Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Sangieta Devkar

Romance Tragedy


4.0  

Sangieta Devkar

Romance Tragedy


फिर भी तुमको चाहुँगा (भाग 2 )

फिर भी तुमको चाहुँगा (भाग 2 )

7 mins 545 7 mins 545

अपूर्वा रुबी हॉस्पिटलमध्ये जॉईन झाली आहे उद्या आपण तिला भेटू. सकाळी ते दोघे रुबी हॉस्पिटल ला निघाले आशुतोष ला कधी एकदा अपूर्वा ला पाहतो असे झाले होते. तुषार ने विचारले आशु आता का भेटायचे आहे तुला अपूर्वा ला आणि असा अजून एकटाच किती दिवस राहणार आहेस ती तिच्या आयुष्यात पुढे निघून गेली. तुषार नाही माहीत मला पण खूप आठवन येत होती अपूर्वा ची अगदी मनातून आतून काहीतरी वाटत होते तिला भेटायची ओढ लागली आहे का ते नाही माहीत आशु म्हणाला.तुषार म्हणाला,कारण तू अजून ही तिला विसरला नाहीस तिचाच विचार सतत करतोस आशु जा विसरून सगळं नव्याने आयुष्याला सुरवात कर . तुषार आय कान्ट मी जिवापाड प्रेम केले रे कसा विसरू तिला आज ही पहिल्या इतकच तिच्या वर प्रेम करतो मी आशु बोलला. ते रुबी ला पोहोचले,दोघ ही डॉक्टर असल्या मुळे त्यांना कोणी अडवले नाही . रिसेप्शनला त्यांनी अपूर्वा ची चौकशी केली तेव्हा ते म्हणाले डॉ आता जरा बिझी आहेत कालच इथे कोरोना पेशंट साठी एक वॉर्ड तयार केला आहे मॅडम त्या पेंशट ना चेक करत आहेत थोडा वेळ थांबावे लागेल. ओके म्हणत आशुतोष आणि तुषार तिथे बसून राहिले.आशु ला आठवले त्याची आणि अपूर्वा ची शेवटची भेट तेव्हा ते दोघ सुट्टी असल्या मुळे सिंहगडावर गेले होते अपूर्वा आशु ला घट्ट पकडून बाईक वर मागे बसली होती मस्त थंडगार हवा होती खूप रोमँटिक वाटत होत तिला आशु सोबत ,ती त्याचा कान ओढ कुठे केसांना हात लाव अशी मस्ती करत चालले होते ते हा प्रवास संपूच नये असे आशु ला वाटत होते. अपूर्वा नेहमी आशु सोबत असताना चेहऱ्याला स्कार्फ बांधत असे पण आज इकडे सिंहगड आऊट साईड ला कोण मला बघणार असे समजून नेमका आज तिने स्कार्फ बांधला नवहता आणि नेमके तिच्या एका नातेवाईकांने तिला आशु सोबत बाईक वर पाहिले आणि तिच्या घरी सांगितले.


संध्याकाळी अपूर्वा घरी आली तेव्हा तिचे वडील खुप रागात होते त्यांनी तिला विचारले ,अपूर्वा कोणा सोबत तू सिंहगड ला गेली होती. ती म्हणाली,आम्ही मैत्रिणी मिळून गेलो होतो सांगितले होते मी. ती खोटे बोलत आहे हे पाहून तिचे वडील अजूनच चिडले म्हणाले एका मुला सोबत बाईक वर गेली होतीस खरे आहे का ? आता अपूर्वा ला खरे सांगणे भाग होते तिने आशु बद्दल सांगितले तसे तिचे वडील म्हणाले,अपूर्वा खूप कष्टाने आम्ही तुला एम बी बी एस चे शिक्षण देत आहोत हे तू विसरलीस का? तुझे स्वप्न सर्जन बनण्याचं आहे असे प्रेमाचे चाळे करत बसशील तर काही ही हाती लागणार नाही. पण बाबा आशुतोष चांगला मुलगा आहे अपूर्वा बोलली. हे बघ अपूर्वा तुला एक तर शिक्षण घेता येईल किंवा त्या मुला सोबत राहता येईल. काय निर्णय घ्यायचा तो तू ठरव. आमच्या पेक्षा तो मुलगा जवळचा असेल तर तू जाऊ शकतेस. अपूर्वा फक्त रडत होती तिला माहीत होते घरची परिस्थिती नसताना ही तिला हे उच्च शिक्षण मिळत होते त्या आई वडीलां चे कष्ट ती कशी विसरू शकेल? मग तिने आशु पासून दूर जाणयाचा निर्णय घेतला . आपल्या स्वप्ना साठी आई बाबां साठी तिने आशु शी असलेले नाते कायम चे तोडले. आशु ने ही खूप समजावले तिला म्हणाला होता मी तुझ्या आई बाबांना भेटतो त्यांना समजावतो पण अशी साथ सोडून जाऊ नकोस. पण अपूर्वा म्हणाली होती हे शक्य नाही आशु प्लिज मला विसरून जा. पण आशु आज ही तिच्या प्रेमात होता तिला विसरणं त्याला शक्य न्हवत. पुढे दोघ ही सर्जन झाले आशु ने स्वहताला कामात इतके गुंतवून घेतले की इतर जगाशी त्याचे जणू काही संबध नाहीच. कामा निमित्त किंवा तुषार ला भेटायला तो पुण्याला यायचा पण अपूर्वा ला कधी ही भेटायचा प्रयत्न केला नाही कारण तिने तसे वचन त्याच्या कडून घेतले होते पण आता त्याला तिला भेटावेसे वाटत होते कदाचीत नियती च्या मनातच हे होते म्हणून तिच्या ओढी ने आशु पुण्यात आला होता. जेंव्हा आपण एखाद्यावर जीवापाड प्रेम करत असतो तेव्हा काहीतरी त्या व्यक्ती सोबत घडणार असे काही से संकेत नियती आपल्याला देत असते. आपली भेट सुद्धा नियती घडवून आणते. अर्ध्या तासा नन्तर वॉर्ड बॉय ने आशुतोष ला मॅडम त्यांच्या केबिन मध्ये आहेत तुम्ही भेटू शकता असा निरोप दिला. अपूर्वा ला तिला भेटायला कोणीतरी आले आहे इतकच समजलं होत. तुषार म्हणाला,आशु तू जा आणि भेट अपूर्वा ला मी इथेच थांबतो. ओके म्हणत आशुतोष तिच्या केबिन कडे गेला .


केबिन च्या बाहेर तिच्या नावाची पाटी होती डॉ . अपूर्वा देशमुख एमडी . आशुतोष तिच्या केबिन चा दरवाजा उघडून आत गेला त्याला पाहून अपूर्वा आश्चर्यचकित झाली म्हणाली,आशु तू इथे ? हो अप्पू कशी आहेस तू ? मी ठीक तू बस ना ती म्हणाली. आशु तिच्या समोर बसला. अपूर्वा म्हणाली,आज इकडे कसा काय काही काम होते का? आशु-- काम नाही पण तुझी खूप आठवण येत होती म्हणून आलो खास तुला भेटायला. अपूर्वा -- आशु आता आठवण येऊन काय उपयोग ? माझा मार्ग वेगळा तुझा वेगळा अजून तू तिथेच थांबला आहेस का? आशु-- हो अपूर्वा मी आज ही तुझ्यावर तितकंच प्रेम करतो. तू लग्न केलेस का? अपूर्वा -- नाही रे घरची परिस्थिती तर तुला माहीतच आहे ना अजून भावाचं शिक्षण पूर्ण व्हायचं आहे त्याला सेटल करायचं आहे . यात माझा विचार मी सुद्धा नाही करू शकत. आशुतोष -- अपूर्वा एकदा भेटशील का मला बाहेर, मी कोल्हापूर ला जाण्या आधी? अपूर्वा-- आशु आता भेटण्याला काय अर्थ आहे काहीच उरलं नाही रे आपल्यात!! म्हणजे तू मला विसरून गेली आहेस अपूर्वा त्याने विचारले. तसच काहीसं समज आता खूप पुढे निघून आलेय मी प्लिज आशु तू पुन्हा मला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करू नकोस आयुष्यात पुढे जा मागे काही ही उरले नाही अपूर्वा म्हणाली. आशु म्हणाला,ठीक आहे अपूर्वा मी पुन्हा तुला कधी ही भेटणार नाही ही आपली शेवटची भेट समज बाय अँड टेक केयर म्हणत आशु केबिनच्या बाहेर पडला. अपूर्वा चे डोळे भरून आले होते मनावर दगड ठेवून ती आशूला बोलली कारण यातून काहीच आता साध्य होणार नवहते. आशुतोष पुण्याहून निघाला. चार दिवसांनीं तुषार चा कॉल आला म्हणाला,आशुतोष अरे अपूर्वा ला कुठल्या तरी खेड्यात पाठवले आहे कारण तिथे डॉक्टर्स कमी पडत आहेत आणि कोरोनाचे पेशंट वाढत आहेत. पण मला ही भीती वाटते की त्या खेड्यात अपूर्वा किती सेफ असेल तिथली व्यवस्था कशी असेल हा ना तुषार काय करू शकतो आपण या परिस्थितीत? सगळी कडे हे रुग्ण वाढत चालले आहे होप फॉर बेस्ट . अपूर्वा घेईल स्वहताची काळजी असे म्हणत आशु ने फोन ठेवला. असाच एक आठवडा गेला सगळीकडे कोरोनाची न्युज ,पूर्ण संचारबंदी होती लोक घरात बसून होते सगळं शांत. आशुतोष मात्र हॉस्पिटल ला येत असे कारण अत्यावश्यक सेवे मधये त्याच काम मोडत होत. खूप काळजी घ्यावी लागत होती. आज आशु खूप दमला होता खूप पेशंट हॉस्पिटलमध्ये आले होते गर्दी होती नुसती त्यामुळे काम खूप होत. रात्री तो जेवून झोपला आणि मध्येच त्याला जाग आली आशु आशु बघ मी आलेय तुला भेटायला असा आवाज त्याला ऐकू आला. आशु झोपेतुन जागा झाला पुन्हा त्याला आवाज आला आशु मी अप्पू अरे तुला भेटायचं होत ना बघ मी आले . आशु डोळे चोळत पाहू लागला त्याला विश्वास बसेना त्याच्या समोर अपूर्वा बसली होती आशु म्हणाला,अप्पू तू इथे कशी कधी आली तू. ती म्हणाली अरे आताच आले तुला भेटून जावे म्हणून. आशु ने तिचा हात आपल्या हातात घेतला म्हणाला,अपूर्वा मी नाही जगू शकत तुझ्या शिवाय आपण लग्न करू तुझ्या आई वडीलांना मी भेटतो आता ते नाही म्हणणार नाहीत. माझं खूप प्रेम आहे ग तुज्यावर. हो आशु पण आता खूप उशीर झाला रे आता नाही आपण एकत्र येऊ शकत मी चालले आशु काळजी घे स्वहताची असे म्हणत अपूर्वा अचानक दूर दूर जात नाहीशी झाली. अपूर्वा असे मोठ्याने आशु ओरडला त्याने पटकन लाइटस लावले पण तिथे कोणीच नवहते. त्याला ते स्वप्न पडले होते . पाणी पिऊन आशुतोष झोपण्याचा प्रयत्न करू लागला पण अपूर्वा ची खूप आठवण येत होती त्याला ते स्वप्न सारख आठवत होते.


सकाळी तो नेहमी प्रमाणे हॉस्पिटल ला गेला. थोड्याच वेळात त्याला तुषार चा कॉल आला. हॅलो आशु ऐक एक बॅड न्युज आहे. काय झाले तुषार सांग पटकन आशु म्हणाला. आशु अपूर्वा आपल्याला कायमचे सोडून गेली शी वॉज नो मोअर तुषार बोलला. व्हॉट ? तुषार डोकं फिरले काय तुझे काय पण काय बोलतोस? हो आशु हे खरे आहे ती ज्या खेड्यात गेली तिथे तिला कोरोनाची लागण झाली पण यात ती वाचू नाही शकली. तुषार म्हणाला. आशु ने कॉल ठेवला आणि अप्पू असे कसे झाले म्हणूनच तू काल माझ्या स्वप्नात मला भेटून गेलीस असे म्हणत आशु रडत होता तितक्यात डॉ मीरा केबिन मध्ये आली तिने पाहिले आशु रडत आहे ती म्हणाली,सर काय झाले तुम्ही का रडत आहात? तसा आशु म्हणाला,मीरा माझी अप्पू मला कायमचे सोडून गेली ग मी नाही राहू शकत तिच्या शिवाय. सर काय झाले नीट सांगा मला. तसे आशुतोष ने मीरा ला थोडक्यात अपूर्वा बद्दल सांगितले आणि पुन्हा रडू लागला तसे मीरा ने आशु ला धीर दिला. ती मायेने त्याच्या डोक्यावरून हात फिरवत राहिली. आशु म्हणाला,मीरा अपूर्वा माझी कधीच न्हवती का ग का देवाने असे तिला न्यावे ? तिची चूक काय होती ती तर त्या कोरोनाच्या रुग्णांना बरे करण्यासाठी गेली होती ना मग देवाने तिच्यावरच असा घाला का घातला असे म्हणत आशु रडतच होता . मीरा ला हे पाहून खूप वाईट वाटत होते तिच्या डोळयात ही अश्रू आले ती म्हणाली,सर चांगली माणसे देवाला ही आवडतात . त्याच्या पुढे आपण हतबल आहोत आणि काही प्रश्नांची उत्तर आपल्याला कधीच मिळत नाहीत . प्लिज सांभाळा स्वहताला. पण आशु चे अश्रू थांबायचे नाव घेत नव्हते. मीरा ला आज समजले होते की का आशुतोष स्वतःच्या कोषातच राहत होता ? आता ती फक्त त्याच्या दुखावर फुंकर घालू शकत होती . अपूर्वा च्या जाण्याचे दुःख फक्त आणि फक्त आशुतोषच जाणत होता...    (समाप्त) 


Rate this content
Log in

More marathi story from Sangieta Devkar

Similar marathi story from Romance