DrSurendra Labhade

Romance Fantasy

4.0  

DrSurendra Labhade

Romance Fantasy

प्रेम अंतरीचे

प्रेम अंतरीचे

2 mins
172


           नयनपाकळ्या मिटवून जेव्हा माझे चक्षू झाकले जातात. तेव्हा तुझ्या आठवणींच्या विचारांचा कोंबडा आरवतो. आणि त्याचे मधुर स्वर प्रेमरूपी घोड्यावर स्वार होऊन माझ्या मणाच्या कर्णपटलांवर येऊन आदळळतात आणि मनाचे दरवाजे अलगद उघडले जातात. मनात लपलेली तुझी नाजूक प्रतिमा आनंदचा आळस देऊन जागी होते. आणि माझ्या मनमंदिरात हर्षाचा घंटानाद घनानू लागतो. मंदगतीने चालणारे हृदय सुद्धा तुझ्या आठवणींच्या मागे पळून जोराने धडाडू लागते. घेतलेल्या प्रत्येक श्वासासोबत तुझ्या आठवणींचा साठा हळू हळू वाढू लागतो. त्यात कधी असते तुझे लहान मुलांप्रमाणे खळखळणारे हास्य, तर कधी मुद्दामहून रागावलेला निरागस चेहरा, तर कधी अबोला धरून बसलेला तो गोंडस मुखडा. खरंच कितीतरी हे भाव माझ्या मनाचा ठाव घेऊ लागतात. मन ही माझ किती वेडं? कधी तुझ्या खळखळणाऱ्या हस्याकडे बघुन अगदी मनमुराद हसतं, तरी कधी अनेक सायास करून तुझ्या अबोला धरून बसलेल्या चेहऱ्याला बोलत करू बघतं. 
          अहोरात्र चालणाऱ्या मनाच्या ह्या लपंडावामधे तु अचानक कुठे लपून बसलीस तर मात्र श्वास थांबल्यासारखे होते. तुझ्या येण्याने एकेकाळी धडाडू लागणाऱ्या हृदयातच धडकी भरू लागते. तू हरवलीस की लपून बसलीस हे शोधण्यासाठी मन मेंदूपर्यंतचा प्रवास वारंवार करू लागते. आणि ह्या प्रवासात तु पुन्हा ढंगाआडून येणाऱ्या सूर्यकिरणांप्रमाणे अचानक दिसते. डोक्यात उसळणारे अनेक प्रश्न टपटप पडणाऱ्या गारांप्रमाणे तुझ्यापुढे मांडू लागतो. कुठे होतीस? काय करत होतीस? लपून बसली होती तर इतक्या वेळ का? घाईने मुखावाटे पडणाऱ्या ह्या प्रश्नांला मेंदुत विणल्या जाणाऱ्या रागाची झालर लागते आणि मृदू असलेले शब्द बोथट होऊन बाहेर निघू लागतात. या सर्व गोष्टीमधे तुझ्या हळव्या मनाला नकळत त्रासही होतो. परंतू त्यामध्ये मी द्वेषाचा साधा दृष्टिक्षेप देखील पडू देत नाही. आपल्या प्रेमरूपी शब्दांना भांडणांचा दोरा लावून अबोलतेचा पतंग मला उडवायचा नसतो. अविश्वासाचे सारे खड्डे बुजवून प्रेमरूपी रथावर कमलपुष्पाप्रमाणे तुला बसवायचं आहे आणि विश्वासाचा भृंगराज होऊन नेहमीच तुझ्या सानिध्यात राहून त्या प्रेमरूपी रथाचा सारथी व्हायचं आहे. पूर्वेकडून उगवणाऱ्या त्या सूर्याप्रमाणे चिरंतन आणि चिरकाल…

𝕯𝕾


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance