लॉकडाऊन दिवस-२१
लॉकडाऊन दिवस-२१
पहाटेच लवकरच जाग आली. बघायचं झालं तर, त्या एक प्रकारे योग्य होतं. खरं आज सर्व प्रश्नांची उत्तरे भेटणार होती . पुढची दिशा समजणार होती. काय पुढे होणार हे, सर्व चित्र स्पष्ट होणार होतं. सर्व आवरून झाल्यानंतर, चहा पीत असताना दूरदर्शन चालू केलं. त्यावेळी बातम्याना पंतप्रधान लाईव्ह होते. पंतप्रधानांनी सर्वांनी जे काही केलं, त्याचं कौतुक केलं . 20 दिवसांमध्ये मात्र आपण त्या विषाणूला रोखून धरलं होतं. आतासुद्धा त्याचे पुढचे काही दिवस आपल्याला पुन्हा, त्याच पद्धतीने त्याला हरवायचं होतं म्हणून पंतप्रधानांनी पुढचे काही दिवस आणखी लॉक डाऊन घोषित केलं.
हे बघताच माझ्यासमोर काही विचित्र चित्र यायला लागले .आपल्या गावांमध्ये असे खुप सारे लोक आहेत, ज्यांना खायला काही मिळत नाही. आता तर लोक डाऊन अजून वाढला आहे. तर त्यांचं काय होणार हे सर्व गोष्टींचा विचार करत असताना. मी आणि माझ्या काही सहकाऱ्यांनी अशा सर्व लोकांना मदत करण्याचे ठरवले. त्याप्रमाणे कामाला सुरुवात केली. जीवनावश्यक वस्तू गोळा करण्यास सुरुवात करून, त्यांचा एका ठिकाणी साठा केला आणि प्रत्येक गावांमध्ये त्या लोकांना अत्यंत गरज आहे अशा लोकांना त्या सर्व गोष्टी वाटण्यास सुरुवात केली. खरंच हे सर्व करत असताना त्यांच्या चेहऱ्यावर जो भावनिक आनंद दिसत होता त्याचं मोल फार मूल्यवान होतं.