लॉकडाऊन दिवस-१४
लॉकडाऊन दिवस-१४


सध्याच्या परिस्थितीचा आढावा घ्यायचा झाला तर लॉक डाऊन सुमारे आता दोन आठवडे झाले होते. परिस्थिती काही नियंत्रणात येत होती. तर दुसरीकडे पुन्हा काळजी वाढत होती. बघायचं झालं तर सर्व जगामध्ये त्या विषाणूशी लढा देण्यासाठी लागणारी सामग्री, औषध आणि विविध गोष्टी जास्त आवश्यक आहेत त्या गोष्टींचा तुटवडा भासत होता.
यावर मात करण्यासाठी खूप सारे लोक, कंपनी आपापल्या परीने खूप असं मोलाचं योगदान देत होते. हीच तर एक आपल्यासाठी अतिशय आनंददायी, प्रेरणादायी आणि एक प्रकारची लढण्याची जी धम्मक आपल्यामध्ये आहे या मधून स्पष्टपणे दिसत होती. खरंतर हे यश सर्व भारतवासीयांचं होतं. कारण ही एकता फक्त आपल्या देशामध्ये पाहायला मिळते अतिशय योग्य असं शस्त्र आपल्याकडे होतं.
आपल्या देशाची ती संस्कृतीच आहे. सर्वजण सर्वांना अत्यंत अशा गरजू लोकांना पाहिजे ती मदत सर्वजण आपापल्या परीने करत होते. फक्त आता आपल्याला एकच गोष्ट करायची होती. ती म्हणजे गर्दी न करता, आपल्याला जे काही अत्यावश्यक सेवांसाठी बाहेर जायचं असेल तर सोशल डिस्टरसिंग पालन करूनच करायचा आहे. आपण एक छोटीशी गोष्ट जरी केली परंतु त्यामधून जो रिझल्ट येणारा असेल तो फार मोठा असेल.....