Author Sangieta Devkar

Romance Tragedy

4.0  

Author Sangieta Devkar

Romance Tragedy

प्रेमरंग

प्रेमरंग

6 mins
260


कैद है या कोई सलाखे ,यु ही चर्चे है 'तेरी आंखो के। डूब जाते है हम इन्हे देखकर ,पैमाने है ,ये नशे के।" 


" नजरेचा माझा हा तीर,करी घायाळ जीव,

माझी नखरेल अदा,त्यावर किती फिदा..

रंग प्रेमाचा अंगाला लावून बघा,..

ओठानी चव ही चाखून बघा..

खेळ इश्का चा...हाय यो नाद खुळा...!!

जीव झालाय येड़ापिसा...यो नाद खुळा..!!

खेळ इश्का चा....हाय यो नाद खुळा....!!


बिजली सारखी थिरकत कामिनी फड़ा वर नाचत होती. तिची अदा,तीच सौंदर्य जो तो नजरेत साठवून घेत होता. कामिनी तारुन्याने रसरसलेली ,कमनीय बांध्याची आणि खास आकर्षण तर तिच्या डोळ्यात होत. तिचे निळे डोळे,त्यात एक जादु होती. सगळा गाव शिटया वाजवत फेटे उड़वत कामिनी ला प्रोत्साहन देत होते. कामिनी ला या गावात येऊन आठ दिवस झाले होते. लोक तिच्या सौदर्याने वेडे झाले होते. दिवसभर काम करून थकलेल्या जीवाला शान्त करायला तमाशा कड़े आपोआप खेचले जायचे. कामिनीला बघून त्यांचा सगळा शिण निघून जायचा. सगळ्यात शेवटी खुर्ची वर बसून श्रीधर राव माने आनंदाने त्या गर्दी कड़े बघत होते. त्यांचे काम फत्ते झाले होते. गावचे सरपंच होते ते. गावाचा विकास बाजूला स्वत:चा मात्र भरगोस विकास करून घेतलेला. यंदा ही निवडणूक होत्या. त्यांना परत निवडून यायचे होते. गावकऱ्यांची नस त्यांनी बरोबर ओळखली होती. आणि त्यांच्या विरोधात असणाऱ्या आबासाहेब पाटिल यांचा काटा ही काढायचा होता


आबा साहेब पाटिल गावचे प्रतिष्ठित साखर कारखानदार. त्यांच्या शेतातले ऊस त्यांच्या फैक्टरीत जायचा आणि इतर गावकरी सुद्धा त्यांच्या ऊस आबा साहेबांच्या कारखान्यात द्यायचे कारण आबा साहेब ऊसाचा योग्य भाव द्यायचे. लोकांचा त्यांच्या वर विश्वास होता. आबा साहेब गावच्या विकासा साठी झटत असायचे पन विरोधी पक्षातले लोक त्यांना जमेल तितकी आडवणुक करायचे. आबांची इच्छा होती की त्यांचा मुलगा माधव यंदा निवडणूकी ला उभा रहावा. एम एस सी झालेला आणि पुढे ऍग्रीकल्चरल ची पदवी घेतलेला माधव हुशार आणि धाड़सी होता. त्याचे शिक्षण पूर्ण झाले होते. आणि तो ही गावात परत आला होता. तो ही आबां सारखा गावाच्या भल्याचा विचार करणारा होता.

माधव ,आमची इच्छा आहे की तू यंदा निवडणूकी ला उभा रहा. तू नक्की निवडून येशील.त्या श्रीधर माने ला कोणीतरी टक्कर दिलीच पाहिजे.

पन आबा मला हे राजकरण नाही जमनार.

माधव तू फक्त जिंकून ये बाकी आम्ही सगळ सांभाळतो.

  आबां च्या शब्दा खातर माधव निवडणूक लढवायला तयार झाला.रोज  सकाळी माधव मॉर्निंग वॉक ला जायचा तसाच आज ही गेला.चालुन झाल्यावर तो गावातल्या नदी काठी आली. तिथे असणाऱ्या खड़कावर बसून राहिला. अचानक कोणीतरी," वाचवा वाचवा... अस ओरडत होते. माधव ने आजुबाजूला पाहिले तर कोणी नव्हते मग त्याचे लक्ष नदी कड़े गेले एक हात वर करून कोणी माधव ला इशारा करत होते. टी व्यक्ति खोल पाण्यात होती. माधव ने कसला ही विचार न करता पाण्यात उड़ी घेतली. पोहत पोहत त्या व्यक्ति पर्यन्त गेला,एक स्त्री पाण्यात बूड़त होती. माधव ने पटकन तिला आपल्या हातावर उचलून घेतले. गोरी पान सुंदर काया,काळेभोर केस,गुलाबी ओठ त्यावर काळा तीळ,घाबरून तिने डोळे बंद केले होते. त्याच्या शरीराला कंप सुटला ,माधव दोन मिनिट तिच्या सौंदयात बुड़ुन गेला. काठा वर आणून तिला माधव ने पायरी वर झोपवले आणि तिच्या गालां वर हळू हाताने थोपटुन तिला जागे करत होता. पण तीच्या पोटात पाणी गेले होते. ती काहीच हालचाल करत नव्हती मग माधव ने तिचे ओठ विलग करून आपले श्वास तिच्या तोंडात भरले. तिच्या त्या नाजुक ओंठा चा स्पर्श माधव ला रोमांचित करून गेला. अहो,उठा आता तुम्ही पाण्या बाहेर आहात . माधव म्हणाला. तसे कामिनी ने डोळे उघडले त्या निळया डोळ्यात माधव हरवून गेला. मूर्तिमंत सौंदर्य त्याच्या समोर होते. जे कोणाला ही वेड लावू शकत होते.


तुम्ही कोण? आभारी आहे मी तुमची?

मी माधव पण पोहता येत नसेल तर कशाला नदीत उतरला?

पोहता येते मला पन पुढे इतके खोल पाणी आहे याचा अंदाज नाही आला. कामिनी म्हणाली.

चिम्ब ओली साड़ी कामिनीचे अंग प्रत्यंग त्यातून दिसत होते. माधव तिच्या कड़े आकर्षित होत होता. कामिनी ही माधव च्या रांगड़या रूपावर फिदा झाली होती.

मी तुमच्या घरा पर्यत सोडू का तुम्हाला? माधव ने विचारले

घर? घर नाही मला ,मी कलावंतीण आहे. तमाशात नाचते मी. कामिनी नाव माझ.

ओह्ह त्याच का तुम्ही कामिनी जिच्या पायी सगळ गाव तमाशा बघायला गोळा होत

साहेब हे माझ काम आहे त्याला नाव नका ठेवू. आणि गावाच् म्हणाल तर त्यांच मनोरंजन करते मी म्हणून माझ्या कड़े येतात ते. या तुम्ही पन एकदा आमच्या फडात.

मला असल काही आवडत नाही. पण एक सांगतो उगाच लोकांना नादाला लावू नका.माधव गेला.

नादाला तर तुला लावनार आहे मी ,मला आवडलास तू कामिनी एकटीच बोलत निघुन गेली.

माधव चा मित्र रमेश त्याला श्रीधर राव ने पैसे देवून आपल्या बाजूने करून घेतले आणि माधव ला रमेश कामिनी कड़े जबरदस्ती घेवून गेला.कामिनी चा नाच बघून ,तिची अदा बघून माधव वेडा झाला. हळू हळू माधव ड्रिंक घ्यायला लागला. कामिनी सोबत त्याची सलगी वाढू लागली. आबा साहेबाना ही गोष्ट समजली तसे त्यांनी माधव ला चांगले सुनावले. निवडणुकीला उभे राहायचे आहे हे विसरु नको बोलले

कामिनी ने माधव ला बोलवले होते. आज शेवटचे भेटून जावू म्हणून माधव आला होता. कामिनी ने त्याला ड्रिंक दिले त्याच्या जवळ बसत म्हणाली,साहेब तुमच्या साठी काही ही करायला मी तयार आहे . माझ प्रेम बसले आहे तुमच्यावर. कामिनी त्याचा हात हातात घेत म्हणाली. माधव ही वेडा झाला होता तिच्या साठी,कामिनी तुझे हे डोळे " आपकी निगाहो का नशा है कुछ ही खास

सागर जैसी तासीर इनमें और अलग सी एक प्यास

डूब जाता हूँ मैं इनकी मदहोशी में,

मिलता हैं सुकून खुद को पाने का एहसास।

माधव ने तिचा चेहरा आपल्या हातात धरला होता.

साहेब मग या नशेत विसरून जा स्व:ताला .

माधव ने अलगद आपले ओठ तिच्या गुलाबी ओठांवर ठेवले . कामिनी ने त्याला घट्ट मीठी मारली. सारी रात्र चांदन्यात न्हावुन गेली. सकाळी माधव ला जाग आली तर त्याच्या कुशीत कामिनी होती. हे कसे झाले महणत पटकन माधव बाजूला झाला तशी कामिनी ही उठली,साहेब अशी रात्र पहिल्यादा अनुभवली . "जादू आहे तुमच्या स्पर्शात. कामिनीने त्याला मागून मीठी मारली."

सोड मला कामिनी हे सगळ नशेत झाल

नशेत झाल तरी तुमच पण प्रेम आहे माझ्या वर. रात्रभर तेच सांगत होता मला तुम्ही.

नाही कामिनी ,हे शक्य नाही.

ठीक आहे जा तुम्ही पुन्हा परत इथे येऊ नका.

माधव घरी आला. या ,सुपुत्र रात्र भर कुठे होता? आल्या आल्या आबा साहेब ओरडले.

माधव काहीच बोलला नाही.

दातखिळ बसली का? तमाशा पायी सार गाव बरबाद होतय म्हणून आम्ही तुम्हाला निवडणुकीला उभ करून गावाला एक उमदा सरपंच देणार होतो जो गावाचा विकास करेल पण नाही तुम्ही त्या कलावंती च्या मागे लागुन स्व; च आयुष्य बर्बाद करायला निघालात.

आबा अस काही नाही.

मला सगळ्या बातम्या समजतात. दारू आणि ती बाई यातच गुंग आहात तुम्ही. त्या बाईचा काहीतरी बंदोबस्त करायला पाहिजे आता. इतक बोलून आबा साहेब गेले.

श्रीधर माने खुप खुश झाले होते. त्यांचा डाव पूर्ण झाला होता आता माधव बाई आणि बाटलीत बुडाला तो काही निवडनुक लढवत नाही म्हणजे आपल्याला टक्कर देणारा कोणी नाही.

माधव ला कामिनी चे वेड लागले होते. तीच सौंदर्य त्याला वेड करत होते. तिच्या नजरेत जादू होती माधव नाही नाही म्हणता पुन्हा कामिनी कड़े येवू लागला. कामिनी ही खुश झाली. आता रोजच ड्रिंक आणि तमाशा यात माधव गुरफटत चालला. माधव सतत नशेत राहु लागला. त्याला आपण काय करतो कसे वागतो याच भान नवहते राहिले. कामिनी कड़े गेल्या शिवाय माधव ला करमत नसायचे. कामिनी मग त्याच्या वर आपल्या सौंदयाची जादू चालवत रहायची आणि माधव तिच्या निळया डोळ्यात हरवून जायचा.

शिरप्या काम आजच फत्ते झाले पाहीजे हे घे पैसे निघ.

आबा साहेब म्हणाले.

शिरप्या निघाला तो थेट कामिनी च्या फडात आला. रात्रीचे दोन वाजले होते. कामिनी गाढ झोपेत होती. तिच्या तोंडाला क्लोरोफार्म लावून तिला उचलले आणि खाद्यावर टाकून शिरप्या बाहेर आला. त्याचा साथीदार होता जीप मध्ये बसलेला. कामिनि ला मागच्या सीटवर झोपवून शिरप्या पुढे बसला आणि काळोखात जीप निघुन गेली. कोणाला कसली भनक सुद्धा लागली नाही.

सकाळी सगळी कड़े एकच चर्चा कामिनि गायब झाली. माधव ने हे ऐकले तसा तो फड़ावर आला पण तिथे कामिनी नव्हती. हताश उदास तो घरी आला आणि दारू ची बाटली त्याने तोंडाला लावली.

आपल्या मुलाच्या हिता साठी आबा साहेबांनी कामिनीचा पत्ता कायमचा कट केला पण माधव आज ही तिच्या आठवणीत गावा बाहेर तिच्या फड़ा जवळ दारू पीत बसलेला असतो. कामिनि तर गेली पण एक आयुष्य उध्वस्त करून गेली.

 "कैद है या कोई सलाखे ,यु ही चर्चे है 'तेरी आंखो के। डूब जाते है हम इन्हे देखकर ,पैमाने है ,ये नशे के।" 


समाप्त #ऑथर ऑफ द मन्थ कथा स्पर्धा


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance