दिवसाचा पाऊण तास..
दिवसाचा पाऊण तास..
तिने घड्याळात पाहिले, संध्याकाळचे पावणे सात वाजलेले.
किचन मध्ये जाऊन तिने चहा ठेवला. हे तिचं नेहमीचं होतं. तेवढ्यात बाहेर हॉर्न ऐकू आला. ती पळत दरवाजा उघडायला आली.
तिने दरवाजा उघडताच त्याच्या कडे पाहून हलकी स्माईल दिली. सुंदर कॉटन ची पिवळी साडी. त्यावर ऑक्साईड चा कानातल्या गळ्यातला चा सेट. तिला पाहूनच त्याचा अर्धा थकवा दूर होई.
तो शांतपणे येऊन सोफ्यात बसला. चहाचा सुंदर असा सुवास पूर्ण घरभर पसरला होता. त्यात त्या चहा पाती ची कमाल होती, त्या घरच्या पाण्याची की तिच्या हाताची. हे आजपर्यंत त्याला पडलेलं कोडेच.
तो उठून आत किचन मध्ये गेला. हाताची घडी घालून भिंतीला टेकुन उभा राहून तिला न्याहाळत होता. आल्या पासून काहीच संवाद नव्हता त्यांच्यात. आणि कधीच नसायचा.
तिने चहा कप मध्ये गाळून घेतला. त्याच्या समोर तो वाफळता कप धरला. वाफेच्या आडून दिसणारी ती त्याला खूप मोहक वाटली.
तिच्याकडे पाहत त्याने चहा संपवला. दिवसभराचा थकवा एका चहाच्या प्याल्यात त्याने दूर करून घेतला अन् तो कप बाजूला ठेऊन निघून गेला.
ती खिडकीतून त्याला फक्त दूर जाताना पाहत होती.
पुन्हा दुसऱ्या दिवशी संध्याकाळचे पावणे सात वाजायची वाट पाहत.
त्याने देशासाठी स्वतः ला बहाल केले. रात्रंदिवस तो confidential कामात होता. सगळी कामे तो चोख कराययचा. फक्त त्याचा विक पॉइंट होता... त्याला मिळणारी एक ऊर्जा होती... तिच्या हातचा वाफळणारा चहा.
ती त्याची पत्नी. त्याच्या सुखात तिचं समाधान.
आज लग्नाला पाच वर्ष झाली. पण ती तितक्याच नेटाने ही दैनंदिनी पाळते.
दिवसाचा पाऊण तास त्याच्यासोबत..

