गहीरे तळे!
गहीरे तळे!
तळ्याच्या काठावर बसून उमाकांत तळ्यातील वलयाला न्याहळीत होता.ते वलय त्याला गुढ वाटत होते.बराच वेळ तिथे बसला होता.
सायंकाळची वेळ होती.शहर संपल्यावर दुर शेवटच्या कोप-या वर विस्तीर्ण पसरलेले असे हे तळे होते.या तळ्यातले पाणी शहराची तहान भागवायचे.पण हे तळेच उमाकांतला तहानलेले वाटत होते.या तळ्याला कशाची तहान आहे हे त्याला कळत नव्हते.नैसर्गिक सौदंर्याने नटलेले हे तळे शापित होते.इथे रात्री अतृप्त आत्म्याचां वावर असतो अशा अफवा लोकांमधे पसरल्याने सहसा सांयकाळी इथे कोणी यायला धजत नसे.उमाकांत तसा खुप धाडसी नव्हता पण गेल्या काही दिवसात त्याचे स्वताःवर नियंत्रण राहीले नव्हते.आँफीस सुटले की तो चालत बसस्टाँपवर यायचा शहराचे शेवटच टोक गाठणा-या बसमधे चढत असे आणि मग शेवटच्या स्टाँपवर उतरुन तो पुढे चालत राहायचा.हे सार यांत्रिकपणे घडत जायचे.कुणीतरी आपल्याला बोलवतेय असा भास त्याला होत असे.
आजही असेच घडले होते तो संमोहीत होवून चालला होता.बस शेवटच्या बस स्टाँपवर थांबली तसा तो तळ्याच्या दिशेने चालायला लागला.सांयकाळ होत आलेली.हळुहळु अंधार दाटायला लागलेला.तो तळ्याकाठी येऊन एका दगडावर बसला आणि तळ्याला न्याहळु लागला.हळूहळू अंधार पडायला लागलेला.तळ्यात हळुहळु पुर्ण चंद्र दिसायला लागलेला.आकाशातून तळ्यात उतरलेला चंद्र त्यांला खुप देखणा वाटत होता.कधी तो आकाशात पाहत तर कधी तळ्यात पडलेले चंद्राचे प्रतिबिंब न्याहळत होता.खुपच अल्हाददायी वातावरण वाटत होते.त्यात सर्वत्र पसरलेली निरव शांतता!.तो आपल्याच तंद्रीत हरवून गेला.
त्याची तंद्री तुटली ती अचानक दुरुन येणा-या एका स्रीच्या हुंदक्याच्या आवाजाने!.तो उठला आणि त्या हुंदक्याच्या आवाजाच्या दिशेने चालायला लागला.जस जसा तो पुढे चालत गेला तसतसा हुंडक्याचा आवाज वाढत गेला.त्याच्या चालण्यात यांत्रिकपणा होता.तो होशमधे नव्हताच जवळ जवळ जर असता तर त्याला लक्षांत आल असत.अशा रात्रीच्या वेळी निर्जन स्थळी महीलेचा रडण्याचा आवाज येणे हे काहीतरी विचित्र असाव.तो आवाजाच्या दिशेने पुढे सरकत राहीला.आणि एका ठीकाणी येवून त्याचे पाऊल थांबले.आता त्याच्या हाताच्या अंतरावर अंधारात एक लावण्यवती स्री हुंदके देत रडत होती.त्याच्या अंगावर क्षणभर काटा आला.भीतीचा गोळा त्याच्या पोटात उठला.पण दुस-या क्षणी त्या स्रीचे लावण्य त्याला आकर्षित करीत होते. तिच्याकडे आपण ओढले जातोय असे त्याला क्षणभर जाणवत होते.तो तिच्या जवळ पोहचला ती खाली मान घालून रडत होती.तो तीच्या मागे उभा राहीला. तिच्या खाद्यावर हात ठेवून तिला बोलाव का या विचारात तो होता.पण ते त्याला योग्य वाटेना मग तो गळा खाकरुन,बोलायला लागला.मँडम..माफ करा मी तुम्हाला डीस्टर्ब करतोय ..पण तुम्ही अशा या निर्जन ठीकाणी ..आणि का रडत आहात?...आता तीच्या रडण्याचा आवाज थांबला. काहीवेळ ती काहीच बोलली नाही.ती शांतता खुपच भयानक वाटत होती.हळुच ती त्याच्याकडे वळली आणि तिने त्याच्या डोळ्यात पाहीले.तिच्या नजरेत एक वेगळीच चमत्कारिक आकर्षण होत.तो तिच्या डोळ्यात पाहतच राहीला.ती भारलेल्या आवाजात म्हणाली..माझ दुःख तुम्हाला नाही कळणार...मी इथे नेहमी येत असते..माझ घर इथे जवळच आहे.. पण तुम्ही रात्रीच्या वेळी इथे काय करता?...तुम्हाला माहीत नाही का? ही जागा भयानक आहे.
तो थांबला..मला कल्पना आहे..पण मी इथे माझ्या इच्छेने येत नाही इथे मला कोणतरी ओढुन आणतय...?
मग ते तर जास्तच भयानक आहे.ती त्याच्याकडे पाहुन चमत्कारिक हसली.
तो काहीसा हादरला...म्हणजे?
ही जागा शापित आहे.इथे अनेक लोकांनी जीव दिला आहे.आणि या तळ्यात मोठमोठया मगरी देखील आहेत.त्या भुकेल्या असतात त्या कधी बाहेर येवून माणसाला फस्त करतील सांगता येत नाही.
तो काहीसा भानावर आला.. मला भीती वाटतेय..तुम्ही अस काही बोलू नका.
तुम्ही थांबलात का इथे ?
मला कळत नाही..
तो इच्छा असूनही निघु शकत नव्हता.कोणती तरी शक्ती त्याला तिथे थांबण्यास भाग पाडत होती.
ती मंद हसली..ठीक आहे..तुम्हाला माझा सहवास हवाय..हो ना!
त्याने यांत्रिकपणे मान हलविली.
मग चला माझ्या सोबत ..अस म्हणुन ती चालायला लागली.तो तिच्या मागे चालायला लागला.
तो कुठे चाललाय याचे त्याला भान नव्हते.
सर्वत्र दाट झाडी आणि त्यात अंधार त्यामुळे त्याला फक्त चंद्राच्या शितल कीरणांचा सहारा होता..त्या झाडीतुन बराच वेळ चालल्यावर ते दोघे एका मोकळ्या ठीकाणी पोहचले.त्या मोकळ्या जागेत एक भव्य महल उभा होता.लांबुनच त्याला महलात मंद तेवत असलेले दिवे दिसले. टुमुकदार असा भव्य महल मंद प्रकाशात नाहून निघालेला त्याच्या दृष्टीपथास पडला.
ती गेट जवळ येताच गेट अपोआपच उघडला.ती आत शिरली तो तिथेच थांबला.तिने मागे वळून पाहीले थांबलात का? या आपलाच महाल समजा!
तो तंद्रीत तिच्या मागे चालू लागला. ती जसजशी पुढे जात होती तसतसे अपोआप दरवाजे उघडायचे दिवे पेटायचे .त्याला सारेच विचित्र वाटत होते.पण आता परत फीरणे अशक्य होते.
तिच्या मागे तो भारलेल्या अवस्थेत चाललेला. हळुहळु त्याच्या दृष्टीस पडले ..काळा पायघोळ अंगरखा परीधान केलेले व चेह-यावर नकाब असलेले माणसे पुतळ्यासारखे उभे असलेले आसे होते. .सावकाश चालत ते दोघे मुख्य भव्य अशा दालनात आले आणि तिथले चित्र पाहुन तो अवाक झाला.
एक वयोवृध्द व्यक्ती हातात कंदिल घेवून उभा होता.व त्याच्या सभोवताली वर्तुळात पायघोळ अंगारखा व नकाबपोश व्यक्ती उभे होते.काही अंतर ठेवून सभोवताली काहीसे अंतर राखून अनेकजन गर्दी करुन उभे होते.त्याला घेवून आलेली स्री आता दिसत नव्हती .तो त्या लोकां मधे फीरत होता पण जसे काही उपस्थितांना त्याचे अस्तित्व जाणवतच नव्हते.ते सर्वजन आपल्याच तालात वावरत होते.तो गर्दित एका कोपऱ्यात उभे राहुन सर्व अद्भुत जग अनुभवित होता,
नकाबपोश मानसाच्या वर्तुळात फीरणारा वृध्द काहीतरी मंत्र पुटपुटत होता.आणि सर्वजन त्याच्या मागे तो मंत्र उच्चारीत होते अचानक तो वृद्ध थांबला आणि त्याने हात वर केला.आणि जशी काही आज्ञा मिळाल्यासारखे सर्वाच्या अंगावरील अंगरखे खाली गळून पडले.तो कोप-यातुन हे सारे अद्भुत जग न्याहळत होता.यापुर्वी असे काही जग अशु शकते अशी त्याने कल्पनाही केली नव्हती.तो बारकाईने न्याहळु लागला.वस्रहीन शरीरावर नकाब असलेल्या त्या जमावात स्री पुरुष दोघेही होते.हळुहळु एकमेकाचा हात धरुन ते प्रणय चेष्टा करायला जागा शोधू लागले.सभोवताली असलेली गर्दी आता उत्तेजित होऊन ते हव्या त्या ललनेसोबत प्रणयचेष्टा करण्यात मग्न झाले.
उमाकांत आवाक झाला होता तेवढ्यात त्याच्या खाद्यावर कुणीतरी हात ठेवला.तो थंड स्पर्श होताच तो दचकला.त्याने वळुन पाहीले.तर त्याला घेवून येणारी तीच लावण्यवती स्री होती!तिने उमाकांतला हलक्या आवाजात विचारले "कस वाटल हे सारं?
तो भारवलेल्या आवाजात बोलला..काही कळत नाही..सगळ विचारापलीकडचे आहे!हे सारं काय आहे ?
ती मंद हसली..हे आमच जग आहे..आम्ही इथेच जमतो फक्त रात्री!
कोण आहेत हे सारे जन
सारे अतृप्त आहेत..तृप्त होतात इथे येऊन..त्यांना आता नाव गाव नाही ते फक्त ...!
फक्त काय ?...आत्मे ...भुते ..
ती मोठ्याने हसली...घाबरलास?
छे...मी कुठे घाबरलोय?तो घाबरला होता.
ती हळुच त्याच्या जवळ आली ..तिचा हळुवार स्पर्श त्याला जाणवला..क्षणभर त्याला छान वाटले.तो तिच्या जवळ ओढला गेला.हळुहळु तोही तिच्या शरीराशी खेळू लागला.हळुच तिने तिचे ओठ त्याच्या ओठावर टेकविले.आता उमाकांतही बेहोश होऊ लागला होता.
तेवढ्यात विज चमकावी तसे झाले आणि एक गोड चह-याची मुलगी त्याला दिसली..उमाकांत ..सोड तिला ..निघ इथून ...जा!स्वताला वाचव...असा आज्ञाधारक आवाज त्याला ऐकायला आला.क्षणभर त्याला कळेना कोण बोलतय कोण होती ती मुलगी!
तो भानावर आला.त्याने त्या लावण्यवतीला हलकेच दुर केले.ती काहीशी नाराज झाली.तिने हाताची मोहक हालचाल केली ती आणखी सुंदर भासायला लागली.ती त्याला मोहात पाडण्याचा पुरेपुर प्रयत्न करीत म्हणाली "उमाकांत, मी कधीची तुझी वाट पाहतेय ..आता मी तुला माझ्या मिठीतून कुठेही जावू देणार नाही.
