The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW
The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW

Raju Rote

Others

2.7  

Raju Rote

Others

जान्हवी

जान्हवी

19 mins
169K


जान्हवी शांत बसुन होती . समोर बसलेला समुपदेशक तिच्याशी धीर गंभीर आवाजात बोलत होता. त्याच्या बोलण्यात एक संथ आणि शांतपणा भरला होता. जान्हवी त्याच्याकडे पाहत होती अधून मधुन तिचे लक्ष खिडकीतून बाहेर जात होत. कुठल्याही एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे तिला कठीण जात होते. रात्री पार्टीत ती भरपुर प्यायली होती ती नशा पुरती उतरली असे दिसत नव्हते. सततच्या पिण्यामुळे तिच्या डोळ्याखाली काळी वर्तुळ दिसायला लागलेली .शरीर मात्र आकारबंध असेच होते तिने केस मोकळे सोडले होते जिन्स पँन्ट आणि टी शर्टवर ती आकर्षक दिसत होती.त्यात तिच बिनधास्त वागणे होतेच सोबतीला.

समुपदेशक हलक्या काहीशा जड आवाजात बोलत होता.जान्हवी..सध्या तुमचा दिनक्रम काय असतो.?

मी उशिरा उठते आणि मैत्रिणीना किंवा मित्रांना फोन करते. मग आम्ही मस्त मजा करीतो..कुठेही भटकतो.

पण जान्हवी सततच्या पिण्यान तुझ्या शरीरावर वाईट परीणाम होतोय याची जाणीव आहे का तुला?

काय होईल ? तेच होईल जे सर्वाचे होते! दुसरे काय?

तस नाही.. तुला यामुळे खुप यातना सहन कराव्या लागतील?

प्लीज..मला भीती दाखवू नका!

भीती नाही मी तुला सत्य काय आहे हे सागतोय...तो थांबला. अजुनही वेळ गेली नाही..तु पुन्हा चांगले आयुष्य जगु शकतेस.

माझ आताच आयुष्यच चांगलं आहे

नेमकं तुला कसं आयुष्य आवडेल?

तुम्हाला मी स्पष्ट सांगते. मला आयुष्यात खुप आनंद उपभोगायचाय..वेगवेगळ्या मित्रासोबत मज्जा करायाचीय!दारु पियाची आहे

मज्जा ..यु मिन?

येस आय मिन सेक्स! येस आय मिन दँट..हे पहा मला कोणतेही बंधन नकोत ..मी माझ्या इच्छेप्रमाणे जगणार आहे.

ओ के.तुम्ही तुमच्या इच्छे प्रमाणे जगावे यात वावगे काहीच नाही

मग?ती म्हणाली

काही नाही तुम्हाला ज्यावेळी काही बोलावस वाटेल तेव्हा इथे या तुमच स्वागत होईल.आणि शक्य झाल्यास स्वताला काही चांगल्या कामात गुंतवा!

ठीक आहे प्रयत्न करेन.अस म्हणुन ती उठली आणि बाहेर आली बाहेर तिचे आई वडील आणि भाऊ बसलेले ते उभे राहीले.

झाल बोलुन? वडीलांनी विचारले

हो.. तिने मान हलवली

मग काय आज पासुन तु दारु आणि तुझे वाईट मित्र परीवार सोडणार?

हे काही ठरले नाही.

कसे ठरेल हीला चटक लागलीय नको त्या डुकरांसोबत फीरायची. ती अशी सुधारणार नाही. हीला चागले दोन चार दिवस अन्न पाणी न देता घरात डांबावे मग कळेल. तिचा भाऊ चिडुन आपला राग बाहेर फेकीत राहीला

काही नाही हिचे लग्न करुन द्यावे म्हणजे आपण मोकळे होऊ! आई काळजीच्या सुरात म्हणाली.

पण कोण करणार हीच्याशी लग्न? भाऊ संतापलेलाच होता.

आई त्याला काहीस ओरडून म्हणाली ..अरे ,असा राग करुन प्रश्न सुटतो का ? जरा दमाने घे!

चला घरी बोलू या.असे म्हणुन ते निघाले.

रामनाथ विचार करायला लागले.आपल्याकडुन काय चुकले?आयुष्यभर आपण देव धर्म सर्व सांभाळत आलो.कुठलेही पाप आपल्या हातुन घडेल असे वर्तन केले नाही.रामनाथ स्वताची गार्मेट फँक्टरी सांभाळायचे.त्यांची पत्नी सावित्री ही साधी सरळ पतीच्या शब्दाबाहेर नसायची.मुलगी जान्हवी आणि मुलगा वेंकटेश अस चौकोनी कुटुंब सुख समाधानाने राहत होते.मध्यतरी शिक्षणासाठी जान्हवी दिल्लीला गेली होती.तिथे तिला अनेक मित्र मैत्रिणी भेटल्या.घरातल्या धार्मिक वातावरणातुन बाहेर पडलेल्या जान्हवीला सुरवातीला नव्या मित्र मैत्रिणीशी जमवुन घेण जरा कठीण गेलेले पण हळुहळु तिला पंख फुटत गेले आणि मग ती मोकळ्या आभाळात स्वच्छंदी भरारी घेवु लागली.रात्री अपरात्री बाहेर मित्रासोबत भटकणे हवी तेवढी दारु पिणे हे नेहामीचे झाले.पुढे तिला पिल्या शिवाय जमेनासे झाले.कसेबसे शिक्षण पुर्ण झाल्यावर हाँस्टेलची रुम सोडुन तिला घरी यावे लागले.तिला जडलेले व्यसन हे आई वडिलांच्या पासुन जास्त दिवस लपले नाही.जेव्हा त्यांना हे सारे कळले तेव्हा त्याना धक्काच लागला होता.हळुहळु त्यांनी परीस्थिती स्विकारली.तिला बोलुन फायदा नव्हता.तिला या परीस्थितीतुन बाहेर काढणे गरजेचे होते.त्यासाठी वेंकटेश यांनी ब-याच ठीकाणी फीरुन बरीच माहीती काढली व एका ठीकाणी समुपदेशकाकडे ते तिला सतत घेवून जावु लागले.तिचे व्यसन थोडे कमी झाले की तिचे एखाद्या व्यक्तीशी लग्न लावुन आपण मोकळे होऊ अशी भाबडी अपेक्षा ते बाळगुन होते.

तिला मात्र हा सारा वेडेपणा वाटत होता.पण आपण जास्त बोललो तर ते आपल्याला एखाद्या हाँस्पिटलमधे अँडमिट करतील ही भीती तिला वाटायची.त्यापेक्षा जे चाललय ते चालु द्यावे. जमलच तर मनासारखा माणुस भेटला तर आपणच लग्नही करु पण एका अटीवर आपण आपआपले आयुष्य मनसोक्त जगायच.कुणी एकाने दुस-याच्या स्वतंत्र्याच्या आड यायच नाही.अशा व्यक्तीच्या शोधात ती होतीच.आणि एक दिवस तशी व्यक्ती तिला सापडली.

समुपदेशन केंद्राच्या बाहेर एक माणुस मोठमोठ्याने बोलत उभा होता.साधारणता चाळीशी गाठलेला हा माणुस दिसायला आकर्षक होता.सडपातळ उंच दाढी वाढलेली काळा गाँगल्स व हातात सिगारेटस अशा स्टायलने तो कौन्सलिंग केंद्राबाहेर अस्वस्थ फे-या मारीत होता.तो व्यसनी आहे हे सांगायची कोणाला आवश्यकता नव्हती.त्याला कशाचीच काळजी नव्हती.तो कुणाशी नीट बोलत नव्हता.असा हा बिनधास्त माणुस तिला आवडला होता.तिला तो तिच्यासारखाच वाटला.बोलुन कंटाळल्यामुळे तो शांत खिडकीतून बाहेर पहात बसला.ती स्वता त्याच्याकडे गेली.आणि मंद स्मित करीत म्हणाली.. हाय!

तो हाय म्हणाला व तिच्याकडे दुर्लक्ष करुन पुन्हा खिडकीतून बाहेर पहायला लागला.

तिला हा आपला अपमान वाटला.ती त्याला हळु आवाजात म्हणाली

मला मदतीची गरज आहे.

काय त्याने प्रश्नांर्थक मुद्रेने पाहीले

ती पुढे म्हणाली माझे सिगारेट संपलेत तु मला देशील का?

त्याने काही न बोलता एक सिगारेट तीच्या हातात ठेवली.ती सिगारेट घेवुन बाहेर गेली एका कोप-यात उभी राहुन ओढत राहीली.संपुर्ण सिगारेट फुंकुन ती आत आली आणि त्याच्या बाजुला बसली

त्याने तिच्या कडे पाहीले तशी ती त्याला थँक्स म्हणाली.

तो निर्विकार पणे "ठीक आहे" एवढच बोलला.

ती काही वेळ थांबली आणि म्हणाली तु मला आणखी एक मदत करशील?

पुन्हा त्याने "काय" असे प्रश्नांर्थक मुद्रेने पाहीले

ती थांबली आणि गंभीर आवाजात म्हणाली माझ्याशी लग्न करशिल?

तो आता तिच्याकडे न्याहळुन पाहु लागला ...तु वेडी आहेस का?

तुझ्या सारखीच ..ती हसली

पागल! अस म्हणुन तो तीला न्याहळु लागला.तशी ती सुंदर होतीच. त्याला ती कामुक वाटली.

तो काही बोलायच्या अगोदरच ती म्हणाली मी तुला दोन दिवस देते मला खात्री आहे तु नाही बोलणार नाही.दोन दिवसानी इथेच भेटु..तुझ नाव नाही सांगितलंस

परेश...!

तीने स्मित केले आणि भेटू अस बोलुन ती निघुन गेली

तो विचारात पडला ..हिला आपल्या बद्दल काय माहीत आहे.पण मज्जा करायला ठीक आहे.नाहीतर तसाही त्याला सरोज सारख्या मध्यमवयीन महीले सोबत राहण्याचा कंटाळा आला होता.

ठरलेल्या दिवशी जान्हवी कौसेलिंग सेंटरला पोहचली ..तो तीची वाट पहात थांबला होता.ते बाहेरच भेटले

चल कुठेतरी हाँटेलमधे जावू या.

नको! अस म्हणुन तिने जिन्सच्या खिशात कोंबलेली लहानशी बाँटल काढली.दोन घोट घेवुन तीने त्याला आँफर केली.त्याने क्षणाचीही उसंत न दडवता ती बाँटल घेतली आणि तोंडाला लावली,काही घोट घेवुन पुन्हा ती तिच्या सुपुर्द केली.

तो म्हणाला चल पलिकडे असलेल्या गार्डनमधे बसु या!

चालेल !अस म्हणुन ते झपाट्याने पडीक अशा गार्डन मधे शिरले.

गार्डन मधील एका मोकळ्या बेंन्चवर ते दोघे बसले.तिने बोलायला सुरवात केली. माझ नाव जान्हवी सायकोलाँजी मधे एम ए केलय.मला मुक्त जगायचय ..ते मी माझ्या आई वडील भाऊ यांच्यासोबत राहुन नाही जगु शकत यासाठी मला लग्न करावे लागेल.आणि ते तुझ्याशी करावे असे मला वाटते.

पण तु मलाच का निवडलेस?माझ्या बद्दल तुला काय माहीत आहे?

काही नाही..तुला मी पहील्यादा मागच्या आठवड्यात पाहीले.तुझे बेलगाम वागणे कशाचे काही घेण देण नाही या गोष्टी मला जमेच्या वाटल्या.आपण लग्न करु फक्त जगासाठी! आपण नवरा बायको असु पण तु तुझ्या मर्जीने व मी माझ्या मर्जीने जगण्यास मोकळी हे तुला मान्य असले तर पुढचे बोलुया

तो थांबला...अन म्हणाला मान्य आहे

गुड ..तिच्या चेह-यावर हसु फुलले

आता सांग तु काय करतोस कस जगतोस

मी एक दारुडा आहे मी दिवसभर क्लब मधे जुगार खेळतो. नेहमी जिंकतो असे नाही म्हणजे कधीतरी हरतोही.त्यातुन माझ्या गरजा पुर्ण करीतो.आणि सध्या एक बाई माझ्या सोबत असते वयस्कर आहे.आम्ही लग्न न करता राहतो ..पण तु आल्यामुळे आता मी तिला जा म्हणुन सांगु शकतो.

सेल्फीश!

तो हसतो..सेल्फीश कोण नाही या जगात!फरक एवढाच आहे मी स्पष्ट बोलतो इतर बोलत नाहीत.

पण ती कुठे जाईल?

तिच्या पहील्या प्रियकरांकडे..पण तो माझा इश्शु नाही..तु त्याचा जास्त विचार नको करुस.

ओ.के..तर मग आज सोमवार आहे. शनिवारी तु माझ्या घरी ये आणि माझ्या घरच्याशी लग्नाबद्दल विचार...जमेल ना?आणि जरा चांगला ये! केस वैगरे कापुन घे.

आता पासुनच माझ्यावर नियंत्रण मिळवायला लागलीस का?

तस काही नाही रे! मी जरा व्यवहारीक विचार करतेय.मी तुझ्याबद्दल भरपुर चांगल सांगेन ते सार खर वाटायला हवे.

ओ के...गुड ! हुशार आहेस तो हसला.

तिने खिशातुन बाँटल काढली उरलेले घोट सपविले..व म्हणाली हा पत्ता घे वेळेवर ये चल निघते मी!आणि ती गार्डनच्या बाहेर पडली.

जान्हवीच्या घरातल वातावरण सारच बदलल होतं.एक भयानक शांतता त्याच्या घरात जाणवत होती.काल संध्याकाळी जान्हवीने आपण लग्नासाठी मुलगा पाहील्याच सागितल तेव्हापासुन हे सार झाल होत.ही मुलगी आपल्याला सुखाने काही जगु देणार नाही. त्यापेक्षा ती लग्न करुन दुर कुठेतरी जातेय हेच बर अस शहाणा विचार रामनाथच्या मनात यायचा तर दुस-याच क्षणी बालपणातील अल्हड जान्हवी त्यांना दिसायची अन त्याच्या मनात वेदना निर्माण करीत असे.

आज सायंकाळी वेंकटेश फँक्टरीतुन घरी आल्यावर सर्व कुंटुबासोबत या विषयावर त्याना चर्चा करायची होती.

सांयकाळचे सात वाजले होते हळुहळु अंधार पडायला लागलेला पण कुणालाही दिवा लावायची इच्छा होत नव्हती.सावित्री उठली आणि तिने दिवा पेटवला. प्रकाशात रामनाथचा गंभीर चेहरा भेसुर दिसत होता.रामनाथने सावित्रीला जान्हवीला उठवायला सांगितले.ती पलिकडे बेडरुममधे झोपली होती.ती उठली फ्रेश झाली व सोफ्यावर येवुन बसली.थोड्यावेळाने वेंकेटेश आला त्याने फ्रेश होण्यासाठी थोडा वेळ घेतला.मग सर्वाना काँफी घेवून सावित्री आली व समोरच्या खुर्चीवर बसली.काहीवेळ कोणीच काही बोलले नाही.मग जान्हवीनेच तोंड उघडले.या शनिवारी तो येणार आहे.

कुणाला विचारुन हे सार करतेस! वेंकटेश चिडुन बोलला.

कोणाला काय विचारायचे ? माझे आयुष्य आहे मला निर्णय घेण्याचा अधिकार आहे.

म्हणजे आमचा काहीच अधिकार नाही का?

शांत रहा ..अस बोलल्याने काही प्रश्न सुटणार नाही.जान्हवी ..तुला जे करायचे ते कर म्हणजे तु सुटशील आणि आम्ही सुटू ! सावित्री वैतागून बोलत होती

रामनाथ स्थितप्रज्ञ होऊन सारे ऐकत होते ..शेवटी सर्वानी जान्हवीचा प्रस्ताव मान्य केला.बैठक संपली आता शनिवारची वाट पहात ते बसले.

परेश आणि जान्हवी गेले तीन दिवस उटीला आले होते.कोर्ट मँरेज झाले होते.ते होण्यापुर्वी बरेच नाटय घडले होते.एकतर परेश हा घरातल्या कोणत्याही व्यक्तीला आवडला नव्हता.जान्हवीच वय सत्तावीस पर्यत आलेल तर तर परेशने चाळीशी गाठलेली..या सर्व गोष्टी घरच्याना पटणे शक्य नव्हत. पण जान्हवी ठाम होती.ती म्हणाली लग्न करीन तर परेशशीच! नाहीतर नाही ,शेवटी सर्वाचा नायलाज झाला आणि त्यांच लग्न लावून ते मोकळे झाले.साधारणता घरातुन मुलगी जेव्हा लग्न होऊन बाहेर जाते तेव्हा माहोल खुप भावनिक असतो पण इथे तस काही नव्हत.आई वडीलांना होणाऱ्या वेदना सोडल्या तर बाकी सगळ आनंदी वातावरण होतं. जान्हवी तर पिंजऱ्यातुन बाहेर मुक्त उडणा-या पक्षा सारखी तिची स्थिती झाली होती.लग्न करायला परेशच्या मित्राने त्याला पन्नास हजार दिले होते ते घेवून ते दोघे हानिमुन साजरा करायला उटीला आले होते एका सुंदर हाँटेलात त्यांच वास्तव्य होत.आता इथे तिला थांबणार कोणी नव्हत अगदी ती हव तस मजा करीत होती.निसर्गरम्य वातावरणात ती चांगलीच रमली होती.

सांयकाळची वेळ होती हाँटेलच्या बाहेर भव्य लाँन होत.बाहेर थंडी पडली होती.त्यांनी दोघांनी थोडी थोडी रम घेतली तशी शरीरात थोडी उब निर्माण झाली.

परेश मला खरेच वाटत नाही मी सर्व बंधनातुन मुक्त झालेय.

जान्हवी, बंधने ही आपल्या मानण्यावर असतात.काही लोक कारागृहात ही स्वतंत्र अनुभवतात तर काही मुक्त वातावरणातही बंदीस्त असतात.

ती त्याच्याकडे पाहायला लागली.

परेश, तु तर एकदम फीलोसाँफर सारखा बोलायला लागलास.

तुला माझ्याबद्दल खुप कमी माहीती आहे.

तुला समजून घेण्यासाठी वेळ तरी कुठे मिळालाय .

मी समाजशास्त्रामधे मी डाक्टरेट केलय..मी एका काँलेजमधे शिकवायचो

हम तिला विश्वास पटेना..तु हे मला अगोदर का सांगितले नाहीस?

मला त्याची गरज नाही वाटत.

दुसर काही नाही माझ्या घरातले हे एकुण आनंदी झाले असते.

त्याना आनंद वाटावा म्हणुन मी तुझ्याशी लग्न नाही केल.

मग का केलस?

मला तुझ थेट बोलण आवडलं...मला ढोंगी जगाशी सख्त नफरत आहे.तो दुर पहात बोलत होता.

मला ते काही माहीत नाही पण मला मुक्त आयुष्य जगायला तु निश्चित मदत करशील,अशी मला खात्री वाटली..कारण तुझ वागण बोलण हे खुप मोजून मापुण नव्हतं..ते मला माझ्या कामाच वाटल

तु ग्रेट आहेस

कुठल्या एन्गलने

तुझ्या सारख जगण्याच स्वप्न कीती जणी पाहतात.अन ते प्रत्यक्षात कीतीजणी उतरवू शकतात..? खुप कमी!

मी खूप विचार नाही करीत..मला जे योग्य वाटते ते करते

मग आता या क्षणी तुला काय योग्य वाटतय

ती त्याच्या जवळ आली आणि त्याचे दिर्घ चुंबन घेवुन विलग झाली ..हे मला वाटल

तो हसला...आणि म्हणाला आता मला यापुढचे बरेच काही वाटते...आणि त्याचे शब्द मुके झाले.आता फक्त त्याचे गरम श्वास एकमेकांना जाणवत होते.

उंच पहाडे हीरवीगार वनराई..खळखळणारे नदी नाले यामुळे दोघांचे मन प्रसन्न झाले होते.तो म्हणालाही तिला आतापर्यंतच्या आयुष्यातील हे जे मी अनूभवतोय ते खुपच सुंदर क्षण आहेत.

तीने त्यावर नेहमी प्रमाणे प्रतिक्रिया दिली..हो,हे सार माझ्यासाठी सुंदर असल तरी हे अंतिम नाही. या पलिकडेही सुख सौंदर्य असु शकत!

माहीत नाही.तो एवढेच म्हणाला

त्याचे दिवस खुप भराभर चालले होते.इथेच कायमच राहावे असे विचारही त्या दोघांच्याही मनात येऊन गेल.दोघांनाही साहसी कृत्य करायला आवडायच..त्यामुळे खोलवर जंगलात जावून कृत्रिम तात्पुरता तंबु उभारुन त्याने आनंदाचे दुर्मिळ क्षण अनुभवले होते.

कीती छान आहे जगणे हे तिलाही आता वाटायला लागले होते..त्या रात्री पोर्णिमा होती..आकाशात सुंदर पुर्ण चंद्र आला होता.त्याचा प्रकाश लख्ख पडलेला.सभोवताली जंगल पसरलेले..ते काहीशा मोकळ्या माळरानावर तंबू बनवुन राहीले होते.दिवसभर ज़ंगलात फीरताना काही आदिवासीनी त्यानी जंगलातील काळ्या रंगाची कोंबडी दिली होती.ती त्यांनी भाजून खाण्याचा बेत केला होता.सोबत मद्य होतच त्याचे घोट आणि भाजलेल चिकन खात खात ते गप्पा मारीत होते.

तो बोलता बोलता म्हणाला.. तु सांग! तुला पिण्याची सवय कशी जडली?

हळुहळु मद्याची धुंदी तिच्या डोळ्यावर येत होती..ती जड शब्दाने बोलायला लागली. माझी कथा जरा वेगळी आहे..लहानपणापासुन मला अस वाटायच मला कोणीतरी बंदिस्त बनवुन ठेवलय.थोड लांब गेल की मम्मी पप्पा चिडायचे.दररोज त्याच्या सोबत पुजा करायची. सगळे धर्मस्थळाना मी त्यांच्यासोबत भेट दिलीय.जस जस वय वाढत गेल तसतस मला काही गोष्टी कळायला लागल्या आपल स्वतंत्र व्यक्तीमत्व ..आपल्या इच्छा आकांक्षा सगळ मला जाणवायला लागले.तशी मी हुशार होतेच दहावीला मला ९५ टक्के मार्क पडलेले.जसजशी मोठी झाले. मला मुक्त भरारी घेण्याचे वेध लागले.मग उच्च शिक्षणासाठी मी दिल्ली गाठली.हाँस्टेल मधे राहायचे.तिथे मुलामुलीचा एक ग्रुप होता.ते सारे हुशार तर होतेच पण त्यांची जगण्याची एक पध्दती होती.स्वतंत्र काय असते ते मी तिथे उपभोगल पण हळुहळु मला पिण्याच व्यसन वाढलं.तिथे माझा एक जवळचा मित्र होता.आमच खुप मस्त जमायच पण एका अपघातात तो गेला आणि माझ पिण वाढल..बस तेव्हापासुन पितेय आणि जगतेय आता फक्त वाटते ऐश करावी मस्त जगावे..यासाठी मला कळत नाही का पण तुच मला योग्य वाटलास!

हं..तो शांतपणे तिचे बोलण ऐकत राहीला.कुठे तरी तिच्या आणि आपल्या जिवनात काहीतरी साम्य आहे,अस त्याला वाटायला लागले.काय वेदना हीच आमच्या जिवनात साम्य दर्शवणारी गोष्ट आहे का?हा प्रश्न त्याच्या मनात उभा राहीला होता.

हळुहळु दहा दिवस ते तिथे राहीले आता पैसे संपत आले होते तेव्हा त्यांनी तिथुन निघण्याचे ठरविले.

घरी परतल्यावर पहील्यांदा तिने त्याचे घर पाहीले.अतिशय वाईट स्थितीत होते कपडे कुठेही फेकलेले होते .स्वच्छताही म्हणावे तेवढी दिसत नव्हती.तिच्यातली बाई जागी झाली तिने रागाने विचारले परेश हे काय राहण्याचे घर आहे का?अरे उकीरड्यावर राहील्या सारखा राहतोस.

काय करणार ?माझ जिवन असच आहे.मी स्वताचे जास्त लाड पुरवु शकत नाही जे आहे तसच जगतो.

ती काही न बोलता उठली आणि तिने घर स्वच्छ केले. कपडे व्यवस्थित लावले. हळुहळु ते घर दिसायला लागले.

दुपारची वेळ होती. जान्हवी घरात पुस्तक वाचीत बसलेली.तितक्यात घराची बेल वाजली.तिने दरवाजा उघडला तर एक मध्यम वयाची स्री समोर उभी होती.ती सरळ आत आली आणि म्हणाली परेश कुठे आहे.बरेच दिवस झाले तो भेटला नाही.

जान्हवीला कळत नव्हत कस व्यक्त व्हाव..तिने विचारल तुम्ही कोण आणि अशा सरळ घरात कशा घुसता?

ती स्त्री मंद हसली..थांब सांगते

तु जान्हवी ना!

हो!

मला कशा काय ओळखता?

सांगते ..मी सरोज! तु येण्यापुर्वी मी आणि परेश एकत्र राहायचो..काही दिवसापुर्वी परेशने तुझ्याबद्दल सांगितले.मला त्यात विशेष काही वाटल नाही ..मी माझ्या मुलीसोबत राहते ..परेश आणि माझे संबध हे जाहीर नव्हते..ते तसे करणे मला परवडणार नव्हत पण शारीरिक आणि भावनिक गरजासाठी आम्ही एकत्र आलो होतो.पण त्याने जेव्हा तुझ्याबद्दल सांगितले तेव्हा क्षणभर मला खुप चिड राग आला पण नंतर मी विचार केला.या सर्व गोष्टी म्हणजे तडजोड होत्या.त्यामुळे वाईट वाटुन काही फायदा नाही.

जान्हवी शांतपणे ऐकत राहीली.ती मुक्त विचाराची असली तरी तीला हे तिचे म्हणणे म्हणावे तेवढे आवडले नव्हते.

तरी तिने तिला चहा काँफी घेशिल का? म्हणुन विचारले.त्यावर

ती नाही म्हणाली.आणि जायला उठली..जाता जाता म्हणाली आता मी इकडे येणार नाही.मला उत्सुकता होती तुला पाहण्याची म्हणुन आले होते.

चल निघते मी! पुन्हा भेटु ,अस म्हणने खोटेपणाचे ठरेल..अस म्हणुन तिने डोळ्यावर गाँगल लावला व झपाझप पाऊले टाकीत ती निघुन गेली.ती निघुन गेल्यावर जान्हवी विचार करायला लागली.परेश कसा माणुस आहे,आपल्याला काही अजुन नीट कळला नाही असे कीती प्रकरणे असतील त्याचे सांगता येत नाही.पण आपणही असेच जगत आलो आहोत मग आता आपल्याला त्याच्याबद्दल हे सार का वाटावे.मी पजेसिव्ह कधीच नव्हते पण मग परेशची अगोदरची प्रेयसीला भेटुन मी अस्वस्थ का झालेय असे अनेक विचार तिच्या मनात आले,का आपण परेशवर मनापासुन प्रेम तर नाही ना करायला लागलो? तिचे तिलाच हसु आले कारण ते आता घडणे शक्य नव्हते तीने प्रेम केले होते मनापासुन निषादवर पण तो गेल्यानंतर तीला प्रेम ही भावनाच राहीली नव्हती.ती हवे तसे हवे त्या व्यक्तीकडुन शरीर सुख घेत आली होती शरीराचे व्यवहार तीने अनेकदा केले पण मनाचे व्यवहार सारे तिचे ठप्प केले होते.विचारातच तिला झोप लागली.

सांयकाळी बेल वाजली तशी तिला जाग आली. उठुन तिने दरवाजा उघडला समोर परेश होता.आत येता येता त्याने शर्टाचे बटन काढले आणि तो फ्रेश होण्या टायलेट मधे शिरला.

तो बाहेर आला आणि आराम खुर्चीत विसावला

बोल कसा गेला आजचा दिवस?

सरोज येऊन गेली. तिच्या शब्दात नाराजी होती

मग काय म्हणाली?

काही नाही!

तस तिला मी आता इकडे येवू नकोस हे स्पष्ट सांगितले होते.

हो, ती म्हणाली तस या नंतर ती इकडे कधीच येणार नाही.

पण तुझा चेहरा का पडलाय

कुठे पडलाय ? झोपेतुन उठल्यामुळे तसे वाटत असावे

हं...!

बर चल आज बाहेर जेवन घेऊ .

ठीक आहे असे म्हणुन तय्यारी करुन ते दोघे बाहेर पडले.

अलिशान हाँटेलमधे ते बसले होते.जेवन करता करता ते बोलत होते.

ती म्हणाली परेश मी खुप मोकळ्या विचाराची आहे पण आज सरोजला भेटुन मला वाईट वाटले.

तुला कधीपासुन जेलियस फीलींग यायला लागलीय

पहील्यादा जाणवले..मला तु फक्त माझाच हवास असे वाटायला लागलेय

ही मालकीची भावना चांगली नाहीये

मला कळतय पण ...अस हे अलिकडे वाटायला लागलय.

मग मला तुझी काळजी वाटतेय.

का ?काय झाले?

कस सांगावे...पण सांगावे तर लागणारच.

ती प्रश्नांर्थक मुद्रेने पाहायला लागली

मी तीन वर्षासाठी जर्मनीला जातोय..हा निर्णय माझाय..तुला पुर्ण स्वतंत्र आहे..तु तुला हवे तसे जगू शकतेस.

ती शांतपणे त्याला न्याहळू लागली.

मग मोठ्या धीराने म्हणाली ठीक आहे ..बहुतेक माझ्या नशिबी अस्थिरता कायम राहणार आहे?..तु कधी जाणार आहेस.

मला उद्याच निघाव लागेल.

घरी परतताना दोघेही तसे शांतच होते.ते दोघे एकत्र येऊन दोन वर्ष झाले होते.ते दोन वर्ष त्याचे खुप आनंदात गेले होते.तिला वाटले होते आता सार छानच होईल.परेश तिला तिच्या मनाप्रमाणे जगु देत होता. पण दिलेल्या स्वतंत्र्याचा गैरफायदा घ्यावा असे तिला आता वाटत नव्हते.हळुहळु नवराबायको हे पारंपरिक नाते त्यांच्यात रुजायला सुरवात झाली होती.पण आज परेशने अचानक सांगितल्यामुळे ती पुन्हा एकदा नैराश्याकडे झुकली होती.त्या रात्री तिला निट झोप लागली नव्हती.रात्रभर ते एकमेकांच्या मिठीत विसवले होते.परेशलाही तिला सोडताना वाईट वाटत होत पण त्याचा नाईलाज होता.

परेश ला युरोपला जावून एक आठवडा झाला होता.जो पर्यत परेश होता तो पर्यत तीचे पिने आटोक्यात होते.पण परेश गेल्यानंतर पुन्हा तिच्या वाटेला भयंकर एकटेपणा आला होता.तो एकटेपणा घालवण्यासाठी ती रात्रभर वेगवेगळ्या क्लबमधे फीरायची. भरपुर प्यायची.हळुहळु तिच्याकडील पैसा कमी होत चाललेला तिथेच तिला तिच्यापेक्षा वयाने लहान सौरभ भेटला.सौरभ श्रीमंत होता.डान्स करता करता तिची त्याच्याशी ओळख झाली होती.तो मनमोकळा होता.हळुहळु ते चांगलेच जवळ येवू लागले.ती परेशचा विरह विसरण्यासाठी स्वताला ती पिण्यात गुंतवत होती.तिला परेश बद्दल मनापासून प्रेम वाटत होते.सौरभ भेटल्या पासुन ती काहीसी आनंदात होती.मुख्ये म्हणजे आता तिच्या संपुर्ण खर्चाची जबाबदारी त्यानेच घेतलेली.अशाच एका रात्री ते दोघे खुप धुंद झाले होते तिला घरी जायचे होते पण ती लडखडत चाललेली. मग त्याने तिला एका लाँजवर नेले रात्रभर ते एकत्र झोपले.सकाळी जेव्हा ती उठली तेव्हा ती हादरली. सौरभ आणि ती एकमेकांना चिटकुन झोपले होते त्यांच्या अंगावर एकही कपडा नव्हता.ती उठली आणि कपडे घालुन धावत घरी गेली.दिवसभर ती रडत होती.हे तिला पटले नव्हते परेशला आपण फसवतोय त्याच्या विश्वासाला तडा देतोय याचे तिला खुप दुःख झाले होते. परेश भेटण्या अगोदरही तिचे अनेकांशी शरीरसंबध आले होते पण त्यावेळी तिने स्वता त्यात सहभाग घेतला होता आणि कुणाशी बांधिलकी ठेवली नसल्याने वाईट वाटुन घेण्याचा सवालच नव्हता.आताची गोष्ट पुर्ण वेगळी होती .आता ती विवाहीत होती.विशेष म्हणजे नव-याचे तिच्यावर व तिचे नव-यावर प्रेम जुळले होते अशात असे वागणे तिला योग्य वाटेना. सौरभने तिला फसवल होत.तिच्यावर एकप्रकारे बलात्कारच केला होता.ती त्याला सोडणार नव्हती.पण तोच पुर्णपणे जबाबदार कसा?आपणही त्यात आहोत अशी भावना तिच्या मनात येत होती.आता हळुहळु तीला नैराश्याने घेरलेल..अशी एका क्लबमधे ती खुप प्याली .रस्याने तीला नीट चालता येत नव्हतं .ती रस्त्याच्या मधोमध चाललेली तितक्यात एक गाडी आली गाडी जास्त गतीने येत नव्हती पण तिचाच तोल गेला आणि गाडीच्या धक्याने ती खाली कोसळली.तिच्या डोळ्यासमोर अंधा-या आल्या होत्या.जेव्हा तिला जाग आली तेव्हा ती हाँस्पिटलमधे होती. हाताला व डोक्याला मार लागला होता पण सुदैवाने मार गंभीर स्वरुपाचा नव्हता.तिला जाग आली तसे तिच्या तोडातुन पाणी असे शब्द आले बाजुला बसलेला मध्यम वयीन गृहस्थाने तिला पाणी दिले तीचे डोके आणि हातदुखत होता.ती कण्हत होती.पाणी पिल्यावर तीने प्रश्नांर्थक मुद्रेने त्या गृहस्था कडे पाहीले.त्या गृहस्थाच्या बहुदा लक्षांत आले असावे तो लगेच मंद स्मित करीत म्हणाला माझ नाव दिनानाथ काल रात्री माझ्या गाडीचा तुम्हाला धक्का लागला.पण मँडम माझी चुक नव्हती तुम्हिच समोर आलात.

हो मला कल्पना आहे मी काल होशमधे नव्हतेच.पण तुयमचे आभार तुम्ही मला इथे आणलत

अहो ते तर माझ कर्तव्यच होत ..पण आता तुम्ही चांगल्या स्थितीत आहात हे पाहुन बरे वाटले आता तुमच्या घरातील लोकाचा संपर्क क्रमांक द्या म्हणजे त्याना बोलावून घेता येईल.

हं...तिच्या चेह-यावर वेदना दिसली.

माझ्या घरी कोणी नाही मी एकटीच आहे माझा नवरा युरोपमधे असतो.त्याला कळविणे मला योग्य वाटत नाही.

अस आहे तर दिनानाथ विचारात पडले. ते भले गृहस्थ होते. त्यांना तिला सोडुन जाणे योग्य वाटेना ..निदान तिला बरे वाटावे तो पर्यत तरी आपण तिला पाहावे असे त्याच्या मनात आले.

हळुहळु तिची तब्येत ठीक होत गेली उपचारा दरम्यान तिचे पिणे पुर्णपणे थांबले होते.हाँस्पिटलमधुन तिला डीसचार्ज मिळाला होता.पण कुठे जावे हे तिला समजेना.दिनानाथ ला तिच्या बद्दल दया वाटायला लागलेली.दिनानाथ आपल्या पत्नीसोबत दुस-या छोट्या शहरात राहत होते.त्यांनी तिला सोबत येतेस का म्हणुन विचारता ती तय्यार झाली. नाहीतरी एकट्यान जगण तिला कठीण वाटत होत.

दिनानाथने आपल्या पत्नीला जेव्हा जान्हवी बद्दल सांगितले तेव्हा तिचाही उर भरुन आला ते दोघे नवरा बायको खुप प्रेमळ होते.त्यांना मुलबाळ कोणीही नव्हते.त्यांना तिची कंपनी आवडली.आणि जान्हवीमधेही

आता खुप बदल झाला होता.ती त्या दोघाची काळजी घेत होती एकुणच घरात वातावरण चांगले आनददायी झाले होते.पण जिवनात चढ उतार असतातच आणि जान्हवी च्या आयुष्यात तर जरा जास्तच होते.

एक दिवस तीला उलट्या आणि चकरा होऊ लागल्या.तिला कळेना हे काय होतय ती परेशान झाली होती.दिनानाथची पत्नीने त्याच्याच जवळच्या डाँक्टराना फोन करुन बोलवले.डाँक्टरांनी जान्हवीला शांतपणे तपासले काही वेळाने ते शांत बसले व पाणी पिवुन म्हणाले विशेष काही नाही.आनंदाची बातमी आहे. जान्हवी प्रेगनंट आहे.

अरे वा ..खुप छान ..म्हणजे एक नविन पाहुणा आमच्या घरी येणार तर

हो अभिनंदन!! असे म्हणुन डाँक्टर निघुन गेले.

दिनानाथ पती पत्नी खूश होते. पण जान्हवी विचारात गढुन गेली. होती.तिला हे मुल नको होते पण यांना कसे सांगावे ते मुल माझ्या पती कडुन नाहीतर एका बलात्कारातुन राहीले आहे .

सारेच अवघड होते.रामनाथ आणि जानकी मात्र आनंदात होते.पण त्याचा आनंद तिला तिच्यावर तिच्या इच्छे विरोधात झालेला अतिप्रसंगाची आठवण करुन देत होता.हे ओझे जास्त वेळ वाहुन नेणे तिला कठीण झाले होते.शेवटी तिने एकदाच त्यांना हे सार सागुन टाकले.दिनानाथ आणि जानकीला सुचेना आपण काय बोलाव..जान्हवी ही चांगली मुलगी आहे पण तिच्या जिवनात आलेल्या परीस्थिने ती वाहवत गेली.तिचे आयुष्य पुन्हा उभे राहीले पाहीजे असे रामनाथला वाटत होते.बाराच वेळ कोणीच काही बोलल नाही शेवटी दिनानाथ म्हणाले मग काय ठरविले आहेस तु

ती शुन्यात पहात म्हणाली मी काय ठरविणार?मला ते बाळ नको आहे.

जान्हवी शांतपणे विचार कर, चुक तुझी असेल कींवा त्या तरुण मुलाची असेल पण नविन जन्माला येणाऱ्या बाळाची काय चुकी..त्याला का प्रायश्चित द्यायच?

ती थांबली ..तिने आपल्या पोटावर हात ठेवला आता तिला आपल्यात उगवणार एक अस्तित्व जाणवू लागलेले.मातृत्वाची भावणा हळूहळू तिच्यात अंकुरायला लागली होती.तिच्या नकळत तिच्या डोळ्यातुन पाणी वाहायला लागलेले ती दिनानाथ आणि जानकीच्या गळ्यात पडली.कीतीतरी वेळ ती रडत होती.शेवटी त्यांनी त्या बाळाला जन्माला घालायचे ठरविले.

मधले काही वर्ष परेशचा आणि तिचा संपर्क पुर्णपणे तुटला होता.परेश विदेशात कुठल्यातरी महीलेसोबत राहत असावा याची जान्हवीला खात्री होती.त्यामुळे तिनेही आपले आयुष्य वेगळ्या पध्दतीने जगण्याचे ठरविले होते ती शाळेत शिक्षिका म्हणुण कामाला लागली होती तिच्या आयुष्यात आता एक छोटी परी आली होती आस्था ! आस्थाचे चालणबोबडे बोलण सार सार तिला आवडायला लागले होते.तिला आता सारच मिळाल होत मुलगी आई बाबा...एक सुखी कुटुब पुन्हा उभे राहीले होते.अशाच एका दिवशी शाळेतील शिपायाने सांगितले मँडम तुम्हाला भेटायला कोणतरी आलय..ती बाहेर आली आणि क्षणभर जागीच खिळली.समोर काळा गाँगल घातलेला परेश उभा होता.आता त्याचे व्यक्तीमत्व रुबाबदार वाटायला लागलेले.तिच्या भावना अनावर झाल्या होत्या पण तिने स्वताला नियंत्रित केले आणि त्याला म्हणाली ..दहा मिनिट थाब मी लगेच आले.

तो थांबला आणि ती आत गेली अर्धा दिवसाची रजा टाकुन ती बाहेर आली.तो अलिशान कार घेवुन आला होता.ते दोघे कारमधे बसले गाडी काहीसी पुढे गेल्यावर त्याने मोकळ्या वाटणाऱ्या रस्त्याच्या कडेला थांबवली.तिला आता नियंत्रण ठेवण कठीण होते. तिने त्याला जवळ ओढले आणि प्रेम आवेगाने ते एकमेकात मिसळत गेले. एकमेकांच्या ओठाला ओठ असे भिडले होते जसे ते पुन्हा विलग होणारच नाहीत.पाच वर्षाची तृष्णा एवढ्या सहजासहजी भागणार नव्हती.त्याने तिला थांबवले आणि गाडी दुर रस्याने धावू लागली.एका निर्जन वाटणा-या लाँजवर ते पोहचले.प्रशस्त कम-यात ते आत शिरताच आतापर्यत दोघांनी दाबुन धरलेला प्रेमाचा उमाळा बाहेर पडला. खुप वर्षानी भेटलेले शरीर एकमेकांत मिसळत राहीले.मनातील प्रेम बाहेर पडत राहीले.पेटलेले ते शरीर हळुहळु शांत होत गेले.मग बराच वेळ ते तसेच पडून राहीले.हळुहळु एकमेकांच्या आयुष्यात घडलेल्या घटना ते जाणून घेवू लागले.

ती म्हणाली "तुला माझी आठवण येत नसेल कारण तु मनाने निष्ठूर आहेस.

हव तर तस म्हण पण खर सागांयच तर यायची कधी कधी..बाकी मी माझ नेहमीच आयुष्य जगत राहीलो..विशेष काही नाही..तुझ सांग?

माझ आयुष्याने पुन्हा मला फसवले

त्याने तिच्या डोळ्यात पाहीले..तिच्या डोळ्यात पाणी तरळले..आणि मग ती सांगत राहीली ..सांगताना तिला भरुन येत होते.तिच्यावर झालेला अतिप्रंसग.. राहीलेल मुल हे सार एकुण तो गंभीर झाला.तिला दोष देण्यात काही अर्थ नव्हता.चुकी आपलीच आहे हे त्याला जाणवले.त्याने तिला जवळ घेतले व म्हणाला,जे झाल ते झाल आता नव्यान आपण आपले जिवन सुरु करु आणि आता मी तुला सोडुन कुठेही जाणार नाही.

तिच्या चेह-यावर समाधानाचे स्मित झळकले.तिने आवेशाने त्याला मिठीत ओढले आणि आपण पुन्हा एकत्र राहण्याचे सुतोवाच केले.आता त्याचे चेहरे खुलले.दिवसभर ते एकमेकांना प्रेम करीत राहीले.दुस-या दिवशी भेटायचे ठरवून ते विलग झाले.तो तिला घरापर्यत सोडायला येणार होता पण तिने नकार दिला.ती टँक्सीने घरी पोहचली.

घरी पोहचताच आस्थाने तिच्या अंगावर झेप घेतली.ती रडत होती.जानकी म्हणाल्या अग कीती उशीर केलास ..आस्थाने रडुनरडून खुप परेशान केले.

आस्था आता जान्हवीच्या कुशीत शांत विसावली होती.आता ती तिला खेळवायला लागली तशी ती खुदकन हसली.तिच्या चेहऱ्यावरचे निरागस हास्य पाहुन तिला खुप छान वाटले.जानकीकाकुनी तेवढ्या वेळेत चहा बनवून आणला होता.जान्हवीच्या मनात आले कीती काळजी घेतात दिनाकाका व काकी!त्याच्या प्रेमानं ती भाराऊन जात होती.अचानक तिला परेशला उद्या सोबत येण्याच वचन आठवल आणि काहीवेळ ती अस्वस्थ झाली.

मैत्री पार्क बस स्टन्डवर तो उभा होता.गाडी सुटायला दहा मिनिटांचा अवधी होता.त्याची नजर गेटवर खिळलेली येणारी आणि आत येणारी प्रत्येक महीला त्याला जान्हवी असल्याचा त्याला भास होत होत होता.जान्हवी येते म्हणाली होती पण अजुन कशी आली नाही हे त्याला कळेना.कालचा प्रसंग त्याच्या डोळ्यासमोरुन जात नव्हता.दिवसभर ते एकमेकाना मिठीत घेवून होते.ते क्षण कधी संपुच नयेत असे त्यांना वाटायचे पण दुस-या दिवशी ते शहर सोडुन जाण्याचा आपला बेत परेशने जान्हवीला सांगितला होता.खर पाहील तर तीला घेवून जाण्यासाठीच तो आला होता.आणि तिनेही मी तुझ्यासोबत कुठेही येणार असल्याचे सांगितले होते.मग अजुन कशी ती आली नव्हती.या विचाराने त्याची अस्वस्थता वाढत चाललेली.

इकडे जान्हवीने निघण्याची पुर्ण तय्यारी केली होती.पण बाहेर निघावे असे तिला वाटेना..आस्था दिनाकाका काकी यांनी तिला खुप जीव लावला होता.आणि आता स्वार्थीपणे त्यांना सोडुन जाणे तिच्या मनाला पटेना.काका आणि काकी यांना तिने हे सार सांगताच ते तिला जा म्हणत होते.ते म्हणाले होते जान्हवी कुठेही रहा पण सुखी रहा अशी आमची इच्छा आहे.पण आता तिलाच त्यांना सोडून जाणे योग्य वाटेना!भेटलेल्या या प्रेमळ लोकांना सोडण्याची तिची तयारी नव्हती.तिने बरेच काही पाहीले व सोसले होते.शेवटी तिने उचललेली बँग खाली टाकली आणि आस्था घेवुन बसली.तिचे मन रडत होते.

थोड्याच वेळाने बस आगारात अनाऊन्समेंट झाली ..आता तरी तिने यावे यासाठी आभाळाकडे त्याने हात जोडले पण ती आली नाही आणि गाडी धकली.हळुहळु गाडी आगाराच्या गेटमधुन बाहेर पडली आणि हमरस्याला लागली.परेश मात्र आयुष्य गमवलेल्या माणसासारखा शरीर खुर्चीवर टाकुन निघाला होता..आजचे दुःख शब्दात मावणारे नव्हते.निराशलेले मन आता घेऊन कुठे जावे हे त्याला कळत नव्हते.आता गाडी नेईल तिकडे तो जाणार होताआपल्याला ती खुप आवडतेय आपण तिच्या प्रेमात पडलोय ही एक जाणीव त्याला नव्याने होऊ लागली होती..गाडीने वेग घेतला.अन गाडीतला टेपरेकॉर्डरवर जुने गाणे वाजत होते.आदमी मुसाफीर है आता है जाता है आते जाते रस्तेमे यादे छोड जाता है..!


Rate this content
Log in