लॉक डाऊन दिवस-१७
लॉक डाऊन दिवस-१७
खरंतर आता बघायचं झालं तर परिस्थिती हळूहळू बिकट होत चालली होती. कारण आता संकटच एकामागून एक उद्भवत होता. लॉकडाऊन फटका आता खूप सार्या कामगारांना बसू लागला. आता हे सर्व मजूर त्यांच्या गावी परत जाण्यासाठी कोणत्या ना कोणत्या मार्गाचा उपयोग करून गावी जाण्याचा प्रयत्न करत होते.
खरंतर ही अतिशय अशी भयानक परिस्थिती उद्भवली होती. पण तरीसुद्धा या परिस्थितीत आपण भक्कम पणे, मुकाबला केला पाहिजे . सरकारने दिलेल्या आदेशांचं पालन केले पाहिजे पण एक पद्धतीने बघायचे झाले तर त्यांचा देखील बरोबर होतं. जेवणासाठी काय भेटत नव्हते, कुठे राहायचं असे असंख्य प्रश्न त्यांच्या मनामध्ये होते.
खरंतर राज्य सरकारने देखील, या अशा सर्व गरजू लोकांची जबाबदारी घेतली होती. विविध सामाजिक घटना, असे अनेक प्रतिष्ठित व्यक्ती अशा अनेक खूप सारे मदतीचे पुढे हात या लोकांसाठी येत होते. आता या लोकांनी थोडसा धीर धरायचा एवढच, मला माहित आहे हे खूप भयानक असलं तरीही आपण याला जिद्दीने सामोरं जाणाऱ्या मधले आहोत.
आता आपली सर्वांची जबाबदारी होती. आपल्या परीने होईल तेथे आपण खारीचा वाटा म्हणून, आपल्या देशासाठी, आपल्या राष्ट्रासाठी, आपल्या मातृभूमीसाठी देण्याची योग्य वेळ हीच आहे.........