हे माझ तारुण्य सार तुझच आहे...ये ..जवळ ये!
तो स्वताला सावरीत म्हणाला..नाही..मला हे सारे नको आहे.
तीच्या चेह-यावर नाराजी आणि क्रोध दाटू लागला
नको ..तर मग का आलास माझ्या मागे मागे!
माझे माझ्यावर नियंत्रण राहीले नव्हते..मला कळल नाही.
पण आता उशीर झाला आहे.ती म्हणाली
नाही मला घरी गेले पाहीजे..उमाकांत म्हणाला.
ती खळखळून हसली...जावू देते ..ठीक आहे सोडते तुला पण तुला एक करावे लागेल.. तुझे कपडे तुला एकदा काढावे लागतील.मग मी तुला जावू देणार
तो थराथरला. त्याने आपला शर्ट काढला आणि काय आश्चर्य सर्व सभोवताचे लोक त्याच्याकडे वेड्यासारखे पाहायला लागले.त्याच्या जगात हा कोणतरी भलताच माणुस आला होता.सर्वजन पून्हा एकदा मुख्य दालनात जमा झाले.वयोवृद्ध माणूस त्याच्याकडे रागाने पाहत होता.वातावरण गंभीर झाले होते.आता काय होईल असा प्रश्न सर्वाच्या चेह-यावर होता. तुझी हीमंत कशी झाली इथे येण्याची?तो वृध्द ओरडून म्हणाला.
मला माहीती नाही..उमाकांत म्हणाला!
तुला आता शिक्षा भोगावी लागेल.
तो गप्प उभा राहीला..शब्द त्याच्या तोंडातून फुटेना!
आता तुला याच जगाचा भाग बनावा लागेल!
पण माझे जग वेगळे आहे..तो थरथरत म्हणाला.
असेल पण ..ज्या अर्थी तु इथपर्यन्त आलाच त्या अर्थी तुझ्या वासना इच्छा आकांक्षा अतृप्त आहेत..त्या तुला इथे पुर्ण करता येतील. पण तुला इथेच राहावे लागेल.आमचा भाग बनावे लागेल.
नाही ...माझ्या अनेक जबाबदाऱ्या आहेत. त्या मला पुर्ण कराव्या लागतील.त्यासाठी मला माझ्या जगात जावे लागेल.
यावर सारा हाँल खदखदण हसला.
तितक्यात एक तेजस्वी आवाज आला...थांबा !
सारे आवाक होऊन आवाजाच्या दिशेने पाहायला लागले.
.आणि क्षणात ती गोड चेह-याची तरुणी दृष्पथास पडली.ती धारदार आवाज आला ...त्याला जावू द्या..!
तो वृद्ध तिला रागावून म्हणाला..तू यात पडू नयेस!
ती हसली ...मी तुमच्या कोणत्याही गोष्टीत पडत नाही ..तशी माझी इच्छा नसती. मात्र इथे माझा नाईलाज आहे.. याला मी ओळखते.याला सोडा तो सज्जन माणुस आहे.
त्या बदल्यात त्याची कीमत तुला चुकवावी लागेल.
मला मंजूर आहे.आणि तुम्ही जर नाही म्हणालात तर माझ्याकडे काही चांगल्या शक्तीच्या बळावर मी याला इथून घेवून जावू शकेल.
ती थांबली..
वृद्धाचा नाईलाज झाला.
तो दरडावून म्हणाला ...ठीक आहे जा त्याला घेऊन आणि त्याच्या कडे वळून म्हणाला आणि तू.. पुन्हा इकडे येवू नको.
त्याने मान हलविली ..आणि ती गोड चेह-याची तरुणी त्याला घेवून त्या महाला बाहेर पडली.
दिवस वर आला होता.सुर्याची प्रखर कीरणे पडले होते.तळापासुन काही अंतरावर उमाकांत पडला होता.त्याचा शर्ट फाटला होता.चेहऱ्यावर काही ओरखडे पडलेले दिसत होते.त्याने डोळे उघडले व सभोवताली पाहीले.उन्हाने त्याचे डोळे दिपून गेले.उठताना त्याला त्रास झाला.अशक्तपणा जाणवत होता.रात्री नेमके काय झाले हे त्याला आठवत नव्हते.अंधूकस काही काही आठवत होतं ..आणि ते नेमक सत्य की स्वप्न हे ही त्याला कळत नव्हत.तो उठुन हळुहळु तळ्याच्या कडेला गेला.तोंडावर पाणी मारताच त्याला ताजेतवान वाटले.त्याने अंगावरचे कपडे नीट केले व तो बसस्टाँपवर जावून थांबला.येणारे जाणारे लोक त्याला विचित्र नजरेन पाहत होते.तितक्यात बस आली तो बस मधे शिरला कन्डक्टरने टीकीट त्याच्या हातात दिले..तो खिडकीबाहेर पाहुन काल घडलेल आठवू लागला.निटस काही आठवत नव्हत डोक मात्र ठणकायला लागले होते.आणि अचानक त्याला आठवला तो गोड तरुणीचा चेहरा..हो तिच होती ती!काँलेजच्या पहील्या वर्षी त्याच्या वर्गात शिकणारी!तो तिच्याशी खुप कमी बोलला होता.ती मात्र त्याला भेटायची आणि बोलण्याचा प्रयत्न करायची!उमाकांतला या सा-या गोष्टीत रस नव्हता.तो नेहमी अभ्यासात मग्न असायचा.त्याच्या घरची परिस्थिती म्हणावी तेवढी चांगली नव्हती.त्यामुळे काँलेजचे मजेदार जिवन त्याला अनुभवायला मर्यादा पडत.रतिकाला हे सार बहुतेक कळल असाव.तिला तो आवडायला लागलेला.ती अभ्यासात खुप हुशार नव्हती.ती नेहमी उमाकांतला वाचनालयात गाठायची व काही प्रश्नांची उत्तरे समजून घेत असे.तो ही तिला मदत करायचा.
काही प्रसंग असेही आले जेव्हा अभ्यासाच्या निमित्तानं ती दोघे उद्यानात एका कोपऱ्यात बसलेले त्यावेळी ती त्याला खेटायची पण त्याने तिचा कधी गैरफायदा घेतला नव्हता,परीणामी तिच्या मनात त्याच्या बद्दल आदर वाढत चाललेला.आपल्यासाठी योग्य वर हाच या निर्णयाला ती पोहचली होती.या सर्व गोष्टी पासुन तो अनभिन्न होता.पण अचानक काय झाल कळल नाही पण रतिकाने काँलेजला येण सोडल होतं.काही दिवस त्याला तिची गैरहजरी जाणवली मात्र काळाच्या ओघात तो तिला विसरुन गेला होता.तिच रतिका काल त्याला भेटलेली आणि तिने त्याला संकटातून बाहेर काढले होते.तो विचाराच्या तंद्रीत आसताना कन्डक्टर म्हणाला चला शेवटच स्टाँप उतरा..तो खडबडून जागी झाला व उतरु लागला त्यावर त्याला कन्डक्टर म्हणाला ..अहो झेपत नाही तर एवढी घेता कशाला?
उमाकांत काही न बोलता गुपचुप खाली उतरला.कन्डक्टरच्या तोंडाला लागणे त्याला योग्य वाटले नाही.
एक दोन दिवस असेच निघुन गेले.आता त्याला बरे वाटायला लागले होते.जूने पुस्तके चाळता चाळता त्याला एक डायरी दिसली.ती चाळताना एका ठीकाणी त्याचे डोळे खिळले.रतिकाचा घरचा पत्ता होता.एवढ्या वर्षानंतर हे सार घडतय याला काय म्हणावे हे त्याला सुचत नव्हत.त्याने तो पत्ता कागदावर लिहुन घेतला व खिशात टाकला कपडे घालून तो बाहेर पडला.
त्याला तिचा पत्ता जास्त शोधावा लागला नाही.काहीशा जिर्ण वाटणा-या लाकडी चाळीजवळ तो पोहचला.एक दोघाना पत्ता विचारुन तो एका घरासमोर आला.ते घर बंद होते.त्याने दरवाजा वाजवला काही वेळ काहीच प्रतिसाद आला नाही.थोड्या वेळाने दरवाजा उघडला व दरवाज्यात एक वयस्कर गृहस्थ उभा होता.
बोला..ते गृहस्थ म्हणाले
रतिका ...इथेच राहते का?
त्या गृहस्थाने त्याला न्याहळले व विचारले..कोण तुम्ही?
उमाकांतने आपली ओळख करुन दीली आणि तो म्हणाला रतिका आणि मी एका वर्गात शिकायचो.
बर ..या आत ..अस म्हणुन त्यांनी त्याला आत घेतले
काय काम होत?
काही विशेष नाही सहज या भागात आलो होतो म्हटल भेटुन जावे.तस बरेच वर्ष झाली..आता ती लग्न होवून गेली असेल असाही विचार आला पण म्हटल चला या निमित्ताने घरच्यांशी तरी बोलण होईल.
ती व्यक्ती गंभिर झाली.चेह-यावर दुखाःची छटा त्यांच्या चेहऱ्यावर उमटली.काहीतरी अघटीत घडले असावे हे उमाकांतला जाणवले
तो म्हणाला काय झाले?
तो वयस्कर उठला व त्याला म्हणाला .मी रतिकाचा वडील...या माझ्या सोबत !
उमाकांतला वाटले कदाचित रतिका आतल्या खोलीत असावी.तो त्याच्या मागेमागे गेला व ते दोघे एका ठीकाणी थांबले.समोरचे दृष्य पाहुन उमाकांतचे हात पाय गळून गेले.
देव्हा-याच्या बाजूला एक फोटो होता त्या फोटोसमोर दीवा तेवत होता,तो फोटो रतिकाचा होता.
ते बाहेर आले.त्या वृध्दाने त्याला चहा विचारला ..तो धन्यवाद म्हणाला..तो दुखीः स्वरात म्हणाला कसे झाले हे सारे?
ती काँलेजला शिकत असताना तिला कँन्सर डीटेक्ट झाला.आणि त्यातच काही वर्षाने ती गेली.आता खुप वर्ष झाले..पण मला सांगा अस अचानक एवढ्या वर्षानी तुम्हाला तिची आठवण कशी आली..त्याला दोन दिवसापुर्वी घडलेल सार सांगाव अस वाटल पण त्यावर त्याचा विश्वास बसला नसता म्हणून त्याने ते सांगायच टाळल.
बस सहज आठवण आली...विशेष काही नाही!अस म्हणून तो बाहेर पडला.
लाकडी जिना खाली उतरता उतरता उमाकांत विचार करायला लागला..जग हे अकलनिय आहे..कधी काय होईल सांगता येत नाही.एवढ मात्र खरे आपल चागले कर्म नेहमीच आपल्याला सोबत असतात आणि अनेक संकटातून वाचवतात.तो बाहेर पडला ..पलिकडे असलेल्या समुद्राचे गार वारे त्याच्या चेह-यावर येताच त्याचा ताण निवळला.आणि पुन्हा उत्साहाने तो वेगाने चालायला लागला.त्याच्या डोक्यात विचार आला आपण जे अनूभवले ते सत्य होत की स्वप्नं ! पण यावर आता जास्त विचार न करता घडलेले सारे तो विसरु लागला!