STORYMIRROR

Shabd Gandh

Romance Others

4.0  

Shabd Gandh

Romance Others

⭐एक बंद पेटी...

⭐एक बंद पेटी...

4 mins
203

राधिका नी न पाहता पाण्याचा अर्धा ग्लास मागे असलेल्या टेबल वर ठेवायचा प्रयत्न केला. पण नेम चुकला. आणि ग्लास सरकून पलीकडे पडला तो थेट देवेशच्या खुर्चीत. ती पटकन उठली "सॉरी सॉरी सर, आय वॉज बीट बीजी"

 देवेशने एक हल्का स्माईल केला.


तसा देवेश आणि राधिका चा थेट संबंध नव्हता. ती एका डिपार्टमेंट मध्ये एका पदावर आणि तो दुसऱ्या डिपार्टमेंट चा हेड. ती दोन वर्षापूर्वी ह्या कंपनी मध्ये आली. देवेश जुना एम्प्लॉइ. राधिका जेव्हा आली ऑफिस मध्ये तेव्हा तिला देवेश पाहताक्षणी आवडला. कधी तरी त्याने आपल्या सोबत बोलावं असं तिला वाटे. पण देवेश ने कधी वळून देखील पाहिलं नाही. 


तो जिथे असेल तिथे ती घुटमळत असत. कारण काढून त्याच्या जवळच्या प्रिंटरवर प्रिंट द्यायची. तो उभा असेल त्याच्या शेजारून जायची. हेतू केवळ एकच, त्याने एक नजर आपल्या कडे पहावे. पण देवेश ने कधीच तिला पाहिलं नाही. 


एकदा बॉस नी रधिकेला मेल केला. तिने तो वाचला आणि फोन वरून कन्फर्म केले काय करायचं पुढे. बॉस नी सांगितलं ज्या डिपार्टमेंट चे काम आहे ते माहिती देतील. आपण थांबू उत्तरा साठी. एके दिवशी राधिका आणि तिची ऑफीस मधली खास मैत्रिण आरती एका प्रोजेक्ट चे डिस्कशन करत होते. अचानक त्यांना आवाज आला. "राधिका कहा बैठती हैं? " कोरस मध्ये आवाज आला...वहाssss. राधिका नी वाकून पाहिलं. देवेश....,. 

देवेश आला आणि आरती सोबत बोलू लागला. ' वो जो मेल किया है, ....," आरती राधिका ला म्हणाली " मॅडम मी मग येते" तेव्हा देवेश ला कळलं ही राधिका आहे. देवेश ने चेहऱ्यावरचे काहीही भाव न बदलता पुन्हा विषयाशी निगडीत बोलू लागला. राधिका पूर्ण ब्लँक....कारण आज दोन वर्षांनी पहिल्यांदा देवेश तिच्या सोबत बोलत होता. राधिकेचा आनंद गगनात मावत नव्हता. ती फक्त त्याला पाहत राहिली. शेवटी तो म्हणाला " कमल आपको मेल कर देगा" राधिका भानावर येत म्हणाली .. हा चलेगा...

देवेश तिकडून जाताच आरती आली. ओ मॅडम ऑल वेल ना..की पाणी देऊ. राधिका खूप खूष झाली. कामासाठी का असेना आज देवेश चार शब्द तरी बोलला तिच्या सोबत.


त्याचं ते पटापट डिसिजन घेणं. सहकाऱ्यांना गोष्टी समजावणं. त्याची अप टू डेट राहणी. राधिका पूर्ण मोहात होती त्याच्या. राधिका फक्त त्याला न्याहाळत राहायची. त्याला नुसतं पाहण्यात तिला विलक्षण आनंद मिळत असे. 


एक दिवस ऑफीस ची सॅक्सेस पार्टी होती. सगळे डिपार्टमेंट एकत्र आले. देवेश कुठेच नव्हता. डिजे सुरू होता. राधिका मैत्रिणींसोबत नाचत होती. अचानक कुणीतरी म्हणाले.... आजा देवेश जॉईन अस. राधिका नी पाहिलं. देवेश मस्त जॅकेट घालून, एकदम हिरो बनून आलेला. त्या क्षणी राधिकेला लाल गुलाब मिळालं असतं तर तिने त्याला प्रपोज नक्की केले असते. खरं तर आज राधिका पण सुंदर दिसत होती. तिच्या गोऱ्या कांतीवर पिवळा रंगाचा तो गाऊन सुंदर वाटत होता. पण देवेश नी आज ही तिला नाही पाहिलं. वाट पाहते राधिका फक्त एका नजरेची त्याच्या.


मनात विचारांची रेलचेल सुरु असताना राधिकेला कॉल आला. कॉन्फरन्स रूम मध्ये निवडक लोकांना बोलवले होते. तिने तिची डायरी घेतली सोबत लागणाऱ्या फाईल घेतल्या. कॉन्फरन्स रूममध्ये येवून ती बसली. मग एक एक करून सगळे आले. देवेश पण आला. मीटिंग देवेश नी अरेंज केलेली. मीटिंग सुरु झाली. देवेश बोलू लागला. " वेल.. माय डियर कलिग्स, मैं आपको बताना चाहता हु आप सब जो मेरे साथ प्रोजेक्ट्स से रेलेटेड हैं, उसी का डिस्कशन करना है. आज आपको मैं सब इन्फॉर्मेशन देता हु. प्लिज नोट इट." राधिका ऐकत होती. शांतपणे. मग देवेश सगळ्यांना उद्देशून म्हणाला, आज मेरा लास्ट डे हैं यहा. राधिका उदास होती. तिला कल्पना होती ह्याची. सगळे पॉइंट्स नोट करून मीटिंग संपली. एक एक करून सगळे निघाले. राधिका डायरी आणि फाईल घेऊन निघाली . तेवढ्यात मागून आवाज आला. मिस राधिका. ...


तो तिच्या जवळ आला. जसा तो जवळ आला राधिका खूष झाली. त्यानी तिला हाक मारणंच अनअपेक्षित. जवळ येऊन त्याने तिला हात मिळवला. बराच वेळ हात सोडला नाही. कॉन्फरन्स रूम रिकामी झाली.. त्याने हात तसाच हातात ठेवला. तिला ह्या गोष्टीचं आश्चर्य वाटलं. त्याने तिला स्वतः जवळ ओढले. ती मोहरुन गेली. इतके वर्ष ज्यानी आपल्याला नुसतं पाहावं अशी तिची इच्छा होती आज ती त्याच्या इतक्या जवळ होती. तो म्हणाला, सक्सेस पार्टी को तुम बहोत सुंदर दिख रही थी. मैं तुम्हे बताना चाह रहा था..तुम मुझे पसंद हो. पहले दिन से. बता नहीं पाया. तिला आणखी जवळ घेत, त्याने तिच्या ओठांचे चुंबन घेत म्हंटल आय लव यू राधिका... राधिकेचे अश्रू अनावर झाले. ती डोळे मिटुन तशीच उभी राहिली. 


पुन्हा आवाज आला. मिस राधिका. मिस राधिका. डोळे उघडताच राधिका नी पाहिलं देवेश समोर उभा आणि हातात पेन त्याच्या. तो म्हणाला युवर पेन. राधिका भानावर आली. अरे यार स्वप्न होतं. त्यानी पेन द्यायला बोलावलं प्रेम द्यायला नाही.. राधिका नी पेन घेतलं आणि वळली. तिला वाटत होतं त्याला सांगावं की माझं तुझ्यावर प्रेम आहे. पण तिची हिम्मत नाही झाली.. ती तिकडून निघून गेली. आणि देवेश नव्या वाटचाली साठी पुढे गेला. 


राधिका साठी आज तो एक सुखाचा झरा आहे. अबोल अव्यक्त प्रीत तिची. त्याच्या सोबत दुरून का असेना काही क्षणांच्या सहवासात ती आनंदी आहे. सगळेच प्रेमाचे भाव रिलेशन मध्ये नाही रूपांतर होत. ते आपल्या हृदयाच्या कोपऱ्यात राहतात. कायमचे. एका बंद पेटी सारखे.


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance