Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Ashutosh Purohit

Romance


2  

Ashutosh Purohit

Romance


*Relationship..! *

*Relationship..! *

2 mins 8.6K 2 mins 8.6K

 माझ्या वयाची अनेक मुलं-मुली हल्ली relationship मधे असतात. Relationship मधे असणं हे हल्लीच्या काळातलं status चं लक्षण झालंय!
 "तुला गर्लफ्रेंड नाही?" माझ्या एका मित्राने भुवया केसाला चिकटतील इतक्या उंचावून प्रश्न केला.
 "नाही" मी म्हटलं.
 "थूत् तुझ्या जिंदगीवर." केवळ माझ्यावर टाकता आली नाही, म्हणून, माझ्यावरच्या तिरस्काराची पिंक त्याने रस्त्याच्या कडेला टाकली...
 त्यानंतरचा जवळ जवळ पाऊण तास, त्यानं मला "स्वामी तिन्ही जगाचा" असला, तरी "गर्लफ्रेंड विना भिकारी" कसा ठरतो हे पटवून देण्यात घालवला.. त्याचं
 हे पाऊण एक तासाचं प्रवचन ऐकून मी इतका भारावून गेलो, की मी आता पदयात्रा करत घरी गेलं पाहिजे आणि जाता जाता, " कोणी गर्लफ्रेंड देतं का गर्लफ्रेंड" असं म्हणत गेलं पाहिजे असं मला वाटायला लागलं...

 एखाद्या मुलाने एखाद्या मुलीवर प्रेम करावं, काही दिवसानंतर त्याने तिला विचारावं आणि तिने "हो" म्हणावं, इतकी बाळबोध व्याख्या आहे relationship ची.. पण हा सगळा graduation ला आलेल्या माझ्यासारख्यांचा मामला आहे असं मला वाटत होतं. पण नाही.. काल मला धक्काच बसला..!
 चक्क एका 9वीतल्या पोरीने 'in relationship' असा status फेसबुकवर टाकला होता..! आणि त्या स्टेटस अपडेट सोबत दोघांचे चित्र-विचित्र अंगविक्षेप करतानाचे फोटो!
 रिलेशन्शिपचं हे वय कमी होत होत, उद्या पाळण्यातलीही मुलगी बापाला, "dadoo (👈 "डॅडो" )  am in relationship" वगैरे सांगेल असा एक विनोदी विचार माझ्या मनात येऊन गेला. म्हणजे, मी बालविवाहावर बंदी आणून काय मिळावलं? असा प्रश्न पडून वरती, राजा राममोहनरॉय बुचकळ्यात! पण असो.

 वास्तविक, या relationship वाल्या लोकांचा एकमेकांवर प्रेम करण्याऐवजी, ते प्रेम दाखवण्यातच निम्मा जीव जात असतो. आपण कोणाच्या तरी प्रेमात आहोत, किंवा आपल्यावर कोणीतरी प्रेम करतंय याच गोष्टीच्या ते प्रेमात असतात.
 Whats app, hike, facebook यांसारख्या गुप्तहेरांच्या मार्फत ते, ही गोष्ट सतत लोकांना पटवून देत असतात.. मी आपला प्रत्येक फोटोला एक like ठोकून पुढे जातो. (scroll डाउन करतो..!)

 बाकी, मी काही कोणाच्या प्रेमात पडेन अशी चिन्हं माझी मला तरी अजून दिसत नाहीत. कुठल्यातरी मुलीला "I love you" म्हणण्याच्या आधीच आत्ताच, तुम्हा सगळ्यांना सांगून ठेवतो, "I love you all!"

 


Rate this content
Log in

More marathi story from Ashutosh Purohit

Similar marathi story from Romance