STORYMIRROR

Shabd Gandh

Romance Others

3  

Shabd Gandh

Romance Others

पुनवेचा सूर्य

पुनवेचा सूर्य

8 mins
184

मऊ मऊ रजई अंगावर पांघरून ती झोपली होती. पहाटे ची कोवळी किरणे खिडकी वाटे येऊन तिला स्पर्श करू लागली. तिने हलकेच डोळे उघडले अन् म्हणाली "गूड मॉर्निंग, सनशाईन".

विहान चा चेहरा आठवून पूनिमाच्या चेहऱ्यावर स्मित खुलले. तिचा सनशाईन आहे तो. ऊर्जा तिच्या जगण्याची. 

ती स्वच्छंदी अशी, स्वतःच्या जगात खुश राहणारी. विहान वर मनापासून प्रेम करणारी.

ना त्याच्या होकाराची अपेक्षा.

ना कधी त्याच्या वेळेची अपेक्षा.

ना कधी सत्यात तो सोबत असेल अशी कामना.

केवळ निस्वार्थ प्रेम. तिचं त्याच्यावर. तो जवळ असो लांब असो. तिने केवळ त्याचाच विचार कायम मनात ठेवला.

त्याच्या असण्याने ती सुखी रहायची . कायम अगदी कायम.

सकाळचे दवबिंदू स्पर्श करायला ती बागेत आली. पायाखाली हिरवे गालिचे. चप्पल एका बाजुला ठेऊन ती अनवाणी त्या हिरव्या गवतावर चालू लागली. दवाने भिजलेले ते गवत तिच्या रोमारोमात सुखद शहारा आणत होते. झाडांच्या मधून येणारी सूर्याची किरणे तिला स्पर्श करु पाहत होते.

विहान ssss... जणू खरंच त्याने तिला स्पर्श केला असावा.

तिची अशी सुंदर सकाळ रोज व्हायची. तो सोबत नसून ही त्याच्या सोबत असण्याच्या भावनेने.

तो इकडे व्हाफाळणारी कॉफी चा मग हातात घेऊन बाल्कनीत उभा होता. त्या चंद्राला पाहत. जग अंधारून आलेलं . आणि काळोख्या आकाशात दिमाखात तेज आणणारा तो चंद्र... एक शितल सहवास त्याच्या सोबत त्या शांत चांदण्याचा त्या शांत चंद्राचा, त्याच्या ओठातून शब्द बाहेर आले..पूनिमा..

तेव्हढ्यात त्याचा मोबाईल वाजला. पूनिमा कॉलिंग..

" हॅलो"

" हाय विहान, how was your day?"

" इट वॉज नाइस, presentation चांगलं झालं, आता तिकडून पॉसिटीव रिस्पॉन्स अपेक्षित आहे, मी तुम्हाला सगळे updates देईन वेळोवेळी"

" ओके, कसं वाटतंय USA. adjust झालास का?"

" येस मॅम, absolutely "

" ओके, तू आराम कर. आता रात्र झालीय तुमची. मी मेल्स चेक करेन आणि काही concern असेल तर मेसेज ड्रॉप करेन"

"sure mam, have a nice day, bye"

" bye"

एअरपोर्टवर फ्लाईट land झाली. ती arrivals area मध्ये चेक करत होती ऑफिस स्टाफ पैकी कुणी आलंय का रिसिव्ह करायला.

तेवढ्यात तिला विहान दिसला. blue denim jacket सफेद टी शर्ट ब्लॅक जीन्स . पूनिमा दिसताच त्याने हात वर करुन इशारा केला. ती जवळ येताच त्याने तिची ट्रॉली हातात घेतली.

"अरे तू का आलास, कुणा ज्युनिअर ला पाठवायचे ना"

" नो problem मला काही हरकत नव्हती"

तो कार स्वतः ड्राईव्ह करत आला होता. 

त्याने आणि तिने मिळून सामान आत ठेवले. अन् ती त्याच्या शेजारी येऊन बसली.

त्याने तिच्या कडे तिरप्या नजरेने पाहिले. ती म्हणाली" चल निघू "

त्याने होकारार्थी मान हलवली अन् कार ग्रँड हेवन च्या दिशेने वळवली.

गेट मधून आत आल्यावर त्याने तिला bye म्हंटले..

"अरे आत ये"

"नाही नको, संध्याकाळी यायचंच आहे"

" येस sure, चल बाय "

ड्राईव्ह करत तो त्याच्या बिल्डिंग च्या पार्किंग मध्ये आला. अन् डोळे मिटून बसून राहिला, तो थेट ६वर्ष मागे गेला.

कॉलेज मध्ये असताना एक सिंपल मुलगी त्याला खूप आवडली. अगदी साधारण दिसणारी. पण चेहरा तिचा चंद्रमुखी. जणू चांदण्यांचा वर्षाव झाला असावा तिच्यावर. येता जाता तिला पाहणे. तिचे ते बालिश हसू, तिचे ते वर्गात प्रश्नांचे उत्तर देणे, वक्तृत्व स्पर्धेत भाग घेणे त्याला तिच्या कडे आकर्षित करायचे. तीच पूनिमा. साधी राहणी असून ही काहीतरी विशेष होते तिच्यात.

तो कॉलेज संपवून फक्त नोकरी लागण्याची वाट पाहत होता. हातात कॉल लेटर आलं की तो तिला आपलं प्रेम व्यक्त करणार होता.

कॉलेज मध्ये annual फंक्शनला मात्र पूनिमा मागे असायची. तिला हा तामझाम कधीच आवडायचा नाही. दूर कुठेतरी ती बसून सगळं पाहत असायची किंवा घरी निघून जायची. ती कुठे राहते, तिचं फॅमिली बॅकग्राऊंड कोणालाच माहित नव्हतं. ती कॉलेजला यायची, लेक्चर झाले की मैत्रिणींसोबत निघायची. मैत्रिणी पण रिक्षा स्टॅण्ड पर्यंत सोबत.

असाच दुरून विहान तिला पहायचा. कधी बोलणे झाले नाही दोघात. पण त्याने ठरवलेले स्वतःच्या हिमतीवर नोकरी मिळवून मगच तिच्या कडे व्यक्त व्हायचे.

कॅम्पस इंटव्ह्यू मध्ये सेलेक्शन झाले. graduation ला फर्स्ट क्लास मिळाला. आता त्याने ठरवल्या प्रमाणे पूनिमा कडे व्यक्त व्हायचे हाच त्याचा मानस.

जॉब सुरू झाला पण पूनिमा त्याला कधी भेटलीच नाही. मनात खंत वाटू लागली, विचार येऊ लागले तेव्हाच बोलायला हवे होते का??

जॉब सांभाळून तो एम. बी. ए. करत होता. ऑफिस चे टार्गेट गाठत होता. सिनिअर त्याला चांगले मिळाले. without गॉड फादर तो वाटचाल करीत होता.

जॉब सुरू करून दोन वर्ष झाली. त्याचा बऱ्यापैकी जम बसला होता कामात. एम. बी. ए ही कंप्लीट झालं.

 "विहान आज न्यू सीईओ आणि एक न्यू joinee येणार आह, प्लीज जरा लक्ष दे" त्याचे सर त्याला म्हणाले.

त्याने सराना स्माईल करून म्हटले " काळजी नका करू, आय विल हॅण्डल"

तो लॉबी मधून चालत जात असताना लिफ्ट उघडली आणि समोरून पूनिमा बाहेर आली. अचानक त्याने तिला पाहताच हाक मारली...

"पूनिमा" 

तिने त्याच्याकडे पाहिले अन् म्हणाली 

" हाय तू ईथे?" 

"हा जॉब करतो इकडे, ती न्यू joinee तूच आहेस का मग, चल नेतो आत तुला"

आज दोघे पाहिल्यांदा बोलत होते. कॉलेज मध्ये ना तो तिच्या कडे आला ना ती त्याच्या समोर आली.

तो तिला वेटींग area मध्ये घेऊन आला. अन् बाकी फॉर्मलिटी करायला HR कडे गेला. मनात खूप खुश झाला तो. दोन वर्ष शोधत होतो पूनिमाला, आज फायनली भेट झालीय. आता उशीर नाही करणार. तिच्या कडे मन मोकळे करेन.

पूनिमा ग्रँड हेवन मध्ये आली. servant ने रूम मध्ये जाऊन सामान ठेवले. 

एअरपोर्ट ते ग्रँड हेवन. तो एकही शब्द बोलला नाही तिच्या सोबत. मनात म्हणाली तसाच आहे अजून.

ती सोफ्यावर पाठ टेकवून बसली. प्रवासाचा क्षीण आला होता. तिने सोफ्याला मान टेकवली अन् तिथे बसल्या बसल्या तिला कॉलेज चा रोझ डे आठवला. तिला मिळालेले येलो roses आणि ती निनावी कविता.

पुनवेचा शीतल चंद्र तू,

तप्त सूर्याचा अंश मी,

तू अंधाऱ्या रात्रीची साथ अशी,

मी भगभगणार दर दिवशी,

तुझे येणे तेच माझे निघणे,

कसे समजावू ह्या मनाचे खेळ असे,

पाहणे तुला आता नित्याचे झाले,

सांगावे वाटते खूप काही सखे,

जे मनात ठेवले होते कायमचे

कळतील का ते भाव तुला माझे

चंद्र आणि सूर्याचा होईल का कधी,

वेगळाच मीलाप ह्या धरणी वरती,

शिंपशिल का चांदणे ह्या तप्त सूर्या वरी ,

शितल चंद्रमुखी तू सूर्य तप्त असा मी.

- निनावी -

आजतागायत ते नाव निनाविच राहिलं आहे.

तो लगबगीने वेटींग area मध्ये आला. अन् तिला म्हणाला " एम सॉरी पूनिमा.. आय मीन मॅम"

ती उठून उभी राहिली अन् म्हणाली "नको बोलू सॉरी, नाही आवडत मला असं"

संध्याकाळी ती ग्रँड हेवन च्या आलिशान हॉेल मध्ये आली. सगळे प्रतिष्ठित लोक जमा झालेली. विहान आला. ऑलिव्ह ग्रीन सूट . God गिफ्टेड handsome लूक. त्यात त्याच्या मेहनती मुळे कंपनीला मिळालेले यश. सगळ्यांच्या चर्चेचा विषय होता तो. दोघे समोरा समोर आले अन् त्यांची नजर एकमेकांवर खिळली.

"इट्स नॉट ok मॅम. मला वाटलं तुम्ही न्यू joinee आहात. एम सॉरी. प्लीज या मी तुम्हाला तुमची केबिन दाखवतो."

तो तिला केबिन कडे घेऊन गेला. आणि केबिन वर एव्हाना नेम प्लेट लावली होती..

ग्रँड हेवन मध्ये announcement झाली. warm welcome to my डॉटर ..

पूनिमा सूर्यवंशी.. नेम प्लेट वाचून तो क्षणभर थांबला. सूर्यवंशी.. ती ओनर ची मुलगी आहे. नवीन सी. ई. ओ.

 तिच्या समोर प्रेम व्यक्त करायचे स्वप्न स्वप्नच राहिले. आज त्याला जाणवले की तो सूर्याची किरण होता आणि ती पुनवेचा चंद्र. दोघांचे मिलन अशक्य होते. आपल्या प्रेमाची वाट त्याने बदलली. इतके वर्षा नंतर आपलं प्रेम समोर असून तो तिला मनातले सांगू शकला नाही.

टाळ्यांचा आवाज झाला. तसे दोघे भानावर आले.

दुसरी announcement झाली. " बिग welcome to a guy who's solely responsible for this success.. विहान अधिकारी "

दोघे पुढे आले. टाळ्यांचा गजर सुरूच होता. सक्सेस पार्टी ची सुरूवात झाली. दोघांच्या तल्लख बुद्धी मुळे हे यश कंपनीने पाहिले होते.

ग्रँड हेवन. पूनिमाच्या वडिलांनी बांधलेला प्रशस्थ बंगला. पूनिमा इंडिया मध्ये बिझनेस पाहते आणि तिचे पप्पा अन् ताई USA ला. आज ची पार्टी स्पेशली तिच्या साठी अरेंज केली होती. म्हणून ती इंडिया मधून यू. एस ला आली होती.

पार्टी नंतर वडील आणि ती बंगल्याच्या लॉन मध्ये बसलेले. तिला विचारात गढलेले पाहून त्यांनी तिला विचारले.. 

"काय सतावत आहे बाळा"

"काही नाही"

" व्यक्त व्हावं केव्हातरी, अशी एकटीच असतेस कायम, बोलत जा जरा. नेहमी शांत असतेस. इतकी मेहनत करतेस. स्वतः चा कधीतरी विचार कर"

"हो पप्पा"

" बेटा, मी तुला कधीच अडवले नाही. आज ही मोकळीक आहे. जे तुला आतून खात आहे. तो problem बोलून सोडव "

"परवा निघेन मी पप्पा , अजून बरीच कामे आहेत"

" ओके, मी सांगितलय त्यावर विचार कर"

" होय पप्पा"

एक दिवस तिकडेच ग्रँड हेवन वर घालवला.

दुसऱ्या दिवशी तिने बॅग भरली. स्वतःच्याच विचारात असताना ती रुमच्या खिडकी पाशी आली. विहान आला होता.  

तिने बॅग उचलली अन् निघाली.

पप्पांना बाय करून ती वळली. समोर विहान उभा होता. त्याने तिच्याकडे न पाहताच तिला बाय केले. 

पप्पा म्हणाले " यंग बॉय, जरा तिला एअरपोर्ट ला ड्रॉप करतो का?"

त्याने तिच्याकडे पाहिले अन् म्हणाला,

"येस सर"

तिने त्याच्या कडे पाहिले अन् काहीही न बोलता कार मध्ये जाऊन बसली.

आज पुन्हा एअरपोर्ट पर्यंत चा प्रवासही तसाच अबोल होता.

दोघे कार पार्क करून departure कडे आले

फ्लाईट ची announcement झाली. तशी दोघांची नजरानजर झाली. 

त्याचे मन बोलत होते नको जाऊ ना..

तिचे मन बोलत होते प्लीज थांबव आज तरी..

पासपोर्ट अन् बोर्डिंग पास सोबत चाळे करत... मध्येच केसांची बट मागे करत ती तिकडून निघायचा निष्फळ प्रयत्न करत होती.

ती पुढे गेली अन्.. तो मागे वळला.. डोळ्यातले अश्रू त्याने पुसले. आणि पुनः तो जाणाऱ्या तिला पहायला वळला. आणि पाहतो तर.. पूनिमा त्याच्या समोर उभी..

त्याने प्रश्नार्थक नजरेने तिला पाहिले.

"विहान... आता तरी बोलशील का??"

हे बोलताना तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.

तिच्या आवाजातली अधीरता त्याला जाणवली आणि त्याचाही संयम तुटला... 

"काय बोलू.... मॅम"

" अजून मॅम??"

" पूनिमा ssss "

"विहान sss"

" अगं तू...." असं बोलून त्याने मान खाली घातली.

" .......पुनवेचा शीतल चंद्र मी,

तप्त सूर्याचा अंश तू


हो ना विहान ..."

हे ऐकून त्याने झटकन मान वर केली अन् म्हणाला "ही कविता तर.."

" निनावी माणसाने लिहिली होती माझ्यासाठी..."

"........"

"आणि तो निनावी तूच आहेस विहान "

विहान शांत उभा होता.

"आता तरी बोल विहान"

"काय बोलू..."

"सगळं, जे कॉलेज पासून दडपून ठेवलेस ह्या हृदयात"

"पूनिमा..मी खरंच व्यक्त होणार होतो, म्हणून खूप मेहनत केली, यश मिळवलं.. अन् त्या दिवशी तुला मनातलं सांगणार असं ठरवलं..तेव्हाच कळलं तू त्या व्यक्तीची मुलगी आहेस ज्यांच्या कंपनीत मी एक साधा manager म्हणून काम करतो. तू चमकणारी चंद्रमुखी शांत सोज्वळ सखी. खरंच खूप आवडतेस मला तू. अगदी कॉलेजच्या पहिल्या दिवसा पासून.. पण त्या दिवशी मी स्वतःला समजावले.. सूर्याचा आणि पुनवेचा मेळ कधीच नसतो. म्हणून स्वतःची पायरी ओळखून मी मागे राहिलो "

"वाह... मागे राहिलो.. अरे तू लपून लपून मला पहायचास तेव्हा पासून मला माहीत होतं तुझं माझ्या वर प्रेम आहे ते. कधीच कोणते डेज अटेंड नाही करायची मी. पण त्या दिवशी थांबली... कारण तुला कविता लिहिताना पाहिलं मी कट्ट्यावर. तू कबूली देशील असे वाटले..पण तेव्हाही तू समोर नाही आलास. आणि पायरी बोलशील तर कसली रे.. तू जी जागा तुझ्या मेहनतीने मिळवली आहेस..तीच मी वारसा हक्काने मिळवली..मग श्रेष्ठ तर तूच ना.."

"पण पूनिमा.."

" पूनिमा.. म्हणजे चंद्रमुखी..चंद्राचा अंश मी. विहान म्हणजे सूर्याचा अंश तू...

अरे... चंद्राला ऊर्जा कोण देतं.

 तूच तर देतोस ऊर्जा मला.

ही पूनिमा अपूर्ण आहे रे विहान शिवाय.."

फ्लाईट ची शेवटची announcement झाली.

तशी ती वळली.

त्याने तिचा हात पकडला आणि स्वतः जवळ ओढले. 

आणि तिच्या कानात कुजबुजला

"मॅम... सुट्टी मिळेल का.. माझ्या चंद्राला ऊर्जा द्यायची आहे... कदाचित तो रुसला आहे..माझी ऊब देऊन पाहतो... कदाचित माझ्या प्रेमाच्या उबेने रुसवा पळेल तिचा."

पूनिमा ने हातात पकडलेले बोर्डिंग पास आणि पासपोर्ट बॅग मध्ये ठेवले. डोळ्या वाटे वाहणारे आनंदाश्रू तिने वाहू दिले.

अन् तिने विहान ची ऊर्जा स्वतः मध्ये सामावून घेतली.

सूर्याचे किरण अन् चंद्राची शीतलता एक झाले.


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance