म्हणाला..मिस लिली.. माझं कौटुंबिक जिवन समाधानी आहे.त्यामुळे इतर गोष्टींचा विचार माझ्या मनात येत नाही.

त्यावर ती हसली व म्हणाली अहो कीती seriously घेता. मी सहज गंमत केली.

आता मिस लिलीची गंमतच त्याला कळेनाशी झाली. तो विचारात पडला.

हळुहळु मिस लिली व दिनेश यांची चांगलीच मैत्री रुळली होती.तो लिली सोबत मोकळेपणानं संवाद करीत असे.पण तिच्या मनात दिनेश बद्दलची प्रेम भावना वाढत चालली होती. 

आता मिस लिली हलकासा मेकअप करुन येत..कधीकधी जिन्स पँन्ट आणि टाँप घालून येत त्यातुन त्यांच्या शरीराचा आकार स्पष्ट दिसावा हा त्यांचा प्रयत्न असावा.आणि जेव्हा त्या दिनेशच्या डोळ्यात पाहायच्या तेव्हा त्यांच्या डोळ्यात एका प्रकारचे आवाहन आहे असे जाणवायचे.

पण दिनेशला माहीत होते या गोष्टी काहीकाळ छान वाटतात नंतर त्या त्रासदायक ठरतात.सुरवातीला गंमत म्हणून साधलेला संवाद पुढे त्रासदायक ठरायला लागतो.मिस लीली बिनधास्तपणे त्याच्याशी प्रेम संवाद साधण्याचा प्रयत्न करत होत्या.अशा स्थितीत त्यांच्याशी कसे वागावे हे त्याला सुचत नव्हते.

मिस लिलीच अलिकडे कामात लक्ष नाही हे इन्टीटुटच्या वरिष्ठ पदाधिका-यांच्या लक्षांत आले होते.मग एक दिवस त्यांना हेड आँफीसला बोलावून तुमच्या कामाविषयी आम्ही असमाधानी आहोत असे त्यांना सांगण्यात आले.

त्या दिवशी काही कारणास्तव दिनेशला कार्यलयात पोहचण्यास उशीर झाला होता.आँफीसमधे कदम एकटाच काम करीत होता.दिनेश येताच त्याने काम थांबवले व सांगितले .अहो सर, थोड लवकर नाही का यायच ?

काय झाले?

आताच तुमची वाट पाहुन मिस लिली गेल्या.

तो उसने हसलो व म्हणाला त्यात काय विशेष ...उद्या पुन्हा येतील!

आता कशाला येतील त्या!

का ? दिनेशने आश्चर्याने कदमकडे पाहीले.

त्यांनी राजीनामा दिला.

काय? त्याला आश्चर्याचा धक्का लागला.खरं पाहील तर मिस लिलीच्या वागण्याला तो वैतागला होता. पण त्या गेल्यावर मात्र त्याचे मन हळहळले.मनात उदासीनता दाटून आली.मनात आले एवढ्या काही वाईट नव्हत्या मिस लीली!

काही वेळ तो शांत बसला. तेवढ्यात चहा आला.चहा त्यांनी ओठाला लावला तसा मिस लिली गायच्या ते गाणे दुरुन कोठून तरी ऐकायला आले. 

"आये हुजूर तुमको सितारो मे ले चलू..दिल झुम जाये ऐसे बहारोमे ले चलू!

काय कसला विचार करताय दिनेशजी..कदमने तंद्रीतून जागे केले.

काही नाही..सहज विचार करीत होतो.

चहा पिता पिता तो विचार करायला लागला. माणसाचे मन अकलनीय आहे.ते काय आणि कसे वागेल याचा अंदाज अजून तरी आपल्याला आला नाही.हे एक सत्य त्याला त्या दिवशी उमजले तसा त्याच्या चेह-यावर स्मित हास्य आले.



Rate this content
Log in