❤️ प्रेम
❤️ प्रेम
"प्रेमाच्या व्याख्या खूप पाहायला मिळतात..ऐकायला सुद्धा मिळतात आणि वाचायला सुद्धा"......!!
"प्रेमावरील लिखाण हे मनाला स्पर्श करून जाईल इतक छान पैकी शब्द रचना मांडलेली असते".....!!
"आयुष्यामध्ये येऊन ज्या व्यक्तीने खऱ्या अर्थाने प्रेमाचे व्याख्या शिकवलेली असते अशा व्यक्तीला कधीच विसरने शक्य नसते आपल्या परीने....
"ज्या व्यक्तीला आपण सर्वस्व मानतो त्या व्यक्तीला मन काहीच विसरत नाही"...
"प्रेम म्हणजे नक्की असते तरी काय
ज्या व्यक्तीमुळे आपण प्रेम अनुभवलेले असते त्या व्यक्तीला विसरणे खूपच कठीण असते.....!!
"तिचं होऊन तिच्या वेदना समजून घेत असतो आपण ती जेव्हा वेदनेतून जात असताना आपण तिचा आधार म्हणून उभे राहतो... प्रेमाने मायेने आपुलकीने तिला कायम साथ देत असतो,सतत तिची काळजी घेऊन तिला जपत असतो"...मग त्या व्यक्तीला विसरणे शक्य आहे का...?
"एक दिवस बोलणं झालं नाही तरी मन कासावीस होऊन जातं...मग ती व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये किती महत्त्वाचे आहे हे आपल्याला समजायला हवं एकदा का ऋणानुबंध एखाद्या व्यक्तीशी जुळले तर ते शेवटच्या श्वासापर्यंत टिकवायचे असते...
"नात्यात एकमेकांवर इतका विश्वास हवा, की कधी बोलणं झालं नाही तरी नात्यात संशय भांडण दुरावा कधीच निर्माण होता कामा नये"......!!
"तुझ्या येण्याने "जगन हे न्यार झालं जी".....!!
"कायमच हव असणार हक्काचं नात प्रत्येकाच्या आयुष्यात असावं...

