पहिलं प्रेम
पहिलं प्रेम


काय झाले असे अचानक जीवनामध्ये,
मनं अंत:करणामध्ये दंग होऊन गेले,
पाहता तुझे रूप ते समोर गोजिरवाणे,
नयन माझे हरवून गेले..
पाहता तुज हृदय माझे भारावून येते,
काय आहे अशी जादू तुझ्या मध्ये,
पाहता तुझ माझ मन वेडावून जाते,
सांग काय अशी भ्रांती तुझ्या नयनांमध्ये..
रोज आस असे तुझं प्रेमळ रुप पाहण्याची,
पण काय असं घडतं ते समजतच नव्हतं,
असा काय खेळ मांडला होता तो नियतीने,
ते कोड कधी संपणारच नव्हतं...
अचानक तू परत समोर आलीस,
मन माझं तुझ्यात हरवून गेलं,
पण काहीच न बोलताच निघून गेलीस,
ते मात्र हृदयाला टोचून गेलं....