Poonam Wankar

Romance

3  

Poonam Wankar

Romance

प्रेम हे... भाग १

प्रेम हे... भाग १

3 mins
287


प्रेम हा शब्दच एवढा सुंदर आहे तर त्याची अनुभूती तर त्याही पेक्षा सुंदर असेल नाही का ?? राधा कृष्ण, लैला मजनू, हिर रांझा या सर्वांनी तर या प्रेमाला अमरत्व प्रदान केलय . संत कबीर देखील म्हणतात,

        " ढाई आखर प्रेम का , पढे़ सो पंडित होय ll "

ज्याला या प्रेमाचा खरा अर्थ उलगडला तो या जगात निरंतर अमर झालाय.

     अशीच एक प्रेम कहाणी मी आज आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करीत आहे ; जर माझ्या मुळे चुकून कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या तर माफ करावे.

                    .............................

      रोज प्रमाणेच आजही श्याम पहाटेच उठून मॉर्निंग वॉकला निघाला. मात्र आजच वातावरण त्याला खूप सुंदर वाटत होत. पाऊस येऊन गेल्यामुळे सगळे रस्ते, झाडे वेली त्यात न्हाऊन निघाले होते. आभाळ निळ्या जांभळ्या ढगांनी व्यापले होते. त्यात मधुमालतीचा सुगंध मिश्रित गार वारा अंगाला स्पर्शून जाताना मन मोहून टाकत होता. या साऱ्याचा आनंद घेत प्रसन्न चित्ताने तो रस्त्यावरून जात होता. आता हळू हळू रस्त्याच्या दुर कडेला सूर्य ही वर येऊ लागला होता. तसा तर तो रोजच या भस्कराचे दर्शन घ्यायचा, मात्र आज हा सूर्योदयसुद्धा त्याला नवखा भासत होता.

       

        एवढ्यात अचानक सूर्योदयाच्या दिशेने एक काळी सावली त्याला त्याच्या दिशेने येताना दिसली. ती जशी जशी जवळ येऊ लागली तसे त्याला जाणवले की ती एखादी तरुणी असावी. डोळ्यासमोर असणाऱ्या सूर्य प्रकाशाने तो तिला बघू शकत नव्हता त्यामुळे तो तिच्या जवळ येण्याची वाट बघत तिथेच रस्त्याच्या कडेला थांबला. काही क्षणातच ती तरुणी त्याच्यासमोर आली. तिचं रूप, साैंदर्य बघून श्याम जणू स्वतःला हरवून बसला होता.


          तिचे वाऱ्यावर उडणारे काळेभोर केस, तिचे बोलके डोळे, ओठ जणू गुलाब पाकळ्या, दुधाळ वर्ण, सडपातळ बांधा...तो अगदीच भारावून गेला होता. डोळ्यांच्या पापण्या न हलविता तो एकटक तिला न्याहाळत होता. तिच्याही ते लक्षात आले होते , आणि ती ही आपल्या नजरेचा एक कटाक्ष त्याच्या कडे टाकत, त्याला मागे सारत पुढे निघून गेली. मात्र श्याम अजूनही ती त्याच्या डोळ्यांच्या आड जात पर्यंत तिच्या पाठमोऱ्या देहाकडे बघत तिथेच उभा होता, जणू काही काळ वेळ थांबून गेला होता. इतक्यात भूकंप झाल्यागत तो हलला आणि भानावर आला...


श्याम : अरे यार!!! वेडी आहेस का..? कोणी एवढ्या जोराने  हलवत का कुणाला ????

शाल्मली : महाराज..... कुठल्या तंद्रीत..??? दहा मिनिटे झालीत तुला हाक मारत आहे. आणि काय रे..... एवढं टक लावुन त्या रस्त्याकडे काय बघत होतास...???

श्याम : (गालात हसत) काहीच नाही. चल निघू या.. नाही तर उशीर होईल ऑफिस ला जायला.

शाल्मली : जी जनाब.. जैसा आप कहे... आपका हुकम सरआंखोंपर...

श्याम : ओय...!!! फिल्मी...!!! चला आता..


       शाल्मली आणि श्याम हे दोघेही बाल मित्र मैत्रीण. दोघांचे वडील सुद्धा जिगरी दोस्त असल्याने दोन्ही कुटुंब एकच वाटत होते. श्याम आणि शाल्मली सुद्धा सोबतच मोठे झाले. शिवाय एकाच वयाचे असल्याने ते खूप जिवलग मित्र बनले होते. एकमेकांशिवाय दोघांचही पान हलायच नाही. त्यामुळे त्यांचे आई वडील सुद्धा त्यांना श्याम व श्यामी अश्या नावाने हाक मारायचे. ते एकमेकांचा आरसा होते. त्यांची मैत्री तर जगजाहीर होती. मैत्रीचा जर साधा विषयही कुठे निघाला तर मोठ्या अभिमानाने श्याम - श्यामी च नाव घेतल्या जायचं.

         

          श्याम एका मल्टी नॅशनल कंपनीत सॉफ्टवेअर इंजनिअर होता तर शाल्मली ड्रेस डिझायनर होती. तिचं स्वतःच बुटिक होत. दोघेही त्यांच्या त्यांच्या व्यवसायात अगदी निपुण होते. श्याम दिसायला एखाद्या हिरो सारखाच होता.. तशी शाल्मली ही कमी नव्हतीच मुळी. दोघांची जोडी खूप छान वाटायची. सोबत वॉकला जाणे, विकेंडला सोबत हिंडणे, सोबत शॉपिंग करणे.. दोघांनाही एकमेकांची जणू सवयच झाली होती.

(क्रमशः)


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance