प्रिये ,आठवते अजुनी ..
प्रिये ,आठवते अजुनी ..
प्रिये , आठवते अजुनी .. तू दाखवलेलं सुरेखबंधनातील नंदनवन
अन आठवणी त्या बेसुमार ... तू असताना ... नजरेस नजर भीडताना ,
लाजून चूर होताना , मिठीत तू येताना.... हाती हात घेऊन मनसोक्त हुंदडताना ..
आकाश मला ठेंगणं व्हायचे...बहरलेली पाने फुले ..पक्षी तेंव्हा गायचे धुंद- कुंद
तो परिसर मंत्रमुग्ध मी व्हायचं , ..मनी मोर नाचायचे, भान जगाचे नसायचे ..
.दिवस होते मंतरलेले ... तुझ्या - माझ्या प्रेमाचे ...
आजही आठवतं शाळेची घंटा होता , तू मला एकटा गाठून मागून हाक मारायचीस ,
अन कुणाचा पिरेड , काल काय शिकवलं ? मैत्रिणी असतानादेखील मलाच विचारून ,
बोलण्याचं बहाणा शोधायचीस ... कळत - नकळत आपण कधी प्रेमात पडलो
हे समजलंच नाही .नंतर ते वाढतच गेलं ... लोणचं मुरावं तसं ते दिवसेंदिवस वाढत गेलं ..
. त्याची चर्चा गावभर झाली . अन अचानक त्याचा त्रास माझ्यापेक्षा तुलाच जास्त होऊ लागला.
आठवतं तुला अचानक एके दिवशी तू निघून गेलीस वादळासारखं...
ते हि फार काही न बोलताच .. येऊन गेलीस जीवनात तेव्हा लोपली जशी वनदेवता अन .
..राहिला वनवास हा .. तू नसताना ...भास तुझे जीवघेणे रात्रंदिनी छळायचे..
.भावनिक क्षण त्या आकंठ बुडाल्याचे ,काही काही बदललं नाही पण ..
.फक्त तू नाहीस ... ती वृक्ष वेली फुलेफळे ,पशु पक्षी सर - सर आहे तसंच..
.तुझी आठवण मात्र रोमा - रोमात भिनलीय ...मनाच्या खोल कप्प्यात साठवून ठेवलीय कायमचीच ...
ती माझ्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही .आठवत तुला , त्या दिवशी तू निघालीस ...
मला कळावं म्हणून कि काय बोलावयाचे , सांगावयाचे असावे बहुदा... शेजारच्या काकूंकडे
दोन - तीन चकरा मारल्या अन नाहीच राहवलं तुला मला बोलल्याशिवाय ...
अन भावविभोर होऊन फक्त म्हणालीस ... मला शिकायला जायचंय .....निघायला हवं ...
कुणी तरी आलं म्हणून गप्पही झालीस... निघून गेलीस .. मनातलं सारं सारं न बोलताच .
..मी फक्त पहातच होतो तुझ्या पाठमो-या आकृतीकडे हताश होऊन शब्दही फुटत नव्हता कंठातून...
जणू शब्दच थिजले ओठावर, पण का कुणास ठाऊक वाटत होतं शब्दांनाही फुटेल वाटलं शब्दांची धुमारे ..
..ती जीवघेणी अस्वस्थता .. मनाची घालमेल .. एक शब्दही न बोलता डोळ्यांची भाषा
मात्र खूप काही सांगून गेली एकमेकांना .. ते आजही आठवलं कि , मन उदास होतं ..
इतकी वर्ष झालीत त्या गोष्टीला पण आजही का कुणास ठाऊक वाटत तुला डोळे भरून पाहावं .
. तुझ्याशी बोलावं ...दुःख तुझं वाटून घ्यावं ... सगळं सगळं तुझ्यासोबत शेअर करावं ...
.असं कोणतं हे नातं .. ज्याला नाव नाही ना कुठला आधार ... तरीही वाटते तूच समजू शकतेस
माझ्या भावना , माझं स्वप्नाळू मन ...माझी कुचंबणा ,माझी घालमेल , माझं वेडेपण ..
. तू होतीस प्रेमवेडी निरागस...अनुभवशून्य , नशिबाच्या भरवशावर ,
घरच्यांच्या भ्रामक विश्वासावर , मी मात्र उगाच ध्येयवेडा कोरडाच ..
जिथे ना कसलं आर्थिक पाठबळ ना कुठला मानसिक आधार ...
एवढं मात्र नक्की कि , तुजजवळ जे काही होतं ते माझ्याजवळ नव्हतं ,
माझ्या जवळ जे काही होतं ते तुला उमगलेलं ..
.नुसतं डोळ्यांनीच तू खूप काही बोलायचीस ...,
कौतुक डोळ्यात तुझ्या ओसंडून वाहू जातील असे वाटायचे
अन माझा होणारा अपमान तुला सैरभैर करायचा ..
.तू कशी होतीस नेमकं सांगता येणार नाही एकद मात्र खात्रीनं सांगता येईल .
तू जशी होतीस तशी अगदी माझ्या मनातली ..तसं तू पुढे सिद्धही केलंस.
कर्तृत्ववान , प्रेमळ तुटलेली नाती सांधणारी ... हवीहवीशी ...

