#फुलले नाते प्रेमाचे... भाग 1
#फुलले नाते प्रेमाचे... भाग 1
"आई किती वेळा सांगू मला त्या गावडळ मुलीशी लग्न करायचं नाही...!माझं प्रेम आहे अर्चनावर लवकरच तिला मी सांगणार आहे. राकेश रागानेच आईशी बोलत होता.
मी हे लग्न होऊन देणार नाही. मी बघितलेल्या मुलीबरोबरच तुला लग्न कराव लागल. अर्चनाबरोबर तुझा संसार होवूच शकत नाही. ती आपल्या घराला कधीच सांभाळून घेऊ शकत नाही.
"माझ्या राज्या ऐक माझं सोडून दे त्या पोरीचा नाद....
आपलं घर उद्धवस्त करून टाकेल ती...! मी तिची चौकशी केलीये. कोणीही तीला चांगलं म्हणत नाही. तिच्या सौंदर्यावर भाळू नकोस मन निर्मळ हवं रे. मी तिला चांगलीच जवळून ओळखते.
राकेश काही न ऐकतच रागानेच दार आपटून बाहेर चालला होता. त्याच्या आईला म्हणजे सुमतीबाईं चक्कर येऊन खाली पडल्या. आवाजाने राकेश आई आई करत पुन्हा माघारी आला. आई उठना,"
तू म्हणशील तसं करेन पण तू उठ. फॅमिली डॉक्टरांना राकेशने फोन करून घरी बोलावले. कामानिमित्त राकेशचे बाबा बाहेर गेले होतें. राकेश घरी आईजवळ एकटाच असल्याने त्याला भीती वाटत होती.
डॉक्टरांनी सुमितीताईना चेक केले. काही गोळ्या लिहून दिल्या. राकेशला सांगितले त्यांच्या डोक्याला काही ताण येईल असं बोलू नका. या गोळ्या वेळेवर द्या. थोड्याश्या मानसिक त्रासामुळे त्यांना चक्कर आली. घाबरण्यासारखं काही नाही. डॉक्टर निघून गेले.
सुमतीताईना थोड्या वेळाने जाग आली. राकेश त्यांच्या पा्याजवळच बसला होता. आईला जाग आलेली पाहून त्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. आई माझं चुकलं ग...!
"तू म्हणतेस तिच्याशी मी लग्न करायला तयार आहे. तुला वचन देतो. तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस.
रामभाऊ राकेशचे बाबा तिथं आले. त्यांना काय झालंय काहीच कळत नव्हते.
त्यांना पाहून सुमितीताई उठून बसल्या.
सुमती काय झालं...? रामभाऊ म्हणाले.
काही नाही चक्कर आली होती. आता बरं वाटतंय मला...!
चल दवाखान्यात जाऊया...
त्याची काही गरज नाही,"राकेश म्हणाला. मी फॅमिली डॉक्टरांना बोलावलं होत.काही काळजी करण्यासारखं नाही म्हणून सांगितलं त्यांनी.राकेश तिथून त्याच्या रूममध्ये निघून गेले.
राकेश एककीकडे आई आणि दुसरेरीकडे अर्चना दोघींमध्ये फसला होता. राकेशच एकतर्फी प्रेम असल्याने अर्चणालाही राकेशच्या प्रेमाबद्दल माहित नव्हतं.अर्चनाला राकेशची आई चांगलीच ओळखत होती.
त्यांचही तसं बरोबरच होत म्हणा....!तिला ना कसली शिस्त...! ना संस्कार....! तिच्या आईबाबांची लाडाची एकुलती एक मुलगी होती ती. सौंदर्य आणि शिक्षण याचा तिला खूपच घमेंड तिला. कोणालाही आदर देणारी नव्हती ती.
सुमितीताईनी बघितलेली मुलगी साधी, सरळ होती. पारू तिचं नाव लहानपणापासूनच तिच्या आईबाबांचं छत्र हरपल्याने मामामामीच्या सहवासात लहानाची मोठी झाली. पारू नावाप्रमाणेच देखणी होती. उंच, गोरीपाण, आकर्षक शरीरायष्टी पाहताच तिला कोणीही पसंद करेल.
राकेशच्या घरचे पारूच्या घरी तिला पाहण्यासाठी गेले. राकेशने साधं तिच्याकडे तोंडवर करून पाहिले ही नाही. त्याच्या आईबाबांना पारू पसंद होती. आई ने राकेशला मुलगी पसंद आहे का विचारताच त्याने तुला आहे ना पसंद असं म्हणाला...!
राकेशच बोलणं जास्त मनावर न घेता आईने सरळ लग्नाची बोलणी करून लग्नाची तारीख पक्की करून टाकली. त्याचे आईबाबा खुश होऊनच तिथून निघाले. राकेश मात्र बळजबरीने सगळं सहन करत होता.
काही महिन्यात राकेश आणि पारूच लग्न धुमधडाक्यात पार पडलं. पारूचा गृहप्रवेश होऊन लक्ष्मीच्या पावलांनी पारू आली. सुमतीताईना मनासारखी सून मिळाल्याने त्या खूप खुश झाल्या होत्या. राकेशचे मनाविरुद्ध लग्नामुळे चेहऱ्यावरचे रंगचं उडाले होतें.
राकेश आणि पारुची लग्नानंतरची पहिलीच रात्र होती. कितीतरी सुखी संसाराची स्वप्नं ती पाहत होती. राकेश तिथं रागानेच आला. त्याच्या मोठया आवाजात बोलण्याने ती घाबरतच उठली.राकेशने तिला कठोर शब्दात सुनावलं."हे लग्न मी आईच्या खुशीसाठी केलं आहे. माझं अर्चना नावाच्या मुलीवर प्रेम आहे. त्यामुळे तुला मी बायको म्हणून नाही स्वीकारू शकत....! ही मी आईसाठी केलेली तडजोड आहे. जगासाठी आपण फक्त नवरा बायको आहोत. घरात नाही हे लक्षात ठेव.
माझ्याकडून कोणत्याही गोष्टीची अपेक्षा करू नकोस. माझ्याकडून तुला कधीच प्रेम मिळणार नाही. पारूला हे सगळं ऐकताच डोळ्यातून अश्रू वाहू लागले. "किती संसाराची स्वप्नं ती उराशी बाळगून आली होती,आणि एका क्षणात ती स्वप्ने चकाचूर झाली होती,पण ती हार मारणाऱ्यातील नव्हती. ही लढाई तिने लडायचं ठरवलं. राकेश त्याचा बिछाना घेऊन तो खाली झोपला. रात्रभर ही मात्र त्याच्या बोलण्याने तळमळत होती. झोप तर येत नव्हतीच तिला. तो मात्र तीला रडवून बिनधास्त झोपला होता.
क्रमश.....
कथा आवडल्यास तुमचा अभिप्राय नक्की कळवा.
