❤️प्रेमातील अंतर...
❤️प्रेमातील अंतर...
जगणे आणि मरणे यांच्या मधल्या प्रवासाच्या मार्गाचे नाव प्रेम असते. कित्येकांच्या वाट्याला फुलांनी भरलेल्या बागेतून जाणारे मखमली रस्ते येतात, गुलाबी स्वप्न येतात, या प्रवासात थकल्याने कुशीत शिरून बसल्याची अनुभूती देईल अशी सावली येते.सार सार येत पण आपण त्या कित्येकांच्या गर्दीतले नाहीत. हे सार आपल्या वाटेला नाही. आपल्या वाट्याला फुलांनी भरलेल्या बागेतून जाणारा नाही. उजाड-ओसाड स्मशानातून जाणारा रस्ता आहे. आमच्या स्वप्नातसुद्धा विरह, वेदना, आसवं आणि अंतच असतो. कुशीत शिरून झोपण सोड पण स्वतःच्या सावलीला सुद्धा घाबरून आम्ही निद्रानाशाचे बळी जायला लागतो. जगणं ओझ आणि दिवस दुश्मन वाटायला लागतो अन मग शेवटी सगळ्या इच्छा अपेक्षा आकांशा मरून जातात. माझ्यातल माणूसपण सोबतीला घेऊन म्हणून विश्वास नावाच्या गोष्टीने ज्या दिवशी आमचा केसांनी गळा कापला, त्या दिवशी आमच्या वाट्याला फक्त रडणं आलं अन आमच्या डोळ्यातील आसवं कधीच कुणाला दिसली नाहीत पार डोळ्यातून रक्त येईपर्यत...
