प्रेम हे! - भाग ३
प्रेम हे! - भाग ३
शामी सायंकाळी लवकरच आवर-सावर करायला घेते. घड्याळीत साडे सहा वाजले होते. श्याम कधीही तिथे पोहचणार होता.
शामी : अंजली, ते ड्रेस घडी घालून रॅक मध्ये ठेवायला घे. आणि जरा लवकर कर हं... , श्याम कोणत्याही वेळी पोहचेल आणि मी जर वेळ केला ना तर चिडेल खूप.. अंजली शामीच्या बुटीक मध्ये काम करायची. श्याम आणि शामीची जगजाहीर असलेली मैत्री तिलाही माहीत होती.
अंजली : ताई , एक विचारू का ?? म्हणजे रागावणार नसशील तर... !!
शामी : अग बोल , काय झालं ???
अंजली : ताई , तू कधी श्याम दादाच्या प्रेमात नाही पडलीस का ग ??
शामी : ये... गप ग ...!!! प्रेम आणि श्याम बरोबर ??? वेडी झालीस का ?? आम्ही खूप छान मित्र आहोत बस. मी तर कधी स्वप्नातही असा विचार केलेला नाही.
अंजली : मग आता कर ना!!! तुमची जोडी काय धमाल दिसते ग !!! असे वाटते की तुम्ही एकमेकांसाठीच आहात. आणि प्रेमात पडायला आणखी काय हवं असतं... तुमची सुंदर , निखळ मैत्री पुरेशी नाही का... ??? ( एवढ्यात गाडीचा हॉर्न वाजतो ) बघ ताई श्याम दादा आलाय . आज विचारूनच घे त्याला.
शामी : ये गप ग...!!! तू म्हणजे ना..!!
श्याम : काय ग , काय म्हणतेय ही अंजली??
शामी : काही नाही रे.... , तू लक्ष नको देऊस .. वेडी आहे ती. चल उगाच उशीर होईल आपल्याला..
श्याम : ओके, बाय अंजली..!!!
जेवण आटोपून श्याम शामीला तिच्या घरी सोडून स्वतःच्या घरी निघतो. शामी फ्रेश होऊन झोपायला येते मात्र आज तिला झोपच लागत नाही. अंजलीचे बोल सतत तिच्या कानात घुमत असतात. एका मागे एक असंख्य विचार तिला सतावू लागतात.
खरच... श्याम आवडतो का मला?? हे तर खरं आहे की आम्ही एकमेकांशिवाय राहू शकत नाही., मग याला प्रेम म्हणतात का.. ?? श्याम ला सुद्धा वाटत असेल का असेच ??? नाही... !!! असे काही नाही... मी पण न उगाच विचार करतेय!!! ही अंजली पण न!! काहीही बरळत असते.
जसे जसे दिवस जाऊ लागतात श्याम आणि अनु एकमेकांच्या जवळ येऊ लागतात. श्याम तिला त्याच्या व शामी च्या मैत्रीबद्दल देखील सगळच सांगतो. त्यामुळे अनु देखील खूप उत्सुक असते शामीला भेटण्यास. तिकडे शामीच्या मनात अंजली ने पेरलेले प्रेमाचे बीज देखील अंकुरायला लागते. आणि ती मनात ठरवते की श्याम शी याबाबतीत बोलायला हवे. म्हणजे त्याला काय वाटतं निदान ते कळेल तरी.
( एक दिवस ऑफिस मध्ये......... )
सर : श्याम , मि. देशमुख आपले सोलापूर वाले क्लाइंट , त्यांचा फोन आलेला. आपण जे सॉफ्टवेअर त्यांना दिलंय त्यात काही प्रॉबलेम्स येताहे म्हणाले. मी बोललो त्यांना आम्ही बघतो म्हणून पण ते म्हणाले की , इथेच पाठवा कुणाला तरी.
श्याम : ओके सर, मी येतो जाऊन. आताच निघतो म्हणजे सायंकाळ पर्यंत परत येता येईल.
सर : हो... निघ तू लवकर. आज वातावरण सुद्धा ढगाळ आहे. कधीही पाऊस येऊ शकतो.
अनु : पप्पा...., मी ही जाऊ का श्याम बरोबर ??? म्हणजे मलाही कळेल कस हॅण्डल करायचं ते..
सर: ओके...!! जा तूही.
अनु: थँक्यु पप्पा.....!!!!
इकडे श्याम देखील मनात खुश झालं होता. त्याच्या मनाची पतंग तर आता उंच उंच झेप घेऊ लागली. अनु आणि श्याम मि. देशमुखांकडील काम संपवतात आणि परतीच्या वाटेवर निघतात. इतक्यात मुसळधार पाऊस लागतो. त्यामुळे श्याम रस्त्याच्या बाजूला झाडाखाली गाडी थांबवतो. दोघेही पावसापासून वाचण्याचा प्रयत्न करीत असतात.
पावसात ओली झाल्याने अनु आणखीनच सुंदर दिसत होती. तिच्या गालावरील ते टपोरे थेंब श्याम ला अलगद टिपावेसे वाटत होते. तो चोरट्या नजरेने तिच्याकडे पाहत होता. इतक्यात अचानक जोरदार वीज कडाडते आणि अनु एकदम घाबरून श्यामला घट्ट मिठी मारते. आता मात्र श्यमचा तोल जातो. तो हळूच तिचा चेहरा वर उचलतो. तिचे चेहऱ्यावरील केस आपल्या बोटांनी हळूच सावरतो. तिच्या डोळ्यांत एक टक बघू लागतो. अनु ला ही श्याम आवडू लागतो. श्याम अनुला म्हणतो,
" अनु, आय लव यू ❤️!!! "
असे म्हणून तो हळूच त्याचे ओठ अनुच्या गुलाबी ओठांवर ठेवतो, आणि एका क्षणात सगळं वातावरण प्रेममय होऊन जातं.
श्याम : अनु माझ्याशी लग्न करशील??
अनु त्याला मानेनेच होकार कळवत त्याच्या मिठीत शिरते. श्याम देखील तिला जवळ घेत पाऊस थांबण्याची वाट बघू लागतो. पाऊस कमी होताच ते दोघे तिथून निघतात. श्याम अनुला तिच्या घरी सोडून पुढे निघतो. आज श्याम रात्रभर अनुच्याच आठवणीत चिंब भिजत राहिला. आणि अनु सुद्धा त्याच्या मिठीत स्वतःला हरवून बसली होती.💞
(क्रमशः)