Raju Rote

Others

0.2  

Raju Rote

Others

थंडीने गोठलेले क्षण...!

थंडीने गोठलेले क्षण...!

4 mins
3.2K


थंडीने गोठलेले ते क्षण...!

रात्रभर ते एकमेकांच्या मिठीत होते

सकाळी जाग आली तेव्हा ती त्याच्या शेजारी नव्हती

तो घाबराघुबरा झाला

कसे बसे कपडे करुन तो तिला शोधायला बाहेर पडला

पहाटेचा रम्य प्रहर

बाहेर कडाक्याची थंडी पडलेली

खुप पुढे आल्यावर ती त्याला दिसली

ती वेगाने पुढे चाललेली

तो तिच्यामागे धावत येतो.

फुललेल्या श्वासावर नियंत्रित करुन तिला विचारतो

हे काही बरोबर नाही.मला तुझ वागणच कळत नाही

ती म्हणते मला थांबवू नकोस, मला जावू दे!

तो तीचे हात धरुन तिला विनवणी करायला लागतो

मला अशी अचानक सोडुन कुठे चाललीस?

ती त्याच्याकडे निर्विकार नजरेन पाहत म्हणते

तुला सोडाव अस मला कधीच वाटल नाही

पण माझी अडचण समजून घे,मला जावू दे!

कुठे जाशील?

सांगायच असत तर निघालेच नसते

मग तु पुन्हा कधीच भेटणार नाहीस

तिच्या डोळ्यात पाणी तरारलं

तेच तिच उत्तर होतं

एक वर्षापुर्वीची गोष्ट आहे

अशीच थंडी पडलेली

ती त्याला एका कँफे हाऊस मधे भेटलेली

ती तिथे रोजच यायची

तोही तिथे यायचा

पहीली नजरानजर झाली

नंतर ओळख झाली

ती खुप कमी बोलायची

बोलतांना ब-याच प्रश्नाचे उत्तर टाळायची

त्यानही तिला कधी जास्त फोर्स केल नाही

तो मनात म्हणायचा

असतील तिच्या काही समस्या!

त्याच्या नकळत ते एकमेकांच्या खुपच जवळ आले होते

एक दिवस दोघांनी ठरवून हील स्टेशन गाठल ..

चांगले पाच दिवस ते तिथे राहणार होते.

हिल स्टेशनच रम्य वातावरण

कडाक्याची थंडीही तिच्या सहवासात गुलाबी झाली होती.

दिवसभर ते मस्त भटकायचे

हव तस वागायचे

इथे त्यांना ओळखणार कुणी नव्हत

ती म्हणाली "या काही दिवसात मी माझे खरे आयुष्य जगतेय"

मलाही तेच वाटतेय..नाहीतर मीही घर आणि काम यात खुप गुंतलो होतो. तुझ्यामुळे माझ्या जिवनाला अर्थ प्राप्त झाला अस वाटतय

तु पहील्यादांच प्रेमात पडलास का?

बहुतेक ..नाही म्हणायला माझ्या जिवनात एक दोन आल्या..पण ते प्रेम नव्हत ..त्यांना माझ्याकडुन काहीतरी हवे होते आणि मला त्यांच्याकडून!हीशोबच होता तो...पण तुझ तस नाही..तु मला खुप आवडलीस..तुला फक्त देत राहाव अस वाटत

काय देशील ?

माझ आयुष्य!

ती हसली..अस आयुष्य कुणाचे कुणाला देता घेता येत नाही

हो येत!

कसं?

आपण लग्न करुया?

ती उदास हसली..ते शक्य नाही!

समोरचे भव्य डोंगर न्याहळीत तो म्हणाला कीती सुंदर आहे

जिवन?

हो ..पण मी समोर दिसणाऱ्या डोगराबद्दल बोलतोय

मी त्या बद्दलच बोलतेय.दुरून डोंगर सुंदर दिसतात..माणसाच आयुष्य असच आहे लांबुन छान वाटतं. जवळ आले की गुंतागुंत कळते

तु तुझ्या आयुष्यातील गुंतागुंती बद्दल बोलत नाहीस!

बोलून तुझ आयुष्य मला काँम्लीकेटड करायच नाही.

ते तसही होतच आहे...तु काही सांगत नाहीस म्हणुन!

चल निघु या का?

नाही मला सांग काय प्राँब्लेम काय आहे तो

घरी गेल्यावर सांगते

घरात तिने कपाट उघडून एक फाईल काढली आणि त्याच्या हातात दीली

तो फाईल चाळीत राहीला..त्याचा चेहरा वेदनेन कळवळला

तिला कँन्सर होता..फाईल ठेऊन तो तिच्याकडे वळला

अन थरथरत्या आवाजात म्हणाला

कधी डीटेक्ट झाला

तु भेटायच्या अगोदर

मग मला सागावस वाटल नाही

नाही

का? ..तुला वाटल असेल जेव्हा मला कळेल तेव्हा तुला मी सोडून देईल. हो ना!

सोडून द्यायला ना मी तुला धरले होते ना तु मला!

तो थांबला ..

तुला माहीत नाही तु दिसली नाहीस तेव्हा पासून काय अवस्था झालीय माझी

चांगला धडधाकट दिसतोय

तुला गंमत सुचतेय ..बोल

नाही रे मी सहज बोलले ..पण खर सांगु का !मला हे तुला कळु द्यायचे नव्हते

पण का? तो कळवळला

मला तुझ संवेदनाशील वागण कळतय नाही अस नाही..पण मला तुझ्या समोर असच जगायच ..मस्त...तुला माझ्याविषयी असाच गर्व वाटायला हवा..तु माझी दया करावी कीव करावी हे मला पटत नाही.

पण तुला एक माझ्या मनातले सांगते..पण आता नाही.नंतर कधीतरी ...ते बोलत राहीले..कधी हसले कधी रडले भावनाचा महापुरच आला होता.

मधले काही दिवस ती त्याला भेटाली नाही..तिचा फोन डेड झाला होता.तो रोज कँफे हाऊसमधे जातो.तिच्या रीकाम्या खुर्चीला न्याहळतो!

आजही ती आली नाही

तिच्या रिकाम्या जागेकडे त्याची नजर पुन्हा पुन्हा जायची

त्याला वाटल आज नाही आली तर उद्या येईल

उद्या नाहीतर परवा येईल .कधीतरी येईलच

पण ती आलीच नाही

तिचा राहण्याचा पत्ता तिने ते त्याला जाणिवपुर्वक दिल नव्हते

संपर्क क्रमांक लागत नव्हता

तिच्याशी संपर्क साधाव असे कुठलेही माध्यम त्याच्याकडे उरलं नव्हत

आता फक्त चमत्काराची वाट पहात बसण्याशिवाय त्याच्यापुढे पर्याय नव्हता

दिवसामागुन दिवस जात राहिले हळुहळु तो तिला विसरत चाललाय अस त्याला वाटायच..पण ती होतीच त्याच्या आठवणीत!

पण एक दिवस मित्राला भेटायला तो हाँस्पिटलमधे आला होता

तिथे ती एका खुर्चीवर बसलेली त्याला आढळली

आनंद राग चिड अशा भावनांचा उद्रेक त्याच्या मनात झाला

तो सर्व गोष्टींना नियंत्रित करीत तिच्याकडे गेला

तीने हलकेच स्मित केले

तो हसला

कशी आहेस?

ठीक आहे!

कुठे आहेस ?

इथेच आहे आता आपण आहोत तिथे!

कँन्सर हाँस्पिटलमधे?

तिने न बोलता होकार दिला

त्या दिवशी दिवस रात्र ते सोबत होते.तो तिला म्हणाला जे होईल ते होईल.जो पर्यत आपल श्वासात श्वास आहेत..तो पर्यत आपण सोबत राहुया

आपण एकमेकाच्या मिठीत आयुष्य काढूया!

ती उदास हसली

तु हरणा-या घोड्यावर पैसे लावतोस अस नाही वाटत तुला

मला तरी कुठे जिंकायचय?

तिने त्याच्या डोळ्यात खोलवर न्याहळले.

तिला प्रेमाशिवाय काहीच नाही दिसलं

रात्रभर ते एकमेकांना प्रेम देतघेत राहीले

सकाळी ती त्याला न सांगता निघुन गेली होती.

रेल्वेच्या आवाजाने ते भानावर आले.

पहाटेची एक्सप्रेस गाडी आली होती.

तिचा आवाज क्षीण झालेला...मला जावू दे

माझे जर तु हीत चिंतीत असशील तर माझ ऐक

अस म्हणुन ती स्टेशन कडे वळली

तो तिथेच असलेल्या एका सिमेंट खुर्चीवर बसला

त्याने चेहरा हातात झाकून घेतला..

गाडी सुटण्याची शिटी वाजली..आवाज करीत गाडी निघून गेली

ते स्टेशनावर पुन्हा भयानक शांतता पसरली

तस ती शांत भयानकता त्याच्या आयुष्यावर पसरली होती..पहाट थंडीने गारठली होती.ती त्याला भयानक वाटत होती.


Rate this content
Log in