Click here to enter the darkness of a criminal mind. Use Coupon Code "GMSM100" & get Rs.100 OFF
Click here to enter the darkness of a criminal mind. Use Coupon Code "GMSM100" & get Rs.100 OFF

Meenakshi Kilawat

Romance


5.0  

Meenakshi Kilawat

Romance


प्रेमगंधाच्या वलयात

प्रेमगंधाच्या वलयात

4 mins 871 4 mins 871

तुला पाहिले मी.. आणि तुझ्या वलयात इतका गुरफटलोय आणि आठवणीच्या हिंदोळ्यावर झोके घेत राहिलो खरच की तुझा चेहरा बघायचा राहूनच गेला होता. आता तू मिळाली ,नाहीतर या सुगंधाने मी पुरता पछाडलो होतो. माझ्या प्रत्येक श्वासावर तुझच नाव कोरले होते म्हणुन मला या जन्मी तू भेटली. तू खरच मला भेटली ना मयुरी? मधुर सारखा मयुरीला विचारत होता.

      प्रेम काय असच असतं! हा ह्रदयाचा कोमल भाव असतो परंतू आठवणीच्या झुल्यात मी पुरता झोके घेत कसे दिवस काढले हे माझ मलाच समजत नाही.जो प्रेम बंधनात अडकतो, त्यालाच या प्रेमाचा अनुभव असतोय.खरच मयुरी मला आपल्या प्रेमाचा अनुभव काळजातुन झाला होता .आणि मधुरने मयुरीला आपल्या अलगद हाताने कवटाळले .या उमलेल्या भावातून प्रेमाचं प्रत्यारोपनं होवून त्यांचे विश्वच बदलले. तो आधीन होवून एकमेकाप्रती ओढीने पाण्याच्या धारेसारखा वहावत  गेलाय. या प्रेमाचा मोहपाश अगदी डोळ्यावर झापड असल्यागत नशेत बेधूंद बेफाम वाऱ्या सारखा बेलगाम पळत होता. दोघानांही जुण्या आठवणीच्या हिंदोळ्यावर झुलवत बेभान करीत होती.      

     तो दिसायला सर्वसाधारण होता.त्याचे व्यक्तीत्व लोभस व सुरेख होते भारदस्त कुरळे केस, चमकदार डोळे,मुखावर पाणीदार तेज होते. त्याच्या डोळ्यात काहीतरी वेगळीच चमक दिसायची. तो मनमिळावू स्वभावाचा असल्यामुळे लहान, मोठ्यांची अनेक कामे तो स्वखुशिने करायचा,घरची परिस्थीती बेताचीच होती. शेतीवाडी करून थोड्या मिळकतीत कुटूंब आपल्या संसारात समाधानाने आईबाबासोबत रहायचे. काटकसर करून त्यांनी आपल्या लाडक्या मुलास बाहेरगावी शिकायला ठेवले होते.चांगल्या कॉलेजात अँडमिशन केले होते. तो सायंसचा विद्यार्थी होता. कॉलेजच्या वातावरणातही तो चेकाळला नव्हता. त्याचे गंभीर व्यक्तीत्व होते व त्याचे नाव मधुर होते.

      तो लायब्रेरीत जात असतांना एका मुलीची टक्कर झाली आणि मधुरच्या नाकात तो वेगळाच सुगंध आला. तसा सुगंध त्याला या आधी कधीच जानवला नव्हता. तो मागे पलटून पहात असतांना कोण्या मुलीची पाठमोरी आकृती दिसली व क्षणात ती मुलगी नजरेआड झाली. तिच्या कपड्याचा रंग सुद्धा त्याने बघितला नव्हता. त्याचे पुर्ण लक्ष त्या सुगंधावर केंद्रित झाले होते. तो संपुर्ण कॉलेजमध्ये तिचा शोध घेवू लागला,पण त्याला ती मुलगी सापडली नाही. तो विनस्क मनाने आपल्या घरी आला,पण त्याचे पुर्ण लक्ष त्या सुगंधात सामावलं होते.त्या गंधाने पुरता गोंधळून गेला होता. त्या सुगंधाच्या शोधात दररोज घाईने तयारी करून तो कॉलेजमध्ये जायचा,पण पदरी निराशा घेवून घरी यायचा. 


       तिकडे त्या मुलीची पण स्थिती जवळपास अशीच झाली होती. ती रोज कॉलेजला येवून त्याच सुंगधाचा सारखा शोध घेवू लागली.ती कॉलेजला आली की मुलामुलींचा घोळका तिच्या मागेपुढे माश्यांसारखा घोंगावत असे. ती प्रतिष्ठित घरची एकुनती एक मुलगी होती. तीच नाव मयुरी होते. नावाप्रमाणेच ती सौंदर्याची मुर्ती कमनीय बांधा व गालावर व हणुवटीवर खळी पडायची, लाघवी बोल व स्मितहास्याने तिने सुंदरतेच्या साऱ्या सिमा काबिज केल्या होत्या. कॉलेजमध्ये तिचे पाऊल पडले की सर्वत्र चैतन्य वाहू लागायचं! हास्याचे फवारे उमटायचे. तिची चाल डौलदार असून केसांचा घणदाट मेंघाच्या छायेसारखा सळसळणारा तांबूस किरणाच्या प्रकाशासारखा सोनेरी रंग होता. तिची साथ सर्वांनाच हवीहवीशी वाटायची.ती वर्गात हुशार नव्हती, तरीपण तिच्या स्वभावातला गोडवा, मधूर बोल त्यामुळे ती बऱ्याच दिलाची चहेती झाली होती. सर्वांशीच ती प्रेमाने बोलायची विचारपूस करायची, तिला कुत्सित प्रवृत्ती किंवा लोचट प्रवृत्तीचे मित्रमैत्रिनी आवडायचे नाही. ती खुप लाघवी कोमल मनाची दयामाया जाणनारी सदा आंनदात राहणारी खुल्या मनाची होती. सुट्ट्या लागलेल्या होत्या नाईलाजाने दोघे ही आपापल्या घरी गेले होते.

      परंतू त्या गंधाला दोघेही विसरले नव्हते. दोघानांही सारखीच तळमळ होती.कश्यातच लक्ष लागत नव्हते.सतत आठवणीच्या हिंदोळ्यावर दोघेही झुलत होते. मनात अनेक प्रश्न करीत होते . एकांतात अश्रृ ढाळीत होते."काय यालाच प्रेम म्हणतात."पण हे काय आपल्याला प्रेम तर नसेल झाले ना? नकोरे बाबा या प्रेमाच्या गोष्टी! असले फालतू काम आपण कधीच नाही करणार. " प्रेमबीम काही नको ,ती फक्त मला एकदा मिळायला हवी. दोन गोष्टी करून तू कुठे अन् मी कुठे परंतू ती मला सत्यात आमोरासमोर मिळायला हवी आहे.


   सुट्ट्या संपल्या तशिच मधुरने कॉलेजला धाव घेतली. सरळ लायब्रेरीत गेला. तिथे कुणीच नव्हत अनामिक वेदनेने तो पोळुन निघाला व त्याचे डोळे भरून आले. इकडे मयुरीला पण कॉलेजला जाण्याची घाई होती, पण बाबा म्हणाले कश्याला घाई करतेस आज आपणाला आत्याकडे जायचे आहे.आणि आईला घेवून मार्केटला जायचे आहे . मयुरी उदास झाली,मनाची तळमळ ती सांगू शकली नाही. दोन दिवस गेलेत. इकडे मधुर तडफडत धावपळ करीत रोज लायब्रेरीत जावून बसायचा, पुस्तक समोर पण शब्द दिसत नव्हते. पुस्तकावर डोक टेकवून बसायचा.तोच वाऱ्याची झुळूक आली आणि त्याला तो ओळखीचा सुगंध आला.तोच क्षणात ताडकण जागेवरून उठला. व भिरभिर चहूकडे बघायला लागला.

     लगेच कानावर गोड आवाज आला! ओळखल काय ? तिने प्रश्न केला होता.तो गांगरला तोच सुगंध ओळखीचा होता.लगेच सावध होवून म्हणाला ! म.म. मला ही ओळखलं काय ? तिने आधी उत्तर दिलं ! होय, मी त्या सुगंधाला ओळखते, तेंव्हा आपली टक्कर झाली होती.ती आपली पहिली भेट होती. काही न बोलताच त्याच्या भारदस्त छातीवर आपल डोक टेकवले होते.मधुर आवाक होवून उभा राहिला.पण काही क्षणात त्यानेही धीराने तिच्या माथ्यावर अलगद आपले ओठ टेकवले होते. दोघांच्यांही डोळ्यातून सारखे आनंदाश्रृ वाहत होते. जणू किती जन्मापासूनची त्यांची ओळख होती आणि भेटीसाठी आतुरलेले मने आज आनंदाने अश्रृ ढाळीत होते. "प्रेमगंध" दुथडी भरून वाहत होता. जसे हिंदोळ्यावर बसून हवेत अधर तरंगत असल्याचा भास होत होता.एक आनंदाचे वलय त्यांच्याभोवती शितल धूंद करणारा सुगंध चौफेर पसरला होता. Rate this content
Log in

More marathi story from Meenakshi Kilawat

Similar marathi story from Romance