पुन्हा नव्याने.
पुन्हा नव्याने.
फेसबुक वरिल सर्व मित्र मैत्रिणी, बंधु, भगिनींचे आभार मानून कायमचंच ऋणात राहू इच्छितो. फेसबुकवरील सर्वांचा सहवास मला नेहमीच हवहवासा वाटत आला आहे. त्याच कारणही तसंच आहे. मित्रहो, जेंव्हा मला एकटं एकटं वाटलं तेंव्हा मला तुमच्यासारख्या मित्राचे विचारच प्रेरणादायी ठरत आले आहे. आपले आभार मानावे तितके थोडेच आहेत. माझे ५००० मित्र आहेत म्हणून नाही तर खूप निर्मळ मनाचे मित्र मला लाभले याचा आनंद वाटतो. सप्तरंगी इंद्रधनुष्यासारखी आपली मैत्री अशीच टिकवून ठेवावी हीच प्रामाणिक इच्छा. मित्रांच्या यादीत तांबडा ,नारंगी, पिवळा, हिरवा, निळा पांढरा, जांभळा , रंग घेऊन आपापल्या खास शैलीत लेखन करणारी मंडळी भेटत गेली. आपणास लगेच रंगावरून जातीचा, धर्माचा, विचार मनात आला. पण तसे मला म्हणायचं नसून अनुक्रमे पहिले दोन रंग वीररस, प्रगती, हरितक्रांती, पांढरा रंग चारित्र्यसंपन्नता इत्यादी गुणसंपन्न व्यक्तिमत्व मला सहजच भेटत गेली.
धावपळीच्या, धकाधकीच्या आयुष्यात क्षणभर चांगलं काही घडू शकतं हेही मला इथेच शिकायला मिळेल असं वाटलं आणि ते खरंही ठरलं. जत्रेला हौसे, गवसे, नवसे येतात तसे इथेही भेटलेच म्हणा. आपापल्या स्वभाव धर्मानुसार, संस्कार, प्रसंगानुरुप जो तो वागतो. काहींना फाजील आत्मविश्वास नडतो, काहींना मी पणा. त्यांच्याशी विचारांची देवाणघेवाण होऊ शकत नाही, की त्यांच्या अंत:र्मनाशी सुसंवाद. कवी, लेखक, हा शेवटी सामान्य व्यक्तीच असल्याने राग, लोभ , द्वेष , मत
्सर, असूया यापासून तो सुटू शकत नाही. हेही तितकच खरं आहे म्हणा, परंतु एक चांगला माणूसच चांगला साहित्य लिहू शकतो असं मला वाटत. .संतांनी म्हटल्याप्रमाणे बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले . करणी आणि कथांनी मध्ये फरक असता काम नये. असो. परि पूर्ण , गुणसंपन्न कुणीही असत नाही. परंतु जो आत्मपरीक्षण करतो आपलंही चुकू शकत हे मामानी करतो तोच सुधारू शकतो हेही इथेच शिकायला मिळत . मी तर असा म्हणेन. प्रत्येकाकडे काहींना काही तरी घेण्यासारखा असतंच, असते फक्त ती दृष्टी असावी लागते.
खूप काही लिहायायच बाकी आहे. मनाला खटकलेलं, मनाला भावलेलं, पण वेळे अभावी लिहण शक्य नाही. पण एवढं मात्र सांगावस वाटत की इथे सर्वच (फेसबुकवरील) मित्र विविध रंगी, विविधढंगी लेखन करतात. प्रत्येकाची शैली, वेगळी, हटके आहे. विशेष म्हणजे कोण कुठला, काय करतो, कुठे राहतो, याचे काही देणे घेणे नसून जे आवडल, खटकल ते बिनधास्त मांडतो कसलीही तम ना बाळगता. फक्त साहित्य हे प्रसाद, ओज, माधुर्य घेऊन येत नाही तर, मानवी जगणे आणि भोगणंही यात आलेलं असत. जगणं सोपं असलं तरी का कण्हत जगतात माणसं? निसर्गही आपणास आशावाद शिकवतो, प्राणी, पक्षी, फुले, फळे, वृक्ष वेली पुन्हा नव्या जोमाने बहरतातच ना! वृक्षापासून परोपकारी वृत्ती, कुत्र्यापासून प्रामाणिकपणा गायीपासून वत्सलता घ्यावी. थोडक्यात काय तर शिशिर येईल पानगळ होईल होऊ देत. पुन्हा नव्याने वसंताचा बहर आहे.
.