The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW
The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW

Meenakshi Kilawat

Romance

3.8  

Meenakshi Kilawat

Romance

प्रेम रसाचे सप्तसुर

प्रेम रसाचे सप्तसुर

14 mins
2.1K


 रुणुझुणु पैंजणाचा आवाज ऐकून बेधुंद होऊन अजय कासावीस व्हायचा पण आरुषी त्याला नाही दिसायची. तो सतत तळमळत असे तिची एक झलक बघण्यासाठी वरखाली बाल्कनीत गिरट्या मारत असायचा. का यालाच  "प्रेम रसाचे सप्तसुर" म्हणतात ही अद्भुत संगीतमय प्रेम रसाने अजयच्या जीवनाला वेढून टाकले होते. त्या संगीताचा मधूर नाद हृदय स्पंदन फक्त आरुषी साठीच धडकत असे त्याचा जीव की प्राण आरुषीमध्ये वसत असे ती दिसली नाही तर त्याला काय करू काय नको व्हायचे.


 वय काहीसे वीस बावीस वर्षाचे दोघेही ग्रॅज्युएशन पूर्ण करण्याच्या तयारीत लागले होते इतरांसारखं त्यांच्या प्रेमात कधीच किल्मिष आलेलं नव्हतं त्यां दोघांनाही एक दुसऱ्यावर अतुट विश्वास होता त्या विश्वासाला त्या दोघांनी कधी तडा जाऊ दिला नाही.


अजय सुरेख उंच धिप्पाड गोरा सुंदर युवक होता

 आरुषीला तो खुप आवडायचा, सुंदरतेपेक्षा जास्त ती त्याच्या गुणाची कायल होती. त्याची दिलखेचक अदा व बालीश सौदर्यवर आरुषी फिदा झाली होती. त्याला कोमल फुले अतिशय आवडायची कुठल्यातरी बगिच्यातून किंवा दुकानातून आरुषी साठी फुले भेट करायचा.आरुषी ती फुले आपल्या रूममध्ये अलगद आपल्या तकिया जवळ ठेवायची व त्या गंधीत दुनियेत झोपी जायची.


कित्येक मुली त्याच्या अवतीभोवती कुंजन करीत परंतू तो लाजाळू पण तितकाच खंबीर व्यक्तित्वाचा धनी होता इतर मुलींची बेमालूम चाळे त्याला अजिबात आवडत नसे. तो फक्त एकमेव आरुषीवर सम्मोहित होता. नेमका त्याचा हाच गुण आरुषीला खुप आवडायचा.


स्वप्नाच्या दुनियेतही ती दोघेच असायचे. दोघांच्या ही प्रत्येक धडकनीमधे प्रितीचा गंध धुंद होऊन सामावलेला असायचा पण त्या दोघांना कधी एकांत मिळाला नाही. चालता-बोलता किंवा फोनवर किंवा कॉलेजात दोन गोष्टी करून समाधान मानत असे ते निर्मळ निर्व्याज प्रेम निर्झर सरीतेप्रमाणे वाहत होते.


 अजय तासंतास वाट बघत असायचा. तिलाही जाणिव होती अजयच्या प्रेमाची परंतू नाईलाज होता. दोघांनी ही कॉलेजमध्ये जाता-येता कित्येक वर्ष घालवली होती. आता पूर्णतया ती दोघे एकमेकांच्या प्रेमात पडली होती श्वासातही एकमेकाची आठवण करून श्वास घ्यायचे. क्षणोक्षणी एकमेकांचा ध्यास प्रेमाने फुलत चालला होता.

खर प्रेम ह्रदयात सत्यम शिवम सुंदरम चा अप्रतिम मेल होता.

 त्या दोघांची भेट कॉलेजच्या पहिल्या वर्षी ॲडमिशन च्या वेळी झाली दोघेही ॲडमिशनसाठी फॉर्मवरच्या तृटी पुर्ण करण्याकरिता इकडे तिकडे जाता येता बोलले होते. एवढिच ओळख झाली होती. ती त्यांची पहिली भेट होती पुन्हा कित्येक दिवस त्यांची भेट झालेली नव्हती.


 परंतू एक दिवस आरुषी कॉलेजला गेली असता काही गुंड प्रवृत्तीच्या boyes नी आरुषीला छेडले आरुषी आतून जाम घाबरली त्यावेळी ती एकटीच असल्यामुळे ती पेचात पडली. आतून ती भेदरलेली असहाय हरिनी सारखी शिकारीच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करीत होती पण तिला रस्ता मिळत नव्हता तिकडे कोणी उपस्थित नव्हते ती कॉलेजला नवीन होती त्यामुळे तिला मित्र-मैत्रिणी नव्हतीच ती एकटीच कॉलेजला जातसे व एकटीच परत येतसे कॉलेजचे प्रांगण भव्यदिव्य असल्या मुळे आवाजही जाऊ शकत नाही याची आरुषीला जाणिव होती.सर्व स्टूडेंट क्लासरूम होती. आता ती पुरती रडकुंडीला आली होती.त्या मुलांनी नानातऱ्हेचे अभद्र शब्दांचा प्रयोग केला त्यामुळे ती वाघीनीसारखी चवताळली आणि ताडकन एकाच्या गालावर सनसनित झापड पडली. ती मुले अजुनच जवळ आली व आरुषीचा हात जोरात पकडला .ती बचाव करण्यासाठी किंचाळली पण ती टवाळखोर मुले ऐकण्याच्या मुडमधे नव्हते.


 दुपारचा ब्रेक असल्यामुळे सर्व सामसूम होती अशावेळी आरुषी मनातन घाबरली तिला काही सुचेनासे झाले ती देवाचा धावा करू लागली चार मुले तिच्या रस्त्यात आडवी होती कुणी काही कुणी काही अपशब्द बोलत होती तिने कानावर हात ठेवून आपले धाडस दाखविले ताठर भूमिका घेतली आतून ती जरी घाबरली होती तरी तिने त्यांना धमकी दिली की तुम्ही मला असं अडवू शकत ना़ही मी प्रिन्सिपल सरांना कंप्लेंट करेन पण ती मुले वाईट प्रवृत्तीची होती तिचे काही ऐकून न घेता त्यांनी तिचा पिच्छा पुरवला तिने तिच्या हातातली पुस्तके घट्ट पकडली व एका मुलाला धाडकन डोक्यावर मारून बाहेर पडण्याच्या उद्देशाने पाऊल पुढे टाकले तसेच तिघे मुले तिच्या दुप्पटा ओढण्याचा प्रयत्न करू लागले.


तसाच एक कठोर आवाज आला " अरे नामर्दांनों माझ्याशी लढा"अन क्षणात धाडकन डोक्याची टक्कर झाली .लाथा ठूस्से दनादनचा पाऊस पडला.तिच्या मदतीला कुणीतरी देवच धाऊन आला होता आरुषी वळून बघते आणि आश्चर्यचकित होते. अजयने दोघांच्या माना पकडून डोकं आपटलं तिसरा घाबरून पळून गेला अजयने त्या तिघांना चांगलेच बदडून काढले होते.आरुषीच्या जीवात जीव आला तिने अजयचे धन्यवाद केले व खुप आभार मानले.


 परत जाण्याची तिची हिंमत होत नव्हती म्हणून अजयने तिला तीने सांगीतलेल्या रोडवर सोडले होते.रस्ता संपे पर्यंत दोघेही अबोलच होते.आरुषी विशन्न अवस्थेत घरी गेली.दुसऱ्या दिवशी तिला कॉलेजला जाण्याचं धाडस झालं नाही. 


 इकडे अजय कॉलेजला गेला असता त्याने आरुषीचा शोध घेतला ती कॉलेजात दिसली नाही वारंवार तो आरुषीच्या क्लासरूम कडे लक्ष पुरवत होता पण आरुषी आलेली नव्हती तो घरी परतल्यावर बाल्कनीत जाऊन बसला त्याला आज काहीतरी वेगळ व उदास वाटत होत. तेंव्हा दूर नजर पडता एका बंगल्याच्या बाल्कनीत आरुषी उभी असलेली त्याला दिसली तो बंगला यांच्या घराच्या अपोजिट साइडला चार बंगले सोडून होता मधे सडक होती .त्याला खूप आनंद झाला.तो मनात म्हणाला. अरेच्या ही तर अगदी जवळच रहाते.

  

 अजयला आरुषी कुठे राहते ही गोष्ट माहीत झालेली होती याआधी त्याला कधीच आरुषी दिसली नव्हती ती आपल्याच एरियात रहात आहे ही गोष्ट अजयच्या ध्यानीमनी ही नव्हती. अजयला मनोमनी आनंद झाला.


 अजयच्या मन आरुषी कडे खेचत होतं दुसऱ्या दिवशी कॉलेजला जाताना आपली स्कूटर आरुषीच्या बंगल्यासमोर थांबविली आणि तिची वाट पाहू लागला परंतु ती घरातून निघाली नाही तेव्हा अजयला तिच्याशी बोलण्याचा मार्ग सापडलेला नाही तो अनमस्क स्थितीत होता लगेच त्याने दुकानात जाऊन एक गुलाबाचा पुष्पगुच्छ घेतला व एका छोट्या मुलाला देऊन त्यात एक पत्र लिहून आरुषीला देण्यासाठी एका छोट्या मुलाला पाठवले. त्या एरियातली सारीच मुले अजयच्या ओळखीची होती त्या मुलाने तो पुष्पगुच्छ आरुषीच्या हातात जाऊन दिला आरुषी आश्चर्याने त्या पुष्पगुच्छाला पाहून त्या मुलाला विचारपूस करीत होती .


 तुला कोणी दिला हा पुष्पगुच्छ त्या छोट्या मुलाने तिचा हात धरुन बाल्कनीत आणले व दूर दुसऱ्या बाजूला उभा असलेला अजय त्याने दाखविला तेव्हा आरुषीचे श्वास जलद गतीने सुखद आंदोलित होऊन धड़धड़ करीत होते.तिने पुष्प गुच्छ कुरवाळले असता त्यात तिला पत्र दिसले ते पत्र वाचल्यावर त्यात फोन नंबरपण होता फोनवर अजयशी तिने वार्तालाप केला अजय ने आरुषीला धीर दिला व म्हणाला,

 आरुषी तू कॉलेजला येत चल ती मुले कधीच तुझ्या वाटेला आडवे येणार नाही इतकी मी गॅरंटी देतो.

तिला कॉलेजला जायला हिम्मत आली. तीने होकार दिला व लगेच तयारी करून कॉलेज साठी निघाली अजयची गाडी सोबत होती.आपापल्या क्लास रूम मध्ये गेले. परत येत असताना अजयची स्कूटर तिच्या मागे येतांना दिसली तेंव्हा आरुषी निर्धास्त झाली तिला टेंशन फ्री वाटायला लागलं. तो आता नित्याचा क्रम झालेला होता जातां-येतां दोघेही आपापल्या गाडीवर पण सोबत येणे-जाणे करू लागले वेळ मिळाल्यास थोडं बोलणं ही होत असे.


 अजयचा परिवार उच्च कुलीन व प्रतिष्ठित धनाढ्य लोकांमध्ये गणल्या जात होतं व भाषा गुजराथी होती.तो आपल्या आई वडिलांता एकुनता एक मुलगा आणि खूप लाडका होता. त्याला कोणत्याच गोष्टीची कमी नव्हती परंतू अजयने कधी त्याचा फायदा घेतला नव्हता तो सालस पण गंभीर मुलगा होता. त्याचे पेरेंट्स खूप मोठे बिझनेस मॅन व भक्तिभाव जपणारे होते.


   आरुषीचा परीवार मध्यमवर्गीय खाऊन पिऊन सुखी होतं.आईवडील व एक भाऊ होता. आरुषी चा भाऊ नुकताच एमबीबीएस डॉक्टर झालेला होता. वडीलही क्लास वन ऑफिसर असल्यामुळे educated   फॅमिली म्हणून त्यांची ओळख होती मराठी परिवार असल्यामुळे महाराष्ट्रात त्यांची बरीच नातेवाईक व मित्रपरिवार होता. काका मामा सर्व जवळच्याच गावात राहायचे .


एक दिवस तिच्या मामाला आरुषीच्या प्रेम प्रकरणाचा छडा लागला आणि तो त्याची बहीण म्हणजेच आरुषीच्या आईकडे धावतच सांगायला आला लगबगीने त्याला माहीत असलेली पूर्ण गोष्ट आरुषी बद्दल सांगितली प्रेम प्रकरण चव्हाट्यावर येण्याआधीच चांगला मुलगा पाहून लग्न करून द्यायचे त्याने बजावले होते. आरुषीची आई कुमुदिनी हिने भावाला स्पष्ट सांगितले की मुलीचे graduation कम्प्लीट झाल्याशिवाय मी लग्न करणार नाही परंतु तो नीराज झाला आणि म्हणाला बेअब्रू होण्यापेक्षा आपली इभ्रत सांभाळून घ्यावी अन्यथा याचे भयंकर दुष्परिणाम होऊ शकतात.आपल्या समाजात आपली कवडी ची इज्जत राहणार नाही लोक आपल्याला नावे ठेवतील इतर पुष्कळ गोष्टी मामाने केल्या होत्या.


त्यानंतर आईने आरुषीला विचारले मामाच्या सांगण्यावरून हे खरं आहे काय तुझं प्रेम प्रकरण चालू आहे काय तू त्या गुजराथी मुलाबरोबर फिरते काय ? अशा अनेक गोष्टी आईने आरुषीला विचारल्या. शांतपणे आरुषी ने आईचं ऐकून घेतलं आणि एकच ठामपणे उत्तर दिले हो आई मी अजयशीच लग्न करणार आहे.

 तुला माझं लग्न करायचं असेल तर अजयपेक्षा चांगला मुलगा आहे शोधून सापडणार नाही.मला अजय मिळाला तर ठीक अन्यथा मी आजीवन कुमारिका राहील आणि जरी तू जबरदस्ती केली तर मी या घरातून कायमची निघून जाईल आईचं आरुषी वर खूप प्रेम असल्यामुळे आई काहीच बोलली नाही आणि म्हणाली बाबाला आपण विचारू आणि नंतर निर्णय घेऊया.


 इकडे अजयच्या परिवारात ही अजयच्या आई-वडिलांना ही दोघांच्या प्रेमाचे धागेदोरे गवसले होते. प्रेमप्रकरण संपवायला मुलाच्या भविष्याचा डाव रचला अजयला मागमूस लागू दिला नाही त्यांनी graduation होताच काही शिक्षण घेण्याकरिता अजयला विदेशात पाठवण्याचा विचार केला अजयला त्यात काहीच वावगं वाटलं नाही. तसा तो स्वभावाचा साधा सरळ व्यक्ती होता तो खुशीने आनंदाने जायला तयार झाला.


अजयच्या आई-वडिलांना मनात खुशी झाली की मुलगा तीन वर्ष दूर झाल्यावर हे प्रेमप्रकरण नक्कीच संपुष्टात येणार आणि आपल्या अजयच्या जीवनातून ती मुलगी परस्पर निघून जाईल तेंव्हा आपण आपल्या समाजात अजय साठी छान मुलगी बघून लग्न करून देऊ. समाजाचे फॅड सर्वीकडे खूप कसोशीने पाळले जातात यात त्यांची काही चूक नव्हती.


ही बातमी अजयने आरुषीला सांगितली तेंव्हा इतर मुलेही इकडे-तिकडे विदेशात जातात त्यात काही मोठंस नव्हतंच तिला कोणत्याच गोष्टी ॉकिंवा संशय आला नाही.


त्यांचा एक दिवसही ही एकमेकाविणा जात नव्हता ती आता तीन वर्ष विरह झेलण्यासाठी तयार झाले.त्यांची अशी ताटातूट झाली हे त्यां दोघांना सुद्धा माहित पडले नाही वरवर पाहता सर्व व्यवस्थित होतं.आरुषीला अजयची पूर्ण खात्री होती ती त्याच्यावर पूर्ण विश्वास करीत होती आणि स्वत:पेक्षा जास्त त्याला मानत होती.अजय म्हणाला,जसे तू आतापर्यंत सावरलंस स्वतःला तशिच आताही सावर माझा उंबरठा प्रवेश करण्याचं तुझे स्वप्न काही काळ लांबेल परंतू ते अवश्य पुर्ण होईल .मी आल्यानंतर लगेच दोघे विवाहबद्ध होणार अशी शाश्वती दिली.


 विदेशाला जाण्यापूर्वी दोघेही भेटण्यासाठी आतुर होते त्यांना एकांत हवा होता यापूर्वी त्यांनी कधीही एकांतात भेटण्याची इच्छा झाली नव्हती. त्यांनी भेटण्यासाठी प्लॅन केला सोबत दोघेही खुल्या वातावरणात काही वेळ रमायचे आणि प्रसन्नचित्त मनाने दुर व्हायचे होते.प्रथमच ती दोघे परीवाराशी खोटी बोलली होती. अजिंठा लेणी बघायला जाणार म्हणून अजयने घरी सांगितले मी मित्राबरोबर जात आहे आणि आरुषी ने पण सांगितले मैत्रिणीबरोबर जात आहे घरच्यांनी विरोध केला नाही.

 त्यांनी एका दिवसाचा अजिंठा लेणीचा टूर अरेंज केला.


 लेणीत पोहोचल्या बरोबर दोघांनीही प्रथमच हातात हात गुंफले होते व पुर्ण आलिंगन दिले व अजयने आरूषीला आय लव यू म्हंटले लगेच आरूषीने आय लव यू म्हटले या कबुली जवाबामुळे प्रेमाला अजूनच बहर आला होता आणि खूप प्रेमवार्ता करून पुर्णतया प्रेमाची घागर तुंडूंब भरली.आरुषीच्या ह्रदयावरचे दडपण कमी करून विश्वास अबाधित ठेवण्यासाठी दोघही प्रयत्न करीत होते .


अजयने आरुषीला तटस्थ राहायला सांगितलं मी असा गेलो आणि असा आलो म्हणत आपला जन्मोजन्मीचा साथ असल्यामुळे याजन्मी आपल्याला नक्कीच भेटायचं आहे असी शंभर टक्के खात्री दिली. इकडची दुनिया तिकडे झाली तरी आपण भेटणारच. अशा अनेक आनाभाका घेतल्या होत्या आरुषीच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या होत्या.आठवतय ना तुला मी वचन दिल होतं माझ्यामुळे तुझ्या डोळ्यांत अश्रूंचा एक थेंबही येऊ देणार नाही, आवरना ती अमुल्य मोती अशी फुटू देऊ नकोस अश्रूंचा बांध आणि अजयचे डोळेही डबडबले होते.दोघांनी एकमेकाचे अश्रूं आपल्या ओठाने अलगद टिपले. 

अजय पुढे म्हणाला! या समाजाच्या अभेद्य भिंती पार करून आपले छोटेसे आकाश सूर्य चांदण्याच्या साक्षीने वसवायचे आहे. तू देशिल ना मला साथ? आरुषीने आपल्या नाजूक हाताचा घट्ट विळखा अजयच्या गळ्यात घातला आंतरिक दुःखाने आरुषीला अजयपासून दूर व्हायची इच्छाच नव्हती .त्याच्या प्रश्नाचे काय उत्तर देणार त्या स्पर्शाने दोघेही बेभान झाले खरे पण लगेच त्यांनी स्वत:ला सावरले. त्यांच्या निश्चल पवित्र प्रेमावर कोणत्याच प्रकारचा डाग लागायला नको कारण हे प्रेम म्हणजे ईश्वराची प्रार्थना आहे याला क्षणिक सुखासाठी अपवित्र करणे घोर पाप आहे ही चूक अक्षम्य आहे ही गोष्ट दोघांनाही माहित होती.तरी आरुषी आत्म्यातून वहावत होती अजयचा स्पर्श तिला उद्दीग्न करित होता परंतू दोघांनीही स्वत:वर ताबा मिळविला.आपले प्रेम निर्मळ पवित्र गंगेसारखे असायला हवे ज्या प्रेमासाठी आपण जीवन जगत आहोत त्या प्रेमात वासना नको.तुला मी भोग्य वस्तू समजत नाही आपले प्रेम सुगंधित फुलासारखे आयुष्यभर दरवळण्याकरिता यात वासनेचा लवलेशही यायला नको.

अजयने आरुषीला समजविले.आरुषीच्या मनातले मळभ निघून गेले तिला अजुनच हलके वाटले. आणि अजयचा कोणत्या शब्दात धन्यवाद करावा सुचेनासे झाले. अजयचे आचरण कसे आहे याची पारख ही झाली होती. त्याचे श्रेष्ठत्व मनात खोलवर उतरले होते.


 त्यांनी घरून टिफिन आणला तो तसाच राहिला.खाण्या पिण्याकडे लक्ष नव्हते.त्यांच्यासाठी आजचा एकएक मिनिट महत्वाचा होता. नाही म्हणता संध्याकाळ झाली आकाशात सुंदर लाली पसरली होती ती दोघे आपापल्या घरी निघून आली.


 अजय दुसऱ्या दिवशी फ्लाईटने निघून गेला.जातांना दोघांनी मुद्दाम भेट केली नाही.तो रडविलेला चेहरा बघून विदा घेणे टाळले होते.ती फोनची आतुरतेने वाट बघत राहिली. अजयने पोहोचल्याबरोबर आरुषी ला फोन केला. सुखरुप पोहोचल्याची वार्ता सुखावून गेली. आरुषीला इकडे सतत अजयचा ध्यास असायचा. जसा देवाचा जाप भक्त करतात तशिच अजयची मानसपुजा करायला लागली होती.


 तिचा साक्षात ईश्वर अजय होता. तिने मनोमनी एक प्रकारचे तप आचरिलं पवित्र प्रेम साकारण्या सकारात्मक विचार करणे हेच तिचे व्रत वैकल्ये होती ज्या गोष्टी अजयला आवडत होत्या त्या गोष्टी करीत होती अजय ने दिलेले फुले सुकलेली फुले रोज प्रसाद म्हणून खायची ती सुकलेली फुले उशीखाली ठेवून रात्रंदिवस अजयचे स्वप्न बघायची ती अजयच्या प्रेमात दिवानीच झालेली होती.

 

 दोन वर्ष कशी भर्रकन निघाली आरुषीला थोड जड गेलं परतू ती सोशिक असल्यामुळे आणि अजयच्या प्रेमावर विश्वास असल्यामुळे कीतीतरी वर्ष वाट बघायला ती तयार होती. आरुषीसाठी मुले बघणे सुरू होते तिच्या नकळत विवाहाच्या गोष्टी होत होत्या. तिच्या engagement ठरवला गेला मुलाने आरुषीला कधी पाहिलं कोणास ठावूक आरुषींने ही मुलगा बघितलेला नव्हता engagement साठी हॉल बुक झाला आणि तारीख पण ठरवली गेली होती.तासाभराच्या आधी हॉलमध्ये जाण्यासाठी आरुषींला तयार व्हायला आईने सांगितले. आणि छान मेकअप करायला सांगितले भरजरी साडी घालायला आईने आग्रह केला होता.  


 ती आईला सारखी विचारत होती की मला एवढी भारी साडी नको मी हे सर्व नाही घालणार माझी इच्छा मुळीच यायची नाही.परंतु आईने तिला आग्रह केला व म्हणाली,

अग चल ना माझ्या मैत्रिणीच्या मुलाचे engagement आहे. तिने तुला पण बोलविले आहे. आरुषी म्हणाली ,मी साधा सरळ सूट घालते पण आईने तिला जबरदस्तीने तयार व्हायला सांगितले अगं समाजाच्या लोकांचा प्रोग्राम आहे आणि तू अशी कशी येणार म्हणून म्हणते चांगली भरजरी साडी घालून तयार हो आणि ही दागिने पण घाल तू खूप सुंदर दिसायला हवी आहे.


  आरुषीचा भाऊ आकाश त्याची इंटर्नशिप संपलेली होती तो पण आला होता. बहीण भाऊ खूप प्रेमाने भेटले. त्यांची खूप गमत चालायची आकाशने बळेच आरुषीला चीडविले तो म्हणाला, अगं लवकर आटोप माझे जिजू वाट बघत आहे. किती त्रास देणार आहेस माझ्या जिजूला खरच तू खूप छान जिजू पाहिलास माझ्यासाठी एवढं बोलताच आरुषीच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला व खाडकन सतर्क झाली.

   आरुषी लगेच म्हणाली,

 तुम्हास एवढी मी जड कशी काय झाली? दादा, तुम्ही मला न सांगता एका परक्या घरी पाठविणार आहात? माझी engagement करणार मला थोडीशी ही कल्पना दिली नाही. माझ्या आवडीनिवडीची जरा ही विचार केलेला नाही. 

    अग ये आरुषी तू काय म्हणाली, 

तुला काही माहित नाही तुझी engagement आहे हे कसं शक्य आहे. तिने भावाला गहींवरुण करुण नजरेने बघितले.होय दादा आई बाबा मला माझ्या नकळत माझा विवाह करीत आहे.मला जरासुद्धा भनक लागू दिली नाही तूच सांग मी काय गोठ्यातली गाय आहे कोणत्याही खुट्याशी बांधावी?मी काय पाप केले आहे. चोरून लपून माझ्या विवाहाचा घाट रचला आहे. दादा आता तूच मला वाचव यातून मी अजयशी खूप प्रेम करते त्याच्याशीच मी विवाह करणार आहे त्याच्या वीणा मी जिवंत राहू शकणार नाही.


 आकाश एकदम आश्चर्य चकित झाला आणि म्हणाला खरच तुला माहीत नाही का तुझी आज engagement आहे आरुषी रडायला लागली आणि जाऊन बिलगली गळाभेट घेऊन आकाशने तिला धीर दिला व म्हणाला, असं शक्य होणार नाही तुला असं जबरदस्तीने कुणाच्याही हातात देणार नाही तू काळजी करू नकोस मी काही करतो.

     आकाश म्हणाला, 

आई बाबाशी बोलणे म्हणजे आज वाद होणार तसं न होता तू गाडीत बैस मी तुला सुरक्षित जागी पोहचवितो. ही वेळ निघाली ना तर तुझी engagement होणार नाही. तशीच आरुषी निमुटपणे सर्वांची नजर चुकवून बाहेर गाडीत जाऊन बसली आणि आकाश पण तिच्या मागे गाडीत बसला ती गाडी त्याने आपल्या मित्राच्या घराकडे नेली आणि मित्राच्या परिवाराला पूर्ण Story सांगितली आणि मदत मागितली.


      मित्राच्या आईजवळ आरुषीला ठेवून तो त्वरित निघून आला आई बाबा घरी रडत होते आणि डोक्यावर हात देऊन बसले होते काय झालं म्हणून आकाशने विचारलं असता आई-बाबा सांगू लागले आपली आरुषी घरात नाही ती कोणासोबत आणि कुठे गेली असेल आता काय होईल, आपली समाजात कवडीची इज्जत राहणार नाही.  

 आकाश म्हणाला , 

 आपल्या मुलीची चिंता सोडून समाजाचा विचार महत्वाचा वाटतो आहे का ग आई? आपण कसले सुशिक्षीत म्हणावे, मला तुमच्या वागण्याची लाज वाटतेय आईबाबा खाली बघायला लागले. त्या पाहुण्यांना तुरंत फोन करून सांगा की ही engagement होऊ शकत नाही. बर थांबा मीच मोठा भाऊ असल्याने मीच हाताळतो त्यांना, माझ्या बहिनीचे मन मी कुणालाच नाही तोडू देणार .

   आई म्हणाली,

खर आहे तुझं म्हणने मी माझ्या छकुलीचा घात करायला चालले होते.आता कुठे शोधू मी माझ्या छकुलीला हे सर्व माझ्यामुळे घडलं माझी छकुली दूर गेली तो अजय तिचा प्रियकर तर इथे नाही मग ती कोणाच्या भरवशावर कुठे गेली काही बरं-वाईट तर नसेल केलं ना?अंसख्य वाईट विचार तिच्या मनात आले. ती अतिशय घाबरली.


 न सांगता तिची engagement आज करणार होते. माझ्या छकुलीला कुठूनही शोधून आणा तिला आता आपल्या पासून कधीच मी दूर करणार नाही. पोलीस स्टेशनला कंप्लेंट करायची मला घेवून चल आकाश,

    आकाश म्हणाला ,

आई शांत रहा मी बघतो काय करायचं ते रात्र फार झालेली आहे तुम्ही सावकाश झोपा.मी कंप्लेंट करून येतोय आपली काळजी घ्या आपली आरुषी जरूर परत येईल तिला मी समजवेन.तू निश्चिंत रहा. बाबा तर अबोलच झाले होते त्यांनी काहीच बोलायचे टाळले त्यांची लाडकी मुलगी त्यांच्यापासून दुरावली होती ते विषन्न अवस्थेत आपली तळमळ आपल्या हृदयात जप्त करीत होते .


 रात्रभर आरुषीला तिकडेच राहायचं होतं तिने सकाळी आकाशला फोन करून विचारलं घरी आई बाबा ठीक आहे ना ? आकाश म्हणाला सर्व ठीक आहे मी निघालोच तुला घ्यायला येतोय तू घाबरू नकोस. 

 आई बाबा झोपलेली असतांना आरुषीला लगेच घरी घेऊन आला. आरुषी आल्यावर आईबाबाला खूप आनंद झाला दोघांनीही तिचा खूप लाड केला.तू आमचा जीव की प्राण आहे.आम्ही अशिक्षीतासारखं वागलो तुझ्याशी आमची प्रिय लेक तू कशी दुर्बूद्धी सुचली मेली आम्हास तुझ्याशी दुश्मना सारखं वागलो.तुझ्या मनाविरुद्ध आम्ही तुझी engagement पण करायला निघालो होतो. आम्ही चूकलोय माफ करशिलना ग आम्हास ?आरुषीने आईबाबाचे डोळे पुसले आणि त्याते सांत्वन केले.

  बघता बघता तीन वर्ष लोटली व अजय विदेशातून परत आला अजयने आल्याबरोबर त्याच्या आई बाबाला सांगितलं मला लग्न करायचं आहे.त्यांना वाटलं की विदेशातली कोणीतरी मुलगी यांनी पटविली तर नाही ना? त्या दोघांना एकदम shocked लागला मनात त्यांनी म्हंटल विदेशाची मुलीपेक्षा आपण आधिच आरुषीसोबत लग्न करून दिले असते तर बर झाल असतं.आता काय होईल.अजयच्या बाबाने अटकतच विचारलय कोण कुठली आहे ती, तिचे नाव काय आहे बेटा .

    अजय म्हणाला, 

तुम्हाला सर्व सांगतो फक्त तुम्ही मला आशीर्वाद द्या.नंतर नाव गाव समाज सर्व सांगतोय.त्याने संपूर्ण गोष्ट संगीतली.आई-बाबा दोघेही चकित झाले की आम्ही ज्या गोष्टीपासून तुला तीन वर्ष दूर केलं तीच गोष्ट तू करतो आहेस. आम्हाला अतिशय आनंद झाला आहे आणि तू प्रामाणिकपणे आपल्या आई-वडिलांच्या आणि आरुषीच्या ही भावना सांभाळल्या म्हणून आम्ही खुशीने तुझे विवाह करून द्यायला तयार आहोत. अजयला अजून काय पाहिजे होतं त्याला सर्वकाही मिळाल्याचा आनंद झाला.


 त्याने लगेच आरुषी सोबत तो शेअर केला धुमधडाक्यात लग्न झालं दोन्ही कडील पार्ट्या सढळच होत्या काही कमी ठेवली नव्हती त्यामुळे सगळ्या गोष्टी व्यवस्थित पार पडल्या स्विझर्लंडला हनिमून झाला दोघांच्याही स्वप्नाची फलश्रुती झाली होती दोघेही आनंदाने नांदू लागले.


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance