Shobha Wagle

Romance

3  

Shobha Wagle

Romance

प्रपोज डे

प्रपोज डे

1 min
297


*अजून ही मन रोमांचित*

*फक्त आठवुनी ते रम्य क्षण*

*लाल गुलाब अर्पुनी मागितलेला*

*माझा हात तो सुंदर दिन.*


खरंच तो दिवस आठवून या वयात ही मला लाजल्या सारखे होते. किती ती तुझी धिटाई! भर कॉलेजच्या मैदानावर सर्वा समक्ष मला प्रपोज केलंस. आणि मी ही क्षणाचाही विचार न करता सर्वा समोर ते मान्य केलेलं.

टाळ्यांचा कडकडाट झाला तेव्हा आपण दोघं भानावर आलो होतो.


माझ्याहून दोन वर्षे तू सिनियर होतास. अभ्यासात तू हुशार होताच तसा वेगवेगळ्या खेळ चषकात ही तू प्राविण्य मिळवत होतास आणि किक्रेटमध्ये तर तूच कर्णधार होऊन जास्तीत जास्त धावा व विकेटस घेत होतास. कॉलेजमधल्या सगळ्या पोरी तुझ्यावर जीव ओवाळीत होत्या.

तू होता ही तसाच राजबिंडा. माझ्याही मनात भरला होता. पण मी साधारण साधी ज्यूनियर तुझा विचार करणे माझ्या सारखीला मूर्खपणाच होता.


त्या दिवशी क्रिकेटचा खेळ बघायला या म्हणून सांगण्या करता तुमची टीम वर्गात आलेली *come to cheer us* म्हणून तू नजरेचा कटाक्ष माझ्यावर टाकलेला तेव्हाच मन चल बिचल झाले होते. दुसऱ्या दिवशी किक्रेट बराच रंगला व प्रतिस्पर्धीला हरवून आपले कॉलेज जिंकले

आम्ही सर्व मुली एकमेकीनां गळ्यात गळे घालून आनंद व्यक्त करत होतो तेवढ्यात किक्रेट कर्णधार *अजिंक्य* लाल गुलाब समोर धरून माझ्या समोर घुडग्यांनी वाकलेला !! तो अविस्मरणीय क्षणाने मी ही जीवनात अजिंक्य झाले.

सर्वांसमक्ष प्रपोज केले राजसा

धन्य धन्य झाले माझ्या जीवा

स्वर्गीय आनंद मजला लाभलेला

अजून जपून ठेवला गुलाब मेवा.


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance