Poonam Wankar

Romance

3  

Poonam Wankar

Romance

प्रेम हे..! - भाग २

प्रेम हे..! - भाग २

4 mins
201


(श्याम आणि शाल्मली मॉर्निंग वॉक करून परतले. शामी ला तिच्या घराजवळ सोडून श्याम त्याच्या घरी जायला निघतो.... )

श्याम : ये शामि, आज बाहेरच जाऊ या का जेवायला ? जाम कंटाळा आलाय ग.. खूप दिवस झालेत गेलो नाही कुठे. शामी : ओके ! डन..! मी पण लवकर येते संध्याकाळी.

श्याम : ये नको! त्यापेक्षा मी ऑफिसमधून येतानाच तुला पिक अप करतो, डायरेक्ट जाऊ या.

शामी : चालेल.. चल निघ नाहीतर उशीर होईल तुला.

श्याम : ठीक आहे.... भेटतो सायंकाळी...!!!

शामी : हो.... बाय!!!!

     श्याम ऑफिसला जाण्याची तयारी करू लागतो. मात्र अजूनही त्याच सगळ लक्ष त्या तरुणी मध्येच होत. तिचे वाऱ्यावर उडणारे केस, तिचे बोलके डोळे, ते गुलाबी ओठ सगळं त्याच्या डोळ्यांपुढे दिसत होते. तो मनात विचार करू लागला... कोण असावी ती ? या पूर्वी कधीच तिला पाहिल नाही. कुणी नवीन राहायला तर नाही ना आले ? कुठे राहत असावी ती ? अश्या असंख्य प्रश्नांचे जाळे त्याच्या मनाला येऊन चिकटले होते.

      ' अरे श्याम!! आवर लवकर , आज जायचं नाही का तुला ?? ' आईने हाक मारत विचारले.

श्याम : हो हो आलोच.. शि... ट्ट्ट !!! दहा वाजले.. उशीर झाला. श्याम पळ लवकर..( स्वतःशीच बोलत )

आई : अरे, किती उशीर श्याम ?? पाहिलंस का दहा वाजले. अजुन ब्रेकफास्ट व्हायचा आहे तुझा.

श्याम : ये आई , ऐक ना ! मी ब्रेकफास्ट कॅन्टीन मध्ये करतो आज. खूप उशीर झालाय. खात बसलो तर आणखीन उशीर व्हायचा..

आई : ठीक आहे... पण आरामात जा रे बाबा... गाडी हळू चालव..!!

श्याम : ( बाईक ला किक मारीत ) हो ग आई... आणि ऐक ना , मी आणि शामी रात्री बाहेर बाहेर जेवायला जातोय त्यामुळे तू आणि बाबा जेवणासाठी माझी वाट बघू नका.. चल निघतो आता. बाय...!!!!

आई : सावकाश जा रे !!! काय होईल या मुलाचं ?? ( मनात पुटपुटत )

     

        श्याम चा स्वभाव खूप मनमिळावू होता. तो लवकरच सगळ्यांशी अडजस्ट करून घ्यायचा. त्यामुळे ऑफिस मध्ये देखील सगळ्यांशी फ्रेंडली होता. शिवाय त्याचा प्रामाणिकपणा , कुठल्याही समस्येला हाताळण्याची त्याची पद्धत यामुळे तो त्याच्या बॉस चा देखील आवडता होता. कुठलंही नवीन काम आलं की आधी श्याम बरोबर डिस्कशन व्हायचं , आणि त्यावर श्यामचा तोडगा देखील अचूक असायचा.

          श्याम ऑफिस ला पोहचतो आणि आपल्या कामात लागतो. इतक्यात त्याचा एक सहकारी दीपक त्याला सांगतो ,

" अरे श्याम , तुला सरांनी केबिन मध्ये बोलावलंय. "

श्याम : अरे !!! आज सर लवकर आलेत का..??

दीपक : हो.. आणि सरांची मुलगी सुद्धा आली आहे आज त्यांच्या बरोबर. पूर्वी लंडनला होती म्हणे ती !!

श्याम : ओके ओके.... आलोच जाऊन..( दारावर नॉक करत ) सर , आत येऊ का ??

सर : अरे श्याम ये . मी तुझीच वाट बघत होतो.

        श्याम ची नजर केबिन मध्ये असणाऱ्या सोफ्या कडे गेली. त्याच्या सरांची मुलगी वर्तमानपत्र वाचत बसली होती. तिने ते अगदी चेहऱ्या समोर धरले असल्याने तिचा चेहरा त्याला दिसला नाही. 

सर : श्याम ये तुझी ओळख करून देतो. ही माझी मुलगी अनुराधा , मागल्या आठवड्यात लंडनहून आली.

        

          सर काय बोलताहेत याकडे त्याच लक्षच नव्हतं. तो अनुराधा कडे एकटक बघत एखाद्या पुतळ्या सारखा उभा होता . आज सकाळी मॉर्निंग वॉक करताना दिसलेली तिचं ही मुलगी.

अनुराधा : हॅलो !! श्याम . तुम्हाला भेटून आनंद झाला.

( श्याम अजूनही त्याच स्थितीत... स्तब्ध.... )

सर : श्याम कुठला विचार करतोय..?? काय झालं ??

श्याम : नाही... काही नाही.. सॉरी...हॅलो अनुराधा. मलाही तुम्हाला भेटून खूपच आनंद झाला.

      श्याम ला त्याच्या डोळ्यांवर विश्र्वासच बसत नव्हता. सकाळपासूनच ज्या सुंदरी ने त्याच चित्त हरलं होत , ती त्याच्या समोर उभी होती. आता तर श्याम स्वतःला हरवून बसला होता. तिच्या प्रेमातच पडला होता.

सर : श्याम, मी अनु ला आपल्या कंपनीत सामील करावं म्हणतोय. त्यामुळे ती नवीन आहे तोपर्यंत तू तिला गाईड करावं असं मला वाटतं. म्हणजे ती कामही शिकेल आणि सगळ्या स्टाफ बरोबर मिक्स सुद्धा होऊन जाईल. काय ग अनु चालेल ना तुला..??

अनु : हो पप्पा .. धावेल. मी खूप उत्सुक आहे हे सगळं शिकायला. काय श्याम करणार ना मला गाईड..?? म्हणजे चालेल ना तुम्हाला??

श्याम : हो नक्कीच मॅम. मला आनंदच होईल..

अनु : अँड श्याम प्लीज डोन्ट कॉल मी मॅम. जस्ट कॉल मी अनु. ओके...

श्याम : ओके..!!!

         

      श्याम मनात खूपच खुश झाला होता. ज्या मुलीने पाहता क्षणीच त्याच चित्त हरल होत आता तिच्याच सहवासात तो कायम राहणार होता. त्याच्या प्रेमाची पतंग मनाच्या आकाशात स्वच्छंद घिरट्या घालू लागली होती. सर्वत्र जणू काही बॅकग्राऊंड म्युजिक वाजू लागले होते. आणि श्याम अनुच्या नामाचा जप करू लागला होता..

(क्रमशः)


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance