आठवणीच्या सावल्या!
आठवणीच्या सावल्या!
दुपार आज कशी अंगावर आल्यासारखी वाटतेय. माझ्यातली उदासीनता बहुदा तिच्यात शिरली असावी. बाहेर तप्त उन्हाच्या झळा शरीराच्या त्वचेलाच घायाळ करतात असे नाही तर मनालाही थकवितात. त्यात तुझी आठवण शरीरावर निथळणा-या घामासारखी वाहतेय शरीराभर!
अश्याच कडक उन्हाच्या प्रहारात तू मला भेटायला आली होतीस. कोण पाहील कोण काय म्हणेल याचा विचारही शिवला नव्हता तिच्या मनाला.वस्ती बाहेरच्या ओजाड काहीशा पडक्या वाटणा-या भींतीच्या आडोशाला तू आलीस अन सरळच डोळ्यात रोखुन म्हणाली होतीस "बोल, कशासाठी बोलवलेस?"
"काही नाही सहज!"
माझे शब्द मुकेच झाले होते.पण ती शांतता बोलकी निघाली. तू जवळ आलीस आणि म्हणालीस, "मी, तू म्हणशील तिकडे कुठेही यायला तयार आहे. फक्त तू सांग!"
मी शब्द दिलाच नव्हता. मात्र बराच वेळ तिचा हातात हात घेवुन तिच्या मनात शिरण्याचा मार्ग शोधीत राहीलो. हळुहळु एकमेकाशी अंगसंग करीत आम्ही बराच वेळ बसलो. निघताना ती एवढेच म्हणाली होती. तू बोलत काहीच नाहीस, तुला हव तेच करतोस!
तसेच आम्ही नेहमी भेटतच राहीलो. तिची भेट म्हणजे मनात फुललेल हळुवार चांदण होत. या चांदण्यात फिरताना शहाणपणचे वस्र पूर्ण उतरावेच लागताच. मग जिथे जागा मिळेल तिथे बसण, बोलण, हसण. सगळच होत जातं. प्रेमात माणुस पडतो म्हणजे क्षणभर त्याला भुरळ पडते, जगाचा विसर पडतो. अशा या भेटीला निरोपाचा शाप लाभलेला असतो. पण म्हणुण का कुणी एकामेका भेटायच टाळत नाही. अशाच भेटीत गुलमोहर फुलल्या सारखं प्रेम फुलत खुलत. तीचा निरोप घेताना काळीज विसरुन आल्याची हुरहुर मलाही नेहमीच जाणवत राहायची हे कबुल करायला
हवं.
भेटता भेटताच अचानकच ती कुठतरी हरवली. कुठे गेली याचा शोध लागता लागला नाही. शेवटी तिला बेवफा जाहीर करुन माझा तपास मीच थांबविला.
बेवफासे भी प्यार होता है..या गाण्याचे नुसरत फत्ते अलीखानचे सुफी स्वर मात्र अजुनही कानात गुंजताहेत. पण खरच बेवफा कोण होत? ती, जिने काही न सांगताच निघुन जावे, .की तो ज्याने तिला विश्वसाने ह्दयाशी कवटाळले नव्हते. तिच्यापेक्षा तिच्या वरवर सुंदर दिसणाऱ्या शरीराशीच तो खेळत राहीला. दिवस हे भींतीवर टांगलेल्या कँलेडरच्या पानासारखे बदलत राहतात. आठवणी मात्र सावल्या सारख्या कायम राहतात सोबतीला!
ऊन सरतं तस ढगाळलेल वातावरण अन गार वारा मनाला देहाला सुखवतो. अशाच एका पावसाळी सांयकाळी ती त्याला दिसली. ती एकटी नव्हती तिच्या बरोबर कोणएक पुरुष होता. तिची अन माझी नजरानजर झाली तशी तिने नजर वळवली. बाकी पाहुन न पाहील्याचा अभिनय तिला छान जमला होता.आता अभिनयाचा कस मलाही लावावाच लागला. त्या पुरुषाच्या शारीरिक जवळकीने तो तिचा अधिकृत पुरुष असावा हे सांगायला खुप आभ्यासाची गरज नसावी. ती आली तशीच निघुन गेली.क्षणाक्षणाला बदलणारे हे जग माणस हेच जिवंतपणाचे लक्षण असावे.
ती त्याला एवढी महत्वाची कधीच वाटली नव्हती.ती त्याच्यामागे भिंगरी सारखी फीरायची. ती आपल्याशिवाय कुणाचाही विचारच करु शकणार नाही या त्याच्या दिवास्वप्नाला वास्तवाचा सुरुंग लागला होता. ती सुखात होती की दुःखात हे त्याला निश्चित सांगता येत नाही.मात्र तिच्याकडे पर्याय होते हे त्याने समजुन घेण्यास विलंब केला.
तुम्हाला सर्व काही मिळत पण तुमच्यावर मनापासून प्रेम करणारी व्यक्ती दूर गेल्यावर मिळणे कठीण असते, हे सत्य तुम्हाला नेहमीच पटेल.