Nutan Pattil

Romance

3.4  

Nutan Pattil

Romance

प्रवास तुझा माझा

प्रवास तुझा माझा

5 mins
298


दोघेही झोक्यावरती बसलो होतो. मंद आवाजात गाणी चालू होती, मंद गार वारा वाहत होता. झाडांच्या पानांची सळसळ चालू होती आणि अचानक आठवला तो दोघांनी केलेला एकत्र प्रवास, प्रवास तिचा आणि माझा, त्या एकत्र केलेल्या प्रवासाने दोघांच्य जीवनामध्ये आलेले वळण... तिची आणि माझी ओळख झाली एका प्रवासातच; आम्ही दोघेही निघालेलो औरंगाबादला; ती एक कवयित्री होती तर मी फिल्मच्या ऑडिशनला निघालो होतो. 


खूप वर्षं निघून गेले या गोष्टीला, बसला खूपच गर्दी होती. कसाबसा तरी मी बसमध्ये चढलो. आणि बसमध्ये पाठीमागेच मला जागा मिळाली, गर्दी खूपच होती. त्यातच एका मुलीचा आवाज ऐकू आला. वीस वर्षांची तरुणी असेल. "प्लीज मला बसमध्ये यायला जागा दया." "असे ती बोलत असतानाच मी माझा हात समोर केला अन् माझा हात पकडून ती बसमध्ये चढली; थँक यू ती बोलली."खरंच, मी तुमचे खूप आभारी आहे. आज माझे कविता सादरीकरण आहे. तुमच्यामुळे मला बसमध्ये जागा मिळाली." ओळखही नव्हती अन् ती खूप फ्रँकली बोलत होती. अन् प्रवासास सुरुवात झाली. बस औरंगाबादच्या दिशेने धावू लागली. ती माझ्या शेजारीच बसली होती. झाडे पळत आहेत असे वाटत होते.खिडकीतून मंद वाऱ्याची झुळूक येत होती.

वाऱ्यामुळे तिचे लांब मोकळे केस खूपच उडत होते. अन् ती होती ही तशीच आधुनिक. खरंच फिल्ममधील हिरॉईन लाजेल अशी!

मीच बोलायला सुरुवात केली... तुम्ही?"

"मी मयुरा मुळची मी सांगलीची पण आता मी पुण्यामध्ये असते. इंजिनिअरीगला आहे पण मला कविता करायला खूप आवडतात औरंगाबादला कविसंमेलन आहे तेथे मी चाललेय? तुम्ही?

मी अभिजीत मी पण इंजिनिअरिंग करतोय पण मलाही फिल्मची ऑडिशन द्यायची आहे म्हणून मी औरंगाबादला चाललोय.

अरे वा! खूपच छान...

मयुरा बोलली बेस्ट लक

मीही तिला बोललो सेम टू यू अन् तिने एक स्माइल दिली. खूपच मोहक तिचे हास्य होते. तिचे ते बोलके डोळे, अन् प्रसन्न चेहरा!

तुम्ही ऑडिशनला चाललात? हँडसम आहात की! ती बिनधास्त बोलली; तिच्या पेहरावावरुन कळतच होते की ती मॉडर्न मुलगी आहे. जीन्स, टी शर्ट व जॉकेट पायामध्ये शुज, हातामध्ये सुंदरसे वॉच व मोकळे केस आणि आमचे संभाषण चालू झाले.


मयुरा बोलली तुम्ही नक्कीच सिलेक्ट होणार. बराच वेळ झाले मी पहातीये तुमच्यामध्ये एका अॅक्टरची अदा वाटते.

मी पण तिला बोललो खरेच तुम्ही एक कवयित्री वाटता.

मयुराने मग तिची एक एकेक कविता ऐकवायला सुरवात केली. इतक्या सुंदर कविता की मी त्या कवितांच्या प्रेमात पडलो.

तुम्ही कुठे राहता? 

मयुरा बोलली मी रुमवर असते आणि तुम्ही? 

मी होस्टेलला असते

मग नाव, गाव लहानपण, छंद व कॉलेज या सर्वांच्या गप्पा रंगल्या. बोलत असताना ती मलाखूपच हुशार वाटली  ती बोलत होती पण माझी नजर तिच्चा सुंदर चेहऱ्यावरुन हटत नव्हती. किती ही सुंदर आहे! माझे मन बोलत होते. अन् प्रवास संपत आला. औरंगाबाद जवळ आले. एक अनोळखी व्यक्ती माझी मैत्रीण झाली होती. मनाला वाटू लागले परत ही आपल्याला भेटेल का? 


एवढयात मयुरा बोलली "अभिजीत तुझा फोन नंबर दे! हो अन् माझाही घे. तुझे सिलेक्शन झाले की मला कळव. 

मला वाटले किती छान ही तर आपल्या मनातले बोलली. मी लगेच फोन नंबर दिला व बोललो "मी तुला नक्की कळवेन!"


एकदाचे औरंगाबाद आले व आमच्या दिशा बदलल्या. आता ही परत भेटेल का? चला, अभिजीत मी निघते. मला नक्की फोन कर अन् ती रिक्षामध्ये बसून निघून गेली. मी बघतच राहिलो. मी ही रिक्षा पकडली व माझ्या ऑडिशनला गेलो. इकडे मयुराने छान कविता सादर केली व तिला बक्षीसही मिळाले. मी ऑडिशनला आलो पण मला मयुराचा गोड चेहराच दिसत होता. ऑडीशन दिले. त्यांनी सांगितले उद्या कळविण्यात येईल. दुसऱ्या दिवशी मला फोन आला की तुमचे सिलेक्शन झाले आहे अन् मला अत्यानंद झाला. मला लगेच मयुराची आठवण झाली. मी तिला फोन केला."हॅलो, मयुरा मी अभिजीत बोलतोय. माझे सिलेक्शन झाले. तू कुठे आहेस? तिनेही आज मुक्काम केला होता. 

मयुरा आपण भेटूयात का? मी ही थांबलो आहे? 

व्हाय नॉट, शुअर मी येथे कॉफी शॉपला येते तू तिथेच ये.

मला खूपच आनंद झाला. मयुराची भेट होणार मी ही चांगल्या प्रकारे तयार झालो. आज मी ही जीन्स शर्ट व गॉगल्स चढवले. परफ्युम मारून मी बाहेर पडलो. तिने सांगितलेल्या अॅड्रेसवरती आलो. मयुरा माझी वाटच पाहात होती. तिने सुंदरसा पिंक स्कर्ट घातला होता व पिवळ्या रंगाचा टॉप घातला होता. कानामध्ये इअररिंग्स घातल्या होत्या अन् ती खूप आकर्षक दिसत होती.  


मला पाहताच मयुरा बोलली "कॉंग्रॅच्युलेशन्स, अभिजीत तुझे सिलेक्शन झाले. हो पण आता पार्टी हवी मी बोललो तुला पार्टी नक्कीच. अन् कॉफी घेत घेत आमच्या गप्पा रंगल्या. 

मयुरा बोलली अरे अभिजीत तू परत कधी निघणार आहेस

मी बोललो उद्या सकाळी

अरे वा! मी पण उदयाच निघते आहे तर आपण बरोबरच निघूयात.

मला मयुराचा सहवास लाभणार या गोष्टीने मी आनंदीत होतो. सकाळी आम्ही फोन करूनच बस स्टेशनवर आलो. आजही ती खूप मोहक दिसत होती. मी तिला बसमध्ये जागा मिळवून दिली. आम्ही एकाच सीटवरती बसलो आतातर आमची चांगली ओळख झाली होती. गाणी ऐकत, निर्सगाचा आनंद घेत आम्ही प्रवास संपवला. एकदाचे पुण्यामध्ये आलो. परत भेटायचे वचन देऊन मी माझ्या रुमवर व ती तिच्या होस्टेलला गेली.    


पण मला मयुरा आवडू लागली. मला तिची आठवण येऊ लागली. अरे आपल्याला हे प्रेम तर झाले नाही ना? मी मनाशीच बोललो. मयुरालाही माझ्याबद्दल असेच वाटत असेल का? 

अन् मी मयुराला फोन केला "अरे अभिजीत किती दिवसांनी फोन केलास? अरे मी तुझ्याच फोनची वाट पाहात होते.  

खरे तर मयुरालाही अभिजीतवर प्रेम जडले होते. अभिजीत होताच तसा गुणी मुलगा.

मी मयुराला "ठिक आहे, मयुरा आपण उद्या अकराला बेकर्स गॅलरीमध्ये भेटू असे सांगितले.


  सकाळी मी लवकरच निघालो. मी तिची वाटच पाहात होतो. तेवढयात मयुरा आली. निळ्या जांभळ्या फ्रॉकमधील मयुरा, बाहुलीच वाटत होती. त्या रंगामध्ये तिचा गोरा रंग अजुनच खुलून दिसत होता. आजतर ती मला खूपच भावली. ती टेबल शेजारी आली. काय ऑर्डर करायचे? पिझ्झा व कोल्ड कॉफी. पिझ्झा आणि कॉफी पिऊन झाली. पण मी निर्धार केला होता की आज तिला प्रपोज करायचे? 

मी बोललो "मयुरा माझे तुझ्यावर प्रेम आहे. अन् मला तुझ्याशी लग्न करायचे आहे? तुला मान्य आहे का?" 

ती मनोमन हसली...

मयुरा... मी म्हणालो

"अरे अभिजीत मला मान्य आहे. प्रथम तुला पाहताच मी तुझ्या प्रेमात पडले. 


मग कॉलेज संपले की घरच्यांच्या संमतीने लग्न करू अभिजीत एक चांगला व खानदानी मुलगा असल्यामुळे मयुराच्या बाबांनी लग्नाला संमती दिली. लग्न पार पडले. एका प्रवासात भेटलेले दोन अजनबी आज पती-पत्नी झाले. त्यांचे मिलन म्हणजे त्यांचा तो सुंदर प्रवास... ते कधीच विसरले नाहीत. एका प्रवासात अभिजीतला मयुरा व मयुराला अभिजीत जोडीदार म्हणून मिळाले व तो प्रवास त्यांच्या आयुष्यातील आठवणींचा ठेवा बनला.


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance