STORYMIRROR

Shabd Gandh

Romance Others

3  

Shabd Gandh

Romance Others

❤️चार वर्षे प्रतिक्षेची...

❤️चार वर्षे प्रतिक्षेची...

4 mins
196

गुलाबी रंगाचं नेलपेंट. रेखीव पाय, सुंदर पायाची बोटं. घरातून निघताना काळ्या रंगाची सोनेरी नक्षीकाम असणारी चप्पल घालताना नित्या स्वतःचेच पाय न्याहाळत होती. काहीतरी मनात विचार येऊन गेला आणि ती स्वतःशीच हसली. सकाळी तयार होताना हलक्या गुलाबी रंगाचा पंजाबी सुट घातला त्यावर गुलाबी झुमके. हातात सुंदर सोनेरी ब्रेसलेट. कपाळावर छोटीसी टिकली. स्वतःला आरशात पाहत ती हसली आणि म्हणाली... चला मॅडम मोठ्या मॅडम वाट पाहत आहेत. 


पोहोचल्यावर चप्पल काढून ती आत गेली आणि टनsssss  घंटेचा नाद केला. नेहमीप्रमणे ती आज देवीच्या देवळात आली. हात जोडून डोळे मिटून तिने एकच मागितलं जे ती कैक वर्षे मागते आहे... आज ही तो दिसावा.. शर्मन.


चार वर्षांपूर्वी जेव्हा कॉलेज चा पहिला दिवस होता. 

एफ. वाय चा वर्ग सापडेना. तेव्हा एक सिनियर बाजूनी गेला. नित्याने पटकन विचारलं, please head me to F.Y.B.Com class. सफेद टी शर्ट मधला तो पटकन वळला आणि स्मित हास्य करत म्हणाला.. it's Just behind you sweet lady.. त्याची उत्तर देण्याची स्टाईल पाहून ती खूप खुश झाली. Thankyou बोलून ती वळली. मनात एक विचार आला. काश इसका नाम पता चल जाता. तेवढ्यात एक मुलगा कॉरिडॉर मधून पळत आला. " शर्मन ss जल्दी चल about to start practicals." मिनी नित्या म्हणजे तिच्या आत असलेली नित्या स्वतःशीच पुटपुटली वाह नित्या आज नाव मागितलस तर नाव मिळालं अजून काही मागितलं असतस तर सोने पे सुहागा. अशा प्रकारे नित्याचा फर्स्ट एवर क्रश कॉलेज मध्ये तिला भेटला. 


दर शुक्रवारी ती देवळात जाते. ह्यावेळेस तिने देवीला सांगितले. मला काही नको दिवसातून एकदा तो दिसू दे. ती दुसऱ्या वर्षाला असताना तो त्याचे कॉलेज पूर्ण करून गेला. नव्या वाटचालीला. आज चार वर्ष झाली. तरी नित्या देवीकडे एकच मागते. आज तो दिसू दे.


देवळातून नित्या बाहेर आली. आणि तिला कॉल आला. interview चा. एका फार्मा कंपनी मध्ये अकाऊंटस् डिपार्टमेंट मध्ये ओपनिंग होती. नित्या चा interview गुरुवारी अरेंज झाला. मिनी नित्या पुन्हा म्हणाली.. एकदा दिसू दे बोलली आहेस. पण दिसणे नाही झाले. चला कॉल आलाय तिकडेच जाऊया. 


गुरुवारी interview ची तयारी झाली होती. आज आकाशी रंगाचा सुंदर पंजाबी सूट आणि आकाशी छोटेसे झूमके घालून नित्या रेडी झाली.  पायात काळे सॅनडल घातले. फाईल घेतली आणि ती निघाली. तसा तिला उशीर झाला होता. म्हणून देवीला बाहेरून नमस्कार करून नित्या नेहमी प्रमाणे बोलली. आज एकदा तरी दिसू दे. तशी मिनी नित्या म्हणाली.. ए बावळट आज interview आहे मुह दिखाई नाही. नित्या स्वतःसोबत हसली. थोड्या वेळात interview च्या लोकेशनला पोचली. रिसेप्शनला चौकशी केल्यावर रिसेप्शनिस्ट ने दुसऱ्या मजल्यावर कॉन्फरन्स रूम कडे जायला सांगितले. लिफ्ट मधून बाहेर आल्यावर नित्या कॉन्फरन्स रूम शोधू लागली. तिकडून एक तरुण जाताना दिसला. नित्याने पटकन विचारले " excuse me can you head me to conference room" तो तरुण तिला न पाहताच म्हणाला ..it's Just behind you sweet lady.. नित्या हे उत्तर ऐकून अचानक म्हणाली.. शर्मन sss तो तरुण पटकन वळला आणि म्हणाला.. तुला कसे कळले मी शर्मन आहे. असे बोलून शर्मन जवळ आला.


नित्या त्याच्याकडे पाहतच राहिली. तो म्हणाला hey I know you..F.Y.B.com class searcher. नित्याला आश्चर्य वाटलं ह्याला कसं लक्षात. नित्याने त्याला होकारार्थी मान हलवून स्मितहास्य केले. तो म्हणाला interview ला आली आहेस? ती म्हणाली हो. त्याने पटकन मोबाईल नंबर दिला आणि सांगितलं मीटिंगला जातोय. interview झाला की कॉल कर. भेटूया.


नित्याचे हृदय इतक्या स्पीड नी कधीच नाही धावले जितके आज धावत होते. 


interview संपवून नित्याने त्याला कॉल केला. शर्मन म्हणाला थांब तिकडेच मी येतो. शर्मन आणि नित्या कॅफेटेरिया मध्ये आले. नित्या काहीच बोलली नाही. शर्मन बोलू लागला. what a coincidence. तू इकडे . seeing you after so many years. मला बोलायचं होतं कॉलेज मध्ये असताना पण तसा कॉमर्स आणि सायन्स direct संबंध नव्हता. सो काँटॅक्ट नाही करता आला. बरं झालं आज भेटलो. नित्या ने विचारलं "काय बोलायचं होतं?" शर्मन ने छान स्मितहास्य केलं आणि म्हणाला "तू मला तेव्हा पासून आवडायची, पण वाटायचं फक्त बघायला आवडतं म्हणून कधी आलो नाही सांगायला. तुझं ते up-to-date राहणं. मॅचींग कानातले. साधं राहणं. तो सोज्वळपणा. सगळं छान वाटायचं. आज सकाळी जेव्हा तू कॉन्फरन्स रूम चा पत्ता विचारलास तुला न पाहताच मला तिच कॉलेज वाली नित्या आठवली. मनात हेच बोलत चाललो होतो तशी पुन्हा कुणी भेटणार नाही. बट सी द डेस्टिनी आय मेट यू" . सगळे बोलून शर्मन नित्याकडे पाहू लागला. नित्याच्या डोळ्यात अश्रू होते. शर्मन ने तिला सॉरी म्हंटले. त्याला वाटले नित्याला असं बोलणं आवडलं नाही. नित्या म्हणाली "शर्मन मला संध्याकाळी भेटशील का, माझ्या हॉस्टेल खाली?" शर्मन थोडा बुचकळ्यात पडला पण त्यानी होकारार्थी उत्तर दिले. नित्या तिकडून निघून गेली.


गुरुवारी संध्याकाळी शर्मन ने हॉस्टेल खालून नित्याला कॉल केला. नित्या हातात चार डायऱ्या घेऊन आली. शर्मनला देत ती म्हणाली "वाचशील का?" तो म्हणाला"अरे नक्की, पण काय आहे ह्यात?" तिने उत्तर दिले"तू". आणि ती निघून गेली. 


शर्मन घरी जाऊन एक एक डायरी वाचू लागला. प्रत्येक पान पलटताना त्याला कॉलेज मधला प्रत्येक क्षण आठवत होता. शर्मन ने सगळ्या डायऱ्या एका रात्रीत वाचल्या. 

सगळ्या डायऱ्यांचं तात्पर्य एकच.. नित्या गेली चार वर्ष त्याची वाट पाहत आहे. 


शुक्रवार उजाडला. नित्या नेहमी प्रमाणे देवीच्या देवळात गेली. फक्त आज तिने"तो दिसू दे" हे वर नाही मागितले . आज ती देवीला म्हणाली "शर्मन कायमचा माझा होऊ दे".


नित्या देवळा बाहेर आली. समोर शर्मन उभा होता. नीत्याला म्हणाला. आज देवीने ऐकले पहा. मी दिसलो तुला. नित्या हसली आणि म्हणाली आजचं मागणं बदललंय. शर्मन हसून म्हणाला तेही देवी ऐकेल. नित्याने आश्चर्याने शर्मन ला पाहिले . शर्मन तिच्या जवळ आला आणि म्हणाला "आय वॉज वेटींग फॉर यू नित्या, विल यू मॅरी मी." नित्याचे डोळे आनंदाश्रुनी भरले. ती शर्मन ला म्हणाली"येस माय सनशाईन" . 


शर्मन ने नित्याला मिठीत घेतले. आणि म्हणाला"थँक्यू फॉर वेटींग फॉर मी, दिज मेनी यिअर्स". 


नित्या ने शर्मनच्या मिठीत चार वर्षांचा दुरावा मिटवून घेतला.


आपण ज्याच्यावर प्रेम करतो तो ही आपल्यावर तितकेच प्रेम करतो. हा एक वेगळाच रोमांचकारी अनुभव आहे.


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance