STORYMIRROR

Prerana Wadi

Romance Tragedy

3  

Prerana Wadi

Romance Tragedy

प्रेमपुजारी

प्रेमपुजारी

6 mins
181

अंशचा वाढदिवस खूप छान पद्धतीने साजरा करा. ब्लॅक फॉरेस्ट केक खूप सुंदर होती. पोकेमन थीमवर केक केली होती. अर्थातच अंशची फर्माईश. त्याच्या सर्व मित्रमंडळींचे खाणे झाले आणि मुले खेळायला बाहेर निघाली.

पूजाने आई-बाबा आणि सासू-सासर्‍यांना म्हटले "चला, आता तुम्ही पण खाऊन घ्या.

पूजाचे आई वडील म्हणू लागले "आमच्या बोलण्याचा तू कधी विचार करणार आहेस? अंश पाच वर्षाचा झाला आता. पण तू फक्त टाळाटाळ करते आहेस."

      पूजा म्हणाली "बाबा माझे म्हणणे त्याही वेळा तेच होते; आजही तेच आहे. नका माझ्या पुनर्विवाह चा विचार करू.अंबरीशच्या जागी मी दुसऱ्या कोणाचा विचारही करू शकत नाही.

     तिच्या सासू-सासर्‍यांनी पण म्हटले "अग आम्ही पिकली पाने किती दिवस टिकणार? अंश पण मोठा होणार .तू तुझे आयुष्य एकटी कशी काढणार?"

पण पूजा निक्षून म्हणाली "मी एकटी नाही. अंबरीशचे प्रेम आणि त्याची आठवण सदैव माझ्यासोबत राहीलच."

पूजेच्या आई-वडिलांचे मन खट्टू झाले. सासू सासऱ्यांनाही थोडं वाईट वाटले परंतु मनोमन सुखावले ही गेले.

     पूजा आणि अंबरीश एकाच कॉलेजमध्ये होते. अंबरीश दोन वर्षे पुढे होता. कुरळ्या केसांची सावळीशी परंतु बडबडी आणि हसतमुख व हसताना गालाला खळी पडणारी पूजा अंबरीशला प्रथमदर्शीच आवडली. पूजा कॉलेजच्या दारातून आत येत होती अंबरीश बाहेर जात होता. पूजा ऑफिसचा पत्ता विचारत होती. बिनधास्त चालणे बोलणे आणि निरागस हसू .अंबरीश ची अवस्था "ती पाहताच बाला, कलिजा खलास झाला!" सारखी झाली होती.

अंबारीशही उमदा तरुण होता. हुशार, नाकी - डोळी निटस. राहणे वागणे एकदम सोबर. थोडासा अबोल. त्यानंतर कॉलेजमध्ये नेहमीच दोघांची नजरा नजर व्हायची. पूजाच्या ध्यानीमनी ही नव्हते पण अंबरीश मात्र तिच्या प्रेमात होता. अंबरीशचे सतत तिच्याकडे पाहत राहणे तिची वाट पाहत राहणे हळूहळू त्याच्या मित्रांच्या लक्षात आले.

      पुढे हळूहळू ही गोष्ट कॉलेज भर झाली. पूजाच्याही लक्षात आली. तिलाही तो आवडला. आणि त्यांचे प्रेम फुलू लागले. आता पूजाला वेळ कमी पडायला लागला. कॉलेजमध्ये असताना ती सतत त्याच्या जवळपास असायची.तरिही रात्री - रात्री सुद्धा दोघेजण एकमेकांशी बोलत राहायचे. तरुण मुलांचे आई-वडील सावध असतातच. पूजाच्या आईच्या हे लक्षात आले. तिने पूजाला विचारले तर पूजा ने स्पष्ट सांगितले आई मला अंबरीशशीच लग्न करायचे आहे. दोन्ही घरी कुणालाही विरोध नव्हताच. त्यामुळे दोघेही निश्चिंत होते.

अंबरीशचे शिक्षण संपले आणि तो नोकरीला लागला.

लवकरच साक्षगंध साखरपुडा करूया असे पूजाच्या आईने घरी बोलले. पूजा लाजली आणि मनोमन सुखावली.

    आता पूजा अंबरीशचे एकमेकांच्या घरी ही जाणे येणे सुरू झाले. इतक्यात अंबरीशला ट्रेनिंग निमित्त एक महिन्यासाठी दिल्लीला जायचे काम पडले. अर्थातच दोघे फोनवर कनेक्टेड होतेच. पण सात-आठ दिवसानंतर अंबरीश चे फोन कमी येऊ लागले. शेवटी एकदा फोन लागल्यानंतर पूजा भडकली."असा काय बिझी असतोस रे ?की फोन उचलत नाही? पण अंबरीश म्हणाला "मी खरंच खूप बिझी आहे सध्या मला फोन करू नकोस." शेवटी पूजाने ते ऐकून घेतले. 

     पण एक महिना झाल्यानंतरही अंबरीश वापस येईना, फोनही करेना. आता काळजी वाटायला लागली. पूजा व तिचे आई वडील अंबरीशच्या घरी चौकशी करायला गेले. पण अंबरीश तिकडेही फोनवर फारसा बोलत नव्हता. आणि त्याने आता दिल्लीलाच बदली करून घेतली होती. असे काय झाले कुणालाच कळेना.

     पूजाचे रडून - रडून आणि विचार करून - करून डोके खराब व्हायला लागले. मग पूजाने एक दिवशी सरळ दिल्लीला जाऊन धडकायचे ठरवले. ती नं सांगताच जाणार होती. परंतु अंबरीशच्या पत्त्यासाठी त्याच्या वडिलांना विचारावे लागले. पूजा दिल्लीला जाऊन सरळ त्याच्या घरी धडकली. आणि पुढचे दृश्य पाहून हादरूनच गेली. अंबरीश एका दुसऱ्या मुली सोबत? दोघांचे कडाक्याचे भांडण झाले.

तर हे कारण आहे अंबरीशच्या बदलण्याचे? पुजा मनात म्हणाली.

    त्यानंतर पूजा तिच्या एका दिल्लीच्या मैत्रिणीच्या घरी राहिली. आणि तिने अंबरीश वर सतत पाळत ठेवली. त्याचे फोटो काढले. ती मुलगी आणि अंबरीश यांच्यामध्ये भलतीच जवळीक दिसली. पूजा ने हे सारे घरी आणि अंबरीशकडेही सांगितले. प्रथम कोणाचाच विश्वास बसत नव्हता पण पूजाने प्रूफस दाखवले. दोन्ही घरी दुःखाची छाया पसरली एवढा मोठा धक्का पचवणे कुणाच्या करता सोपी नव्हते.

     पूजाला हा फार मोठा अपमान वाटत होता. इतके दिवस माझ्यासोबत सुखी संसाराचे स्वप्ने पाहणारा, प्रेमाच्या आणाभाका घेणारा अंबरीश इतक्या खालच्या पातळीवर जाऊच कसा शकतो?ती चवताळलेली नागिण होती. तिने ठरवले आता अंबरीशला धडा शिकवायचा. तिने युट्युब वर एक कार्यक्रम पाहिला होता. त्यातला होस्ट हेच काम करायचा. लोकांना फसवणारे जगात भरपूर असतात पण त्यांच्या विरोधात पुरेसे पुरावे नसल्यामुळे कोणी कोर्टात किंवा पोलिसात जाऊ शकत नाही. पण म्हणून अशा लोकांना काय सोडून द्यायचे? जे लोक दुसऱ्याच्या भावनांशी खेळतात त्यांना शिक्षा तर व्हायलाच हवी. अशांना ट्रॅप करायचे आणि त्यांच्याकडून खरे वदवून घ्यायचे. प्रसंगी त्यांना ठोकायचंही काम पडायचे. आता पूजा सुडाने पेटली होती. तिच्या भावनांशी असा खेळणार्‍या, तिच्याशी प्रतारणा करणार्‍या, अंबरीशला तिला धडा शिकवायचा होता.

        तिने त्या कार्यक्रमाच्या होस्टला ज्यांचे नाव गुरू होते त्यांना कंप्लेंट केली. आणि त्यांनी अंबरीशला एका जागी बोलावले. गुरुने अंबरीशला या सर्व बद्दल छेडले. पण अंबरीश चांगलाच बेशरम निघाला. शांत अबोल वाटणारा हा या लेव्हल पर्यंत गेला वर मुजोर्‍या करतो आहे हे पाहून पूजाचा पारा चढत चढत गेला व गुरुलाही राग आला. त्याला पुष्कळदा लोकांकडून खरं काढताना लोकांना दोन-चार गुद्दे मारायची सवय होतीच. त्या तिरीमिरीतच त्याने अंबरीशच्या पोटात दोन गुद्दे मारले. पण अंबरीश एकदम कोसळला रडू लागला आणि त्याला भडभडून रक्ताची उलटी झाली. आता सारेच घाबरले. सर्वांनी त्याला ताबडतोब दवाखान्यात ऍडमिट केले. इकडे अंबरीशच्या त्या मैत्रिणीलाही हे सारे कळले. ती धावत आली आणि पूजाला खूप बोलू लागली. " अग तू इतकी पाषाण हृदयी कशी बनलीस?" ती सांगू लागली. "अंबरीशने जे पण काही केले ते फक्त तुझ्यावरच्या प्रेमाखातर केले. त्याला पोटाचा कॅन्सर आहे. त्याला आधी पोटाचा थोडा त्रास होताच. पण दिल्लीला आल्यानंतर तो आजारी पडला आणि साऱ्या टेस्ट केल्या तेव्हा लक्षात आले कॅन्सर तिसऱ्या अवस्थेत आहे. तुला हे सारे कळले तर तू सहन करू शकणार नाही. किंवा त्याचे आई-बाबाही सहन करू शकणार नाही. मी त्याच्याच कंपनीत आहे ट्रेनिंगच्या निमित्ताने आमची ओळख झाली. व माझ्या मदतीने त्याने हा डाव आखला. तुझे किंवा त्याच्या आई-वडिलांचे मन त्याच्याबद्दलचं खराब झाले तर तो गेल्यानंतरही तुम्हाला फारसे वाईट वाटणार नाही असे त्याला वाटले म्हणून त्याने हे सारे केले."

      आता पूजाला जबरदस्त धक्का बसला ती अंतर्मुख झाली. दवाखान्यात डॉक्टरांची ट्रीटमेंट सुरू होती. आणि पूजाचे व्रतवैकल्य सुरू झाले. सगळ्याचा परिणाम असा झाला की अंबरीशला बरे वाटायला लागले. आई बाबांनी त्याला घरी वापस आणले. आता पूजा त्याच्याच घरी येऊन राहू लागली. आणि फक्त त्याची सेवा करू लागली. मध्ये एकदा कपडे घ्यायला घरी गेली असता आई म्हणाली "त्याच्या घरी जाऊन राहणे दिसायला चांगले दिसत नाही. त्याच्याबद्दल आम्हालाही काळजी वाटते. पण तसाही तो आता काही दिवसांचा पाहुणा आहे. तू तुझं आयुष्य खराब का करून घेते आहेस? लोक काय दहातोंडांनी बोलतात. पण पूजाने ऐकले नाही. पुढे हाच प्रस्ताव अंबरीशच्या आई-वडिलांनी पण मांडला. पण पूजा फळे कापत होती त्याच चाकूने तिने अंबरीच्या अंगठ्याला टोचले त्यातून पटकन रक्त आले तोच रक्तांनी भरलेला अंगठा तिने आपल्या भांगात फिरवला. आज पासून आम्ही दोघं पती-पत्नी आहोत असे ठणकावून सांगितले

      अंबरीशीला नाही म्हणण्याचाही वेळ तिने दिला नाही. शेवटी त्या दोघांचे घरगुतीच लग्न लावून देण्यात आले. पूजा शिघ्र संतापी होती. पण तितकीच समजूतदारही होती. अल्पावधीतच पूर्ण घराला आपलेसे करून घेतले ती मन लावून अंबरीश ची सेवा करू लागली. आणि खरोखर तिच्या प्रेमाखातर कदाचित यमराजही नमला आणि त्याने अंबरीशला जणू मुदत वाढ दिली. अंबरीशच्या तब्येतीत पुष्कळ सुधारणा दिसू लागली. तो घरूनच कामही करू लागला. हळूहळू त्यांचा संसार फुलू लागला. आणि त्यांच्या संसार वेलीवर एक कोवळे फुल आले.

   त्यांनी त्याचे नाव "अंश" ठेवले. दोन्ही घरी सारेच आनंदले. बघता बघता अंश दोन वर्षाचा झाला. पण अंबारीश चा त्रासही पुन्हा सुरू झाला. औषध पाणी, अंगारे धुपारे,पूजा -पाठ, व्रतवैकल्य करून पूजाचा चेहरा निस्तेज झाला.

      पण काहीही उपयोग झाला नाही व एक दिवस अंबरीश सर्वांना सोडून निघून गेला.

अर्थातच हे एक दिवस होणारच होते. पूजा लवकरच सावरली. तिच्यावर दोन घरांची जबाबदारी होती आणि ती छान सांभाळत होती.

    पण पूजा च्या आईला नेहमी काळजी राहायची. आपल्या नंतर पूजाचे काय होणार म्हणून त्या सतत तिला सुचवायच्या की तू दुसरे लग्न कर. पण "ज्याने एकदा अमृत प्यायले तो गुळवणी पीत नाही."

पूजाच्या प्रेमाखातर जगात बदनाम व्हायला तयार असणाऱ्या अंबरीशचे प्रेम तिला मिळाले आता अंबरीशच्या बाळाची काळजी घेणे, आई-वडिलांना सांभाळणे व आपल्याही आई-वडिलांना सांभाळणे हेच तिने आपल्या जीवनाचे ध्येय ठरवले.

   हिच तिची प्रेम- पुजा होती. 



Rate this content
Log in

Similar marathi story from Romance