STORYMIRROR

SHUBHAM GHUDE

Others

4.8  

SHUBHAM GHUDE

Others

हरवलेलं जीवन

हरवलेलं जीवन

2 mins
474


खूप साऱ्या दिवसातून बघायचे झाले तर , असे खुप सारे वर्ष निघून गेले. पण आपण काय करायचो, आपण कसे जीवन जगत होतो. हे सर्व गोष्टी आपण आपल्या धावपळीच्या जीवनामध्ये विसरून गेलो आहोत. पण खरंच आता आपण जीवन जगतो, ते खरंच आपल्याला आनंद देणारे, तसेच रमणीय करून टाकणारे आहे का? या गोष्टींचा आपण कधी विचार केलाच नाही.

असे खुप सारे प्रश्न माझ्या मनामध्ये निर्माण होत होते. खरंतर बघायचं झालं तरी या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याकडेच होती. पण आपण ती कधी शोधण्याचा प्रयत्न केला नाही . खरंच आपण ज्यावेळी लहान होतो ते गावाकडचं जीवन खरंच अतिशय रमणीय , हसमुख आणि अनेक पद्धतीने भरून गेलं होतं, काय ते सुख होत. आपल्या गावांमध्ये काय माणसं होती जिवाभावाची, एकमेकांच्या सुख दुःख मध्ये नेहमी सर्वांच्या सोबत असणारे . पण आता आपण जीवन जगतो त्यामध्ये हा कोणत्याच गोष्टी दिसत नाही. माणसाकडे जसजसं पैसे वाढायला लागले, तस तसा माणूस गावापासून दूर होत गेला. पण त्याला ही गोष्ट समजली नाही आपण गावातून नाही, तर आपल्या जीवनातून दूर जात चाललो आहे. ज्या मातीमध्ये आपण लहानाचा मोठा झालो, त्याच मातीला विसरु गेलो.

गावामध्ये पूर्वी

, आपण सर्वजण एखादा सण म्हणजे प्रत्येकाच्या मनामध्ये आनंद , उत्साह निर्माण करणारा असायचा. सर्व लोक गुण्यागोविंदाने, आनंदाने सर्वजण सहभागी होऊन अतिशय छान पद्धतीने रमणीय होऊन जात. पण आता आपण जीवन जगतो त्यामध्ये या कोणत्याच गोष्टी दिसत नाही. बघायचं झालं तर आपण अशा आपल्या जीवनामध्ये खूप सर्व गोष्टी विसरलो आहेत. पण त्या गोष्टी आपण विसरून चालणार नाही . या गोष्टींचा विचार सर्वांनीच केला पाहिजे, त्याच गोष्टी मध्ये आपल्याला खऱ्या अर्थाने आयुष्य म्हणजे काय,हे जगायला शिकवतात .माणुसकी काय असते, हे आपल्याला शिकवते. पैशाने तुम्ही सर्व विकत घेऊ शकता ,ही तुमची मानसिकता बनली आहे ती फार चुकीची आहे. या मानसिकतेला बदलण्यासाठी आपण जे हरवलेलं जीवन आहे त्याच पद्धतीने जीवन जगले पाहिजे.

पूर्वी आपल्याकडे मोबाईल, दूरदर्शन यांचे प्रमाण फारच कमी होते . तर सर्व गावातील मुलं एकत्र येऊन अतिशय आनंदाने विविध खेळ खेळायचे. यामधूनच एकतेच दर्शन घडत. आता बघायचं झालं तर , आपण त्या मोबाईलच्या फारच आहारी गेलो आहोत. त्यामुळे आपण आपल जीवनच विसरून गेलो. हे कुठेतरी बदलला पाहिजे सर्वांनी या गोष्टींचा विचार करण्याची वेळ आता आलीच आहे......


Rate this content
Log in