Abasaheb Mhaske

Inspirational

2  

Abasaheb Mhaske

Inspirational

प्रेमात पडतांना.

प्रेमात पडतांना.

2 mins
1.6K


   कोणी कितीही नाही म्हटलं तरी आ्युष्यात प्रत्येक जण एकदा तरी कुणाच्या ना कुणाच्या प्रेमात पडतोच. फरक एवढाचं की, काही जण प्रामाणिकपणे कबूल करतात तर काही जण आपलं स्टेटस, पोझिशन, प्रतिमा वगैरे डागळेल अशा भीतीने प्रेम व्यक्त करीत नाही की, कोणासमोर कबूलही करू शकत नाही. परंतु  प्रत्येक जण आयुष्यात एकदा तरी प्रेमात पड्तोच हे ही तितकंच खरं आहे. पहिलं प्रेम तो कधीही विसरू शकत नाही. प्रेमात पडणे म्हणजे(आपटणे नव्हे)  ही प्रक्रियाची मुळी केंव्हा कशी घड्ते ? हे प्रत्यक्ष ब्रम्ह्देवाच्या बापालाही समजणार नाही तर तुम्ही आम्ही किस पेड की पत्ती?   नकळत्या वयात मुलं मुली केवळ शारिरीक आकर्षण, चित्रपटात दाखवलं तसं आपणही करावं  याचं प्रकारचं असतं. काहीवेळा मुलं मुली चित्रपटात दाखवतात  तसं  वागण्याचा प्रयत्न करतात आणी आपलं नाही तर समोरच्या व्यक्तीचं जीवन उध्वस्त करून टाकतात. एकतर्फी प्रेमातून जिवंत जाळले तरी जातात नाही तर त्रासाला कंटाळून आत्महत्या तरी करतात. प्रेम हे देऊळ असतं, खडतर गिर्यारोहण असतं. जीवनदायी कुटुंब्वत्सल असतं. जे खरं प्रेम करतात ते जोडीदाराचं कधीच वाईट विचारही करू शकत नाही. प्रेम कर भिल्लासारखं बाणावर खोचलेलं, चिखलात रूतलेलं जमीनीवर असून आकाशाला भिडलेलं.

             प्रेम या अडीच अक्षरातंच अवघं विश्वंच सामावतं. प्रेम हे आकाशातल्या विजेसारखं  असतं.  प्रदीर्घ सहवास व त्यातून मैत्री होणे स्वाभाविकंच पण मैत्रीतून प्रेम व जिवनभराची सोबत हे ठरविणे की , नुसतीच मैत्री टिकविणे यात गफलत होते. काही प्रसंगी तर मागचा पुढचा विचार न करता शरीरसुखाची अपेक्षा केली जाते; किंवा परस्पर संमतीने सगळ घडतं व त्यातूनच मग अनेक प्रश्न उदभवतात.  प्रेमिकांना तारेवरची कसरत करावी लागते. 'आता हिचं बाई काही खरं नाही.' 'ये तो गया काम से.' असे शेरे ऐकावे लागतात. अनेकांना आपल्या उमेदीच्या काळात आयुष्याला आकार द्यावयाचा असतो तेंव्हाच ते मोडून पडतात. असंख्य मुले मुली उधवस्त होतात.  प्रेम म्हणजे वासनांध शरिरांचा मिलाफ नव्हे, प्रेम हे दोन जिवांचे मधुर मिलन हे समजण्याचं वयही नसतं. प्रेमात पडणा-यांपैकी यश अपयश बघता प्रेमात यशस्वी होणारे भाग्यवान थोडेच. प्रेमात अपयशी होणारे हे नकळत प्रेमात पडत असले तरी वेळीच सावध होणं आवश्यक असतं.

     अर्थात प्रेमात पडणं न पडणं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असला तरी चित्रपट व वास्तविक आयुष्य फार वेगळं असत हे ही समजून घेतलं पाहीजे. प्रेमात पडण हे नकळत घडत असलं तरी प्रेमातून निखळ मैत्री की,  आयुष्यभराची साथ हे परस्पर  संमतीने पक्क  ठरवून घ्याव. अगोदर आपलं करीअर महत्वाच. आपल्या पालकांनी पाहिलेलं स्वप्न, त्याच्या पूर्तीकडे वाट्चाल करूया असं ठरवून फिनिक्स पक्षासारखी राखेतून गगनभरारी मारण्यास काहीच हरकत नसावी. प्रेमात अयशस्वी ठरलेल्यांना सावरण्याची ईश्वर सुबुध्दी देवो अनं यशस्वी प्रेमीयुगलांना थम्स अप.. बेस्ट ऑफ  लक. 

 


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational